तूच दे तुझी साथ (हॉर्मोन्स आणि वाढत वजन )

...



" वहिनी, किती उशीर गं दार उघडायला? केव्हाची बेल वाजवत होते. " नाराजगीच्या सुरात नणंदबाई आपल्या भावजयंला बोलल्या

"सॉरी ताई, किचन मध्ये होते म्हणून उशीर झाला." नमिता नणंदबाईंना माफीच्या सुरात बोलली.

"ताई, पाय धुवून घ्या. चहा टाकते तुमच्यासाठी." नमिता

"वहिनी फक्त चहा नको गं, मस्त गरम गरम, मऊ लुसलुशीत पोहे पण बनव तुझ्या हातचे." तोंडाला आलेले पाणी गिळत नणंदबाईंनी फर्माईश केली आणि पाय धुण्यासाठी बाथरूमकडे गेली.

"हम्म, झालं चालू मॅडमचे नखरे. जेवणाची वेळ झाली. जेवण तयार आहे पण यांना आता पोहे खायचे आहेत. म्हणे मऊ लुसलुशीत. जाऊदे मला काय करायचं आहे बनवते."  मनातल्या मनात स्वतःशीच संवाद करत नमिता पोह्याची तयारी करू लागली.

नणंदबाई बाथरूम मधून तोंड पुसत बाहेर आल्या आणि किचन जवळ थांबून नमिताला खालून वरपर्यंत निहाळात होती.
नेमका त्याच वेळेस नमिताचं लक्ष तिच्याकडे गेलं.

"ताई, काही हवंय का? नमिताने नणंदबाईंना विचारलं.

"नाही गं. बाळं कुठे आहे? झोपलं आहे का?"नणंदबाई बेडरूम मध्ये गेल्या.

बाळं झोपलेले पाहून नणंदबाई हॉल मध्ये त्यांच्या आईकडे गेल्या.

"आई, वहिनी दिवसंदिवस कनींग बनत आहे. कशी दिसतंय विचत्र. जरा आवर तिला. घरात बसून फक्त खाणं चालू आहे वाटतं. " म्हणत दोघी मायलेकी फिदीफिदी हसू लागल्या.

नमिताने दोघींचं बोलणं ऐकलं होत. आता हे रोजचंच झालं होत. प्रत्येक जण तिला हेच बोलत होता.
दोघींचं बोलणं ऐकून डोळे काठोकाठ भरून आले पण डोळयांतलं पाणी वरती पाहून डोळयांतच अडवलं तिने आणि चेहऱ्यावर एक खोटी स्माईल घेऊन नणंदबाईंना नास्ता देण्यासाठी गेली.

पोह्याचा एक घास तोंडात घालून नणंदबाई बोलू लागल्या, " वहिनी वाईट वाटून घेऊ नको गं पण जरा स्वतःकडे बघ, तो गाउन कसा पोटावरच घाण झालाय, वजन किती वाढलंय पोट तर असं दिसतंय जणू आता सातवा लागला. डाएट कर, व्यायाम कर. कर बाई काहीतरी. नाहीतर एक दिवस घराचं दार मोठं करावं लागेल. " असं म्हणत परत दोघी मोठमोठ्यांनी हसू लागल्या.

यावेळेस त्याचं बोलणं मनात खोलवर लागलं आणि ती तिथून पळतच रूममध्ये गेली.

मोठ्यांनी ओरडून रडावं वाटतं होत पण बाळं झोपलं असल्यामुळे ती मोबाईल घेऊन पाहत बसली.

मोबाईल पाहत असताना तिला तिच्या मैत्रिणीचं स्टेटस दिसला, आणि आता मात्र अश्रूने विद्रोह केला आणि गालावरून गळ्यापर्यंत पोहचू लागले.

नमिता पाटील आणि अनिल पाटील सुंदर समंजस जोडपं. लग्नाला तीन वर्ष झाले आणि त्त्यांच्या प्रेमवेलीवर प्रिशा उमललेली.

नमिता सोबतच तिची जवळची मैत्रीण माधुरीही आई झाली तिला मुलगा झाला आणि हिला मुलगी.

डिलीव्हरी नंतर नमिताचं वजन वाढतच होत आणि माधुरी सहा महिन्यातच पाहिलीसारखी स्लिम फिट झाली.

नमितानेही प्रयत्न केले पण दिवसंदिवस तिचं वजन वाढतच होते.
प्रिशा आता नऊ महिनाची झाली होती.

आज नणंदबाईचं बोलणं आणि त्यात माधुरीचा स्लिम फिट असा स्टेटस मधला फोटो बघून आणखीनचं दुःख झाली आणि रडू लागली.

तेवढ्यात सासूबाईंचा आवाज देऊ लागल्या,
"नमिता, ये नमिता.. जेवायला दे गं जरा. जेवणाची वेळ झाली. काय करत आहेस आतमध्ये??" सासूबाई हॉलमधून जोरजोराने ओरडतच होत्या.

नमिताने स्वतःचे डोळे स्वतःच पुसले आणि बाथरूम जाऊन चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारले आणि मनातलं दुःख मनात ठेवून रूम बाहेर आली.

दिवसभर ती नणंदबाईच्या बोलण्याचा विचार करतं होती.

रात्री काम आवरून बेडवर पडल्या पडल्या दिवसभर घडलेले सगळे प्रकार डोळ्यासमोर नाचू लागले आणि नकळतपणे तिचे डोळे वाहू लागले आणि अचानक रडण्याचा आवाजही वाढला.

अनिलने तिला आवाज दिला, "नमु, ये नमु.. रडत आहेस का राणी? "आणि त्यांनी तिला उठवलं. पाहिलं तर डोळे पाण्याने भरलेले होते.
त्याला आता काळजी वाटु लागली.
"नमु काय झालंय सांग ना? अशी रडू नको गं. कोणी काही बोललं का?" अनिलने काळजीने तिला जवळ घेत बोलला.

तिने दुपारी घडलेला प्रकार त्याला सांगितला.त्यात माधुरीच स्टेटस पाहून तिला वाईट वाटलं.

"लग्नानंतर किती छान होतं माझं शरीर, आता डिलीव्हरी नंतर खुप विचत्र झालं आहे. मला स्वतःचाच राग येतोय. डाएट केला तर बाळाला दूध कमी पडत आहे. जेवण भरपूर केल्यास वजन वाढत आहे. काय करू कळत नाहीये मला." रडत रडत नमु नवऱ्याला सांगत होती.

अनिलने तिला त्याच्या परीने खुप समजावलं. थोड्या वेळासाठी ती शांत झाली आणि त्याच्या मिठीत झोपी गेली.

बाळं, घर, काम, यामुळे तिने स्वतःकडे लक्षच दिलें नाही. या सगळ्यामुळे अनियमित आहार, अनियमित झोप, झेरो व्यायाम, झेरो मेडिटेशन. या सगळ्याचा असर तिच्या शरीरावर तसेच मनावर होत होता.

नमिता आज पार्किंग मध्ये मुलीला खेळण्यासाठी घेऊन आली होती. आणि त्याच वेळेस नेमकं तिची मैत्रीण माधुरीही तिच्या मुलाला घेऊन आली होती.

जवळ असूनही दोघींची जास्त भेट होतं नव्हती. नमिताला कामाचा लोड प्लस घरचं कंजेस्टेड वातावरण पाहता माधुरी तिला फोनवरच बोलुन घ्यायची.
" हाय नमु, कशी आहेस? " माधुरीने नमुला मिठी मारत विचारलं.
अचानक पडलेली मैत्रिणीची मिठी मधलं सुखच वेगळं असतं.
"माधु, मी ठीक आहे. तू कशी आहेस? आणि विराज बाळा तू कसा आहेस?" त्याच्या गालावर पापा देत नमिताने विचारलं

माधुरीने ही प्रिशाला उचलून कडेवर घेतलं, आणि तिच्याशी बोलू लागली "प्रिशू माऊला ओळखलं का?" 

"नमु, आता आपल्या लेकरांचा बर्थडे आला. बघ बघता बघता एक वर्ष झालं हे बदमाश आपल्या आयुष्यात येऊन." तिने प्रिशाच्या गालावर ओठ ठेवत नमुला म्हणाली.

दोघींनी दोघांना खाली सोडलं आणि तिथेच बेंचवर बसल्या.

"नमु, बोल राणी काय झालं? काही बोलायचं तुला. काही विचारायचं आहे?"तिचा हात हातात घेत माधुरीने नमुला विचारलं. शेवटी मैत्रीचं नातं डोळे पाहून ओळखतं की काय प्राब्लम आहे ते.

"माधु, मला कळत नाहीये पण आजकाल वजनाचा फार टेन्शन येत आहे. त्यात अनियमित पाळी, आणि हे मूड स्विंग्स कधी छान वाटतं तर कधी अचानक रडू येत." नमिता तिला स्वतःचा प्राब्लम सांगत होती जेणेकरून तिच्याकडून तिला काही सल्ला मिळावा.

" नमु, सगळ्यात आधी तर तू स्वतःकडे लक्ष दे. स्वतःला पाहिलंस केस विंचारले नाहीस तू आज? काय अवतार केलंय तू. " माधुरी थोडी रागवत होती तिला.

"इच्छाच होतं नाही काही करण्याची. असं वाटत काय करायचं नीटनेटका राहून. शरीर तर वाढतच चालं आहे.आणि तुला तरं माहिती घरात किती काम असतात मला स्वतःसाठी वेळच भेटतं नाही."

" असं कसं बोलू शकतेस तू? स्वतःकडे स्वतःलाच लक्ष द्यावे लागते. स्वतःची साथ स्वतःला द्यावी लागते राणी. काम आहेत तरं त्यांचं योग्य नियोजन कर. स्वतःसाठी जर तुला इतका वेळ नसेल की तू केस नीट करावे मग काही अर्थ नाही. आणि प्लीज घरातले कामात हेल्प करत नाहीत वैगरा वैगरा ही सगळी कारणे आहेत. " माधुरी रागाने तिला बोलली

"नमु अगं बाळं झालंय तुला स्वतःला प्रायोरिटी कधी देणार तू? अगं बाळं आता पासून आपलं अनुकरण करतं. तू अशी नाराज, डिप्रेस, गबाळी राहिल्यास तुझी मुलगी काय शिकेल तुझ्याकडून. सॉरी राणी जास्त हर्श बोलत आहे पण करून बघ स्वतःचे कामं सगळ्यात आधी. तुला फ्रेश वाटेल. कॉन्फिडन्ट वाटेल." माधुरी नमुला तिच्या परीने समजावत होती.

"नमु, बियंग अ मेडिको, तुला काही गोष्टी सांगते ते कर सगळं ठीक होईल.
ताण तणाव घेतल्याने ही वजन वाढते. तू ही सायन्स ची स्टुडन्ट आहेस तुला समजेल असेच सांगते.
तुझी कंडिशन आणि तुझी लक्षण पाहता तुझ्या शरीरामध्ये हॉर्मोनल इंबॅलन्स मुळे सगळं घडत असावं असा माझा अंदाज आहे."
"आपलं शरीर कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन तयार करते.या हॉर्मोन चं प्रमाण शरीरात कमी असण्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. जसे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं.आपल्याला शारीरिक आणि भावनिक आव्हाने पेलण्यास तयार करतं. आपली पाचक क्रिया साठी पण याचा उपयोग होतो.
आपण जास्त काळ तणावग्रस्त राह्यल्यास कॉर्टिसोल चं उत्पादन वाढतं परिणामी उच्च रक्तदाब, इम्युनिटी कमी होणे ,सतत भूक लागल्यामुळे वजन वाढणे , रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे,इत्यादी समस्या येऊ शकतात."

"झोप नीट नाही घेतल्यास पण हॉर्मोनल इंबॅलन्स होतो आणि वजन वाढतं.
झोप नीट घेतली नाही की त्याचा परिमाण घेर्लीन आणि लेपटीन या दोन हॉर्मोन वर होतो. घेर्लीन हे भूक वाढवणारे हॉर्मोन आहे तर लेपटीन भूक कमी करणारे!
झोप कमी झाली की घेर्लीन वाढते आणि लेपटीन कमी होते.
मग वाढते आपली भूक आणि गोड धोड खायची इच्छा आणि वाढत आपलं वजन."

" नमु इतकेच हॉर्मोन्स नाही बरेच हॉर्मोन्स आहेत ज्यांचा वाढणाने आणि कमी होण्याने आपल्या शरीरात प्रचंड बदल होतात. "

"लास्ट आहे आपला आहार. आपला आहार हा सात्विक आणि ताजाचं हवा. जेवणाच्या वेळा पाळायला हव्या.
सकाळी उठल्यावर दोन तासांच्या आत काहीतरी खायला हवे. यावेळी पाचन क्रिया उत्तम असते.त्यामुळे नाश्ता चांगला केला पाहीजे. जेवण 2-3 वेळेस हलका फुलका घरी बनवलेले सात्विक."
"सूर्योदयाच्या आत उठून  व्यायाम आणि सूर्य नमस्कार घालावे. सोबत मेडिटेशन करायचे. स्वतःला पाच चांगली वाक्य म्हणायचं. पॉसिटीव्ह स्तुती स्वतःची.
शक्यतो हे सगळं सकाळीच करावा यावेळी आपल्याला जास्त फ्रेश वाटत असते."

"सगळ्यात आधी दुसरे कसे फिट आणि मी अशी बेधब हे स्वतःला म्हणणं बंद कर. स्ट्रिक्ट रहा स्वतःसोबत. हे मला माझ्यासाठी करायचं आहे. मग बघ आपोआप तुला वेळ भेटेलच.
सकाळी बाळं उठण्याआधी उठून व्यायाम करायचं. नास्ता जेवण ची प्लॅनिंग आदल्या दिवशी मनात फिक्स ठेवायची. बाळं आता मोठं झालंय. त्याची काम घरात सगळ्यांना वाटून द्याची.
कोण काय म्हणतंय, जाड झाली, कनींग झाली सगळं सोडून दे.
तणाव जेवढा वाढेल तेवढं तुझं वजन वाढेल."

"इथून पुढे नो रोना धोना, ओन्ली आराम से खाना और आराम से सोना... और जल्दी फिट होना."

माधुरीच्या समजावण्यामधला सायिन्टिफिक टच तिला चांगलाच टच करून गेला होता. दुसऱ्या दिवशी पासून तिने स्वतःवर मेहनत घेण्यास सुरुवात केली.

आज मुलीच्या सेकंड बर्थडेला एकदम स्लिम ट्रिम झाली होती.

तिला पाहून माधुरी बोलली, "बघ बोली होती ना, सोपं आहे."

नमु ने तिला कडकडून मिठी मारली आणि बोलली, "तू नसतेस तर माझ्या हॉर्मोन्सला न्याय नसता मिळाला."

स्त्रियां मध्ये जडणारे 80% आजार हे त्यांच्या लाईफ स्टईल मुळे असतात.
स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांना खुश करण्याचा नादात स्वतःला दुःखात लोटून देतात.
आपण काय करतो, सकाळी उठल्यास पटकन फ्रेश होऊन घरातील काम आवरतो. मग नास्ता बनवतो, सगळ्यांना देतो पण स्वतः मात्र गरम गरम ताजा कधीच खात नाहीत. नेमकं काहीतरी काम आठवतं ते करत बसतो.
जेवण बनवून झालं की किचन आवरणं, स्वयंपाकची भांडी घासणं, सगळी काम आवरली की मग जेवण करायला बसतो.
आपण स्वतःच स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाहीत मग बिचार शरीर काय करेल, ते ही त्याच्याप्रमाणे वाढत जाते.
आता ज्या चुका करत आहात त्याचे परिणाम आपल्या शरीराला भोगवं लागेल.
दुसरे लोक तुम्हांला समजावू शकतात पण स्वतःची साथ स्वतःलाच द्यावी लागेल.

आपलं मानसिक आरोग्य हे आपल्या प्रत्येक आजरासाठी कारणीभूत असते. मग ती साधी ऍसिडिटी असो या गंभीर दुसरा आजार.
आपलं मानसिक स्वस्थ आपल्या हातात आहे. त्याला स्वतःलाच जपावे लागेल.
हॉर्मोन्स च्या तारा आपल्यामुळे बिघडतात. त्यांना परत व्यवस्थित कनेकशन देण्याचं कामं ही आपणच करू शकतो.
आधी स्वतःची काळजी घ्या. मग इतरांची.
फक्त वजन वाढीबदल नाही तर स्त्रियांना खुप लवकर डायबेटीस, उच्च रक्त दाब, pcod अश्या आजरांना बळी पडावं लागते.
थँक्यू
उषा