ह्रदयी प्रीत जागते भाग १० अंतिम भाग

Story Of Two Friends And Their Love


हृदयी प्रीत जागते भाग १०
क्रमश : भाग ९
आज शंतनूचा साखरपुडा होता .. शंतनू एकदम खुश दिसत होता .. ग्लो आला होता नवरदेवाचा .. सगळे मोठे लोक सांगतील ते आनंदाने करत होता .. इतके कि त्याच्या हातावर त्याने मेहंदी पण काढून घेतली कारण मामांनी सांगितले शगुनाची मेहंदी नवऱ्याने पण काढायची ..
संध्याकाळी घरात पाहुणे यायला सुरुवात झाली .. आचाऱ्याने जेवण बनवायला सुरु केले. लाऊड स्पीकर वर कुमारसानु त्याचा घसा आळवत होता .. पोरं त्यावर नाचत होती .. बायका काठ पदराच्या साड्या नेसून मिरवत होत्या ... एकूणच लग्नाची तयारी जोरदार झाली होती .. स्टेज फुलांनी सजला होता .. नवरा नवरीच्या चेअर मांडल्या होत्या.
मामाने नव्याला आणायला गाडी पाठवली होती आणि आता कोणत्याही क्षणी नव्या नवरीच्या रूपात अवतरणार होती .. शंतनू नवरदेव बनून तयार होता .. मस्त शेरवानी घालून साखरपुड्यासाठी तिची वाट बघत होता ..
तेवढ्यात नवरीची गाडी आली .. आणि नव्या नवी नवेली दुल्हन बनून आली
नव्याने चिंतामणी रंगाची पैठणी नेसली होती .. मोत्याचे दागिने , अंगावर शाल .. लांब कमरेपर्यंत केस .. त्यावर गजरे लावले होते .. डोळ्यांत काजळ , चंद्रकोर वाह .. शंतनू तर शंतनू मंथन पण दोघेही स्तब्ध होऊन तिच्याकडे बघू लागले.
मंथन " उफ !! माय गॉड .. शी इज जस्ट ब्युटीफुल .. काँग्रट्स शंतनू .. " आणि मंथनने त्याला एक हसतच मिठी मारली .. हृदयात त्याचा खळबळ झाली होती. नव्याने सरळ सरळ त्याला निग्लेक्ट केले .. तो तिथे आहे का नाही तिला माहीतच नाही .. ती फक्त शंतनूकडे एक टक बघत होती .. .
थोड्याच वेळात साखरपुडा झाला .. गावातल्या सगळ्या लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला .. सकाळी हळद .. मग लग्न असा प्लॅन होता .
मंथन कडे एकदा पण तिने डुंकूनही बघितले नाही .. हे कारण पुरेसे होते मंथनच्या तोंडावर बारा वाजले ..
एवढा पण मी लगेच परका झालो का ? पूर्ण प्रोग्रॅम मध्ये साधे एक स्माईल पण दिले नाही .. ना माझ्याकडे बघितले .. मी समोर गेलो तर चक्क दुर्लक्ष केलं .. रागाने मंथन त्याला दिलेल्या रूम मध्ये आला आणि त्याचे सामान भरु लागला .. आत इथून निघूनच जावे .. इथे अजून थांबणे मुश्कील झाले होते .. किंवा .. तो नव्याला शंतनूची होताना पाहू शकत नव्हता .. आपोआप घाम सुटत होता .. डोळ्यांतून पाणी येत होते .. मन भरून आले होते .. हृदयातली धडधड जे काही होतंय ते चुकीचे होतंय असे ओरडून सांगत होते .. पण आपली हि मनाची अवस्था मी कोणाला सांगू ? कोण समजून घेईल ..
शंतनू जेव्हा सांगत होता तेव्हा मी ऐकायला पाहिजे होते .. म्हणूनच रागाने ती माझ्याशी अशी तुटक पणे वागली असणार
तेवढयात शंतनूचा कॉल आला .. "अरे कुणीकडे गेलास .. इकडे ये आपण स्टेज वर फोटो काढू .. नव्या गाणे म्हणणार आहे .. लवकर ये .. "
शंतनूला काय सांगू ? असा अचानक निघून गेलो तर त्याला नाही आवडणार .. काय करू ? काहीच कळेना त्याला .. तोंडावर पाण्याचे हबके मारून मारून चेहरा धुतला .. आणि फ्रेश होऊन बाहेर आला .. पण आत मध्ये रडल्यामुळे डोळे लाल झाले होते हे शंतनूच्या लगेच लक्षात आले
शंतनू " काय रे ? मी समजू शकतो तुझ्या भावना ? मला माहितेय तुझे नव्यावर प्रेम आहे .. आणि तुझ्या डोळ्यांसमोर नव्या माझी होतेय हे पाहणे म्हणजे कठीण काम आहे तुझ्यासाठी "
मंथनने त्याला एक कडकडून मिठी मारली " सॉरी , तू राग नको माणूस .. मला थोडा वेळ हवाय .. मला थोडा वेळ दे .. मी बाहेर पडेन तिच्यातून .. सॉरी यार "
शंतनू " मी तुला त्या दिवशी किती समजावले होते .. कि तू कर तिच्याशी लग्न .. पण नाहीच तू ऐकले नाहीस ? आता मी काहीच करू नाही शकत .. "
तेवढयात नव्याला सगळ्यांनी गाणे म्हणायला सांगितले
शंतनू " चल , जाऊ तिकडे .. " दोघे खुर्च्यांमध्ये येऊन बसले
राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा
हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता

पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते
लाजुनी मनोमनीं उगिच धुंद राहते
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता

दिवसरात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
तिच्या सुमुधुर आवाजाने तिने हे गाणे म्हंटले आणि शंतनू आणि मंथनच्या डोळ्यांत पाणी आले होते .. दोघांच्याही हृदयात अशीच अचानक प्रीत जागी झाली होती ..आपल्या दोघांच्या मनाचा ठाव जणू तिच्या गाण्याने घेतला होता .. दोघांनी आपापले डोळे पुसले .. मंडपात असलेल्या सगळ्या जणांनी कडकडून टाळ्या वाजवल्या ..
मंथन " शंतनू , ऐक ना .. आता मी इथून गेलेलेच बरे आहे .. माझ्या बेस्ट विशेष कायमच तुझ्या बरोबर असतील .. आय नीड सम टाईम .. असे सारखे भान हरपून तिच्याकडे बघणे पाप आहे .. माझी वहिनी आहे .. हे माझ्या मनाला कळले पाहिजे .. माझ्या हृदयात असलेली तिच्यासाठीची प्रीती थांबली पाहिजे .. तुला तर माहितेय हे सगळे जाणता अजाणता झाले आहे आणि एक ह्या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर आजिबात परिणाम होऊ द्यायचा नाहीये मला .. लवकरच मी माझ्यासाठी दुसरी नव्या शोधेन .. "
असे वाक्य तो बोलायला आणि मागून कुठूनसा फुटबॉल त्याच्या अंगावर आला आणि सटकन त्याच्या डोक्याला लागला ..
मंथन " आउच !! " आणि डोक्याला हात धरून बसला आणि दोघेही बॉल कुणी मारला म्हणून वाकून बघू लागले
तर समोर नव्या .. ट्रॅकसूट घालून केसांच्या हाय पोनी बांधून पायात स्पोर्ट्स शूज घालून उभी होती ..
ती तिच्या पायाने बॉल वरचा तिचा कंट्रोल दाखवत होती आणि बॉल पुढे पुढे पळत होता .. आणि एक जोरात किक आणि पुन्हा एकदा मंथनच्या डोक्याला बॉल लागला " व्हॉट द हेल .. लागतंय "
तो इकडे तिकडे बघू लागला तर शंतनू गायब झाला होता .. समोर नव्या आणि तोच उभा होता ..
मंथन " हे काय ? गावातली लोक मारतील .. आणि एक शंतनूला पण आवडणार नाही .. माझ्याशी बोलू नकोस नाहीतर मामाने बघितले ना तर दोघांना थोबडवूंन काढेल तो .. जा .. प्लिज जा .... "
नव्या " ए .. इडियट .. तुला ना मला जाम बदडून काढावी वाटतेय .. तुला माझे प्रेम कळत नाहीये ना ... तू खूप वाईट आहेस .. जशी तुझ्या हृदयात प्रीती फुलली तशी माझ्या हृदयात पण गेल्याच वर्षी तुझ्यासाठी प्रीती फुलली .. पण तू मला समजूनच नाही घेतले "
मंथन " नव्या , शट अप यार .. आता एंगेजमेंट झाली ना तुझी ? आता का हा विषय छेडतेय ?"
नव्याने त्याला हाताला धरले तो हात सोडवून घेऊ लागला " सोड .. कुणी बघेल "
नव्याने त्याला ओढतच स्टेज जवळ आणले तर शंतनू त्याच्या बायको बरोबर मस्त फोटोला पोज देत होता .. कधी तिच्या खांद्यावर हात .. कधी तो बसलाय .. कधी उभा राहिलाय आणि दोघांच्याही डोळ्यांत प्रेम ओथम्बुन वाहत होते .. मंथनला एक मिनिट काहीच कळेना ..
नव्या स्टेज वर पण आहे आणि त्याच्या जवळ फुटबॉल घेऊन पण उभी आहे ..
मंथनला एकी मिनिट गरगरले " मला नव्याचे भास होतायत वाटतं "
नव्या " बावळट !! ती माझी बहिण दिव्या आहे ? "
मंथन " सेम टू सेम तुझ्यासारखी आहे "
नव्या " येस .. शी इज माय ट्वीन सिस्टर .. जुळी बहीण आहे .. शंतनूने गावात जी बघितली पहिल्यांदा ती दिव्या होती .. मी नाही "
मंथन " म्हणजे ?"
नव्या " म्हणजे त्या दिवशी आम्ही दोघी शेतात होतो .. त्यामुळे मला वाटले कि त्याने मलाच पाहिली .. पण तो जो कोकराचा सिन सांगत होता तो माझ्या बरोबर घडला नव्हता .. माझी बहीण दिव्या पलीकडच्या गावात टीचर आहे .. ती तिकडेच राहते .. "
मंथन एकदम आनंदाला " मग हे आधी का नाही सांगितलेस ? तुला बहीण आहे हे तुला तर माहितीच होते ना "
नव्या " आजोबांनी सांगितले कि शंतनूने मला पसंत केलेय .. त्यामुळे शंतनू बरोबर आजोबांनी आणि मामाने माझे नाव जोडले आणि त्यातून सगळा गोंधळ झाला "
मंथन " मग हे तुला कसे आणि कधी कळलं?
तेवढयात शंतनू आणि दिव्या दोघे चालत आले.
शंतनू " मी सांगतो .. हा सगळा प्लॅन माझाच होता .. त्या दिवशी मी जेव्हा लग्न कॅन्सल करायला म्हणून गावी आलो होतो तेव्हा घरात आल्रेडी लग्नाची तयारी सुरु झाली होती आणि टिळा नाही तर डायरेक्ट लग्न करायचं ठरलेय म्हटल्यावर मी जरा नाराजीतच पुन्हा शहरात येत होतो तर पुन्हा तेच कोकरू आडवे आले आणि मी गाडीवरून पडलो .. तिथेच बेशुद्ध झालो.
शुद्ध आली तेव्हा .. दिव्या माझ्या समोर होती .. लांब केस .. परकर पोलका , पिंक दुपट्टा .. सेम जी मी पहिल्यांदा पाहिली होती ती .. मी म्हंटले नव्या इकडे कुठे आली .. तिची तर मॅच आहे आज .. मी म्हटले " नव्या .. तू कधी आलीस इकडे ?"
तर हि म्हणाली " मी नव्या नाही मी दिव्या आहे .. नव्या माझी जुळी बहीण आहे "
मला असा आनंद झाला .. मला शुद्ध नव्हती तर हिने कसल्या तरी पाल्याचा रस पाजल्यामुळे शुद्ध आली होती .. मग काय तसाच झपाटल्या सारखा मामा कडे आलो आणि त्याला सांगितले मला नव्या नाही दिव्या आवडते .. मामा असा भडकला .. मला म्हणाला काल पर्यंत नव्या आज दिव्या .. काय येडा झाला काय ?\"
मग मी मामाला सगळा किस्सा सांगितला .. मग मी आणि मामा आजोबांना भेटायला गेलो आणि सांगितले कि मला दिव्याशी लग्न करायचंय .. इतका आनंद झाला होता मला कि लगेच तुला फोन करून सांगणार होतो कि माझे प्रेम नव्या वर नाही दिव्यावर आहे .. पण म्हटलं जरा तुला छेडू .. त्या दिवशी इतका मागे लागून सुद्धा तू ऐकलं नाही ना .. म्हणून मग हे गुपित गुपितच ठेवलं तेही दोघांपासून.
आजोबांनी दिव्याला विचारले तुला हा मुलगा पसंत आहे का ? तर दिव्या म्हणाली ते सारखे माझ्या कोकराला वाचवतात आणि स्वतःला लागवुन घेतात .. किती प्राणी मात्रांवर प्रेम करतात .. मला चालेल .. पण मी शहरात रहायला जाणार नाही .. माझी शाळा सोडणार नाही हे त्यांना चालत असेल तर ..
मग काय ? मी लगेचच होकार दिला .. आणि म्हणून रात्री मी तुला आनंदात फोन केला होता .. आता मी लग्न करतोय . तू पण ये. आणि मुद्दामून तुला नव्या बरोबर शॉपिंगला पाठवली कारण तेवढाच एकत्र वेळ घालवाल शिवाय लग्नाची शॉपिंग काय तुम्ही दोघे फुकट घालवणार नाही .."
मंथन " नव्या तुला माहित होते का कि लग्न तुझे नाहीये तुझ्या बहिणीचे आहे "
नव्या " नाही ना .. ह्या लोकांना तुला आणि मला येडा बनवलंय .. मला हि वाटले आता मी ह्या शंतनूच्या गळ्यातच पडते कि काय ? "
तेवढ्यात दिव्या " ए .. हॅलो ... माझे मिस्टर आहेत ते आता .. आणि तुझे जीजू .. नीट बोल काय ?
शंतनु मनात " एवढा रिस्पेक्ट च्यायला !! "
मंथन "सॉरी वहिनी ..पण आता आपण ओळखणार कशी आपली बायको ?"
शंतनू " केस "
नव्या " लहानपणी आईला पण कन्फयुजन होयचे म्हणून आई माझे केस कापू लागली .. आणि हिचे लांब ठेवू लागली .. हाच मेजर चेंज आहे दोघींच्यात "
शंतनू " नाही ग .. खूप बदल आहे .. ती किती शांत आहे .. ती किती सुंदर आहे .. तिचे डोळे बघ .. "
दिव्या इकडे लाजून चूर " अहो !! काय हे .. कोणा समोरपण काहीपण बोलता "
तेवढयात शंतनूला कोणीतरी आवाज दिला म्हणून दिव्या आणि तो हातात हात घेऊन तिकडे गेले
मंथन " मग आपण पण उद्याच लग्न करायचं का ? ह्याच मांडवात .. नाहीतरी तुम्ही दोघी ट्विन्स आहेत .. आता इथून पुढे सगळेच एकत्र करू .. "
नव्या " तुला तर जायचं होते ना .. दुसरी नव्या शोधायला .. जा .. जा " आणि पुढे चालू लागली
मंथनने तिचा हात पकडला आणि सटकन मागे ओढली आणि डायरेक्ट मिठीतच आदळली " नको ना आता त्रास देऊ .. आधीच किती रडलोय मी .. तू रडवलंय मला .. चल आता किस देऊन टाक .. मघाशी किती जोरात बॉल मारलास मला "
नव्या " तुला तसेच पाहिजे .. अरे माझा मोबाईल ह्या तुझ्या मित्राने काढून घेतला होता .. तुझ्या पासून हि बातमी लपवण्यासाठी .. ह्याची सुहागरात बघ आता कशी बिघडवते ... "
मंथन " ए गप ए .. आपल्या दोस्ताला काही बोलायचं कामं नाही .. अजिबात त्याला त्रास द्यायचा नाही .. (हळूच तिच्या कानाजवळ)तुला काय त्रास द्यायचाय तो मला दे .. "
नव्या " ते दोघे किती छान दिसतायत ना .. शंतनूने बघ तिचा हात जो हातात घेतलाय तो सोडतच नाहीये " हे दोघे त्या दोघांना लांबून बघत होते.
मंथन " उद्या मॉम डॅड आणि दि जीजू ला इकडेच बोलावून घेतो .. आपण पण लग्न करू ?"
नव्या " कपडे ?"
मंथन " फुटबॉलच्या ड्रेस वर जर्सी नंबर दोन घालून करू "
नव्या " काही पण .. तू घेऊन दिलेला शालू नसेन मी "
मंथन " आणि दिव्या ?"
नव्या " तुला वाटतं का शंतनू दिव्याला मी आणलेला शालू नेसायला देईल .. तिची सगळी शॉपिंग त्याने स्वतःने केलीय "
मंथन "अरे वाह !! मग झाले तर .. आपण पण उद्याच लग्न करू ?"
नव्या " अरे ए .. पण आजोबांची परमिशन "
मंथन " घेतो ना ... चल जाऊ "
मग काय मंथन - नव्या आणि शंतनू - दिव्या यांचे दुसऱ्या दिवशी वाजत गाजत धुमधडाक्यात लग्न झाले .. अख्खी फुटबॉलची टीम मुलांची आणि मुलींची आली होती. सगळेच दिव्या आणि नव्याला बघून आश्यर्य चकित होत होते.
शंतनू आणि मंथन इतके खुश याआधी कधीच दिसले नाहीत .. दोस्ती सही सलामत ठेवली दोघांनी जरी दोघांच्याही हृदयात एकाच वेळी प्रीत जागी झाली होती तरी . देव पण कधी कधी परीक्षा बघत असतो .. आणि अशा परीक्षेच्या काळी माणसाची नियत कळून जाते .. देवाच्या परीक्षेत शंतनू आणि मंथन बहुदा पास झाले म्हणूनच दिव्या अचानक समोर आली .
लग्नानंतर चौघे एकत्र फिरायला गेले .. आणि चक्क वळून वळून लोक त्या दोघींना बघायचे .. फक्त केस लहान मोठे हा फरक होता ..
मंथन " नव्या , दिव्या वहिनी सारखे तुला पण गाणे म्हणता येतं का ग ?"
नव्या " छ्या !! असली गाणी बिणी आपल्या बसचं काम नाही. "
मंथन आणि शंतनू हसायला लागले.
दिव्या " मला कुठे येतं तिच्यासारखे फुटबॉल खेळता ?"
शंतनू " हो ग बाई .. कोण नाही काही बोलत तुझ्या बहिणीला .. मंथनची बायको नंतर आमच्या दोघांची मैत्रीण आहे ती आधी "
मंथन " वहिनी ! तुमचे कोकरु कुठे आहे ? जे सारखे तुम्हीं शंतनूच्या गाडी समोर सोडत होतात ते ?" आणि हसायला लागला.
दिव्या अशी लाजली " ते ना .. पहिल्या वेळी चुकून आले होते .. दुसऱ्या वेळी मी ते मुद्दामून सोडले होते."
शंतनू एकदम उडालाच " काय ?"
दिव्या " हा मग .. मी जेव्हा आजोबांकडे आले तेव्हा आजोबांनी तुमचा फोटो दाखवला आणि सांगितले कि हा नव्याचा होणारा नवरा.. तेव्हाच मला वाटलं कि काहीतरी गडबड आहे .. ह्यांनी तर मला बघितली होती .. "
शंतनू " म्हणजे ? तुला मी आधीच आवडलो होतो का ?
दिव्या लाजून दोन्ही हात तोंडावर ठेवून बसली.
शंतनू " म्हणून तू ते गाणे म्हंटलेस काय ? काय होते ते .. जुने गाणे आहेना "
दिव्या " ह्रदयी प्रीत जागते ... जाणता अजाणता "
मंथन " अहो शंतनू .. इट्स नॉट वन साईडेड देन "
शंतनू " अरे .. आता सांगतेय हि लग्न झाल्यावर ?"
नव्या "आता सांगितलेंन ते बघ .. मला तर वाटले कि कोकरा एवढं लेकरू झाल्यावरच बोलेल."
तसे सगळे तिला हसू लागले आणि ती खूपच लाजत होती.
मंथन त्याच्या कानात " शंतनू ,आय थिंक यु शुड स्पेंड सम quality टाईम विथ हर .. तू रूम मध्ये गेलास तरी चालेल ."
शंतनू त्याच्या कानात " साल्या !! तुला एकांत पाहिजे म्हणून मला हाकलवतो काय ?
मंथन " हो ना .. प्रेमाची कबुली झाली पण वसुली बाकी आहे अजून."
शंतनू " ठीक आहे .. चल बाय .. मी जातो हिला घेऊन ."
मंथन " का ? तुला नाही का वसुली करायची ?
शंतनु " करणार ना .. मास्तरीण बाई चिडायच्या त्याची भीती वाटते."
मंथन " वेड्या .. हृदयात प्रीत जागी झालीय तिच्या .. अजून किती हिंट्स देईल ती "
शंतनू " ठीक आहे .. मग जाऊ दोघेही आपापल्या रूम मध्ये."
दिव्या आणि नव्या " काय बोलताय तुम्ही दोघे ?"
दोघांनी डोळ्यांवर गॉगल लावले आणि गाणे म्हणू लागले " हृदयी प्रीत जागते .... जाणता अजाणता .. मस्त गाणे "
आणि हसत हसत आपापल्या रूम मध्ये गेले.

समाप्त !!

🎭 Series Post

View all