नकारात्मक आणि निराशाजनक विचार कसे नियंत्रित करायचे?

सतत जर नकारात्मक विचार करत असाल तर तेच खरे वाटायला लागतात. ही सवय आपल्या मानसिक आरोग्यासाठी घा??

कोविड १९ मुले आपण सगळेच जण जवळ जवळ २ महिन्यापासून लॉक डाऊन झालेलो आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच मानसिक अवस्था थोडी दोलायमान झालेली आहे. एकूणच भविष्यातल्या अनिश्चिततेमुळे आपण थोडे संभ्रमित झालेलो आहोत.

बघा नं सोशल मीडिया किंवा अगदी आपल्याला आपल्या नातेवाईकांचे फोन आले तरी आपल्याला त्यांच्या बोलण्यामध्ये हा निराशेचा सूर जाणवतो.

माणसाचं मन मोठा गमतिशीर असतं. नॅशनल सायन्स फाउंडेशन च्या अहवालानुसार सर्वसाधारण दिवसभरात माणसाच्या मनात १२००० ते ६०००० विचार येत असतात. त्यातले साधारण ८०% विचार हे नकारात्मक असतात आणि ९५% विचार हे पुन्हा पुन्हा येत असतात. आणि जेव्हा सतत आपण नकारात्मक विचारच जर पुन्हा पुन्हा करत असू तर आपल्या मनाची अवस्था सुद्धा नकारात्मक होते आणि उदासीनता येते. आणि जे उदासीनतेचा प्रमाण कमालीचं वाढतं तेव्हा व्यक्ती डिप्रेशन ची शिकार होते.

सतत जर नकारात्मक विचार करत असाल तर तेच खरे वाटायला लागतात. ही सवय आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते, कारण त्या अवस्थेमध्ये आपली सकारात्मक विचार करण्याची क्षमता कमी व्हायला लागते, नैराश्यामध्ये वाढ व्हायला लागते.

त्यासाठी आपल्याला आपल्या मनाची कार्य प्रणाली समजून घेणं भाग आहे. दिवसभरात इतके विचार येऊन सुद्धा सगळेच विचार आपल्या मनात रेकॉर्ड होत नाहीत, काही पुसून जातात. आपल्या अवचेतन मनात तेच विचार रेकॉर्ड होतात ज्यामध्ये आपल्या भावना असतात. उदा. काल दुपारी आपण काय जेवलो ते आठवत नाही. पण १० वर्षांपूर्वी जर कोणी काही बोललं असेल, काही बोलून दुखावलं असेल तर ते लक्षात राहत. प्रसंग कधी, कुठे घडला हे सुद्धा आठवतं . तेच निगेटिव्ह विचार, अतिविचारां मुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यामध्ये बिघाड होत असतो.

आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि आपल्या मध्ये सकारात्मक मानसिकता तयार होण्यासाठी आपण काय करू शकतो त्यावर आपण आता बोलू.

१) स्वतःला सतत व्यस्त ठेवा.
२) जी गोष्ट जेव्हा करणे आवश्यक आहे तेव्हा त्वरित करा.
३) सोशल मीडिया पासून अंतर ठेवा.
४) छोटे छोटे गोल्स तयार करा.

(याबद्दल माहित जाणून घेण्यासाठी खाली दिलेला विडिओ नक्की बघा.)

नकारात्मक आणि निराशाजनक विचार कसे नियंत्रित करायचे?

या छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात कराल तर हळू हळू तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या मानसिक अवस्थेमध्ये बदल होत आहे. आणि अतिविचार, नकारात्मक विचारांपासून तुम्ही दूर होत आहात. नक्की करून बघा.

धन्यवाद.

NLP Practotioner & Counselor Smita Ajay Chavan