हम-तुम भाग -14

hi

तन्वीला दुसऱ्या मुलाबरोबर बघून मानस चिडून निघून जातो . आणि तन्वी त्याला कीर्ती बरोबर बघून चिडते .आणि सौरभला थोडास दूर करून ,काहीच न बोलता क्लासरूमकडे निघून जाते .. विनय त्यांना जेवढ एकमेकांबरोबर आणायचा प्रयन्त करतो तेवढे ते दोघे दूर जातात असं त्याला वाटायला लागत..,सौरभला तन्वीच अचानक निघून जाण खूप खटकत ,तो तन्वीला सरप्राईझ देण्यासाठी कॉलेजला आलेला असतो, त्याला थोडं वाईट वाटत ,आणि स्नेहाला तन्वीला नक्की काय झालं तेच कळत नाही,ती सौरभला कँटीन मध्ये थांबायला सांगून तन्वीला बोलवायला जाते .ती एकदम गडबडीत विनयला जाऊन धडकते .." अग स्नेहा जरा हळू ना ,कसली एव्हडी गडबड आहे तुला ,जोरात पडली असतीस ,मी होतो म्हणून वाचलीस ." " सॉरी यार विनय ,मी ना तन्वीला बोलवायला जात होते,आजकाल तन्वीला काय झालय तेच मला कळत नाही,कधी कधी खूप जास्त खुश असते ,आणि कधी कधी एकदम चिडून जाते आत्ताच सौरभला भेटून खुश झाली ,फकत उद्या मारायच्या बाकी होत्या ,आणि अचानक त्याला काही न सांगता रागात इकडे निघून आली ,त्याला खूप वाईट वाटलं यार " " स्नेहा तू नको जास्त टेन्शन घेऊ ,सगळं नीट होईल ,ह्या दोघाना त्याच्या मनातल्या भावना सांगता येत नाहीत म्हणून हे सगळं होतंय.. जाऊ दे तो विषय जरा वेगळा आहे ,तू मला एक सांग तो मुलगा कोण आहे नक्की? डायरेक्टच विचारतो ,तो तन्वीचा बॉयफ्रेंड आहे का ?"त्याच असं बोलणं ऐकून स्नेहाला खूप हसू येतो " म्हणजे तू पण फसला ना ,तो आमच्या बालपणीचा मित्र आहे म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड आहे , ,बॉयफ्रेंड वगैरे काही नाही, तस त्याला तन्वी खूप आवडते असं त्याने मला खूप आधीच सांगितलंय पण तन्वी च्या मनात तस काही नाहीये ,ती त्याला फकत एक चांगला मित्र समजते ,तो सध्या बंगलोरला असतो, ,तन्वीला सरप्राईझ देण्यासाठी कॉलेजला आलाय तो ,सगळ्यांना पहिल्यांदा त्याला आणि तन्वीला बघितलं कि ते कपल आहेत असच वाटत ,अरे मी तर तुझ्याशी बोलताना विसरलेच कि मी तन्वीला बोलवायला आले म्हणून ,सौरभ बिचारा एकटाच बसलाय,मी जाते यार ,नंतर भेटू " स्नेहा निघून जाते . इकडे विनयला सौरभच टेन्शन येत तो तिथेच विचार करत थांबतो ... स्नेहा तन्वीला शोधते " तन्वी काय झालय तुला, तू अशी का वीएर्ड वागतीयेस ,तो सौरभ बिचारा तुला सरप्राईझ द्यायला कॉलेजला आलाय आणि तू त्याला असं एकटं सोडून अचानक का निघून आलीस?त्याला खूप वाईट वाटलं, तुला नक्की काय झाली तन्वी मला सांगशील का ?" " ओह शीट ,सॉरी यार स्नेहा ,त्या कीर्तीला बघून मी उगीच चिडले आणि इकडे निघून आले , रागामध्ये सौरभला तर विसरूनच गेले यार ,चल लवकर तो एकटा असेल तिकडे ." स्नेहा: " तन्वी मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलं नाहीये ,तन्वी तुझं हे अचानक चिडणं खूप वाढलंय अलीकडे त्या दिवशी पण तू ऑडीटोरिम मधून अचानक निघून गेलीस,नक्की तुला त्या कीर्तीचा काय प्रॉब्लेम आहे? मला तर खरंच काही कळत नाहीये ,तू मला सगळं नंतर नीट सांगणार आहेस कळल ,आत्ता आपण कँटीनमध्ये जाऊ ,सौरभ बिचारा वाट बघत असेल ." दोघी कँटीनमध्ये जातात,सौरभ त्याच्या मोबाईल काहीतरी करत असतो .." सौरभ आय एम एक्सट्रेमली सॉरी यार ,मला जरा एक अर्जेन्ट काम आठवल म्हणून अचानक गेले .सौरभ मुद्दाम चेहऱ्यावर राग आल्याचं दाखवतो . सौरभ: " मला खूप राग आलाय तुझा ,एकतर पहाटेची फ्लाईट होती ,घरी येऊन झोपलो पण नाही मी एवढ तुला सरप्राईझ द्यायला कॉलेजला आलो ,आणि तू माझं असं स्वागत केलस ,मला वाटलं सहा महिन्यांनी भेटल्यावर जरा माझा भाव वाढला असेल पण ,जाऊ दे यार स्नेहा मला कोणाशीच बोलायचं नाहीये.. मी जातो परत घरी " असं बोलून तो टेबलवरून उठतो. " सौरभ मी तुला सॉरी बोलले ना यार ,परत एकदा कांन पकडून सॉरी ओके " .." स्नेहा मला जरा ऐकू आलं नाही ग ,तुझ्या मैत्रिणीला जरा मोठ्याने परत बोलायला सांगतेस का .तन्वी त्याचा हात पिरगाळून बोलते तन्वी : " ऐकू येत नाहीये का ? थांब तुझ्या कानात ओरडून सांगते " सौरभ : " तन्वी अग माझा हाथ दुखातोय यार , मला तुझं सॉरी ऐकू आलय ,सोड ग माझा हाथ ." तन्वी त्याचा हाथ सोडते “ यार सौरभ ,तू एकदम भारी सरप्राईझ दिलस ,मला तर जाम आवड्या ,एक फोन तर करायचा ,आम्ही मस्त दांडी मारली असती कॉलेजला आपण फुल्टू धमाल केली असती ना यार ." सौरभ : " अग येडाबाई मी तुला फोन करून कळवलं असत तर मग सरप्राईझ कस राहील असत? आणि आपण आत्तापण धमाल करू शकतो." सौरभ दोघीना त्याच्या कॉलेजच्या गंमती-जमती सांगतो ,त्याच्या गप्पा रंगलेल्या असतात..

इकडे ऑडिटोरियम मध्ये सगळे मानसची वाट पाहत असतात ,मानसला आलेला पाहून सगळे त्याला पेंडिंग राहिलेली काम सांगत असतात . मानस तन्वीवर खूप चिडलेला असतो ,पण तो चेहरा शक्य होईल तेव्हडा नॉर्मल ठेवण्याचा प्रयन्त करतो.." गाईस आज हे सगळी काम पूर्ण झाली पाहिजे बाय हुक वर बाय ऑर कुक,इझ ध्याट क्लियर "मानसचा चिडलेला आवाज पाहून सगळे शांत बसून काम करतात..कीर्ती मानस जवळ येते " मानस इझ एव्हरीथिंग ओके? मला तू थोडा डिस्टर्ब वाटतोयस ,मघाशी पण तू काही न बोलता निघून आलास ,तुझा मूड चांगला नसेल तर आपण उद्या करू प्रॅक्टिस " मानस: " तस काही नाही कीर्ती ,आय आम फाईन ,आपण करूयात आज प्रॅक्टिस ,मी काल नव्हतो ,तर ऑलरेडी मिस झालीये प्रॅक्टिस. " दोघेपण स्टेजवर प्रॅक्टिस करायला जातात ,पण डान्स करताना त्याच्या डोक्यात तन्वी आणि त्या मुलाबद्दल विचार येत असतात ,त्याच डान्स मध्ये लक्ष नसत ,डान्स करताना त्याच्या पायात पाय अडखळून कीर्तीचा तोल जातो आणि ती खाली पडते ,तिचा पाय मुरगळलेला असतो तिचा रडण्याचा आवाज ऐकून मानस भानावर येतो ." ओह्ह शीट ,सॉरी यार कीर्ती माझं लक्ष नव्हतं ,माझ्यामुळेच ,तुला लागलं यार ? " पाय मुरगल्यामुळे तिला उठता येत नाही ,मानस तिला उठण्यासाठी सपोर्ट करतो .." अरे तुझी चुकी नव्हती ,मीच चुकले आणि पडले आऊच,मला खूपच त्रास होतोय यार " सगळे कीर्ती आणि मानसकडे येतात . अमेय : " काय यार कीर्ती ,जरा जपून प्रॅक्टिस करायची ना ,मला तर वाटतंय आपण हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ लगेच " कीर्ती : " अमेय नको बाबा डॉक्टरकडे ,माझ्या डॅडला जर कळलं ना तर ते उगीच जास्त घाबरून जातील, मला वाटेल बर ,मला तर डान्सच टेन्शन आलाय " मानस : " यार कीर्ती तू डान्सच कशाला टेन्शन घेते ,आपण कॅन्सल करू त्यात काय एव्हडं ,तूझा पाय नीट होण जास्त महत्वाचं आहे कळल " " नाही मानस आपला डान्स खूपच इम्पॉर्टन्ट आहे माझ्यासाठी ,मी डान्स नाही करू शकत म्हणून कॅन्सल नाही करायचा प्लिझ .. मानस : " ठीक आहे आपण बघू काही करता येत का ,तू आत्ता घरी जाऊन आराम कर .अमेय तू प्लिज कीर्तीला घरी सोडून येतो का ? कीर्ती : " असं काय करतो यार मानस ,मला बसू दे ,थोड्या वेळाने जाईन मी .. मी काय म्हणते तू माझ्या ऐवजी तन्वी बरोबर कर ना परफॉर्म ,तशी पण ती खूप मस्त डान्सर आहे ,ती लवकर शिकेल डान्स ," अमेय :" ब्रीलीयंट आयडिया कीर्ती ,आपण असच करू ,मानस आता तू आणि तन्वी दोघे मिळून डान्स परफॉर्म करा ,सगळ्यांना कीर्तीच म्हणणं पटत ,तेव्हड्यात स्नेहा आणि तन्वी सौरभ बरोबर ऑडिटोरियममध्ये येतात . तन्वी : " काय झालं तुझ्या पायाला कीर्ती ? कीर्ती : " काही विशेष नाही ग ,बहुतेक पाय मुरगळा आहे ,तन्वी आम्हाला सगळ्यांना वाटत कि माझ्याऐवजी तू मानस बरोबर साल्सा डान्स परफॉर्म करावस ,प्लिज नाही म्हणू नकोस ,खूप ईम्पॉर्टन्ट आहे ग " तन्वीला काय बोलावं ते एकदम सुचत नाही " कीर्ती ,मला तुझ्यासारखा डान्स नाहि करता येणार ,मला वाटत नको उगीच रिस्क घयायला सौरभ : " तन्वी कशाला खोटं बोलतेस " सौरभ अनोळखी असल्यामुळे सगळे एकदम त्याच्याकडे बघतात ,तन्वी त्याची ओळख करून देते .. " तन्वीला साल्सा येतो .थांब मी सांगतो सगळ्यांना ,आम्ही खूप आधी एका इव्हेंटमध्ये केला होता" विनय सगळं ऐकतो आणि त्याची ट्यूबलाईट पेटते ..विनय : " मग तन्वी तू आणि मानस दोघे पण डान्स करणार आहात” ,मानस सौरभच बोलणं ऐकून अजून चिडतो .मानस: " काही गरज नाही आहे त्याची ,मला वाटत आपण कॅन्सल करू ,तस पण तन्वीला कीर्तीसारखा डान्स नाही जमणार असं मला वाटतंय ." मानसच असं बोलणं ऐकून तन्वी नाराज होते ,मानस तिच्याबरोबर डान्स करायला तयार होईल असं तिला वाटत असत .. तन्वी : " मानस बरोबर बोलतोय ,मला नाही जमणार ." सौरभ : " काय ग तनु कशाला खोट बोलतीये ,तन्वीला क्लासीकल ,वेस्टर्न दोन्ही डान्सफॉर्म खूप छान जमतात ,मी तिला चांगल ओळखतो ,मला काही माहिती नाही तन्वी ,तू हा डान्स करणार आहे आणि हे फायनल आहे " .. सगळे सौरभच्या बोलण्याला सपोर्ट करतात .मानसला सौरभने तिला असं हक्काने बोललेले खटकतं ,मानस काही बोलणार तेव्हड्यात विनय त्याला थांबवतो .विनय : " चला तर मग हे फिक्स झालं कि ,तन्वी आणि मानस आपल्या कीर्तीच्या इच्छेसाठी डान्स करणार आहेत,अरे सगळे गप्पा काय मारता बसलोत आपण,खूप काम बाकी आहेत ,सगळे आपआपली काम करा बघू,तन्वी आणि मानस तुम्ही स्टेजजवळ जाऊन प्रॅक्टिस चालू करा ." सगळे त्यांची राहिलेली काम पूर्ण करत बसतात ,सौरभ ,स्नेहा , विनय हे पेंटिंग्सच राहिलेली काम करत बसतात . मानस आणि तन्वी दोघेच स्टेजच्या शेजारी असलेल्या पायऱ्यांवर जाऊन बसतात .. तन्वी डान्सबद्दल खूप एक्साएटेड असते ,ती मानसची बोलताबोलता सहज त्याचा हाथ धरते आणि त्याला स्टेप्सबदल विचारते ,तन्वीने अचानक हाथ पकडल्याने तो सुखावून जातो ,थोड्यावेळासाठी सौरभचा विचार न करता तिच्याबरोबर डान्सबद्दल डिस्कस करतो मानसला सौरभने तिला असं हक्काने बोललेले खटकतं ... थोड्यावेळाने सगळे काम संपवून घरी जायला निघतात , फ्रेशरपार्टी साठी फकत ५ दिवस राहिलेली असतात त्यामुळे तन्वी आणि मानस प्रॅक्टिससाठी थोडा वेळ थांबणार आहेत असं ते सगळ्यांना सांगतात तन्वी आईला फोनकरून उशिरा येणार आहे असं कळवते ..सौरभ: " मी थांबलो असतो तन्वी तुझ्यासाठी ,पण मला एका कामासाठी अर्जेंट जावं लागणार आहे ," तन्वी : " अरे सौरभ ,तू बिनधास्त घरी जा ,मला आणि स्नेहाला मानस सोडेल घरी ." तन्वीने मानसवर दाखवलेल्या विश्वास आणि हक्कामुळे मानस सुखावून जातो .. विनय : " सौरभ तू आता तन्वीची बिलकुल काळजी नको करू,मानस तिची खूप काळजी घेतो .टच गाईस " सौरभ तन्वीकडे जाऊन तिला नॉर्मल हग करतो .. तेव्हड्यात विनय त्याला अक्षरश: तिच्यापासून दूर ओढत नेतो विनय : " अरे तुला उशीर होतोय ,तू विसरला वाटत ,हा अमेय तुला ड्रॉप करेल ,बाय " सौरभ ,अमेय निघून जातात , तन्वी आणि मानसला थोडा एकांत मिळावा म्हणून विनय स्नेहाला घेऊन कँटीनमध्ये स्नॅक्स आणायला जातो ... आता ऑडिटोरियममध्ये फकत तन्वी आणि मानस असतात ..

क्रमशः

तळटीप : सौरभच्या येण्याने तन्वी आणि मानस दुर होतील ? मानस तन्वीला त्याच्या प्रेमाची कबुली देईल ? सौरभ तन्वीला तिच्याबद्दलच्या भावना तिला सांगेन ? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतील .. तुमच्यासाठी आजचा भाग जरा मोठा टाकला आहे ... तुमच्या अपेक्षा कळवा, चला मग पटापट कमेंट करा ,तुमचं कथेवरील प्रेम कमेंटमधून दिसू द्यात ,

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

🎭 Series Post

View all