हम-तुम भाग -16

HI

मानस आणि तन्वी दोघांनी खूप सुंदर क्षण अनुभवलेले असतात ,ते दोघे पण एकमेकांचा विचार करत झोपी जातात ,दुसऱ्या दिवशी तन्वी खुप लवकर उठते ,आज ती खूप खुश असते ,रेड कलरचा अनारकली घालते ,त्याला मॅचिंग असे हँगिंग इअररिंग्ज ,डार्क काजळ ,हलकीशी रेड कलरची लिपस्टिक लावते,रेडी होऊन मस्त आरश्यासमोर स्वतःला पाहते आणि लाजते .तेव्हड्यात आई तिला बोलवते ,त्यामुळे ती आरश्याला मस्त फ्लायिंग किस देऊन खाली जाते . तिला मस्त रेडी झालेलं आईच्या नजरतुन सुटत नाही ." गुड मॉर्निंग पिल्लू ,आज काही स्पेशल आहे का कॉलेज मध्ये ?" तन्वी : " नाही ग आई ,पण तू असं का अचानक विचारलं ? " आई: " तन्वी बेटा ,आज एकदम सुंदर दिसतियेस ,म्हणून विचारलं " तन्वी थोडस बावरते " अग आई तूच ओरडत असते ना, कि हा अनारकली चा ड्रेस मी वापरात नाही म्हणून ,मग आज घालून बघितला ,चांगला दिसतोय ना? तसही आजपासून माझी प्रॅक्टिस आहे ना डान्सची म्हणून ,विशेष काही नाही ,चल ,मला पटकन ब्रेकफास्ट दे ,नाहीतर उशीर होईल ,मी बाप्पा च्या पाय पडून येते तोपर्यंत " असं बोलून तन्वी देवघरात जाते आणि गणपतीच्या मूर्तीला नमस्कार करते " गुड मॉर्निंग बाप्पा काल खूप काही झालंय ,मला तर कळतच नाही कि माझ्याबरोबर काय होतंय ते,पण कालचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता ,काल पहिल्यांदा मी मानसला मी खूप जवळून पाहिलं,त्याच्या डोळ्यात मला काहीतरी वेगळं जाणवल ,आणि त्याच्याबरोबर मला काहीतरी वेगळं फील झालं ,ह्यालाच प्रेम म्हणतात का बाप्पा ? माझा खूप जास्त गोंधळ होतोय बाप्पा ,लवकर काही तर सांग ना रे बाप्पा ?" इतक्यात तिची आई तिला नाश्ता करायला आवाज देते ." तन्वी ,लवकर ये बाळा ,नाहीतर पोहे गार होतील " आईचा आवाज ऐकून तन्वी तिच्या बाप्पाला बाय करते " गणू लवकर हा गोंधळ थांबावं बर का ,जाते मी आत्ता " आई आणि तन्वी दोघी नाश्ता करतात ,नंतर तन्वी ,स्नेहाला घेऊन कॉलेजला जाते . इकडे मानस तर सकाळपासून भारी मूडमध्ये असतो ,तो मस्त डार्क ब्लू कलरचा त-शर्ट घालतो अँड लाईट ब्लू कलरची डेनिमची जीन्स घालतो ,टी-शर्ट चे ,शॉर्ट स्लिव्हस असल्यामुळे त्याचे बायसेप एकदम उठून दिसत असतात,सगळं आवरून तो खाली येतो ,त्याची मॉम ब्रेकफास्ट साठी डायनिंग टेबलवर न्युजपेपर वाचत बसलेली असते ,मानस एकदम हळू तिच्या जवळ जातो आणि मॉमला मागून तिच्या गालावर किस देतो आणि मिठी मारतो " गुड मॉर्निंग मॉम " मॉम : " अरे किती घाबरले मी , मानस तू काय ,लहान आहेस का? "मानस : " मॉम तुला वाटलं पप्पा आले म्हणून ?काय घाबरते ग मॉम ,ओके तरीपण सॉरी " मॉम: " ओके बेटा ,बाय द वे यु आर लूकिंग व्हेरी हँडसम चॅम्प आज एकदम स्वारी जोरात दिसतीये,काय स्पेशल आहे का ?" मानस थोडं लाजतो " नाही ग मॉम, आजपासून डान्स प्रॅक्टिस आहे ना,म्हणून थोडं लवकर जायचंय कॉलेजला " " ओके ,हो तू आणि कीर्ती दोघे साल्सा करणार आहेत ना ,सांगितलं होतास तू मागे ,मग कशी चालली आहे तुमची प्रॅक्टिस ? मानस : "मॉम ,कीर्तीच्या पायाला लिगामेंट इंज्युरी झालीये ,त्यामुळे ती नाही करणार आहे परफ़ॉर्मन्स " मॉम: " ओह्ह ,कशी आहे ती आत्ता ,तुम्ही काळजी घेत जा रे,मग तुमचा डान्स कॅन्सल झाला का ?" मानस : " मॉम कॅन्सल नाही झाला ,तन्वी आहे ना,ती खूपच भारी डान्स करते ,तिला वेस्टन ,आणि क्लस्सिकल दोन्ही डान्स येतात , तन्वी खुपच स्मार्ट आहे ,आम्ही दोघे करणार आहोत " मानस तन्वी बद्दल बोलताना खूप एक्साईट होतो ,त्याची मॉम सगळं पाहत असते ." हो ,किती कौतुक करणार आहेस तन्वीच ,लवकरच भेटावं लागेल तिला असं दिसतंय , मस्त प्रॅक्टिस करा तुम्ही ,मी निघते ओके " मॉमने आपल्याला बरोबर पकडलाय हे तो ओळखतो आणि तन्वीचा विचार करत स्माईल करतो .सगळं यावरून कॉलेज ला जातो .. कॉलेजला आल्यावर तन्वीची नजर सगळीकडे फकत मानसला शोधत असते ,त्याला समोरून येताना पाहून तिचे हार्टबिट वाढतात,मानस तन्वीला पाहून खूप खुश होतो ,तन्वी अनारकली ड्रेसमध्ये एकदम डॉल दिसत असते मानस पण एकदम कातिल दिसत असतो,दोघांची नजरानजर होते ,तन्वी त्याच्या डोळ्यात पाहून खूप वेगळं फील होत .मानस तर तन्वीकडे एकटक बघत असतो,विनय मानसला आवाज देतो ,त्याच्या आवाजाने मानस थोडा भानावर येतो ,त्याचा गोंधळ पाहून तन्वीला हसू येत ..विनय : " काय यार मी तुला किती आवाज देतोय ,लक्ष कुठे असत तुझं? बघ ग तन्वी नेहमी कुठेतरी तरी हरवलेला असतो ,मला तर वाटतय हा नक्की कुणाच्यातरी प्रेमात पडलाय ,तुला काय वाटत ? " तन्वी पाणी पित असते विनयने असं बोलल्यावर तिला एकदम ठसका लागतो ," मला काय माहित हा कोणाच्या प्रेमात पडलाय ते ? तूच सांग मानस आता " मानस : " तन्वी ,तूपण काय ह्याच ऐकते ,ह्याला तर काहीपण बोलायची सवयच आहे ,तू नको लक्ष देऊ ,चल आपण भेटू आफ्टरनूनला प्रॅक्टिससाठी ऑडिटोरियममध्ये भेटू बाय "सगळे आपापल्या क्लासरूममध्ये जातात .

तळटीप : प्रेमात पडल्यावर सगळ्यांमध्ये बदल होतात ,पण हे होणारे बदल फॅमिलीमध्ये आईला लगेच जाणवतात,आणि आपल्यातील बदल आईला कळू न देण्यासाठी सगळे खूप प्रयन्त करतात,पण आपले पेरेंट्स ह्या फेजमधून गेलेले असतात ,त्यामुळे त्याच्यानजरेतून सुटणे जरा अवघडच असत ,तुमचे अनुभव नक्की कळवा .. तुमच्या कमेंटची वाट पाहते ... स्टे होम स्टे सेफ

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

FOLLOW MY BLOG FOR ALL UPDATES....THANKS 

🎭 Series Post

View all