भाग 2
"अशी कशी वेंधळी आहेस? तूझी वस्तू तुला नीट ठेवता येतं नाही. म्हणूनचं... म्हणूनचं सांगत होते. ठेव ती चैन माझ्याजवळ... पण नाही. ऐकणार तर खरं ना? म्हणे आईची आठवण आहे... हुह..." सुमित्राची बडबड चालूच होती. अन् दूर्वा मात्र आल्यापासून तिची कटकट ऐकून त्रासली होती.
"सुमित्रा... अग सापडेल कुठेतरी... कशाला विनाकारण बडबड सुरु केलीय तू? तूझ्या बडबडीने चैन परत मिळणार आहे का?" विनायक राव
"घ्या घ्या... तुम्हीं पण पोरीचीच बाजू घ्या... मेली माझंच तोंड बंद नाही राहत." सुमित्रा तोंड वाकड करत किचनकडे निघून गेली.
विनायकराव आणि सुमित्रा दुर्वाचे आई बाबा. सुमित्रा सावत्र आई. दुर्वा सहा सात वर्षाची असतानाच हर्ट अटॅक ने तिची आई तिला सोडुन देवाघरी गेली. म्हणून विनायक रावांनी सुमित्रा शी दुसरे लग्न केले. सुमित्रा चांगलीच खाष्ट बाई... उठता बसता दुर्वाला टोमणे द्यायची. विनायक रावांना वाईट वाटायचं पण करणार काय? त्या भांडकुदळ बाईच्या नादी कोण लागणार?... तरी नशीब दुर्वाचा सावत्र भाऊ वेद चांगला होता. कधीच तो दुर्वाशी वाईट वागला नाही... तर अशी दुर्वाची फॅमिली... पण दुर्वा मात्र फॅमिली असूनही एकलकोंडी झालेली... तिला हक्काचं असं कोणीच नव्हत शिवाय तिच्या मैत्रिणी... सायली अन् आरती जवळचं ती आपला राग, दुःख, आनंद सगळ काही व्यक्त करायची.
सुमित्राच्या बडबड करण्याने ती आज चांगलीच डिस्टर्ब झाली होती, आधीच तिला आईची ती एक आठवण हरवल्याच अतोनात दुःख झालेलं त्यामुळें नाश्ता न करताच ती कॉलेजला निघुन गेली.
***
***
"ए... ए... तुला सांगतोय ना? दे ती चैन इकडे... रश्मी प्लिज आता मॉमला काही उलट सुलट नको सांगू... दे बर ती चैन इकडे..." कार्तिक सकाळपासून रश्मीच्या मागे लागलेला कारण त्याच्या खिशातील चैन तिला सापडलेली.
"ओ हो कमऑन दादू ... इतका काय घाबरतो? ... आता तर मॉमला दाखवणारच..." रश्मी दात दाखवत म्हणाली
"ए माझी आई... खरच सांगतो यार तिची चैन माझ्याकडे चुकून आलीये... तू तर पाहिलच ना आमचा डान्स... चुकून माझ्या शर्ट च्या बटणात अडकली... तू पण ना... सगळ एक्स्प्लीनेशन द्यावं लागतं तुला..."
"भोली सी सुरत आँखो में मस्ती हाय... आय हाय... हा ss हा sss हा... नाही दाखवणार रे दादू कोणाला पण दुर्वा वहिनी म्हणून आवडेल आपल्याला... विचार कर" रश्मी चैन त्याच्या हातात सोपवून स्मायल देऊन गेली.
"ती अन् माझी पार्टनर... माय फूट... सदानकदा आगीचा गोळा आहे नुसता..."
***
***
कार्तिक केव्हाचा दुर्वाचीच वाट पाहत होता. तेवढ्यात दुर्वा अन् तिच्या मैत्रिणी येताना दिसल्या.
"ए ती आली बघ दुर्वा..." सोहम बोलला पण कार्तिक लक्ष कुठं होत त्याच्या बोलण्याकडे तो तर केव्हाच हरवला होता तिला पाहण्यात...
गुलाबी रंगाचा फुल स्लिवस लाँग टॉप... निळ्या रंगाची जीन्स गळ्याभोवती गुंडाळलेला दुप्पटा... कानात मॅचींग झुमके... डाव्या हातात घड्याळ... उजव्या हातात त्याच रंगाच्या चार बांगड्या... खांदयावर रुळणारे सिल्की केस... रेखिव चेहरा... जणू देवाने तिला घडवताना आपलाच जीव ओतला होता... सडपातळ बांधा...पण... काय कमी होती तिच्यात?... तिच्या चेहऱ्यावर किंचित देखिल हास्य नव्हत... जणु एखाद्या सुंदर नाजुक फुलला तोडून टाकावं अन् ते फुल कोमेजून जावं अशीच ती दिसतं होती... कदाचित तिची चैन हरवली होती म्हणून का?.....
"ओ हॅलो.... तुझ्याशी बोलतोय मी... लक्ष कूठे आहे तुझं? की आता हृदयात वसंत लागला फुलायला? हा?" ... सोहम त्याच्या खांद्याला हलवत म्हणाला
जशी कार्तिक ची तंद्री भंग पावली तसा तो धावतच गेला....
"एक्सक्युज मी?.... " कार्तिक
"काय आहे?" दुर्वा जरा वातागुन म्हणाली
"तुला नीट बोलता येत नाही का ग... जेव्हा बघेल तेव्हां ओरडतच असतेस?"
"हे... बोलायला मी नाही आले तू आला आहेस? समजल... " दुर्वा त्याच्यापुढे बोट नाचवत बोलली.
"बर बर बाई... तुझी चैन माझ्याकडे आली होती ही घे" खिशातील चैन काढून कार्तिक हात पुढे करतो.
"काय? ही ही कुठे सापडली..." अधाशा सारखी ती चैन हातात ओढून घेते. भुवया जुळवून कार्तिक तिच्याकडेच बघत राहतो कारण तिच्या डोळ्यांत पाणी आलं होत. ती चैन छातीशी कवटाळून बंद डोळ्यांनी उभी होती. तिच्या दोन्हीं गालावर अश्रू ओघळले... न राहवून कार्तिकने काळजीने विचारले...
"आर यू ओके?..." त्याच्या प्रश्नावर मात्र ती त्वेषाने त्याला बिलगली. हे कार्तिक साठी अनपेक्षित होतं... काहिच न बोलता तो तसाच पुतळ्या सारखा उभा होता. शेवटी तिचं हळुवार बाजूला झाली... तिची मान खालीच होती.
"थँक्यू.... थँक्यू सो मच.... खरचं तुझी आभारी आहे... माझ्या आईची ही शेवटची आठवण आहे... थँक्यू" इतकंच बोलून ती माघारी वळली... कार्तिक तिला पाहतच राहिला... तो पण माघारी वळला पण त्याला तिची हाक ऐकू आली...
"कार्तिक..." तिच्या या प्रेमळ हाकेने त्याच्या हृदयात जणु असंख्य तारा छेडल्या गेल्या...
"फ्रेंड्स? "... तिने हात समोर केला... आपसूकच त्याचाही हात पूढे आला...
ती एक चैन मात्र त्यांच्या नव्या प्रेम अंकुराला निमित्तमात्र ठरली होती...
क्रमशः.....