Feb 26, 2024
प्रेम

हम-तुम भाग -11

Read Later
हम-तुम भाग -11

तन्वी आणि मानस हे दोघेपण एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात पण दोघांना हि ते उमगलं नसत .विनयला मात्र मानस हा तन्वीच्या प्रेमात पडलाय हे माहित असत ,पण तो स्वतः मानसला किंवा तन्वीला काहीही न सांगायचे किंवा विचारायचे ठरवतो .विनयला नक्कीच खात्री होती के ते दोघे पण लवकर त्यांच्या एकमेकांविषयीच्या भावना समजून घेतील फकत त्या दिवसाची तो वाट पाहत असतो. मानस कॉलेज मधून लवकर घरी जातो ,त्याचा मूड एकदम खराब झालेला असतो . मानसची मॉम घरीच असते , ती मानसला लवकर आलेलं बघून खुश होते " वॉव चॅम्प आज एकदम लवकर घरी आलास ,थांब मी रामू काकांना मस्त तुझ्या आवडीची कांद्याची भजी बनवायला सांगते ." "मॉम मला खरच काही नकोय," तो मॉमशी जास्त काहीच न बोलता सरळ त्याच्या रूममध्ये जातो आणि दार लावून बेडवर पडतो ,त्याच्या नकळत त्याचे डोळे भरून येतात. मानसच्या मॉम ला जाणवत कि नक्कीच काही तरी त्याच बिनसलंय ,त्याची मॉम मस्त त्याच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी ,भजी घेऊन त्याच्या रूमकडे जाते आणि डोअर नॉक करते . मानसच इकडे विचारांमध्ये हरवला असतो त्यामुळे त्याला आवाज येत नाही. शेवटी वाट पाहून त्याची मॉम त्याला आवाज देते ,त्या आवजामुळे तो भानावर येतो आणि पटकन डोळे पुसतो मग डोअर ओपन करतो ."सॉरी मॉम मी जरा वॉशरूममध्ये होतो म्हणून वेळ लागला,अरे वा हे काय तू तर मस्त माझी फेव्हरेट कॉफी आणि भजी घेऊन आलीस ,रामू काकांना सांगायचं ना तू कशाला एकटी एव्हडं सगळं घेऊन आलीस " "हो मला वाटलं तुझा ऑफ झालेला मूड किमान हे बघितल्यावर ठीक होईल आणि मला तुझ्या चेहऱ्यवरची ,मिसिंग झालेली क्यूट स्माईल जरा बघायला मिळेल म्हणून मी स्वतः घेऊन आले." " ,अग मॉम असं काही नाही ,जरा दमलो होतो बस ,एव्हढच ." "असं आहे तर ,जाऊ दे मस्तपैकी गरम आहे तो पर्यंत खाऊन घे चल." मानसचा खर तर बिलकुल मूड नसतो ,पण समोर भजी बघून त्याला जाणवत कि त्याने सकाळ पासून काहीच खाल्लं नसतं .तो त्याच्या मॉमसाठी थोडास खाऊन घेतो ."मॉम तू बनवलीये भजी राईट ? तुझ्या हाताला तर एकदम भारी चव आहे ,मी लगेच ओळखू शकतो ,मॉम आय लव्ह यु सो मच, थिस इझ मच निडेड वन ." " हो मला वाटलंच तू सकाळपासून काही खाल्लं नसणार म्हणून ,तुला आवडतात म्हणून मी स्वतः केली " मानसच खाऊन झाल्यावर त्याची मॉम परत जायला निघते तोच मानस तिला मिठी मारतो " थॅंक यू सो मच मॉम." " अरे हो बाळा मी वेगळं असं काहीच केलं नाही ,लव्ह यु टू माय बच्चा ,आणि अजून एक गोष्ट जर कोणी दुःखी असेल तर तर त्याच्या डोळ्यात पाणी येत,थकल्यामुळे नाही ,तुला खोट बोलता नाही येत पिल्लू सो डोन्ट ट्राय ओके ,एक लक्षात ठेव युअर मॉम इझ ऑलवेझ देयर फॉर यू ..ओके ,तूला जर काही शेयर करावं वाटलं तर नक्की कर .. असं बोलून त्याची आई निघून जाते . मानस थोडासा रिलॅक्स होतो आणि मनात ठरवतो कि आपण तन्वीला विसरण्याचा थोडासा प्रयत्न करायचा आणि स्टडीवर फोकस करायच . इकडे तन्वीपण घरी आल्यावर चिडचिड करत असते ,तिची आई सगळं बघत असते पण ती तन्वीला लगेच काही विचारत नाही ,"तन्वी कॉलेज मध्ये परफॉर्मन्स साठी तू नाव देणार होतीस , काय झालं त्याच ?दिलस का मग ?" " हो ग आई दिल मी नाव कमिटीकडे ,बघच तू त्या साल्सापेक्षा एकदम भारी असा डान्स करणार आहे मी ." "असं होय ,म्हणजे अजून कोणी डान्स करणार आहे वाटतं,साल्सा इस व्हेरी डिफिकल्ट डान्स फॉर्म .. आईने असं बोलल्यावर तन्वीला थोडासा राग येतो पण ती तस काही दाखवत नाही " असं काही नाहीये ग आई ,एवढ पण अवघड नाही तो साल्सा ,सगळ्यात अवघड तर क्लासिकल डान्स आहे." असं नसत बेटा तन्वी प्रत्येक डान्सफॉर्म हा वेगळा असतो ,त्याची शैली वेगळी असते असं कुठल्याही डान्सफॉर्मला कमी लेखन चुकीचं आहे ". " बर मातोश्री ,चुकलं माझं ,पण मी ठरवलंय कि मी वेस्टर्न आणि क्लासिकल मिक्स डान्स परफॉर्म करणार आहे ." अरे वा मस्त एकदम ,लवकर प्रॅक्टिस चालू कर मग ,मी तर म्हणते आजपासूनच कर . "बरोबर आहे तुझं आई जर मला बेस्ट डान्स करायचा असेल तर लवकर प्रॅक्टिस करावी लागेल .,मी आज रात्री स्टेप्स डिसाईड करते आणि मग उद्या पासून प्रॅक्टिस... असं बोलून तन्वी झोपायला निघून जाते. बाल्कनीमध्ये बसल्यावर तीला कॉलेजमधलं सगळ आठवत आणि ती शांतपणे सगळ्याचा विचार करते." मी का आज चिडचिड करतीये ?सकाळी तर माझा मूड किती मस्त होता .कॉलेजला जाताना तर मी खुश होते ,मग अचानक काय झालं?कि मानसला कीर्तीच्या एकदमजवळ बघून मला चिडचिड झाली ?कि ते परफेक्ट कपल वाटत आहेत असं ऐकल्यावर चिडचिड झाली ?मला कशाला त्रास होईल त्याला कोणाजवळ बघून ? मी त्याच्या प्रेमात तर नाही पडले ? असं मला कधीच फील नाही झालं ? नो नो मी त्याच्या प्रेमात पडूच शकत नाही ,तस हि तो एव्हडा हॅण्डसम आणि श्रीमंत आहे ,त्याला तर खूप साऱ्या गिर्ल्फ्रेन्ड असतील,तो कशाला माझ्या प्रेमात पडेल? हे असले विचार त्या स्नेह्यामुळे येत असतील , हि स्नेहा काहीही डोक्यात भरते माझ्या ,मी आता तिच्याकडे लक्षचं देणार नाहीये.", ती तिच्या आवडत्या ह्रितिक च्या पोस्टर जवळ जाते आणि त्याच्या कानात बोलते ." असं लगेच कोणी प्रेमात पडत नसत ,मी वाचलेल्या ,लव्हस्टोरीझ मध्ये तर किती उशिरा प्रेमात पडतात ,मी लगेच कोणाच्या प्रेमात पडण तर शक्यच नाही ,मी जेव्हा प्रेमात पडेल त्यावेळेस तर मला नक्की कळेल ना माय स्वीटू ,आय लव्ह ओन्ली यु माय स्वीटहार्ट. ." असं बोलून ती झोपायला जाते..

तळटीप :हा भाग थोडासा बोर वाटू शकतो ,पण जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात पडतात तेव्हा त्याची फॅमिली ,फ्रेंड्स ह्यांना त्या दोघांच्या अगोदर कल्पना येते,प्रेमाची जाणीव होण्यासाठी काही घटना आवश्यक असतात त्याशिवाय प्रेमाची जाणीव होत नसते ,मानसाला त्याच्या प्रेमाची पूर्ण जाणीव झालेली आहे पण आपल्या तन्वीला जाणीव कधी होते ते पाहू ... . ...

तुमच्या कमेंट पण येऊ द्या . कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...

क्रमशः

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Vrushali Gawade

Research associate

HI,I am vrushali gawade from aurangabad,i love to write stories,travelling,exploring new places. in my college days i used to write blogs on various subjects ,so I have started to pursue my hobby and passion with blogs.I hope you will enjoy reading my blogs.

//