हम-तुम भाग -17

HI

मागील भागात आपण पाहिलं कि प्रेमात पडल्यावर सगळ्यांमध्ये बदल होतात ,पण हे होणारे बदल फॅमिलीमध्ये आईला लगेच जाणवतात,आणि आपल्यातील बदल आईला कळू न देण्यासाठी सगळे खूप प्रयन्त करतात,मानस आणि तन्वी पण ह्याच फेझ मधून जात असतात . आता पुढे

फ्रेशर पार्टीसाठी फकत ६ दिवस राहिलेले असतात ,त्यामुळे प्रॅक्टिससाठी दोघेपण लवकर ऑडिटोरियम मध्ये येतात. मानस तन्वीला सगळ्या स्टेप्स समजावून सांगतो,तन्वीला साल्सा येत असल्यामुळे ती लवकर स्टेप्स शिकते. स्टेजवर फकत एक फोकस लाईट चालू असतो , ऑडिटोरियम मध्ये दोघेच असतात मानस आणि तन्वी दोघे मनापासून डान्स करत असतात .. मानस आणि तन्वी दोघांच्या मनात आनंदला पारावार उरत नाही. दोघांचे हार्टबिट वाढलेले असतात . डान्स करत असताना होणारी नजरभेट , सुखावणारे स्पर्श ,गाण्यातील शब्द ,ह्या सगळ्या गोष्टीमुळे दोघेहि खूप जवळ येतात ,आणि डान्स करत असताना

गुलाबी आँखें जो तेरी देखीं
शराबी ये दिल हो गया
सम्भालो मुझको, ओ मेरे यारों
सम्भलना मुश्किल हो गया
दिल में मेरे ख़्वाब तेरे
तस्वीर जैसे हों दीवार पे
तुझपे फ़िदा मैं क्यूँ हुआ?
आता है गुस्सा मुझे प्यार पे

मैं लुट गया, मान के दिल का कहा
मैं कहीं का ना रहा
क्या कहूँ मैं दिलरुबा?
बुरा ये जादू तेरी आँखों का
ये मेरा क़ातिल हो गया
गुलाबी आँखें जो तेरी देखी
शराबी ये दिल हो गया

ह्या गाण्यातील भावना दोघेही अनुभवत असतात ,आणि एका क्षणासाठी एकमेकांच्या नजरेत हरवून जातात... आणि एकमेकांच्या नजरेत कैद होतात.खूप सारे रोमांचित क्षणाची अनुभूती त्यांना येत असते . डान्समुळे रोज भेटणं ,एकत्र घरी जाण ,मानस तन्वीची खूप काळजी घेत असतो,घरी गेल्यावर पण दोघाना करमत नसे ,रात्री मोबाइलवर चॅट करण चालू असत ,त्यांचं प्रेम हळुवार खुलत असत,त्यांच्या प्रेमाची कुणकुण स्नेहा विनय अमेय कीर्ती आणि त्याच्या इतर मित्र-मैत्रिणीना लागलेली असते . कीर्तीच मानसवर मनापासून प्रेम असत ,तिला थोडं वाईट वाटत असत पण ती तस दाखवत नाही .

फ्रेशर पार्टीची तयारी जवळजवळ झाली असते ,डेकॉरेशन कॅटरिंग ,पोस्टर्स हे सगळी कामे आता पूर्ण झालेली असतात ,मानस आणि तन्वीचा डान्स एकदम परफेक्ट बसलेला असतो,दोघाणी खूप मेहनत घेतलेली असते कॉलेजमध्ये वातावरण एकदम प्रफुल्लित झालेल असते . सगळीकडे पार्टीची धामधूम चालू असते . सगळ्यांना नवीन मित्र- मैत्रिणी भेटतात कॉलेजमध्ये लेक्चर झाल्यावर कँटीनमध्ये सगळे पार्टीबद्दल चर्चा करत असतात ,ज्युनिअर स्टुडन्ट पार्टीसाठी खुप जास्त एक्साटाईड असतात ,तर काही सिनिअर मूल नवीन मुलींना कस पटवायचं ह्याचहि प्लॅनिंग करत असतात . कॉलेज लाईफ मध्ये फ्रेशर पार्टी म्हणजे नुसती धमाल ,जोड्या जुळवा-जुळावी ...फ्रेशर पार्टी साठी रेड-ब्लॅक अशी थीम ठेवलेली असते . स्नेहा आणि तन्वीने पण खास पार्टीसाठी शॉपिंग केलेली असते . सगळे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस उजाडतो , फ्रेशर पार्टीचा दिवस उगवतो .. पार्टीची वेळ हि संध्याकाळची असते . त्यामुळे आज दिवसभर लेक्चर नसतात ,मानस आणि त्याचे फ्रेंड्स कॉलेजला सकाळीच आलेले असतात .मानस स्वतः सगळ नीट झालंय कि नाही ते चेक करतो ,कॉलेजचे प्रिंसिपल आणि इतर स्टाफ सगळी तयारी पाहून एकदम खुश होतात आणि मानस आणि त्याच्या टीमच कौतुक करतात .. तन्वी पार्टीसाठी घेतलेला ब्लॅक कलरचा स्लिव्हलेस शॉर्ट वन पीस घालते त्याच्यावर कॉर्नरला रेड कलरचे छोटे ३ रेड रोझेस असतात ,तिच्या नितळ कायावर ब्लॅक कलर खूप जास्त उठून दिसतो ,

तिने केसांची छानशी हेअरस्टाईल केली असते ,आणि पुढच्या काही केस कर्ल करून मोकळे सोडलेले असतात, हातामध्ये सुंदर असं छोटास खड्यांचं ब्रेसलेट घातलेलं असत ,गळयात सुंदर असं हार्टशेप सिल्वर खड्यांचं पेंडंट असलेली चैन घातलेली असते,त्याच शेपचे सुंदर इअररिंग्ज घातलेलं असतात ,डोळ्यांना जरा डार्क कलरचा आयशॅडो आणि मस्कारा लावलेला असल्यामुळे तिचे डोळे आज अजूनच खूप सुंदर दिसत असतात ,पार्टी असल्यामुळे ती जरा डार्क ब्राउन कलरची लिपस्टिक लावते,तिने आज एकदम छान मेकअप केलेला असतो ,आरशात स्वतःच सौन्दर्य न्याहाळत असताना ,मानसच्या विचारांनी एकदम गोड शहारा येतो ,आणि एकदम लाजते ,मानसच्या नुसत्या विचारांनी तिचे हार्टबिट वाढतात.. स्नेहाचा आवाज आल्यामुळे ती ड्रेसवर मॅचिंग असे ब्लॅक कलरचे हाय हिल्स घालून ती तिच्या रूममधून खाली येते आज तन्वी खूपच क्युट आणि एकदम कातिल दिसत असते. स्नेहा तन्वीकडे नुकतीच तिच्या घरी आलेली असते ,तिनेही डार्क मरून कलरचा शॉर्ट वन पीस घातलेला असतो,ती पण खूप सुंदर दिसत असते.. तन्वीला पाहून तर स्नेहा एकदम शॉकच होते ,"ओह्ह माय गॉड तन्वी ,यु आर लुकिंग व्हेरी होत अँड सेक्सी बेब ,आज मुलांचं काही खर नाही,आणि स्पेशली मानस तर आज फ्लॅटच होणार आहे. "ये जरा हळू बोल ना बावळट ,आईने जर ऐकलं ना तर माझी वाट लागेल ,खर सांग ना मी ठीक दिसतीये ना ? तेव्हड्यात तन्वीची आई किचन मधून बाहेर येते ," व्वाव तन्वी यु आर लुकिंग गॉजस डिअर .मस्त दिसतोय एकदम ड्रेस ,पण मला सांग तुम्ही दोघी आता जाणार कश्या आहात ? आणि परत येताना पप्पाना पाठवू का तुम्हाला घयायला ? " आग आई तू नको टेन्शन नको घेऊ ,मानस आणि विनय आम्हला दोघीना पीक आणि ड्रॉप करेल ,सो डोन्ट वरी " " ओके ,आज जरा मानसला घरात बोलूवून घे ,म्हणजे मी बोलेल त्याच्याशी मग मला टेन्शन नाही. " काय ग आई ,मी काय लहान आहे का आता ? त्याना कस वाटेल? " तन्वी बेटा तू माझ्यासाठी लहानच आहेस ,आणि माझं तुला ऐकावं लागेल ओके." " ओके मी बोलवते त्यांना आत. मग तर झालं " .. इतक्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो ,ती खिडकीतून खाली पाहते तर तिला फकत विनयच दिसतो,तिला वाटत कि मानस आतमध्ये असेल म्हणून ती लगेच मानसला फोन करते ,पण मानस तर आधीच ऑडिटोरियमध्ये गेलेला असतो , लाऊड म्युझिकमुळे त्याला फोनची रिंग ऐकू जात नाही ,मानसने फोन उचलत नसल्यामुळे ती विनयला कॉल करते ." हाय विनय ,ऐकना ,तू आणि मानस दोघेपण जरा वर या ना .माझ्या आईला तुम्हाला आत्ताच भेटायचंय यार ." विनय : " तन्वी मी ऐकटाच आहे यार ,आणि नक्की मला फटके द्यायचा तुझा प्लॅन तर नाही ना?बर थांब येतो मी वर ,तुम्ही खूप उशीर कराल " फोन ठेऊन विनय तन्वीच्या घरी येतो . आई : " अरे तू उभा का आहेस बस ना,मी चहा बनवते " विनय :" काकू मी परत येईल ,आता थोडासा उशीर झालाय ,तुमचं काही काम होत का? तुम्ही अरर्जेंट बोलवलत? " आई : " अरे विशेष काही नाही ,तू मानस ना?" विनय :" नाही काकू मी विनय ,मानसचा मित्र ,त्याला कॉलेजला थोडं काम होत म्हणून तो लवकर गेलाय " आई: " बर विनय ह्या दोघीना रात्री नीट घरी सोडशील ना ? विनय : " काकू तुम्ही निश्चिन्त राहा ,तन्वी आणि स्नेहा ,म्हणजे स्पेशली तन्वी माझ्या बहिणीसारखी आहे ,तुम्ही टेन्शन नका घेऊ ,मी वेळेत सोडेन ह्यांना घरी " विनयचं बोलणं ऐकून तन्वीची आई थोडी निवांत होते " आईडू जाऊ का ग आता ? उघिच उशीर होईल यार " आई : " ओके ,जा मस्त मज्जा करा ,उशीर नका करू " सगळे गाडी मध्ये बसतात , विनय : " तन्वी एकदम घरी बोलवून आज तर मला चांगलाच घाबरवलास यार तन्वी : " अरे आईला जरा काळजी वाटत होती ,म्हणून तिला मानसला भेटायचं होत,मी तर विसरलेच त्याला मी सोडून खूप सारी काम असतात ,मानस पीक करायला न आल्यामुळे तन्वीची थोडी चिडचिड होते ,विषय बदलण्यासाठी मुद्दाम विनय इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असतो ..विनय : " यार स्नेहा ,तुम्ही दोघी पण खूपच भारी दिसताय यार ,बरं झाल तू रेअसत फ्रंट सीटला बसलीये ,नाहीतर मी तर ड्राइवर वाटलो असतो " त्याच्या बोलण्यावर स्नेहा एकदम मनापासून हसते ,तन्वीच तर लक्षच नसंत ,ती आपलं खिडकीतून बाहेर बघत असते ,सगळ्यात पहिले तिला मानसने पाहावं असं वाटत असत ,त्याच्यासाठीच तर ती एव्हडी तयार झालेली असते

तळटीप : तन्वीला पाहून माणसाची विकेट पडेल कि मानसला पाहून तन्वी बोल्ड होईल ? फ्रेशर पार्टीसाठी नेक्स्ट पार्ट मध्ये भेटू .तुमचा काही फ्रेशर पार्टीच्या काही आठवणी असतील तर नक्की कळवा..तुमच्या कमेंटची वाट पाहते ,लवकर भेटू परत .....sayo nara ....

FOLLOW MY BLOG FOR UPDATES....

🎭 Series Post

View all