हृदयीचा राजकुमार तू… (भाग २)

वेगवेगळ्या मार्गांचे वाटसरू ते... एक कधी होतील का??
मी मेघा…

सूर्योदयाच्या त्या कोवळ्या उन्हात झरझर श्रावणसरी बरसव्यात तसे भासले… हृदयाचे ठोके अचानक वाढतायत जाणवलं… अंगावर शहारे भरभर येऊ लागले… त्याच्या हसण्यात जणू मी क्षणभरासाठी चिंब चिंब झाले… त्या सरींचा भार सहन न होऊन मी डोळे मिटून घेतले…

किती गोड स्माईल होती ती…

अगदी एक दोन सेकंद फक्त बघितली असेन मी… पण काहीतरी वेगळाच जाणवलं मला…

मी हसले, खूप मनापासून…

तेवढ्यात अंशू उठला आणि गाडीतून उतरून पळाला… मीदेखील त्याच्या मागे आतमधे गेले. सर्वजण फारच खुश होते.

दादाने रात्रभर ड्राइव्ह केल्याने तो झोपून गेला. अंशू आणि इशू घरभर उड्या मारत होते. मीदेखील अंघोळ वैगेरे आवरून आजीजवळ चुलीपुढे जाऊन बसले.

मामींनी आल्या आल्या किचनचा ताबा घेतला. मामादेखील अंघोळ करून आला. चुलीवरचा गरमागरम चहा आणि चपाती खात आजी बाबांसोबत खूप गप्पा मारल्या.

मामा आवरून शेतातली कामं करायला निघाला म्हणून आम्हीसुद्धा त्याच्या मागे निघालो. इशुला त्याने घेतलं होतं तर अंशूला मी…

चालता चालता नजर सहज तिथे घुटमळली… तो होता, त्याची गाडी धुवत होता… तसं तर ओळखत होते मी त्याला, माझ्या लांबच्या मामाचा मुलगा होता तो… पण कधीच बोललो न्हवतो आम्ही… पुढे त्याच्या घराजवळ गेले आणि मामी बाहेर आल्या नेमक्या…

"कधी आलात मेघा, कशा आहात… आमच्या नणंदबाई कुठे आहेत…"

"मी छान मामी… तुम्ही कशा आहात… आईसुद्धा आलीये, घरी आहे. येते जरा रानातून जाऊन…"

"हो हो नीट जा… पुढे जरा रस्ता खोदला आहे, सांभाळून…"

"हो हो…", मी गोड हसून म्हणले.

पुढे जातच होते की मागून दादाचा आवाज आला.

"मेघाsss…"

"हा दादा… अगं फोन वाजतोय तुझा कधीचा, घेऊन तरी जा…"

"अरे शीट, विसरले मी… आलेच, मामा ह्याला घेऊन जा पुढे, मी आलेच…", मामाला अंशूकडे देऊन मी पुन्हा घराकडे वळले.

आताही त्याची नजर खालीच होती… कोणीतरी मित्र होता ह्यावेळी सोबत…

मी दादाकडून फोन घेतला आणि फोनवर बोलत पुन्हा त्याच वाटेवरून निघाले. तेवढ्यात दादा मागून आला आणि खांद्यावर हात ठेवून माझ्याबरोबर चालू लागला.

कसे असतात ना भाऊ… स्वतः कितीही त्रास देतील पण बाहेर गेल्यावर एकटे मात्र सोडणार नाहीत… मी त्याच्याकडे बघून हळूच हसले आणि त्याने मला वाकड दाखवलं. वेडा कुठला…

आम्ही शेतात गेलो… खूप मस्ती केली… इशु आणि अंशूला तर रान कमी पडत होत खेळायला… त्यात दादा असल्यावर मग तर विचारायचच नाही…!

मी मात्र गोठ्यात छोट्या वासराजवळ जाऊन बसलेले… खूप गोड होत ते…

दुपारी घरी आलो आणि मस्त जेवून झोपी गेलो…


मी चैतन्य…

जेवून खूप छान झोप लागलेली. संध्याकाळचे चार साडे चार झाले होते आणि अचानक एका मुलीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला.

"ए सांगितलेलं काळात न्हाई का… कडकडन निघायचं…"

"नाय निघत जा… काय करणारेस… माझ्या आत्यच घर हाय…"

"कोण आत्या… कुठली आत्या… आलाय वर तोंड करून… सांगितलेलं ना पुन्हा इथे पाऊल ठीवायच नाय म्हणून…"

"लय बोलतीस हा तू… आवर घाल तोंडाला…", त्याने असं म्हणताच तिने डायरेक्ट जाऊन त्या मुलाची कॉलारच धरली.

"सांगितलेलं कळतं न्हाई तुला… का सगळ्या गावाम्होरं तमाशाच करायचा हाय… आलाय मोठा आत्याच्या घरी… मागचे पाच सहा वर्ष तर दिसली न्हाई तुम्हाला आत्या… शेवटचं सांगतेय दिप्या, पुन्हा जर इथे दिसलास ना… न्हाई तुला कोयत्यान कापून वरच्या वावरात गडल तर बघ… चल निघ आता… आलाय दारू पिऊन तमाशा करायला…", असं म्हणून तिने त्याला जोरात ढकलल आणि तो खाली पडला. एव्हाना सगळे गोळा झाले होते. पाठमोरी असल्याने तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. आणि ती वळली…


सायंकाळच्या उन्हात तो करारी चेहरा जणू तिच्या पूर्वजन्मीच्या राज्ञी लक्षणांची साक्ष देत होता… ओढणी गरकन फिरवून तिने दुसऱ्या खांद्यावर टाकली आणि सायकलला लागलेली पिशवी काढली. घरी निघालीच होती की पुन्हा मागे वळली आणि एकवार सगळ्यांकडे बघितलं…

"आता काय जेवणाच आवातन हाय का आमच्या घरी…", असं म्हणून जोरात कडाडली… आणि भरभर तो गर्दीचा भर ओसरला.

आता ती मला पूर्ण दिसत होती… आकाशी ड्रेस, लाल ओढणी… लांब काळे केस…

"खरंच किती मोठी झाली आहे ही… पण अजूनही तशीच आहे, नावाच्या विरुद्ध, स्नेहा…", मी तिच्याकडे बघून विचारच करत होतो की तिची नजर सहज माझ्यावर गेली… ते निळे डोळे… कसे विसरू मी!

उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये
ऐसा हुआ असर के मेरे होश उड़ गये
उनसे मिली नज़र…🎭 Series Post

View all