ऋण लघुकथा

Story Of A Girl Who Donets Her Body Parts

ऋण


मनवा ने जेव्हा डॉक्टरांकडून रिपोर्ट्स कलेक्ट केले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली .. एवढ्या लहान वयात माझ्या लेकराच्या वाट्याला हे का यावे ? सुन्न झाले तिचे मन .. डोळ्यांतून सतत अश्रूंची धार वाहत होती .. घरी जायलाच भीती वाटत होती तिला .. समोरून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ती कशी आणि काय देणार होती ? .. जिला स्वतःलाच आधार हवाय ती दुसऱ्या कोणाला कसा आधार देणार होती ?..
हॉस्पिटल च्या बाहेर पडली .. रिक्षेत बसून घरी आली .. येताना .. सौम्या च्या आवडीचा चॉकलेट केक .. नक्की घेऊन आली ..
सौम्या चातका सारखी घरात तिच्या आईची वाट बघत होती .. गेले कित्येक दिवस ना ती शाळेत गेली होती . ना घरातून बाहेर खेळायला गेली होती .. दिवसभर घरात एकटी रहायची .. नाही म्हणजे दिवसभर तिच्या सेवेसाठी एक मावशी ठेवली होती .. पण आई ती आई च असते ना .. पोरगी दिवसभर आईच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची ..
मनवा घरात आली पायावर पाणी घेतले आणि ८ वर्षांच्या सौम्याला छातीशी कवटाळून बसली .. तिच्या चेहऱ्यावर अगणित पापे देऊ लागी .. हे करताना पण डोळे भरून येत होते ..
सौम्या " आई तू का रडतेय ? "
मनवा " काही नाही रे राजा .. सॉरी .. तुझ्यासाठी मी काही करू नाही शकत .. तुला फिरायला नाही नेऊ शकत .. तुझ्या शी खेळू नाही शकत .. म्हणून मला आज वाईट वाटतंय "
सौम्या " आई .. नको ना असे म्हणूस .. बाबा आले कि आपण जाऊ ना सुट्टीत फिरायला .. दरवर्षी जातोच ना आपण .. या वर्षी मे महिन्यात आपण एस्सल वर्ल्ड ला जाऊ "
मनवा मनात विचार करू लागली " में महिना .. नाहीये एवढा वेळ आपल्या जवळ पिल्लू .."
सौम्या " आई बाबा कधी येतोय ? मला बाबाची आठवण येतेय "
मनवा " मी .. मी बोलवून घेतलय बाबांना .. येतील ते लवकरच .. बरं चल .. आज तुला काय करू खायला .. लवकर खा आणि लवकर औषध घे .. तुला आरामाची गरज आहे .."
सौम्या वैतागतच " काय ग आई... कंटाळा येतो ना मला .. झोपून झोपून .. चल ना आज तरी गार्डन ला खेळायला जाऊ ना "
मनवा " नको ना .. राजा .. थोडे ऐक माझे .. आज नको .. तुझे बाबा आले ना कि आपण नक्की गार्डन जाऊ ... "
सौम्या " नक्की काय झालंय मला ? आई तू का रडतेय ? मी .. मी कधीच बरी होणार नाहीये का ?"
मनवा " असे नको बोलूस बाळा .. तू बरी होशील ... लवकर "
मनवा उठून किचन मध्ये जाऊ लागली तर सौम्या ने मनवा चा हात धरला
सौम्या " आई .. बाबाला माफ़ कर ना आता ? त्याला घरी बोलावं ना रहायला .. "
मनवा " सौम्या .. तू उगाच मोठ्यांच्या भांडणात नको पडूस .. मी कितीदा सांगितलंय तुला ? जा आराम कर "
सौम्या " आई .. तुला बाबांची गरज आहे .. उद्या मी नसणार आहे ना तुझ्या बरोबर .. मला माहितेय .. हल्ली .. मला सारख्या रक्ताच्या उलट्या होतात .. "
निस्तेज डोळे .. डोळ्यांखाली काळे झाले होते .. हातापायाच्या काड्या .. शरीरा ला थकवा .. मनवा ला आपल्या मुलीकडे बघवतच नव्हते .. जेवढी ती तिच्याकडे बघे तेवढे डोळे भरून येत होते .. सौम्याचे हे बोलणे ऐकून तर एक जोराचा हुंदकाच आला तिला .. मागे फिरली पुन्हा आपल्या लेकीला मिठीत घेऊन असंख्य पापे देऊ लागली
मनवा " सौम्या .. तुझी आई इतकी ब्रेव्ह नाहीये .. तुझ्या शिवाय नाही जगू शकणार मी .. तू ... तू .. मला सोडून कधीच जाऊ नकोस .. मला वचन दे .. पिल्लू ..असं वेड्या सारखं पुन्हा नाही बोलायचं .. आज रात्री बाबाला बोलावलंय मी घरी .. आपण वेळ आली तर बाहेरच्या देशातल्या डॉक्टरांना बोलावू .. तुला आम्ही काही होऊ देणार नाही "
सौम्या आनंदून " म्हणजे आई तू बाबाला माफ़ केलंस? आता बाबा घरी राहू शकतो ?"
मनवा " हो .. पण तेही जर तुझ्या बाबाला राहायचं असेल तर .. मी फोर्स नाही करणार त्याला "
सौम्या " आई तुला माहितेय ना? .. बाबा .. तू रहा .. असे म्हटल्या शिवाय नाही राहणार "
मनवा " सौम्या .. झोप बघू जरा वेळ .. मी मस्त डोसा आणि चटणी करून आणते तुझ्यासाठी "
सौम्या " आई .. ते चटणीला फोडणी दे .. मस्त कढीपत्त्याची "
मनवा " हो ग राणी "
-------------------------------
मनवा आणि श्रीधर चे लग्न होऊन १० वर्ष झाली होती . दोन वर्षांचा सुखाचा संसार झाला आणि सौम्या आली त्यांच्या जीवनात .. पण काहीच वर्षांत दोघांमध्ये काही गैरसमज झाले आणि दोघे सेपरेट झाले .. मनवा तिच्या पायावर उभी होती .. मुलीचा एकटीने सांभाळ करत होती .. श्रीधर चे पण सौम्यावर खूप प्रेम आहे ..पण मनवा त्याला माफ करत नव्हती आणि त्याला घरात घेत नव्हती .. सौम्याला भेटायला म्हणून श्रीधर त्याला जमेल तेव्हा यायचा . तिच्या बरोबर खूप वेळ एकत्र घालवायचा पण रात्री मात्र त्याला घरी रहायची परमिशन नव्हती .. हजारदा सॉरी बोलून सुद्धा मनवा त्याला माफ़ करत नव्हती ..
सेपरेट राहून जवळ जवळ ३ वर्ष उलटून गेली होती पण दोघेही अजूनही मुव्ह ऑन नव्हते झाले .. म्हणजेच दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम होते .. पण मनवा चा वुमेन इगो ( मुद्दामून हा शब्द वापरला .. बरयाचदा पुरुषांच्या बाबतीत मेल इगो वापरला जातो पण महिलांना सुद्धा हा इगो असतोच .. म्हणून वुमन इगो असा शब्द वापरला ) तिला अडवत होता ..
गरमा गरम डोसा आणि ओल्या खोबऱ्याची आंबट गोड चटणी .. त्याला कढीपत्ता आणि मोहरीची तडतडलेली फोडणी .. अहाहा ! काय सुगंध येत होता घरात .. जशी चटणी ला फोडली पडल्याचा सुगंध आला तशी सौम्या बेडरूम मधून चालत चालत .. डायनिंग वर येऊन बसली ..
एक क्षण मनवाला श्रीधर ची आठवण झाली .. श्रीधर पण अशी चटणी ला फोडणी बसली कि लगेच जेवायला येऊन बसायचा .. हि चटणी म्हणजे त्याची फेव्हरेट होती .. रोजच लागायची त्याला .. या चटणीच्यावासा वरच तो जेवायचा ..
सौम्याला तिने तिच्या हाताने भरवले .. औषध दिले .. आणि अंगावर पांघरूण टाकून झोपवले .. तेवढयात दाराची बेल वाजली .. बाहेर श्रीधर आला होता ..
मनवा ने दार उघडले ..
मनवा " आलास "
श्रीधर " सौम्या कुठे आहे ? "
मनवा " जेवलायस कि जेवणार आहेस ?"
श्रीधर " रिपोर्ट्स आले का ?"
दोघेही एकमेकांच्या प्रश्नांचे उत्तर देत नव्हते .. कसलाच ताळमेळ नसल्याने हा असा संसार विस्कटला होता ..
मनवा किचन मध्ये गेली आणि गरम डोसे बनवू लागली श्रीधर साठी .. तोपर्यंत श्रीधर फ्रेश झाला आणि सौम्या च्या उशाशी जाऊन बसला .. तिच्या डोक्यावर हाताने थोपटत होता ..
मनवा " ताट वाढलंय .. जेवून घे "
श्रीधर न बोलता आला आणि जेवायला बसला .. त्याला त्या चटणीच्या सुवासाने राहवलेच नाही ..
श्रीधर " तू पण बस जेवायला "
मनवा " नाही नकोय मला "
श्रीधर ने पण काही आग्रह केला नाही .. \" जेवायचं तर जेव ...नाहीतर नको जेऊ "
श्रीधर " रिपोर्ट्स आले का ?"
मनवा " हो आलेत "
श्रीधर " काय म्हणाले डॉक्टर ?"
मनवा " तू जेव आधी मग बोलू आपण .. "
श्रीधर ने पटकन जेवण उरकले आणि रिपोर्ट बघितले आणि मटकन खालीच बसला बेडवर ..
मनवा बेडरूम च्या खिडकीत उभी राहून रडत होती .. श्रीधर पण सुन्न झाला होता .. आपल्या मुलीची हि अवस्था .. ब्लड कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराने तिला का जखडावे .. देवाने तिच्या ऐवजी मला का नाही असला आजार दिला .. मी .. हसत तयार झालो असतो .. श्रीधर ला लिटरली दरदरून घाम फुटला होता .. सगळे रिपोर्ट्स त्याच्या हातातून सटकले .. तो धावतच सौम्याच्या रूम कडे गेला आणि झोपलेल्या सौम्याला छातीशी कवटाळून रडू लागला
श्रीधर " सौम्या ...पिल्लू .. माझी एवढीशी पिल्लू .. काय ग हे .. "
श्रीधर च्या आवाजाने सौम्या जागी झाली ..
सौम्या " बाबा .. बाबा .. आलास का तू .. बाबा .. अरे रडतोस काय ? तू काय लहान आहेस का आता ?"
श्रीधर चा हात मायेने सौम्याच्या डोक्या वरून फिरत होता .. " कशी आहेस पिल्लू .. काय त्रास होतोय .. काही दुखतंय का तुला ? किती बारीक झालीस .. " भरल्या डोळ्यांनी एक हतबल बाप होता
सौम्या " बाबा अरे .. मी बरी आहे आता .. तू नको काळजी करुस .. तू ना तुझ्या मनवा ची काळजी कर .. ती बघ .. ती पण आल्या पासून रडतेय .. "
श्रीधर ने तिला मांडीवर घेतले .. ती दोन महिन्यांची असताना त्याने मांडीत घेतल्या शिवाय झोपायची नाही ती .. "
श्रीधर च्या तोंडून आपसूक अंगाई आली " बाळा जो .. जो .. रे "
सौम्या हसतच " बाबा .. नको ना .. किती बोअर करतोय तू .. "
तेवढ्यात मनवा डोळे पुसत आली तिथे .. सर्वांना दुधाचे कप घेऊन
मनवा " चला आता न कंटाळा करता दूध पिऊन घ्या बरं "
सौम्या " नको ना आई .. मला नाही आवडत दूध "
शेवटी दोघांनी मोठ्या प्रयत्नांनी तिला दूध प्यायला दिले आणि झोपवली आणि बाहेर येऊन बसले
थोड्या वेळाने
श्रीधर जायला निघाला " मी येतो उद्या .. आपण दोघे मिळून डॉक्टरांकडे जाऊ एकदा "
मनवा " श्री .. "
आज बऱ्याच दिवसन्नी तिने त्याला ‘ श्री ’ अशी हाक मारली होती .. हल्ली श्रीधरच म्हणायची
श्री ने चमकून तिच्याकडे पहिले . ती नेहमी सारखी करारी.. कोणाचीच गरज नसणारी स्त्री नव्हती .. ती आज एक थकलेली .. घाबरलेली .. भेदरलेली आई होती ..
मनवा रडतच " श्री ... जाऊ नकोस .. तिला तू पाहिजेस .. तिला तुझी गरज आहे .. तू जाऊ नकोस .. प्लिज " आणि दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन मनवा जोर जोरात रडू लागली ..
श्री ने पायात शूज घातलेले ते लगेच काढले आणि पटकन मागे फिरला आणि मनवा ला घट्ट मिठीत घेतले त्याने
मनवा जोर जोरात रडतच होती .. अल्मोस्ट कोलॅप्स झाली होती " श्री माझ्या पिल्लू ला वाचव ना .. प्लिज .. श्री .. मला हवीय ती .. का .. माझ्या एवढ्याश्या लेकराला देवाने असं केलं.. श्री .. (मधेच आवंढा गिळत ) श्री .. मला डॉक्टर म्हटले .. भरीत भारी १ महिना .. जास्त वेळ नाहीये तिच्याकडे .. लास्ट स्टेज .. श्री .. वेळ नाहीये .. काय करू मी .. कुठे जाऊ .. आपण तिला बाहेरच्या देशात नेऊ .. माझा नि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे .. माझे सगळे रक्त तिला देऊ .. श्री माझ्या मुलीला वाचव "
श्री " मनवा .. सांभाळ स्वतःला ..आपल्याला तिची काळजी करायला हवी .. करू काहीतरी .. तू नको काळजी करुस "
बराच वेळ मनवा ला समजावत होता तो .... तिला स्वतः डोसा बनवून त्याने भरवला .. तिची अवस्था फार वाईट झाली होती .. काळजीने .. रडून रडून थकली होती .. मला कोणाची गरज नाही .. मी .. माझी समर्थ आहे हा सगळा अभिमान.. तेज गळून गेले होते ..
श्री च्या मांडीवर डोके ठेवून ती आडवी पडली होती श्री सोफ्यावर बसला होता आणि तिच्या केसांतून हात फिरवत " मी आहे तुझ्या बरोबर असा विश्वास देत होता "
बराच वेळ झाल्या नंतर तशीच ती तिथेच सोफ्यावर त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आणि त्याला तिथेच बसल्या बसल्या झोप लागली होती .. सौम्या ला सकाळी लवकर जाग आली .. आई अजून माझ्या शेजारी नाही आली म्हणून बघायला बाहेर आली तर बाहेर दोघांना असे सोफ्यावर झोपलेलं तिने बघितले आणि सौम्याला खूप आनंद झाला .. आई आणि बाबांचं भांडण मिटले .. म्हणत धावतच ती मनवा च्या पोटावर चढून पुन्हा झोपली .. आनंदाने ..
पुढे श्रीधर मनवा आणि सौम्या तिघे मिळून कॅन्सर वर मात करण्यासाठी अहो रात्र पर्यंत करत होते .. सौम्याच्या सगळ्या इच्छा तिचे आई बाबा आनंदात पूर्ण करत होते .. सौम्या ला रोज १० मिनिटे गार्डन ला खेळायला न्यायचे .. तिला एस्सल वल्ड ला घेऊन गेले .. छोट्या छोट्या राइड्स केल्या .. तिला खायला काय पाहिजे ते मनवा स्वतःच्या हाताने खायला करून भरवायची .. श्री च्या मांडीवर थोपटून तो तिला झोपवायचा ..
सौम्या " बाबा .. आणि आई माझ्या कपाटात मी एक इन्व्हलोप ठेवलंय .. ते शाळेत एक दिवस एका NGO आणि हॉस्पिटल चे लोक आले होते त्यांनी तो फॉर्म मला दिला होता .. मी तो घेऊन ठेवला पण आई बाबांची सही पाहिजे त्यावर .. "
मनवा " सौम्या बाळा झोप आता .. नको शाळेचा विचार करू .. तूला आरामाची गरज आहे "
सौम्या " आई .. आण ना तो इन्व्हलोप "
मनवा " नको ग .. बाळा झोप ना .. "
श्री " काय आहे त्यात बाळा "
सौम्या " बाबा .. माझे जेवढे ऑर्गन वापरता येतील ते सगळे ऑर्गन मला डोनेट करायचेत .. त्या NGO वाल्यांनी आम्हाला एक व्हिडीओ दाखवला होता आज जगात अशी कितीतरी लहान मुलं आहेत .. त्यांना दिसत नाही .. कोणाचे हार्ट नीट कम करत नाही .."
मनवा ने पुन्हा डोळ्यांत अश्रू काढायला सुरुवात केली .. " झोप ना सौम्या .. तुला आता मी ओरडू का ? कशाला नको ते बोलत बसलीय.. तुला काहीहि होणार नाहीये "
सौम्या तर झोपली .. पण श्री मात्र अस्वथ होता .. त्याने तिच्या कपाटातले ते कागद बाहेर काढले .. ऑर्गन डोनेट संदर्भात वाचून काढले .. आपली ८ वर्षांची मुलगी सुद्धा इतका परिपकव विचार करते त्याला शॉकच लागला ..एकदम शांतच झाला तो ..सौम्याला झोपवून तो त्याच्या बेडरूम मध्ये आला .. झोपलेल्या मनवा कडे बघू लागला .. मनवा जशी विचारांची पक्की आहे तशीच सौम्या पण पक्की आहे .. दिसायला माझ्या सारखी असली तरी गुण आईचे घेतलेत तिने ..
मनवा " श्री .. झोपला नाहीस का ? कसला विचार करतोय ?"
श्री चे डोळे पाणावले होते .. " मनु .. आपली सौम्या .. "
मनवा पण रडायला लागली .. दोघे लिटरली घाबरले होते .. हातातून निसटून जाणारी आपली पोर सहनच होत नव्हते त्यांना दोघांना ..
----------------
पुढे काही दिवसात सौम्या तिच्या आई वडिलांना सोडून गेली .. श्री ने तिची शेवटची ईच्छा सुद्धा पूर्ण केली .. तिचे सर्व बॉडी पार्टस डोनेट केले .. कोण्या एका अंध मुलाला नेत्र दान केले आणि ते अंध मुलं आज तिच्या डोळ्यांनी हे सारे जग पाहत होते .. कोण्या एका मुलीला सौम्याचे हृदय दान दिले होते आणि तिच्या हृदयात ती कायमसाठी जिवंत राहिली होती .. खऱ्या अर्थाने आज सौम्या मरून सुद्धा जिवंत राहिली होती .. अजरामर झाली होती .. कारण ज्यांना तिने तिचे ऑर्गन्स दिले होते त्यांनी पण मरणोत्तर अवयव दान करावे असे सांगितले होते ..
---------------
मनवा आणि श्रीधर मुलीच्या दुःखातून बाहेर पडत नव्हते .. पण मुलीने जाताना त्यांच्यातला दुरावा संपवून गेली होती .. ते दोघे एकमेकांतील राग रुसवा विसरून एकत्र आले होते .. एकमेकांचा आधार बनले होते .. सौम्या ने सांगितल्या प्रमाणे एकमेंकांची काळजी घेत होते .. आणि रोज कितीदा तरी सौम्याला आठवत बसायचे.
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे…
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,
कितीदा सुकून पुन्हा फुलावे…
कितीदा नव्याने…
किती हाक द्यावी तुझ्या मनाला,
किती थांबवावे मी माझ्या दिलाला,
कितीदा रडुनी जीवाने हसावे…
कितीदा नव्याने…
मुलीने घेतलेल्या अवयव दानाच्या या धाडसी निर्णयाला आई वडिलांनी साथ दिली होती .. कारण त्यांना तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या .. डॉक्टरांनी त्यांनी घेतलेल्या निर्णया बद्दल त्यांचे कौतुक केले .. इतके कि TV वर सुद्धा बातमी दाखवण्यात आली.. समाज आणि नातेवाईक ह्या दोघांना आणि सौम्याला कधीच विसरणार नाहीत .. सौम्याने एक प्रकारे सामाजिक ऋण फेडले होते .. मरणोत्तर अवयव दान करून एक प्रकारे पुण्याचं काम केलं होते ..
पुढे मनवा ला पुन्हा दिवस गेले .. कदाचित पुन्हा सौम्याचं आपल्या पोटी येईल अशी आशा बाळगून होते ..
समाप्त !!!
कथा काल्पनिक आहे .. आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा ..
© सौ. शीतल महेश माने