हम-तुम भाग 2

hi

दोघे पण क्लासरूमकडे निघतात, कॉरिडॉर मध्ये जाताना सगळ्या मुलीची नजर त्याच्यावरच असते, सगळ्या नवीन   ऍडमिशन असणाऱ्या मुली तर जागेवरच उभ्या राहून त्याच्या   व्यक्तिमत्त्वाकडे पाहून मंत्रमुगध होतात.स्नेहा तर मोठे डोळे करून त्याच्याकडेच पाहत  असते तनु कॉउंटरवर चौकशी करत असते आणि स्नेहाकडे पेन मागत असते

 तनु :“अगं  स्नेहा केव्हापासून तुझ्याकडे  पेन मागतीये ,लक्ष कुठंय तुझं बावळट ? तनु स्नेहला जोरात चिमटा काढते.

स्नेहा : “औच ,अग  कशाला मला चिमटा काढलास ग ? कसल दुखतंय ग

”तनु : “मी कधीपासून तुला पेन मागतीये आणि तू समाधी लावूंन बसलीये दिवसाढवल्या,दे ते पेन इकडे” 

स्नेहा :“अग तन्वी तू काय पेनच घेऊन बसलीये, तो बघ कसला  हॉट अँड हॅंडसम आहे”.”एकदम भारी यार” माझी तर विकेटच गेली यार ...मार  डाला

तनु  मानस कडे पाहून डोक्याला हात लावते आणि स्नेहा ओढत क्लासला नेते ,मानस कडे पाहून न बघितल्यासारखं करते .तनु :“माझ्या ह्रितिक पेक्षा नक्कीच खूप कमी आहे स्नेहा, तु पण ना कोणावर पण लगेच लट्टू होते यार” .मानस ते ऐकून हळूच हसतो,पण तनु  जाताना एकदा मागे वळून पाहते आणि तिची आणि मानस  ची नजरानजर  होते ,मानस तर तिच्याकडे बघतच राहतो तिचे सुंदर बोलके डोळे पाहून तो तर त्यात हरवून जातो ,कानावर आलेल्या बटा मागे करत असताना तिची कोरीव नखे ,गुलाबी ओठ ,छोटस आणि सुंदर नाक  आणि  कातिल स्माईल ,आलेला जस्मिन  पर्फुमचा  सुगंध ,त्यामध्ये तो हरवून जातो (मागे वोइलॉन वाजण्याचा भास होतो त्याला आणि तो स्माईल करतो)मागून विनय त्याची मज्जा बघत असतो. तो जवळ येऊन बोलतो 

विनय : भावाची विकेट गेली वाटत?? अरे कोई गिटार नहीं, तो ढोल ताशे बजाओ यार...

मानस : “गप रे काय पण काय चालू असत रे तुझं .दुसरी काही काम नाही वाटत” ,जा ते जोशी मॅडम ने बोलावलंय त्यांना भेट आधी..रिकामटेकडा कुठला .

विनय :“बर बाबा,  जातो मी ,पण माझ्यापासून काही लपवू नको भावड्या” .लव्ह अट  फर्स्ट साईट ,,लव्ह गुरु मत सिखा  बेटा. मानस  मनात तर खूपच भारी  फील करतो  आणि निघून जातो . इकडे तनु आणि मानसी कलासरूम मध्ये  आत जातात .क्लासमध्ये सगळे नवीन असतात त्यामुळे सगळे एकमेकांशी ओळख  करून घेत असतात ,दोघी आत आल्यावर सगळी मूल तन्वीकडे बघत राहतात .तन्वी दुर्लक्ष करून बेंचवर  जाऊन बसते ,तिला ह्याची सवयच झाली असते .. प्रोफेसर  क्लास मध्ये येतात आणि सगळे स्टुडन्ट त्यांना गुड मॉर्निंग  विश  करतात. प्रोफेसर कुलकर्णी  सगळ्यांना कॉलेज ची ओळख करून देतात आणि सगळ्यांना  डिटेल्स विचारतात . जुजबी ओळख झाल्यानंतर ब्रेक होतो.क्लास मधली मुलं  तन्वी कडे ओळख करून घ्यायला जातात ..तन्वी थोडस  बोलून स्नेहाबरोबर   कॅन्टीन  निघून जाते.

स्नेहा:“काय ग तन्वी ,किती भाव खातेस ते आपले क्लासमेट कसली लाइन मारत होते तुझ्यावर आणि तू एकाला पण भाव दिला नाहीस.” 

तन्वी:“अरे जानेमन ..चिल यार अगं स्नेहा माझ्यासाठी कोणी तरी एकदम खास  बनवलाय देवाने ,एक दिवस नक्की मी कुणाच्या तरी प्रेमात पडेल आणि त्यादिवशी नक्की तुला सांगेन,स्नेहा मला माहिती आहे कि मी सुंदर आहे म्हणून हि मुलं  माझ्या  मागे मागे करतातं .पण तुला खर सांगू का , बाह्यसौन्दर्य हे कालानुरूप निघून जात ग,मला खरच माझ्या मनावर ,विचारांवर  प्रेम करणारा साठी हवा आहे ग कळलं” 

स्नेहा :“बापरे  हे तर एकदम गंभीर आहे ,धन्य आहात तन्वी मॅडम तुम्ही, माते ह्या पामराला क्षमा असावी ,आता जरा पोटाचं पाहता का? कावळे पोटात ओरडून ओरडून  मेले वाटत”

🎭 Series Post

View all