आलिंगन (भाग 2)

A hug is a story that takes a husband and wife's loving journey to a different turn from where they never meet each other, only memories now with them.

आलिंगन (भाग 2)

आता मात्र समिधा खरच घाबरली होती. 
तिला वाटले मला नक्कीच काहीतरी झालय,
 व ते कसतरी होतंय याची  लक्षणं  अजून डॉक्टर ला कळाली नाहीत. 
 मग  माझ्या या गरीब, भोळ्या, भाबड्या, प्रेमळ बायकोला कसे कळेल. 
(वरती बायको या शब्दासाठी वापरलेल्या विशेषणाची बरोबरी आपल्या बायकोसोबत करू नये कारण ते सर्व काल्पनिक आहेत व कुणाच्या बायकोत जर हे गुण आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा). 
गमतीचा भाग सोडा, 
पण वेळप्रसंगी हे गुण कसे दाखवायचे व कसे वाफरायचे हे फक्त बायकोलाच जमू शकते, 
समिधा घाबरलेला चेहरा करून आत आली व पुन्हा आवाज देत म्हणाली 
समीर उठ,
 'चहा देते करून मग तुला बर वाटेल, 

मी तरीही काही बोललो नाही कारण अजूनही ती दूर होती.
 माझ्या आवाक्याबाहेर,

ती थोडी अजून जवळ आली व डोक्याला हात लावणार तोच......
तिचा पुढे केलेला हात तसाच ओढून,
 मी तिला जवळ ओढले, 

समीर हे काय करतोस,
 तू तर आजारी होता ना ??
'ती व्याकुळतेने म्हणाली,

हो होतो,
 पण आता नाहीये 
तू जवळ आली व माझा आजार पळून गेला.
 काय? जादू केलीस ग तू  
मी खोचकपणे बोललो 

म्हणजे तू नाटक करत होतास तर?
काय रे हे आपण काय लहान आहोत का 
आता ?
ती लडीवाळपणे बोलली

लहान ......
अग मी 100 चा व तू 98 ची जरी झाली तरी मी तुझ्यावर असेच व इतकेच प्रेम करेल.
 मी आमच्यातील अंतर आणखी कमी करत बोललो,
अर्थात आमच्यात 2 वर्षाचे अंतर होते वयानुसार,

आता मात्र ती चिडली,
तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता 
व रागात म्हणाली तुला शेवटचं सांगते 
सोड, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत.
तुझ्या सोबत लग्न केल्याचे   परिणाम च भोगतोय,
मी पुन्हां तिला चिडवण्यासाठी बोललो आणि माझी तिच्यावरील पकड अजून घट्ट केली.

आता ती माझ्या इतक्या जवळ होती की तिची वाढलेली हृदयची स्पंदने मला ऐकायला येत होती 

आपण आता याच्या मिठीत पूर्ण अडकलो आहोत. 
व आता सुटका नाही.
 म्हणजे सुटण्याचे सगळे निरर्थक प्रयत्न करून झाल्यावर ही गोस्ट तिच्या लक्षात आली.
मग तिने थोडे गोड बोलायला चालू केले 

'ये समीर ऐक ना.....
मी फक्त हहहहहहहहहह 
असे म्हणून तसाच राहिले 

 सकाळ आहे,  व खुप कामे पडलीत सोड ना, ती पुन्हा केविलवाण्या स्वरात उद्गारली 

नाही सोडत, जा 
 मी लटकेच बोललो. 

अरे येईल कुणी सोड ना,

येऊ दे हक्काची बायको आहे माझी 
नाही सोडत 

समीर सोड म्हणते तुला 
आता पुन्हा  थोडी चिडली होती ती,

नाही सोडत,
 म्हणतो तुला 
मी पण थोडा राग आणून बोललो.

सम्या सोड म्हणते तुला 
उगाच ओरडायला लावू नको 
आता ती खरच चिडली होती. 

तू चिडल्यावर किती छान दिसते ग,
मी तिच्या कपाळावर माझे ओठ टेकवत तिला जवळ घेतलं 

आता मात्र तिचं स्वतः वरील नियंत्रण सुटले होते. 

इतकावेळ सुटकेसाठी घट्ट पकडलेला माझा हात नकळत तिने सैल केला.
अंग  तर  पूर्ण थंड पडले होते.
तिच्या लाजलेल्या चेहऱ्यावर मला फक्त माझेच प्रतिबिंब दिसत होते.
सुटकेसाठी तळमळणारी समिधा आता स्वतःहून माझ्या कुशीत विसावत होती. 

तिचे हे बदललेलं रूप बघून मी तर भारावून गेलो.
 अगोदरच जीवापाड प्रेम करणारा मी, 
आज पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलो. 
माझ्या प्रत्येक कृतीला ती प्रतिसाद देत होती.
आज माझी समिधा मला पुन्हा नव्याने भेटत होती.

आम्ही दोघं आमच्यात इतके गुंतून गेलो की दारावरची बेल तिसऱ्यांदा वाजली याचे भान देखील राहिले नाही.

दारावर कोण असेल?
समिधा व समीर ची प्रेम कहाणी कसे वळण घेईल ?
बघुयात पुढच्या भागात 

क्रमशः...............................

🎭 Series Post

View all