हृदयी प्रीत जागते भाग 2

Story Of Two Friends And Their Love
हृदयी प्रीत जागते भाग २
क्रमश : भाग १
मंथनची त्याच्या टीम बरोबर ड्रेसिंग रूम मध्ये चर्चा चालू होती .. टोनीच्या टीमला कसे हरवायचं असे सगळे बोलत होते .. ग्राउंडवर मुलींची मॅच चालू होती.. टोनीच्याच कॉलेजच्या मुली वर्सेस मंथनच्या कॉलेजच्या मुली .. या आधी मंथनच्या कॉलेजच्या मुलींची फुटबॉल टीम नेहमी टोनीच्या म्हणजे SD कॉलेजच्या टीम कडून हरायची .. त्यामुळे कोणीही ती मॅच बघण्यात इंटरेस्टेड नव्हतं ..
तेवढ्यात अविनाश धावत आला.
अविनाश " मंथन,अरे बाहेर चल, पोरींची टीम सॉलिड खेळतेय .. यावर्षी आपल्या कॉलेजच्या पोरी पण फुटबॉलची मॅच काढणार."
मंथन "नाही रे .. तेवढी टाप नाहीये त्यांच्यात."
अविनाश " अरे तू बाहेर तर चल .. यावर्षी कोणीतरी नवीन मुलगी टीम यामध्ये खेळतेय. अख्ख्या ग्राउंड वर तिच्याच नावाचा जयघोष चालू आहे.. मी तर पहिल्यांदा एवढी भारी मॅच बघितली पोरींची.. चल"
तसे सगळे धावतच ग्राउंडवर जिकडे प्रेक्षक बसतात तिथे आले.. रूमच्या बाहेर आल्या आल्याच टाळ्यांचा कडकडाट आणि चिअर अपचा आवाज येत होता .. असा आवाज फक्त बॉईजच्या टीमलाच मिळत असे नेहमी
ग्राउंड वर मोठं मोठ्याने कॉमेंट्री चालू होती .. गाणी,धिंगाणा .. पोरींची टीम इकडे तिकडे धावत होती .. एक मुलगी जिच्याकडे बॉल होता ती एकटीच बरीच जणींना चुकवून बॉल पायाने मारत मारत पुढे ढकलत होती .. दुसऱ्या कोणाला टच पण करून देत नव्हती आणि एक क्षणात " गोल " अंपायरने शिटी वाजवली आणि स्कोर बोर्ड पुन्हा झळकला " ६ गोल " बाय MD कॉलेज म्हणजे मंथनच कॉलेज
सगळ्या पोरी बसायच्या खुर्च्यांवर उभ्या राहून लिटरली उड्या मारून त्या गोल करणाऱ्या मुलीला नावाने हाक मारून चिअरअप करत होत्या" नव्या .. नव्या ..किंवा कदाचित दिव्या ..दिव्या " तेवढ्या गोंगाटात नीट आवाज येत नव्हता.
मंथन अविनाशला " कोण आहे रे ती गोल करणारी ?"
अविनाश " न्यू ऍडमिशन आहे .. नव्या का दिव्या साले काय ऐकू येत नाही नाहीये”
मंथनची नजर फक्त त्या गोल करणाऱ्या मुलीवर होती .. तिने केसांचा हाय टाईट पोनी बांधला होता .. ब्लू कलरची कॉलेजची जर्सी त्यावर नंबर होता २ .. मंथनचा जर्सी नंबर पण दोनच होता .. एक मिनिट त्याला तिचा अभिमान वाटला .. नंबर २ म्हणजे स्पेशल आहे असे वाटले .. तिची चपळाई .. ती धावली कि मागे पुढे तिचा हलणारा पोनी .. चाणाक्ष तजेलदार,धारदार डोळे.. असे मागे पुढे हलत होते कि ती जणू पायाच्या आधी डोळ्यांनीच फुटबॉल खेळतेय .. तेवढयात तिने पुन्हा एकदा गोल केला .. आणि आनंदाने हाताची मूठ आवळून " येस" असे केले .. आणि तिच्या मैत्रिणीला आनंदात मिठी मारली ..
मॅच संपली आणि निकाल डोळ्यांसमोर होता .. मॅच मंथनच्या कॉलेजच्या टीमने जिंकली होती .. आणि सगळे उभे राहून टाळ्या वाजवत होते अगदी प्रिंसिपल मॅडम सुद्धा ..
जिंकलेली टीम ग्राउंडच्या बाहेर आली .. ती मुलगी .. पण बाहेर आली .. खूप दमली होती .. घामाने ओथंबली होती .. तिच्या हॅन्ड टॉवेलने चेहरा आणि मान पुसता होती .. पाण्याच्या बॉटलचे झाकण उघडले आणि पाणी पिऊ लागली .. पाणी पिताना तिचा कंठ हलत होता.. काय नजारा होता तो .. येता जाता सगळे तिचे अभिनंदन करत होते आणि तेवढ्या सगळ्यांना ती हसून " थँक यु बोलत होती "
चालत चालत त्या सर्व मुली ड्रेसिंग रूमला जायला निघाल्या.. मंथनची नजर केव्हा पासून तिच्यावरच होती .. ती जस जशी त्याच्या जवळ येतेय असे वाटले तस तसे त्याच्या हृदयात धड धड वाढू लागली .. का ? ती नुसती जवळ येतेय तर इतकी मनात चलबिचल होतेय .. मंथनला काहीच काळे ना ..
ती चालत त्याच्या एकदम शेजारी आली .. बाकीची टीम मधली मुलं .. तिला वेल प्लेड .. काँग्रट्स करत होते .. आणि ह्याची बोबडी वळली होती .. तिला शेजारून बघताना आताच हार्ट अटॅकने मरतो कि काय असे हृदय थांबले त्याचे .. एक क्षण.
ती पुढे जातेय बघितल्यावर तो पटकन बोलला" जर्सी नंबर २ .. काँग्रॅजुलेशन्स .. यु नेल्ड इट "
तशी ती जरा पुढे गेली होती ..पटकन मागे वळली .. आणि मंथन कडे बघून " थँक यु जर्सी नंबर दोन " आणि निघून गेली.
मंथन मनात " काटा रे काटा .. काय आहे यार .. अंगावर काटा आला "
अविनाश " ओये .. चला आता आपली मॅच आहे."
मंथन नाईलाजाने त्या सुखद धक्क्यातून बाहेर आला आणि आपल्या मॅचची तयारी करायला ड्रेसिंग रूम मध्ये गेला ..
तेवढयात त्याला फायनल ऑल द बेस्ट बोलायला शंतनूने कॉल केला
शंतनु " काय रे ? रेडी का मॅच साठी .. ?"
मंथन " यार ..आय एम इन लव्ह .. माझे हार्ट बिटस वाढलेत .. तिला पाहिले आणि वेडा झालोय."
शंतनु" काय बोलतो? कोण आहे ती ? "
मंथन"आय डोन्ट नो .. जर्सी नंबर २"
शंतनू" हा तर तुझ्या जर्सीचा नंबर आहे ना?"
मंथन " अरे तिच्या पण जर्सीचा नंबर दोनच आहे. "
शंतनू " आपल्या कॉलेज मध्ये ?"
मंथन " मग काय त्या टोनीच्या.. त्यांच्याकडे बघत पण नसतो मी "
शंतनू " कोण आहे कोण पण ती? "
मंथन " येड्या माहित नाही ना .. तू का नाहीयेस आज .. तुला दाखवली असती असती ना तुझी वहिनी"
शंतनू " साल्या.. सकाळी मी तुला तिला वहिनी बोल म्हटले तर मला शिव्या घातल्यास आता का ? "
मंथन " शांत्या .. आय एम इन लव्ह .. " तो जोर जोरात ओरडत होता आणि त्याच्या हृदय उड्या मारून मारून साथ देत होते.
शंतनू " च्यायला .. दोनो एक साथ प्यार में .. इकडे माझी पण अवस्था लै बेकार आहे .. सारखा तिचा पुसटसा चेहरा समोर येतोय आणि कानात आवाज येतोय " थँक यु."
मंथन " काय? ती तुला थँक यु बोलली "माझी वाली पण मला " थँक यु " असेच बोलली "
शंतनू " कुछ तो गडबड है यार ..काय होतंय काय आपल्याला?"
मंथन " काय होतंय काय माहित? प्रेमात असेच पडत असावे "
दोघेही बोलताना एक्ससाईट झाले होते.
अविनाश " मंथन अरे आटप .. नाव घेतायत टीमच. "
मंथन " चल रे ठेवतो फोन जातो मॅच खेळायला "
शंतनु " ऑल द बेस्ट .. किती गोल करणार आज ?"
मंथन " आज गोलचा पाऊस पडणार आहे .. आज मी जाम खुश आहे."
मंथनची टिम थोड्याच वेळात ग्राउंड वर धावत आली आणि सगळ्या पोरी " मंथन .. मंथन " असे ओरडायला लागल्या .. स्पोर्ट्स टी शर्ट मधून त्याचे ऍब्स दिसत होते आणि ते पाहून पोरी अजूनच ओरडत होत्या ..
मंथनने एकदा सर्व प्रेक्षांकडे बघितले .. स्टारचं होता तो कॉलेजचा .. सर्वांना हात वेव करून अभिवादन केले त्याने .. इतक्यात ती .. प्रेक्षकांच्यात बसलेली त्याला दिसली .. जीन्स,व्हाईट कॉलरचे टी शर्ट तेही इन केलेलं .. केस आता तिने मोकळे सोडले होते आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल लावला होता आणि तोंडात बहुदा च्युईंगम चघळत असावी..
मंथन " हाऊ इज पॉसिबल .. जेव्हा पण तिला बघतो तेव्हा हृदयात काहीतरी होते.. हार्ट बिट्स फास्ट होतात .. काय होतंय यार मला."
तेवढ्यात मॅच सुरु झाली ... मंथनने आता सगळे लक्ष मॅच वर केंद्रित केले आणि थोड्याच वेळात मंथन फूटबॉल वरचा त्याचा कंट्रोल आणि त्याच्या सगळ्या स्किल्स दाखवू लागला .. गोल झाला कि एक नजर तिच्याकडे बघायचा .. ती टाळ्या वाजवते का नाही हे बघायला .. पण काही उपयोग नाही .. ती तिच्या मोबाईल मध्ये जे तोंड खुपसून बसली होती .. ती त्याच्याकडे लक्षच देत नव्हती .. ना मॅच कडे .. आणि इकडे साहेबांचा पारा चढत होता .. मला इग्नोर कशी करू शकते ती .. ह्याचेच आश्यर्य वाटले त्याला.
पूर्ण कॉलेजच्या आवारात “मंथन मंथन असे सगळे ओरडत होते आणि मंथन त्याच्या टीम साठी गोल वर गोल करत होता .. टोनीच्या टीमला त्याने रडकुंडीला आणले होते ..
आणि रिझल्ट काय असणारा मॅचचा .. मंथनची टीम जिंकली होती .. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या .. मंथन मात्र मॅच झाल्यावर तिथून लगेच बाहेर पडला आणि ड्रेसिंग रूम कडे जायला निघाला ..
वाटेत त्यालाही सगळे काँग्रट्स करत होते .. तो ऍटीट्युड मध्ये " थँक यु .. थँक यु " करत निघून गेला .. मनात राग होता .. तिने त्याची मॅच नीट पाहिली नाही .. त्याच्यासाठी टाळ्या नाही वाजवल्या म्हणून
शॉवर खाली उभा राहिला.. डोळे मिटले कि तिचा चेहरा समोर येत होता .. आणि शंतनू म्हणाला तसा " थँक यु जर्सी नंबर २ " असा आवाज येत होता .. तयार होऊन बाहेर आला .. जीन्स टी शर्ट घालून तयार होऊन आला .. आणि त्याच्या बाईकने घरी जायला निघाला
तर अविनाश " अरे मंथन, तू लगेच का निघून आलास ?.. ती जर्सी नंबर दोन तुझी चौकशी करत होती."
तशी मंथनच्या चेहऱ्यावर हसू आले . पण दाखवत नव्हता .. फुकटच अटीट्युड " काय बोलली रे "
अविनाश " ती म्हणाली .. कॅप्टनच नाव काय ?"
मंथन "मग ?" तिने काय ऐकले नाही का ? स्टेडियम मध फक्त माझंच नावं घेत होते सगळे.
अविनाश " मी विचारले तुझे नाव काय ?"
मंथन " मग ती काय म्हणाली "
अविनाश " ती म्हणाली , ए .. माझे नाव कशाला हवंय तुला ? कामाशी काम ठेवायचं ? उगाच जास्त पीर पीर नाही करायची "
अविनाश एकदम बारीक तोंड करून बोलला आणि मंथनच्या चेहऱ्यावर गोड हसू आले
मंथन " कुठे गेली ती ?"
अविनाश " अरे मला काय माहित ? आमच्या सारख्याला भिका घालतात का पोरी ? साला आमचा जन्मच अरेंज मॅरेज साठी आहे "
मंथन " ए गप रे .. उगाच डोकं नको खाऊ "
अविनाश" मंथन,एक सेल्फी घेऊन दे ना मला तिच्या बरोबर .. अरे कसली आहे ती .. लहानपणी माधुरी दीक्षितचा धकधक गाणं पाहिल्यावर धकधक झाली होती आणि आता हि ज्या स्टाईलने फुटबॉल खेळते ना ते पाहून धकधक होतंय .. काश मी तो बॉल असतो .. निदान पायाने तुडवलं तरी असते रे तिने मला"
मंथन आणि अविनाश दोघेही टाळ्या देऊन हसू लागले.
अविनाश " मंथन .. तुझा मूड का गेलाय रे पण आज ?"
मंथन मनात " हो रे च्यायला !! उगाच डोक्याला शॉट .. कसला राग आला काय माहित .. “
मंथन “तो रे शंतनू नाहीये ना म्हणून असे होत असेल .. मी मिस करतोय त्याला "
अविनाश " चला .. म्हणजे .. तुम्ही दोघे रिलेशन मध्ये आहात हे सांगितलेत ते बरे केलेस "
मंथनने त्याची बॅग फेकून अविनाशला मारली .. तसा अविनाश हसत हसत लांब पळत सुटला
मंथन " तू ये ..साल्या .. रात्री पार्टीत तर येशील ना .. नाही तुला बॉल सारखा तुडवला तर बघ "
अविनाश " अरे हा मान फक्त जर्सी नंबर २ ला दिलाय मी .. तुला नाही "
मंथन तिचा उल्लेख झाला तसा उगाचच लाजला आणि उलटा हात स्वतःच्या केसांवरून मागे घेतला ..

🎭 Series Post

View all