जगण्याची आशा ( भाग 4 ) ( अंतिम भाग )

About Life And Hope


जगण्याची आशा ( भाग 4 )
( अंतिम भाग )

दीपकला स्वतःला स्वयंपाक बनविता येत नव्हता पण किराणा आणणे,भाजीपाला आणणे, टिफिन पोहोचविणे. अशी सर्व कामे तो करत होता.ज्योतीला मदत करत होता.
जेव्हा मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले तेव्हा ज्योतीने आपल्या मदतीला आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना बोलावले व त्यांना त्याचा मोबदलाही देऊ लागली. त्या स्त्रियानांही काम मिळाले त्यामुळे त्याही खूश होत्या.
कोरोनात अनेक लोक असे होते,ज्यांनी कोरोना म्हणजे पैसे कमविण्याची एक उत्तम संधी म्हणून लोकांची लुबाडणुक करून पैसे कमवीले तर काही असे होते ,ज्यांनी गरजूंना शक्य होईल तितकी निस्वार्थीपणे मदत करत आपल्यातील माणुसकी जिंवत ठेवली.
दीपक व ज्योतीला तर लोकांना जेवण देण्यात खूप आनंद वाटत होता. आपल्या हातून काही तरी चांगले काम देव करून घेत आहे. असेच त्यांना वाटत होते.
कधी स्वप्नात ही वाटले नव्हते की, कंपनीत नोकरी करणारा दीपक लोकांना टिफिन देण्याचे काम करेल. पण कोरोनाने सर्वच परिस्थिती बदलली होती. पद,प्रतिष्ठा यापेक्षा जिंवत राहणे हेचं महत्त्वाचे वाटत होते आणि त्यासाठी लोक प्रयत्न करत होते. प्रत्येकासाठीच ती परिक्षेची वेळ होती. ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ होती ,जे आयुष्यात हार स्विकारणारे नव्हते असे लोक आपली जगण्याची आशा जिंवत ठेवत ,आलेल्या अडचणीतून मार्ग काढत जगण्याचा प्रयत्न करत होते.
भविष्यात काय होईल ? याचा विचार करण्यापेक्षा आज काय परिस्थिती आहे आणि आपण आता काय करू शकतो ? हाच विचार प्रत्येकाच्या मनात होता.
दीपकसारखे असे अनेक लोक होते ,ज्यांनी आपले काही तरी गमावले होते.
आई,वडील,भाऊ, बहीण, पती,पत्नी, मुले ,मित्र असे आपल्या आयुष्यातील प्रेमाचे व्यक्ती कोरोनाने हिरावून घेतले होते. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेलेल्या कुटुंबाची परिस्थिती तर खूपच दयनीय होती. कोणाचे अश्रू पुसायला ही जाता येत नव्हते ना कोणाचे सात्वंन करता येत होते. कोरोना होण्याची भीती आणि सरकारने करून दिलेले नियम यामुळे लोकांना तर आपल्या नातेवाईकांचे अंत्यदर्शन सुद्धा करता येत नव्हते. प्रत्येक जण जीव मुठीत धरून जगत होता.
ज्यांना कोरोना झाला व ते त्यातून सुखरूप वाचले त्यांच्या साठी तर तो खरचं पुर्नजन्मचं होता आणि त्यांच्यासाठी ते दिवस अविस्मरणीय क्षण ठरले होते.
प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या संकटाला तोंड देत जगावे लागत होते.
दीपकसारखे असे अनेक लोक होते,ज्यांनी आपले खूप काही गमावले होते , ज्यांना जगावेसेच वाटत नव्हते.
त्यांच्यातील जगण्याची आशाच संपली होती.
दीपकने ही आपल्या जगण्याची आशा सोडलीचं होती, पण इवल्याशा रोपट्याने त्याच्या मनात आशेचा किरण दाखविला आणि तो पुन्हा जिद्दीने जीवन जगण्यास तयार झाला होता.लढाईत हार मानण्यापेक्षा ती लढून मरावी. याच विचाराने त्याने जीवनात येणाऱ्या संकटाशी लढण्याचे ठरविले. आणि त्याला हळूहळू ती लढाई जिंकत असल्याचा आनंदही मिळू लागला.
दीपक नोकरीसाठीही प्रयत्न करत होता.
आणि काही महिन्यातचं त्याला एका कंपनीत नोकरीही मिळाली.
ज्योतीने आपल्या सहकाऱ्यांसह टिफिनचा व्यवसाय सुरू ठेवला होता.
त्यांच्या संसाराची गाडी पुन्हा छान सुरू झाली होती पण आई-बाबा या सर्व गोष्टींचा आनंद घ्यायला नव्हते याचे दीपकला व ज्योतीला वाईट वाटत होते.
गेलेला पैसा आपण पुन्हा मिळविला पण आईबाबांना तर कायमचे गमावले होते.
याचे दुःख आयुष्यभर त्यांना राहणार होते.


आपल्या आयुष्यात उद्या काय होईल ? हे कोणालाच माहिती नसते पण
उद्या आपल्या आयुष्यात काही तरी चांगले होईल या आशेवरचं प्रत्येक जण जीवन जगत असतो.
जगण्याची आशाचं आपल्याला जगण्याचे बळ देत असते. एक छोटासा आशेचा किरण आपल्या आयुष्यात सुखाचा प्रकाश आणत असतो.


समाप्त


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all