हृदयी प्रीत जागते भाग ४

Story Of Two Friends And Their Love

हृदयी प्रीत जागते भाग ४
क्रमश : भाग ३


शंतनू मस्त मामीच्या हातचं जेवला .. मामाने त्याला मेडिकल मधून एक गोळी आणून दिली होती ती खाल्ली आणि मग गाढ झोपून गेला होता ..मामाने ईकडे लगेच त्याची माणसे कामाला लावली आणि गावात नव्या किंवा दिव्या नावाची कोणी मुलगी आहे का ह्याची चौकशी केली .. तर अशीच चौकशी करताना त्याला कळले कि सरपोतदार आजोबांची नातं जी शहरात शिकायला असते तिचे नाव नव्या आहे .. आणि आज सकाळीच ती आपल्या गावात होती आणि १० नंतर तिच्या आजोबांनी गाडीने शहरात पाठवली कारण तिचे कॉलेज होते .. मामाला कोणीतरी नव्याचा एक जीन्स मधला फोटो पण पाठवला होता ..
गावातल्या रमेशच्या बहिणीची ती चांगली मैत्रीण झाली होती त्यामुळे दोघींचा एक फोटो होता त्यातला नव्याचा फोटो मामाकडे आला ..
नव्या नक्कीच दिसायला सुंदर होती,जीन्स घातली होती माधुरी दीक्षित सारखा तिचा स्टेप कट होता .. शिवाय शहरात शिकायला जाते म्हणजे फक्त गावातलीच नाही तर ती थोडी मॉडर्न पण होती.. पण सरपोतदार आजोबा एकदम स्ट्रिक्ट होत .. गावात आल्यावर मुलीला गावातल्या सारखे कपडे घालायला लावायचे .. त्यामुळे इकडे आली कि ती परकर पोलका आणि दुपट्टा घालायची .. इतकी सारी माहिती मामानी काढली आणि घरी आपल्या भावी सुनेचा फोटो मोबाईल मध्ये घेऊनच आले. त्यांनी शंतनूला उठवले
मामा " शंतनू,उठ आता .. झाला कि नाही आराम " शंतनू डोळे किलकिले करून उठला .. मामा हसतच त्याच्या समोर उभा होता.
मामा " मला माहिती मिळालीय त्या मुलीची .. जा उठ तोंड धुवून ये .. चहा घेता घेता सगळं सांगतो
शंतनू पटकन उठला आणि फ्रेश होऊन आला .. मामीने दोघांना चहा करून आणला .. मामांनी फुर्र फुर्र करून चहा घेतला आणि त्याला मिळालेली सगळी माहिती सांगितली .. आणि तिचा फोटो पण दाखवला .. शंतनू तिचा चेहरा बघून इतका खुश झाला .. मामा ती अशीच दिसत होती .. हीच आहे ती .. थँक यु मामा .. थँक यु .. म्हणत म्हणत त्याने मामला घट्ट मिठी मारली.
शंतनू " मामा, शहरात ती कोणत्या कॉलेजला आहे हे कळलं का ?"
मामा " नाही ना .. ते आत तू बघ "
शंतनू" हो नक्कीच .. मामी .. मी निघतो ग "
शंतनूला आता तिकडे थांबवेना , ती तिकडे शहरात आहे म्हणजे त्याची वाट बघतेय आणि आता त्याला तिला शोधायचं होते ..
मामा " हे बघ,आता रात्र झालीय .. उदया सकाळी जा "
मामी " हो .. मामा बरोबर सांगत आहे "
शेवटी शंतनूला रात्र मामाकडे रहावं लागले.
शंतनूने रात्री मंथनला कॉल केला .. मंथन नुकताच पार्टी वरून आला होता .. स्वतःला आरशात बघून हसत होता .. फायनली त्याचं आणि नव्याचं बोलणं झाले होते आणि आता ते फ्रेंड्स झाले होते .. तेवढयात त्याला कॉल आला
शंतनू " हॅलो मेरी जान ,काँग्रॅच्युलेशन !! शेवटी जिंकलास ना .. माहीतच होते मला तू जिंकशीलच .. "
मंथन " आज ना पाऊस पाडला रे गोल्स चा "
शंतनू " हो पाहिले फोटो मी .. अव्याने टाकले "
मंथन " तू कधी येतोय साल्या .. खूप काही घडलंय कालच्या दिवसात .. मला तुला खूप काही सांगायचंय "
शंतनू " हो ना मला पण सांगायचंय .. खूप काही माझ्याही आयुष्यात घडतेय .. तुझी वहिनी अल्मोस्ट फायनल झालीय .. मामाने पण माहिती काढलीय .. आता लवकरच मामा स्थळ घेऊन जाईल माझे तिच्याकडे फक्त एकदा बाबांनी परमीशन द्यायला हवी "
मंथन " अरे पण नोकरी ?"
शंतनू " अरे तिला गावातली पण सवय आहे आणि शहरातली पण .. मी विचार करतोय आता इथेच मामाकडे शेतीत लक्ष घालतो .. मामाचा पण खूप मोठा पसारा आहे .. नोकरीत काय आहे ?"
मंथन " गुड .. शाबास.. आता म्हणजे तू शेतकरी झालास. " आणि हसला
शंतनू " अरे बरीच बाकीची पण कामं असतात ज्यात मी माझे शिक्षण वापरून मामाला फायदा होईल "
मंथन " नक्कीच , हल्ली शेतीकडे वळणें पण गरजेचे आहे .. ज्यांची आहे त्यांनी तरी निदान सोडली नाही पाहिजे "
शंतनू " अरे आपण बघना .. पोरगी आयुष्यात आल्यावर एकदम शहाणे झाल्या सारखे वाटतोय ."
मंथन " मी पण विचार करतो आता डॅडला बिझनेस मध्ये मदत करेन ."
शंतनु आणि मंथन दोघेही एकदम " म्हणजे च्यायला आपण लग्नाला तयार आहोत " आणि जोर जोरात हसायला लागले.
मंथन " चल उद्या सकाळी येतोय ना ?"
शंतनू " हो .. आताच निघत होतो रे पण मामा नाही पाठवत म्हणतोय रात्र झालीय "
मंथन " चल भेटू दया सकाळी .. तुला भेटवतो तुझी वहिनी "
शंतनू " उद्या तुला दाखवतो फोटो तुझ्या वहिनीचा "
आणि दोघे पुन्हा जोर जोरात हसले.
--------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी मंथन मस्त तयार होऊन त्याच्या बाईकने कॉलेजला आला .. आणि त्याच्या नेहमीच्या कट्टयावर बसून शंतनूची वाट बघत होता .. थोड्याच वेळात तिथे शंतनू आला .. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली.
शंतनू " काँग्रट्स .. "
मंथन " काँग्रट्स. "
दोघेही हसले
शंतनू "चल , जर्सी नंबर २ ला भेटवं "
मंथन " अरे हो , पण एक मिनिट काल नुसतीच मैत्री झालीय .. तिला अजून मी आवडतोय कि नाही मला माहित नाही .. त्यामुळे नुसता फ्रेंडली बोल तिच्याशी ओके. "
शंतनु " ओके .. "
मंथन " तुझी वालीचा फोटो दाखव ?"
शंतनू " अरे .. माझी वालीचा फोटो नंतर दाखवेन मी. "
मंथन " का ? असे का ?"
शंतनू " कारण तुझ्या आधी मी प्रेमात पडलो आणि लगेच तुला सांगितले .. त्यामुळे आता तू पाहिले तिला भेटावं मग माझी वालीचा फोटो दाखवतो. "
मंथन " ठीक आहे .. तू म्हणशील तसे .. तसेही मी डायरेक्ट वहिनीला तुझ्या लग्नात पण भेटायला तयार आहे. "
शंतनू जरासा लाजला.
मंथन " सो यु आर ब्लाशिंग "
शंतनू " नाही रे .. आपण ना एकाच मांडवात लग्न करू .. मग अजून मज्जा येईल ना. "
मंथन " चालेल कि "
शंतनू " मग कुठे भेटेल ती "
मंथन " आय डोन्ट नो .. म्हणजे ती कॉलेज हॉस्टेलला राहते .. कदाचित ग्राउंड वर पण असेल "
दोघे ग्राउंड वर आले .. ग्राउंड वर सगळ्या मुली खेळत होत्या आणि मंथनची नजर तिला शोधत होती .. पण ती काही दिसे ना .. कदाचित रात्री झोपायला उशीर झाला असेल म्हणून आली नाही का काय ?
मंथन " चल गर्ल्स हॉस्टेलला जाऊ ?"
शंतनू " अरे थांब ना, वाट बघू थोडा वेळ.. तू मोबाईल नंबर नाही घेतलास का ?"
तेवढयात शंतनूच्या मोबाईल वर एक अननोन नंबर वरून कॉल आला
शंतनूने कॉल उचलला.
शंतनू " हॅलो .. कोण बोलतंय? "
तिकडून " हॅलो,मी नव्या बोलतेय .. मला तुला भेटायचंय ?"
शंतनू एकदम एक्ससाईट झाला .. आयला मी हिला शोधायच्या आधी हिनेच मला शोधले . मामा पोहचला वाटत तिच्या आजोबांकडे .. त्या शिवाय इतक्या फास्ट ती कॉल करू शकत नाही.
शंतनू " हा मग कधी आणि कुठे भेटायचं ते सांग " मी पोहचेल. "
नव्या " मी MD कॉलेजच्या पाठीमागे एक कॅफे आहे ना तिथे तुझी वाट बघतेय .. जरा येशील का आता भेटायला ?"
शंतनू " हो ठीक आहे .. आलोच लगेच
मंथन " कुणाचा रे फोन ?"
शंतनू " अरे, ते माझ्या वालीचा कॉल आला. "
मंथन " अरे वाह !! \"तेरी तो निकल पडी. "
शंतनू " भेटायला बोलावतेय .. च्यायला .. घाम फुटला रे असला सुंदर आवाज आहे ना ."
मंथन " सही !! ठीक आहे .. मग जा .. जाऊन ये .. मग आल्यावर भेटवतो तुला जर्सी नंबर २ ला "
दोघेही सेपरेट झाले .. शंतनू वॉशरूम मध्ये गेला .. चेहरा धुवून केसांना सेट करून कॉलेजच्या मागे असलेल्या कॅफे मध्ये आला ..
ऑरेंज लॉन्ग स्कर्ट व्हाईट टॉप,स्टेप कट असल्याने मोकळे सोडलेले केस .. पायात ब्लॅक हिल्सचे सँडल .. तिरकी टाकलेली स्लिंग बॅग , डोळ्यांवर गॉगल आणि तोंडात च्युईंगम .. फोटो बघितल्यामुळे त्याने लगेच ओळखले तिला ..
स्वतः च्या हार्टबीट्सचा आवाज त्याला येत होता " धक धक.. "
पटकन येऊन तिच्या समोर बसला.
तिने एकदम मोकळी हसून त्याला " हाय " म्हंटले
ती " सो .. मी नव्या .. "
तो " मी .. शंतनू "
नव्या " तर मला आत्ताच आजोबांचा फोन आला होता, तुझ्या मामांनी माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घातली आहे .. आणि मला असे कळले कि काल तू मला पाहिलेस आणि तुला माझ्याशी लग्न करायचंय "
शंतनु " काही ऑर्डर करूया का ?"
नव्या " नाही .. मला लवकर जायचंय .. "
शंतनू " इथली कॉफी चांगली असते .. " बोलतच त्याने वेटरला हात केला आणि दोन कॉफी ऑर्डर केल्या.
नव्या " मी अरेंज मॅरेज वर बिलिव्ह करत नाही .. सो मला या लग्नांत अजिबात इंटरेस्ट नहिये .. तर मी तुला नकार देण्या आधी तू मला नकार देऊन टाक."
नव्या एकदम मूळ मुद्यावरच घसरली
शंतनू " काल, तू त्या कोकरा बरोबर बोलताना किती छान दिसत होतीस , आणि ते कोकरु पण किती क्युट होते "
नव्या" हमम .. तो विषय महत्वाचा नाहीये .. मी काय सांगते ते महत्वाचे आहे . “
शंतनू " तू मला अशी किती ओळखतेस ? प्रेम असे लगेच कसे होईल ? थोडा एकमेकांना वेळ तर देऊ "
नव्या " हे बघ , माझ्या जवळ एवढा वेळ नाहीये.. "
शंतनू " तू खरंतर , मला रिजेक्ट करायच्या हेतूनेच इथे आलेली दिसतेय ? का ? कोणी आहे का तुझ्या आयुष्यात?"
नव्या "आय थिंक मला जे तुला सांगायचे होते ते मी तुला सांगितलंय .. मी निघते "
शंतनू " एक मिनिट, मी बोलत नाहीये तर तू जरा जास्तच बोलतेय असे वाटत नाहीये का ? सी .. आय एम इन लव्ह अँड आय वॉन्ट टू मॅरी विथ माय लव्ह .. त्यामुळे लग्न तर मी तुझ्याशीच करणार .. विथ युअर कन्सेंट ऑर विथ आऊट युअर कन्सेंट .. आता पर्यन्त आपल्या लग्नाच्या गोष्टी सुरु झाल्या असतील .. माझा मामा मी जी वस्तू मागतो ती वस्तू मला मिळवून देतोच ."

Hello,

Happy Holi to all readers..

Please note 17th and 18th two days I will not post part due to festival...

Enjoy festival of colours..

Sheetal mane

🎭 Series Post

View all