होऊ कशी उतराई... भाग 3
“मिलिंद सगळं आपल्या हातात आहे, पण माझं बाळ...माझं बाळ मिलिंद..माझं बाळ कुठे आहे मिलिंद.” रेवा जोरजोरात रडायला लागली.
“रेवा मला बाळापेक्षा तू महत्वाची आहेस. तू माझं आयुष्य आहेस, तुला काही झालं तर मी कसं जगायचं?” मिलिंद
“पण मला बाळ महत्वाचं आहे मिलिंद.”
थोडया वेळाने कुसुम खोलीत आली,
रेवाच्या डोक्यावरून हात फिरवत
“पोरी का जीवाला त्रास करून घेतेस, जे व्हायचं ते होतचं. नियतीच्या खेळाला आपण नाही बदलवू शकत. आणि आपल्या घरात बाळ नक्की येईल बघचं तू.” कुसुमने रेवाला जेवण भरवलं.
काही दिवसांनी रेवाचं ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण झालं.
त्यानंतर वर्षभर तरी घरी कुणीच बाळाचा विषय काढला नाही. एक दिवस मिलिंद एकटाच डॉक्टरला जाऊन भेटला. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला टेस्ट ट्यूब बेबीची कल्पना दिली.
मिलिंदला डॉक्टरचं म्हणणं पटलं, तो घरी आला आणि त्याने लगेच आईला हे सगळं सांगितलं. कुसूम जुन्या विचाराची, तिला ते पटलच नाही. पण मुलासाठी त्या तयार झाल्या. असं नाही तर तसं वंश तर आपलाच असणार आहे.
सगळं ठरलं पण प्रश्न निर्माण झाला तो हा की गर्भधारणेसाठी अशी व्यक्ती कुठून आणायची जी नऊ महिने हा जीव पोटात वाढवेल.
आठ दिवस याच विचारात गेले. एक दिवस रेवा ऑफिसला गेलेली असताना कुसूम मिलिंदशी बोलली.
“मिलिंद बाळा एक विचार माझ्या डोक्यात आलाय.”
“काय आई? बोल ना.”
“मिलिंद हे बाळ जर मी माझ्या उदरात वाढवलं तर?” कुसुम
“काय? आई पण हे कसं शक्य आहे.या वयात तू हे सगळं?” मिलिंद
“एकदा डॉक्टरांशी बोलायला काय हरकत आहे.” कुसुम
“नाही आई, लोकं काय म्हणतील. समाज थुथु करेल माझ्यावर. नको आई मी हे असं काहीही करणार नाही आहे.” मिलिंद
“अरे तू लोकांबद्दल विचार का करतो आहेस? ते तुला बाळ आणून देणार आहेत का? आपला विचार आपणच करायचा असतो.”
काही वेळाने मिलिंद तयार झाला.
दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले.
डॉक्टरच्या कानावर सगळं घातलं.
“हे बघा तुमचं वय बघता, तुम्हाला जर कुठलाही हेल्थ प्रॉब्लेम नसेल तर आपण हे करू शकतो. आधी मला तुमचं फुल बॉडी चेकअप करून घ्यावं लागेल.”
“डॉक्टर मला काहीच हेल्थ प्रॉब्लेम नाही आहे. तरी तुम्ही तुमच्या फॉर्मालीटी पूर्ण करा.” कुसुम
“कुसुम ताई खरच मला तुमचं खूप कौतुक वाटतंय, तुम्ही तुमच्या सुनेसाठी किती धाडसी निर्णय घेतलात. खरच मला तुमचा खूप अभिमान वाटतोय.” डॉक्टर खूप उत्साहाने बोलल्या.
“खरं सांगू का डॉक्टर मी आधी तिच्याशी काही बरी वागायची नाही, पण हळू हळू तिचा त्रास बघता, तीच दुःख बघता माझ्या मनात तिच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली. शेवटी मी पण एक स्त्रीचं आहे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घ्यायला हवं.” कुसुम
“मी ऐकलं होतं एक स्त्रीच स्त्रीची वैरी असते पण इथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण आहे.” डॉक्टर
“आणि हो जेव्हा एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला साथ दिली ना तर मग त्यांना कुणीही हरवू शकत नाही.” कुसुम
दोघ्याही हसल्या.
कुसुमच्या सगळ्या टेस्ट झाल्या सगळं नॉर्मल होत.
संध्याकाळी रेवा घरी आली तेव्हा मिलिंद आणि कुसुम मस्त आरामात चहा पीत बसले होते. रेवाला थोडं आश्चर्य वाटलं.
“मिलिंद आज तू लवकर आलास?”
“नाही, अग मी आज गेलोच नाही.”
“काय? का?” रेवा
“आज मी एका महत्वाच्या कामासाठी आई सोबत बाहेर गेलो होतो अँड यु नो व्हॉट? ते काम सक्सेस झालंय.” मिलिंद
मिलिंदने रेवाला सगळं सांगितलं.
रेवाने तोंडावर हात ठेवला.
“तू खरं सांगतोस.”
मिलिंदने होकारार्थी मान केली तशीच रेवा कुसुमला जाऊन बिलगली.
“थँक यु आई, थँक यु सो मच.”
क्रमशः
काय होईल पुढे ..रेवाला जे हवंय ते मिळणार की आणि काहीअघटित काही घडणार ,जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा