हम-तुम भाग -15

hi

मानस आणि तन्वी दोघेपण ऑडिटोरियममध्ये एकटेच असतात .सगळीकडे एकदम शांतता पसरलेली असते ,दोघांच्या मनामध्ये वेगळीच हुरहूर निर्माण होते .मानस तन्वीकडे हळूच चोरून बघत असतो ,तन्वीला एकदम काय बोलावं ते कळत नसत ,शेवटी काहीतरी बोलायचं म्हणून ती मानसला बोलते ," मानस मला खर तर खूप टेन्शन आलाय डान्सच ,आणि तुला पण असं वाटतंय ना कि मला नाही जमणार ," तिच्या बोलण्यानं मानस एकदम तिला बोलतो ," तन्वी मला एकदम तस नव्हतं बोलायचं ,म्हणजे साल्सा जरा अवघड डान्सफॉर्म आहे म्हणून बोललो ,आणि तस हि तुझ्या स्पेशल फ्रेंड ने सांगितलं ना कि तू आधी त्याच्या बरोबर केलाय डान्स .त्याने सांगितल्यामुळे मला आत्ता कळलं ." मानस मुद्दाम स्पेशल शब्दावर जोर देतो , ते तन्वीच्या लक्षात येत .." मानस सौरभ माझा स्पेशल फ्रेंड नाही तर खूप चांगला फ्रेंड आहे ,तुला काय वाटलं कि तो माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून? तन्वी जरा सिरीयस होऊन विचारते, .. ,तिच्या अनपेक्षित प्रश्नाने मानस गोंधळून जातो ." तन्वी ,अगं मला तस म्हणायच नव्हतं ,म्हणजे मला असं वाटलं ,म्हणजे असू शकतो ,तो तुझ्याशी खूप हक्काने बोलत होता म्हणून वाटलं,आणि बॉयफ्रेंड असला तरी मला काय प्रॉब्लेम आहे ,माझं थोडीच तुझ्यावर प्रेम आहे,मला थोडीच तू आवडते ? " सगळं बोलल्यावर त्याच्या लक्षात येत कि तो जरा जास्तच बोलला ,तो लगेच जीभ चावतो आणि तन्वीकडे बघतो .. तन्वी मानसच्या गोंधळाकडे बघत असते ,मुद्दाम त्याला विचारते " मानस म्हणजे मी तुला आवडत नाही ? असं म्हणायचं का तुला ? " तन्वी तू आवडत नाही असं नाही ग ?" त्याची अजून मज्जा घेण्यासाठी ती त्याच्या जवळ जाऊन डोळ्यात बघून पुन्हा विचारते "म्हणजे मग कस मानस ?" तिच्या असं बोलण्याने मानस खूप जास्त गोंधळून जातो " कस सांगू मी यार तुला ,मलाच कळत नाहीये” त्याचा गोंधळ पाहून ती हसायला लागते ,आणि मानसच्या लक्षात येत कि त्याची मज्जा घेते ,मानसपण हसायला लागतो.तेव्हड्यात बाहेर जोरात पाऊस चालू होतो , "मानस बाहेर बघ किती मस्त पाऊस पडतोय ,चल आपण पाऊसात भिजू थोडास" असं बोलून ती त्याचा हाथ पकडून त्याला बाहेर घेऊन येते ,तिने मानसचा हाथ धरल्याने त्याची विकेट ऑलरेडी पडलेली असते ,तो तिच्याबरोबर काही न बोलता बाहेर जातो .. तन्वी बाहेत गेल्यावर पळतच पाऊसात भिजायला जाते ,मानस तिथे आडोश्याला थांबून तीच्या निरागस चेहऱ्याकडे बघत असतो ,पाऊसामुळे तीच सौन्दर्य अजूनच खुलते ,पडणाऱ्या पाउसाच्या धारा ती तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहून देत असते ,दोन्ही हाथ लांब करून जणू त्या पावसाला तिच्या बाहुपाशात घेत असते ,,पाऊसात भिजल्यामुळे तिचा कमनीय बांधा अजूनच स्पष्टपणे दिसत असतो ,मानसचे हार्ट तिला बघून अजूनच जोरात धावू लागते . तन्वी त्याला ओढतच पाऊसात घेऊन येते , ,पाऊसामुळे जमा झालेल्या तळयातल पाणी ती मानसच्या अंगावर उडवते,मानसपण तिच्या अंगावर पाणी उडवतो ,दोघेहि पाऊसाचा मनसोक्त आनंद घेतात ,पावसामुळे थोडा चिखल झालेला असतो .तन्वी मानसच्या अंगावर पाणी उडवण्यासाठी जात असते ,तितक्यात तिचा पाय घसरतो,ती पडणार तेव्हड्यात मानस तिला पकडतो ,दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात त्यांच्या ओठांमध्ये खूपच कमी अंतर असत ,तिचे गुलाबी ओठ ,पाऊसामुळे अजूनच मादक दिसतात, दोघांना त्यांचे उष्ण श्वास जाणवत असतात , दोघाचे हार्टबीट वाढतात ,मानस तिच्या चेहऱयावर आलेले ओले केस बाजूला करतो ,तिच्या काळ्याभोर केसांमधून पडणारे पाऊसाचे थेंब त्याला त्याच्या ओठामध्ये टिपण्याचा मोह मानसला होतो ,पण तो स्वतःला कंट्रोल करतो आणि तिच्या डोळ्यामध्ये बघतो ,तिने घाबरून बंद केलेले डोळे ती हळूच उघडते ,आणि मानसकडे बघते ,दोघेहि एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात ,तेव्हड्यात कुठेतरी जोरात वीज पडते ,त्या आवाजाने तन्वी घाबरून त्याला एकदम जोरात मिठी मारते.. दोघेही एकमेकांच्या पहिल्या स्पर्शाने मोहोरून जातात.. थोडा वेळ कोणी काहीच बोलत नाही ,दोघेही हा क्षण त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात साठवून घेतात.. मानसला त्याच आयुष्य ह्या क्षणातच कैद व्हावं असं वाटत..तन्वीला जाणवत कि तिने मानसला बराच वेळ मिठी मारली ,ती मनातल्या मनात खुश होते आणि लाजते .. मानस तन्वीला कानात सांगतो " मला असं वाटतंय कि तुला खूप थंडी वाजतीये ,अजून खूप वेळ आपण असच थांबलो तर आजारी पडशील " मानस असं बोलल्यामुळे ती भानावर येते , तिला थोडास ऑकवर्ड फील होत आणि तिला थंडीची जाणीव होते " ती मानस पासून थोडी दूर होते " सॉरी मानस ,मला विजेच्या आवाजाची खूप भीती वाटते त्यामुळे " ती पुढं काही बोलणार तितक्यात मानस तिच्या ओठांवर बोट ठेवतो " शूहह ,मला माहिती आहे ,तू काही एक्सप्लेन करायची गरज नाही ,चल आपण आत जाऊन बोलूयात ,अजून पाऊसात भिजायचं नाहीये मला.. तन्वी डोळे मोठे करून त्याच्याकडे ओठांवरच्या बोटाकडे इशारा करते ,मानस लगेच तिच्या ओठावर ठेवलेलं बोट बाजूला करतो..दोघेपण ऑडिटोरियममध्ये जातात,मानस काहीच बोलत नाही ,तन्वीला काय बोलावं ते सुचत नाही त्यांच्यात वेगळीच ऑकवर्ड वाटणारी शांतता निर्माण झालेली असते..इतक्यात विनय आणि स्नेहा येतात ,त्यांना आलेलं पाहून तन्वीला थोडं हायस होत ,विनय त्यांची मज्जा घेण्यासाठी त्यांना बोलतो " काय चाललय तुमच्या दोघांचं ?" विनय असं बोलताच तन्वी आणि मानस दोघे आधी एकमेकांकडे बघतात आणि मग विनयकडे बघतात " ते आम्ही ,काही नाही ,ते असं " तन्वीचा उडालेला गोंधळ बघून सगळे हसतात .. "तन्वी ,केवढ टेन्शन घेते यार ,मी तर गंमत करत होतो ,मला एक सांग ऑडिटोरियममध्ये तर पूर आलेला दिसत नाहीये ,मग तुम्ही दोघे एव्हडं कसे भिजला ?मानस तन्वीकडे बघून तिला डोळ्याने आधार देतो " अरे विनय आम्ही थोडं बाहेर गेलो होतो ऑडिटोरियमच्या आणि तितक्यात जोरात पाऊस चालू झाला ,मग काय भिजलो आम्ही " स्नेहा आणलेले गरमगरम समोसे आणि सँडविच त्यांना देते " किती भिजलंय यार तुम्ही ,लवकर खाऊन घ्या ,नाहीतर गार होईल .. तन्वी मानसला डोळ्यानेच थँक्स बोलते .. खाऊन झाल्यावर मानस विनय ला बोलतो " विनय मला वाटत ,आज हा पाऊस काही थांबणार नाही, आम्ही उद्यापासून प्रॅकटीस चालू करतो,ह्यां दोघीना लवकर घरी सोडणं जास्त गरजेचं आहे ,तन्वी तर खूप भिजलीये ,उगीच आजारी पडेल " विनय हळूच त्याच्या कानात बोलतो " ओह्ह क्या बात है भाई ,भाभी कि अभिसे इतनी जादा फिकर ,सही जा रहे हो मेरे भाई " त्याच बोलणं ऐकून मानस एकदम ब्लश करतो ,क्युट स्माईल त्याच्या चेहऱ्यावर येत.. " तू पण ना विनय लगेच चालू होतो यार " मानस तन्वी आणि स्नेहाकडे येऊन त्यांना बोलतो मानस: " तन्वी ,स्नेहा,आपण आज लवकर निघूया ,खूप जास्त पाऊस येतोय ,तन्वी आपण उद्यापासून प्रॅक्टिस चालू करू ओके ".सगळ्यांना मानसच बोलणं पटत ,आणि सगळे घरी जायला निघतात .. तन्वी कोणाशीच काही बोलत नाही ,ती एकदम शांत बसते.बाकी सगळे गप्पा मारत मानसच्या गाडीजवळ येतात ,विनय मुद्दाम स्नेहाशी गप्पा मारत मागच्या सीटवर जाऊन बसतो .. आता ड्रायविंग सीटवर मानस आणि त्याच्या शेजारी तन्वी बसते .. मानस त्याच्या गाडीमधला रेडिओ चालू करतो.रेडिओवर खूप मस्त सॉंग्स लागलेलं असत..दोघांच्या मनःस्थितीला एकदम साजेस गाणं लागत

जो हाल दिल का इधर हो रहा है

वो हाल दिल का उधर हो रहा है

गले से लगा लूं लबों पे सजा लूं

तेरे अफ़सानों को अपना बना लूं

दर्द है हल्का सा मगर हो रहा है

जान-ए-जां दिलों पे प्यार का

अजब सा असर हो रहा है

जो हाल दिल का इधर हो रहा है

वो हाल दिल का उधर हो रहा है

रेडिओवर खूप मस्त सॉंग्स लागलेलं असत..दोघांच्या मनःस्थितीला एकदम साजेस गाणं लागत.. गाणं चालू असताना ,तन्वी आणि मानस दोघे एकमेकांकडे चोरून बघत असतात .. आधी स्नेहा आणि विनयला ड्रॉप करतात ,आता आजची संध्याकाळ दोघांसाठी खूप स्पेशल असते . मानसला तो तिच्या प्रेमात पडलाय ह्याची पूर्ण खात्री असते ,आणि सौरभ तिचा बॉयफ्रेंड नाही गाडीमध्ये मानस आणि तन्वी हे दोघेच असतात ... तन्वी खूप शांत असते ,मानस तिच्याकडे मुद्दाम बघत नसतो .कारण तन्वी त्याच्याकडेच बघत असते हे त्याला माहित असत ,तो हा क्षण एन्जॉय करत असतो ,तन्वीच घर आल्यावर ती गाडीतून उतरते .आणि त्याला थँक्स बोलते ,बाय करून घराकडे निघते ,तिला मानस आवाज देतो " तन्वी , आजचा पाऊस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता,ह्या आधी मी इतका मनसोक्त कधीच भिजलो नव्हतो ,थँक्स यू सो मच डिअर ,बाय गुड नाईट " " मानस मी पण आज खूप दिवसांनी मनसोक्त भिजले ... बाय गुड नाईट " तन्वी आणि मानस दोघेही घरी जातात . रात्री बेडवर पडल्यावर मानसला तन्वीबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत.तो आज खूप खुश असतो .त्याने तन्वीबरोबर खूप सुंदर क्षण घालवलेले असतात .आणि त्यात सौरभ हा तन्वीचा बॉयफ्रेंड नसून फकत चांगला फ्रेंड आहे हे कळाल्यावर तो खूप जास्त खुश असतो. कि आता तन्वीला त्याच्या मनातल्या फीलिंग्स लवकर सांगायच्या असं मानस त्याच्या मनात ठरवतो .. त्याच्या चेहऱयावर सुंदर असं स्माईल येत ,आणि त्याच्याजवळ असलेल्या उशीला कवटाळतो " गुड नाईट स्वीटहार्ट ,असं बोलतो तन्वी समजून किस करतो,,आणि झोपायला जातो.. झोपायच्या अगोदर तन्वीला मेसेज टाईप करतो " गुड नाईट डियर ,थँक्स फॉर लव्हली टाईम स्वीटहार्ट" मेसेज सेंड कार्याचा सेंड च बटन दाबणार त्याआधी मसेज परत एडिट करतो आणि फकत गुड नाईट पाठवतो .. इकडे तन्वीपण त्याच्या मेसेजची वाट पाहत असते , मानसचा आलेला मेसेज बघून ती खूप जास्त खुश होते .. तिने स्वतः मध्ये खूप वेगळा बदल अनुभवला असतो .मानसबद्दल वेगळी भावना निर्माण झालेली असते .त्याच्याबद्दल घालवलेले क्षण हवेहवेसे वाटतात ,त्याचा स्पर्श ,त्याच तिला पकडणं ,तिने त्याला मारलेली घट्ट मिठी ,त्याच्या बाहुपाशात अनुभवलेली सुरक्षा ,त्याच तिच्या ओठानवर ठेवेलल बोट ,त्याचे नशिले डोळे ,सगळं आढळून तिचे गाल एकदम आरक्त होतात ,ती स्वतःलाच आरशात बघून खूप लाजते.. आणि तिच्या आवडत्या टेडीला मिठी मारते आणि मानसच्या विचार करत झोपी जाते

क्रमशः

तळटीप : मानस तन्वीला प्रेमाची कबुली देईल का? तन्वीला कधी कळेल कि ती मानसच्या प्रेमात पडलीये ते ? पहिल्यांदा प्रेमात पडल्याची भावना खूपच वेगळी असते ,सगळं जग नव्याने भासत ,आपल्या जोडीदाराला आपलय मनातील भावना सांगणं खूप कठीण असत ,बघू तन्वी आणि मानस पुढे काय करतात ते ? तुमचे पण काही पहिल्या प्रेमाच्या आठवणी असतील तर नक्की सांगा ,नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे.

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

🎭 Series Post

View all