Jan 19, 2022
प्रेम

होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19

Read Later
होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19

होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 19

आणि तिच्या अंगावरच ब्लँकेट नीट करून बाजूला सरकला..
तिने डोळे उघडले..तो थोडा दूर झोपला होता..ती त्याच्याजवळ सरकली..त्याने ही हसत तिला आपल्या जवळ ओढलं..ती ही लाजून त्याच्या कुशीत शिरली..

"वेडू कुठली.." राहुल गालातल्या गालात हसत म्हणाला

दोघेही गोड हसत एकमेकांना कुशीत घेऊन झोपले.. दिवसभराच्या फंक्शनमुळे दमले असल्याने ते लगेच झोपी गेले..

आता पुढे:

"गुड मॉर्निंग मॉम.." मिताली

"गुड मॉर्निंग बेटा..लगेच का खाली आलीस..? आराम करायचा होता अजुन थोड्यावेळ.." सीमाताई

"नको..मी ठीक आहे..मॉम..मी काही हेल्प करू का..?" मिताली

"नाही गं..आज आज्जी आणि आत्या बाई जाणार आहेत..त्यांच्या साठी मिठाई आणि थोडं फराळाचा पॅक करून घेत आहे..तू फक्त मिठाईचा बॉक्स त्यांना दे.." सीमाताई

"हो मॉम.." मिताली

"राहुल उठला नाही का अजून..?" सीमाताई

"अं..नाही अजून.." मिताली लाजत म्हणाली

"बरं.." सीमाताई तिला लाजताना बघून हसल्या

"मॉम..सॉरी आज पण लेट झालं मला..मी ब्रेकफास्ट बनवायला येणार होते..ते साडी जमत नव्हती नीट..?" मिताली थोडं घाबरत म्हणाली

"मितू..अगं किती घाबरत आहेस बाळ..आधी कशी रिलॅक्स वावरत होतीस घरात..आत्ता काय झालं अचानक..आम्ही, हे घर काय नवीन आहे का तुला..? तू सध्या फक्त आराम कर..बाकी सगळे आहेत इथे काही करायला..टेन्शन नको घेऊ कुठल्या ही गोष्टीचं..समजलं..?" सीमाताई

"हो मॉम.." मितालीला थोडं भरून आलं..तिने पटकन सीमाताईंना मिठी मारली..

"आईची आठवण येते का..? जा फोन कर त्यांना..तुला बरं वाटेल.." सीमाताई

"नाही..तसं काही नाही..मी तिला करेन नंतर फोन..थँक्स मॉम.." मिताली डोळे पुसत म्हणाली

तितक्यात राहुल आणि काव्या तिथे आले..दोघांनीही खुणेनेच काय झालं म्हणून विचारलं..त्यांनी काही नाही मी आहे असा इशारा केला..

"हं..हास बघू आता..नाहीतर तुझ्या नवऱ्याला वाटायचं की मी सासुरवास करते तुझा..बघ.. कसा आत्ताच रागाने बघतोय माझ्याकडे.." सीमाताई हसत म्हणाल्या

मितालीने वळून बघितलं..मागे राहुल आणि काव्या हसत होते..त्यांना बघुन ती पण हसली..

सगळ्यांनी मिळून ब्रेकफास्ट केला..त्यांनंतर पाहुणे गेले..आता बाहेरचं कुणी नव्हतं..सगळे रिलॅक्स बसले हॉलमध्ये..अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी चालू होत्या..लग्नात कशी मजा आली, काय काय झालं अस काही न काही बोलणं चालू होतं..मिताली ही आता नॉर्मल झाली होती..ती ही आधी सारख हसून गप्पा मारत होती..

"उद्याचं काय मग..? कधी निघायचं आहे..? आम्हाला माहीत आहे बरं..मज्जा आहे एका मुलीची.." सीमाताई मितालीला चिडवत म्हणाल्या

"मॉम..तुम्ही पण ना.." मितालीने लाजून त्यांना मिठी मारली

सगळे हसायला लागले.

"राहुल तिथे आत्ता विंटर असेल का रे..?." रणजीतराव

"हो डॅड.." राहुल

"मितू जा बरं तू पॅकिंग करायचं बघ लगेच.. काही लागणार असेल तर आजच शॉपिंग करा..उद्यासाठी काही ठेऊ नको.." सीमाताई

"हो मॉम.. मी लिस्ट बनवते आणि काही लागणार असेल तर दुपारी जाऊ..आणि आजच पॅकिंगही करते.." मिताली

"हं..ठीक आहे..मी आता स्वयंपाकाच बघते.." सीमाताई असं म्हणत किचनमध्ये गेल्या..

राहुल आणि मिताली बेडरूममध्ये आले..

राहुलने दार बंद केलं आणि मितालीला आपल्या मिठीत ओढलं..

"सकाळी मला न उठवता का गेलीस खाली..?" राहुल तिच्या गालावर किस करत म्हणाला

"तुम्हाला खूप गाढ झोप लागली होती..म्हणून नाही उठवलं.." मिताली

"पण मग आता मला स्वीट चालेल..जे मी झोपलो असताना तू दिलं होतंस ते.." राहुल तिच्या ओठांवरून बोट फिरवत म्हणाला

"म्हणजे..तुम्ही.." मिताली आश्चर्याने म्हणाली

राहुलने एक मिश्कील स्माईल दिली..

"मी तर तुझ्या आधीच उठलो होतो..तू काय करते ते बघायचं होत मला.." राहुल तिच्या गालावर गाल घासत म्हणाला

"तुम्ही ना..बोलू नका माझ्याशी..असं कुणी करतं का..?" मिताली लटक्या रागाने म्हणाली

"हो..मी करतो ना..या पेक्षा जास्त काही करू शकतो.." राहुल

त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला..त्याच्या नजरेतले भाव बघून ती गोड लाजली..ओठ थरथरू लागले..श्वासांची गती वाढली..त्याने जवळ येत तिच्या थरथरणाऱ्या ओठांना आपलंसं केलं..खूप वेळाने ते बाजूला झाले..मितालीने त्याच्या टीशर्ट मध्ये चेहरा लपवला..

"रोजची मॉर्निंग मला अशीच स्वीट पाहिजे..ओके..?" राहुल आणखी तिची मजा घेत म्हणाला

"अं..प्लिज..बास ना आता.." मितालीला खूपच लाज वाटत होती..

"ओके ओके..आत्ता बस करतो..बाकीच जे काही आहे ते रात्री करू म्हणे..आता लिस्ट बनव..आपण लंच करून शॉपिंगला जाऊ..ओके..?" राहुल गालातल्या गालात हसत म्हणाला

"राहुSSल.." तिने त्याच्या छातीवर एक हलकासा पंच मारला..

दोघांनी मिळून लिस्ट केली..लंचसाठी खाली आले..

"मॉम मी लिस्ट बनवली..लंचनंतर मॉलमध्ये जायचं ठरवल आहे..म्हणजे आम्ही जाऊ ना..?" मिताली

"हो..त्यात काय विचारायचं..बरं मी पण आज आश्रमात जाणार आहे..खूप दिवस झाले गेले नाहीये.." सीमाताई

"आम्ही पण तुमच्यासोबत आलं तर चालले का हो..?" रणजीतराव मस्करी करत म्हणाले

"अहो..काही काय विचारताय..तुम्हाला कधीपासून परमिशन घायची गरज पडली.." सीमाताई

"आता सासू झालात तुम्ही..म्हटलं सुनेसारखं आम्ही पण परमिशन घ्यावी.." रणजीतराव

"जेवा चुपचाप..उगीच मुलांसमोर काहीही बोलता.." सीमाताई लटक्या रागाने म्हणाल्या

"बरं.. मग नंतर बोलू आपण.." रणजीतराव हळूच म्हणाले

सगळे हसायला लागले..सीमाताई त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघितलं..तसं सगळे शांत बसले..

"काऊ..तू पण चल आमच्यासोबत.." मिताली

"नको गं.. तुम्ही दोघे फिरून या मस्त..माझ काय काम तुमच्यामध्ये.." काव्या

"असं काही नाही..चल ना प्लिज.." मिताली

"हो काऊ..चल तू पण.." राहुल

"तुम्ही दोघे ना.. वेडे आहेत खरच..इथे कपल्सना प्रायव्हसी पाहिले असते ..तुम्हाला मिळते तर मला मधे घेता प्रत्येकवेळी.." काव्या डोक्याला हात मारत म्हणाली

"तू बच्चा आहेस माझी..माहिती आहे ना..मग तुला कसं सोडणार.." राहुल

"तरी बरं स्वीझरलँडला चल म्हटलं नाहीत नशीब..नाहीतर तिथं ही घेऊन जाल.." काव्या

सगळे हसायला लागले..

"आत्ता आम्ही जाऊ..नंतर आपण सगळे जाऊ परत एकदा.." राहुल मितालीकडे बघत डोळा मारत म्हणाला

हसत गप्पा करत लंच झाला..सीमाताई रणजीतराव आश्रमात गेले..हे तिघे मॉलमध्ये जायला निघाले..मॉलमध्ये पोचल्यावर समोर आदित्यराजला बघून काव्या पळत त्याच्याकडे गेली..

"आदी..तू..इथे.." काव्या त्याला हग करत म्हणाली..त्याला तिथे अचानक बघून तिला खूप आनंद झाला होता..

"अगं हळू..पडशील ना.." आदित्यराज हसत म्हणाला

"हो मग माझ्याबरोबर कोणी नको का इथे..तुमचं शॉपिंग माहिती आहे मला..चांगलच..5-6 तास एकटं बोअर होईल मला.." राहुल त्यांना चिडवत म्हणाला

"हो भाई..करेक्ट..आणि बॅग्स पण उचलायला कोणी हवं ना.." आदित्यराज पण त्यात सामील झाला

"व्हेरी फनी..एकतर मला जबदस्ती आणलं सोबत..यायचं होत मग बायकोबरोबर.." काव्या गाल फुगवत म्हणाली..त्याला बघुन ती इतकी आनंदात होती आणि तो राहुल साठी आला म्हटल्यावर तिचा मूड गेला..

ती फुग्गा झाली तसं राहुल आणि आदित्यराज हसायला लागले..मितालीने त्यांच्याकडे एक रागीट लूक दिला..दोघांनी कसंबसं हसू कंट्रोल केलं..

"काऊ..तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे..चल मी तुला लिस्ट दाखवते..लवकर शॉपिंग करूया.." मिताली तिची समजूत काढत म्हणाली

काव्याने त्या दोघांकडे बघत नाक उडवलं आणि मितालीसोबत लेडीज सेक्शनला गेली..हे दोघेही एकमेकांना टाळ्या देत हसत त्यांच्या मागून गेले..

शॉपिंग करताना पण काव्याला चिडवण चालू होतं..ती ही एन्जॉय करत होती त्यांचं चिडवण..उगीच फुगायचं नाटक करत होती..

शॉपिंग झाली तसं राहुल आणि मिताली घरी परत गेले..त्यांना पॅकिंग करायचं होतं..काव्या आणि आदित्यराज त्याच्या कार मधून फिरायला निघाले..नंतर डिनर करून तो तिला घरी सोडणार होता..काव्या नखरे करत आदित्यराज सोबत नीट बोलत नव्हती..

"काऊ..सॉरी..किती चिडते गं लगेच.." आदित्यराज

"हूं.. माहीत आहे ना..मग कशाला चिडवायचं.." काव्या नाक उडवत म्हणाली

"सॉरी सॉरी.. हे घे चॉकलेट्स.." आदित्यराज तिला बॉक्स देत म्हणाला

चॉकलेट्स बघून तिच्या चेहऱ्यावर लगेच हसू पसरलं..

"हं..इट्स ओके आदी..मी नाही चिडले.." काव्या गोड स्माईल करत म्हणाली

"मग हे काय होतं मॉलमधून निघाल्यापासूनच..?" आदित्यराज

"ते असंच.. मी चिडल्यावर तू काय करतो ते बघायला.." काव्या हसत म्हणाली

"यू मिन..तू मला टेस्ट करत होतीस..?" आदित्यराज एक भुवई वर करून म्हणाला..

"नो आदी..तुला कशाला टेस्ट करेन मी..थँक्स फॉर चॉकलेट्स.." काव्या विषय बदलत म्हणाली

"हं..वेट..हॉटेलमध्ये पोहचू दे..मग तुला बघतोच मी.." असं म्हणत आदित्यराजने कारचा स्पीड वाढवला..

"आदी..काय करत आहेस..स्पीड कमी कर..आदी प्लिज.." काव्या अस्वस्थ होत म्हणाली

त्याने लक्ष दिलं नाही..त्याने आणखी स्पीड वाढवला..

तिने डोळे घट्ट मिटून घेतले..सीटवर हात घट्ट पकडले..तिला भीती वाटायची फास्ट कार चालवली की..लहानपणापासून.. आदित्यराजला ते माहीत नव्हतं..

"आदीSSSSS प्लिSSSज.." काव्या कसं बसं म्हणाली..तिच्या डोळ्यातून आता पाणी यायला लागलं..घश्याला कोरड पडली..

आदित्यराजने ते बघितलं.. तिची अवस्था बघून तो ही घाबरला..ती भीतीने थरथर कापत होती..त्याने कार साईडला घेतली..आणि पटकन तिला जवळ घेतलं..तिने आधी त्याचा हात झिडकारला..त्याने परत फोर्स करून तिला जवळ ओढलं..ती त्याच्या कॉलरला पकडून रडायला लागली..

"आय एम सॉरी काऊ..मला माहित नव्हतं..जस्ट रिलॅक्स..आय एम विथ यू बेबी..काम डाउन..प्लिज.." आदित्यराज तिला शांत करत म्हणाला

"मला घरी जायचं आहे.." काव्या हळू आवाजात एक एक शब्द बोलली..

"ओके..आपण जाऊ..मी तुला ड्रॉप करतो..तू रिलॅक्स हो.." आदित्यराज

तिला थोडं बरं वाटल्यावर त्याने कार चालू केली..ती डोळे मिटून शांत बसली.. अजुनही नॉर्मल नव्हती झाली..तो तिला सरळ मोहिते मॅन्शनमध्ये घेऊन आला..

"काऊ..घर आलं..उठते का..?" आदित्यराज तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला

"आदी..इथे नको..मला घरी सोड प्लिज.." काव्या

"तुझी कंडिशन ठीक नाही बेबी..असं तुला घरी सोडलं तर सगळे टेन्शनमध्ये येतील..आणि मला ही काळजी वाटत राहील तुझी..तू आत्ता इथे थांब.. आपण इथेच डिनर करू..मग मी तुला ड्रॉप करतो..ओके..?" आदित्यराज तिची समजुत काढत म्हणाला

तिने मान हलवत होकार दिला..त्याचं म्हणणं ही योग्य होतं.. ती अशा घाबरलेल्या अवस्थेत देशमुख व्हिलामध्ये गेली तर सगळे काळजीत पडले असते हे तिला माहीत होतं..सगळ्यात जास्त राहुल..म्हणून जास्त आढे वेढे न घेता तिने होकार दिला..नाही म्हणून वाद घालायची एनर्जी पण तिच्यात नव्हती..

दोघेही आदित्यराजच्या बेडरूममधे गेले..त्याने तिला सोफ्यावर बसवलं..

"तू आराम कर..मी कॉफी आणतो आणि डिनरचं पण सांगून येतो.. " आदित्यराज तिच्या डोक्यावर किस करत म्हणाला..

"हं..लवकर ये.." काव्या

तो कॉफी घेऊन आला..ती डोळे मिटून शांत बसली होती..त्याने तिला कॉफी दिली.. तिला जरा बरं वाटलं.. ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली..आदित्यराज बाल्कनीत आला..त्याला खूप वाईट वाटत होतं..तिची अशी हालत आपल्यामुळे झाली आहे म्हणून तो स्वतःला कोसत होता..त्याने बाल्कनीच्या रेलिंगला जोरात पंच मारला..

"आदी..स्टॉप इट..वेडा आहेस का.?" काव्या त्याचा हातावर फुंकर मारत म्हणाली

"आय डीझर्व इट बेबी..जस्ट लूक ऍट यू..दिस इज माय फॉल्ट..टोटली माय फॉल्ट..आय एम रिस्पॉन्सीबल फॉर युअर कंडिशन..आय मेड यू क्राय..बेबी..ब्लडी फूल आय..." आदित्यराजच्या डोळ्यात पाणी आलं होतं

"आदी..काम डाउन..आय एम फाईन नाऊ.. मी खरंच ठीक आहे..प्लिज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको..मला परत त्रास होईल मग.." काव्या त्याच्या लागलेल्या हातावर किस करत म्हणाली..तिच्या डोळ्यातलं कढत पाणी तिथं पडलं..त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला..डोळ्यातलं पाणी पुसलं..

"सॉरी..रडू नको आता परत..मी नाही काही करणार..ये इकडे.." आदित्यराज चेअरवर बसला..तिला मांडीवर बसवलं आणि कुशीत घेतलं..

ती ही त्याला बिलागली..शांतपणे डोळे मिटून त्याच्या छातीवर डोकं ठेऊन बसली..

तो तिच्या केसातून हात फिरवत राहिला..कोणी काहिच बोलत नव्हतं..खूप वेळ ते तसेच बसले होते..

"काऊ..कसं वाटतंय बेबी..? " बराचवेळा झाल्यानंतर आदित्यराज म्हणाला

"हं..ठीक आहे मी.." काव्या अजुनही डोळे मिटून बसली होती

"डिनर करायचा..?" आदित्यराज

"हं.." काव्या

"मी इथे मागवतो.." आदित्यराज

"नको..खाली जाऊ..सगळ्यांसोबत डिनर करू..मी भेटले पण नाही कुणाला..कसं वाटेल त्यांना..?" काव्या

"हं..ओके..चल मग..मी फ्रेश होतो..आपण खाली जाऊ.." आदित्यराज तिला किस करत म्हणाला

दोघेही खाली आले..सगळ्यांसोबत गप्पा करत डिनर झाला..आदित्यराज तिला सोडायला निघाला..कारमध्येही ते शांतच होते..आदित्यराज अगदी आरामात कार चालवत होता..त्याने आईस्क्रिम पार्लर समोर कार थांबवली..तिच्यासाठी पार्सल घेऊन आला..

तिने हसत ते घेतलं..आता कुठे ती मनापासून हसली होती..थोडं खाल्लं..बाकीच पॅक करून घेतलं..

"हॅपी..?" आदित्यराज हसत विचारलं

"हो..हॅपी.." काव्या

"मला काय मिळेल मग..?" आदित्यराज

तिने त्याला ठेंगा दाखवला..आणि हसायला लागली..तिचं हसणं बघून त्याला रिलॅक्स वाटलं..तो हळूहळू तिच्या जवळ आला..तिचे केस बाजूला केले..तिच्या मानेला पकडून पुढे ओढलं आणि डीप किस केलं..तिने ही त्याला तसाच प्रतिसाद दिला..आता कुठे दोघेही रिलॅक्स फील करत होते..तिला घरी ड्रॉप करून तो त्याच्या घरी गेला..

◆◆◆◆◆

"गुड मॉर्निंग मॉम डॅड.." राहुल आणि मिताली आज सोबतच ब्रेकफास्टसाठी खाली आले..

"गुडमॉर्निंग बेटा.." सीमाताई आणि रणजीतराव

"मॉम मी आजचा लंच मी बनवू..?" मिताली त्यांना सगळ्यांना ब्रेकफास्ट सर्व्ह करत म्हणाली

"मितू अगं तुम्हाला आज ट्रॅव्हल करायचं आहे.. कशाला दमते उगीच..नंतर कर म्हणे .." सीमाताई

"मॉम..प्लिज..काल पण तुम्ही मला काही करू दिल नाही..बाकीचे आहेत मदतीला..एकटी सगळं नाही करत..प्लिज.." मिताली

"बरं.. कर तुझ्या मनासारखं.." सीमाताई हसत म्हणाल्या

मिताली आणि सीमाताई काय बनवायचल ते ठरवत किचनमध्ये गेल्या..

"काऊ अजून आली नाही..उठली नाहीये का..?" रणजीतराव

"हो डॅड..ती रात्री लेट झोपली..उठली नसेल अजून.." राहुल

"बरं.. " रणजीतराव

"डॅड उद्याच्या मीटिंगच कसं करणार तुम्ही..मी ती नेक्स्ट वीकसाठी पोस्टपोर्न करू का..?" राहुल

"नको..मी करेन अटेंड..काही लागलं तर काऊ आहेच.." रणजीतराव

"हं..ओके..मी त्याचे डिटेल्स राणेंना मेल करतो..ते ही तुम्हाला हेल्प करतील.."राहुल

ते दोघे डिस्कस करतच होते की काव्या खाली आली..

"गुड मॉर्निंग डॅड, गुड मॉर्निंग भाई.." काव्याने सोफ्यावर झोपून रणजीतरावांच्या मांडीवर डोकं ठेवलं..

"काय झालं बेटा..? बरं वाटत नाहीये का..?" रणजीतराव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले

"नो डॅड..असच.." काव्या

"काऊ..उद्या डॅड सोबत मीटिंग अटेंड कर प्लिज.." राहुल

"हो भाई..मला मेल कर डिटेल्स..मी बघते.." काव्या झोपेतच म्हणाली

रणजीतरावांना इम्पॉरटंट कॉल आला..ते उठून त्यांच्या स्टडीरूममध्ये गेले..

"काऊ..बच्चा काय झालंय..? अजून तू नाईट ड्रेस मध्ये आहेस..फ्रेश पण नाही झालीस.. ताप आहे का..? ये इकडे..माझ्याजवळ बस.." राहुलने तिला आपल्या जवळ बोलवत काळजीने विचारलं..

"नाही भाई..बस थोडं डाउन वाटतंय..थोड्यावेळाने बरं वाटेल.." काव्या त्याच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली

"हं..टेम्परेचर तर नाहीये..झोपली नाहीस नीट..? काल रूममधला लाईट पण ऑफ केला नव्हतास.. भीती वाटत होती का..?" राहुल

राहुलने काल रात्री ती आल्यावर एकदा उठून तिच्या रूममध्ये आला होता.. ती नीट झोपली की नाही ते बघतील होतं..

"अं..ते..काल.. काही नाही..घाबरले नव्हते मी..ते जाऊदे..मितू कुठे आहे..? तुमचं पॅकिंग झालं..?" काव्या विषय बदलत म्हणाली

तिला खरंतर सांगायचं नव्हतं..पण तो राहुल होता..त्याच्यापासून काही लपून राहणार होतं का..त्याने बरोबर ओळखलं ते..

"काऊ..पटकन सांग काय झालं होतं..की मी आदित्यला विचारू..?" राहुल

"नाही..त्याला नको काही बोलू..त्याची चूक नव्हती..त्याला माहित नव्हतं मला स्पीडची भीती वाटते.." काव्या घाबरून पटकन म्हणाली

"म्हणजे तुला काल नक्कीच भीती वाटली होती..म्हणून तू आज डाउन आहेस..काय झालं सांग आता.." राहुल

काव्याने काही न लपवत सगळं सांगितलं..

"काऊ..काल इतकं सगळं झालं तेव्हाच सांगता नाही आलं का..? मला कॉल करायचा होता..मी आलो असतो.. रात्री परत काही झालं असत तर..? रात्री भीती वाटत होती तर मला का नाही बोलवलं..?" राहुल

"भाई..आदी होता सोबत..आणि इतकं काही नाही झालं.." काव्या

"हं.." राहुल सिरीयस होता म्हणून काव्या जरा घाबरली

"दादू..प्लिज..तू आदीला काही बोलणार नाहीस ना..? प्लिज..त्याची चुकी नव्हती..तो तर मला सोडायला पण तयार नव्हता..खूप वेळ माझ्यासोबत होता..त्याला ही गिल्टी वाटत होतं.." काव्या घाबरत म्हणाली..ती आदीची बाजू सावरत राहुलला समजावत होती..

"नाही बच्चा.. त्याला ही हे समजलं असेल.. मला माहित आहे आता तो परत असं करणार नाही.." राहुल हसत म्हणाला.

"थँक्स दादू.. बरं मला सांग ना मितू कुठे आहे..?" काव्या

"किचनमध्ये.. लंच ती बनवणार आहे आज.." राहुल

"Wow..खरंच..मी आले तिला भेटून.." काव्या उठून किचनमध्ये गेली..

"गुड मॉर्निंग मितू.. गुड मॉर्निंग मॉम.." काव्या सीमाताईच्या गळ्यात पडत म्हणाली

"काऊ, किती लेट उठलीस बेटा.. आणि हे काय..?अजुन आंघोळ पण नाही केलीस..जा आधी फ्रेश हो.." सीमाताई तिला रागवत म्हणाल्या

"मॉम..जाते गं..थांब ना जरा..मितू सोबत बोलू तर दे.." काव्या

"बरं..5 मिनिटात तू मला बाथरूममध्ये गेलेली दिसली पाहिजेस.." सीमाताई

"मॉम..प्लिज..मला नंतर रागव..आधी एव्हढी चांगली सून शोधुन आणली तुझ्यासाठी जरा तिच्याकडे बघ.. तिचं कौतुक कर..किती सुशील, सालस, प्रेमळ, आज्ञाधारी बहू आहे तुझी.." काव्या तिच्या साडीचा पदर डोक्यावर टाकत म्हणाली

"मितू तू असं म्हण..पाय लागू माजी..माजी आप आराम किजीए..मैं हूं ना..सब संभालुंगी.." काव्याची नौटंकी चालू झाली..

"मग मॉम तू असं म्हणशील..सून बहू..आजसे ये तिजोरीकी चाबियां तुम संभालना..अब दो चार पोता- पोती गोदी मैं खिलवा के मैं तो तीर्थयात्रा पे चली जाऊंगी.." काव्या सीमाताईच्या मागे जाऊन म्हणाली

"दोन चार का..,मला तर 8-10 पण चालतील.." सीमाताई हसत म्हणाल्या..हे ऐकून मिताली तर इतकी गोड लाजली..

ते बघून परत सगळे हसायला लागले..कुणाला वाटेल का मगाशी काव्या इतकी डाउन होती..भाई कडून लाड करून घेत होती..आणि आता बघा..

"आपकी इच्छा जरूर पुरी होगी माजी..मग आहेच मितू अशी कितने अच्छे संस्कारवाली आदर्श बहू.." काव्या मितालीजवळ जाऊन म्हणाली

तिच्या या नौटंकीवर मिताली खळखळून हसायला लागली..
सीमाताई पण हसत होत्या..किचनच्या भिंतीला टेकून हे सगळं बघणारा राहुल मितालीच्या हसण्यात कधीच हरवला होता..आणि कॉल संपवून तिथे आलेले रणजीतराव हे सगळं बघून समाधानाने हसत होते..

◆◆◆◆◆

"सगळं घेतलंय का..?" सीमाताई

"हो मॉम.." मिताली बॅगची चेन लावत म्हणाली

"बघ आणखी काही राहिलंय का..?" मेधाताई

"नाही गं आई.." मिताली

6.30 झाले होते..अर्ध्या पाऊण तासात राहुल आणि मिताली मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी निघणार होते..T2 टर्मिनस वरून रात्रीची फ्लाईट होती झ्यूरीक, स्वीझरलँडसाठी..

मेधाताई आणि महेश राव त्यांना भेटायला आले होते..मिताली शेवटचं एकदा सगळं चेक करत होती..सीमाताई आणि मेधाताई तिला ढीगभर सूचना देत होत्या..(शेवटी आई ती आईच असते..) काव्या पण मितालीला मदत करत होती..

"आणि परक्या देशात उगाच एकटं कुठे फिरू नको..काही माहिती नाहीये तिथलं.." मेधाताई

"काकू ती हनीमूनला चालली आहे..कॉलेज ट्रिपला नाही.." काव्या

"तेच ना..आई अगं मी एकटी कुठे कशाला फिरू..तुझं तर काही पण असतं.." मिताली

"आणि तिला फिरावं वाटलं तर तरी भाई तिला एकटं सोडेल का..?" काव्या मितालीकडे बघत डोळा मारत म्हणाली 

"हो..तेच ना..ते आत्ताच सोडत म्हणजे..तसं नाही..ते.." तिला आपण काय बोललो ते समजलं..आणि पुढे काय बोलावं सुचेना..

सगळे हसायला लागले..मिताली लाजुन वॉर्डरोब मधलं काही तरी आणायच्या बहाण्याने तिथून उठली..

"मी खाली जाते..बॅग्स घ्यायला पाठवते सदाभाऊला..काऊ तू पण चल.." सीमाताई आणि काव्या मेधाताईंना मितालीसोबत बोलायला मिळावं म्हणून खाली गेल्या..

आदित्यराजही त्यांना भेटायला आला होता..राहुल आणि तो हॉलमध्ये बसले होते..

"भाई..मी..मला बोलायचं आहे तुझ्यासोबत.." आदित्यराज जरा चाचरातच बोलला.

"हं..बोल ना..परमिशन कशाला हवी.." राहुलला अंदाज होताच त्याला काय बोलायचं आहे ते..

"भाई ते ऍक्चुली काल.. काव्या खूप घाबरली होती..इट वॉझ माय मिस्टेक.." आदित्यराजने त्याला सगळं सांगितलं..

"इट्स ओके आदित्य..तुझा फॉल्ट नाही काही..काऊने मला सकाळीच सांगितलंय होतं हे सगळं..डोन्ट वरी..ती आत्ता ठीक आहे.." राहुल त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला

"पण हे अस तिला भीती का वाटते..आय मिन..इतकी घाबरली होती ती..मला तर काहीच सुचत नव्हतं.." आदित्यराजला ते आठवून आणखी कसंतरी वाटलं

"माहीत नाही नक्की रिजन..पण मागे एकदा मी फास्ट कार चालवली होती तेव्हा ती अशीच पॅनिक झाली होती..ताप आला होता..त्या नंतर परत कधी फास्ट नाही चालावलं..ड्रायव्हरला पण क्लिअर इन्स्टक्शन्स आहेत तशा.."राहुल

"भाई..तुला राग आला असेल माझा..आय एम सॉरी..मला खरच अस काही नव्हतं करायचं..बिलिव्ह मी.." आदित्यराज खाली मान घालून म्हणाला

"आदित्य अरे ठीक आहे..तिला काही हार्म नाही झालं ना..तू तिची काळजी घेतलीस नंतर..आता तोंड पडून नको राहू..काव्या आत्ता खुश आहे..तिला वाईट वाटेल.. परत स्वतःचा मूड खराब करून घेईल ती.." राहुल

"थँक्स भाई.."आदित्यराज त्याला मिठी मारत म्हणाला

"काळजी घे तिची..लहान आहे अजून ती..सांभाळून घे.." राहुल

"हो..डोन्ट वरी भाई.." आदित्यराज

"काय झालं..?" काव्या तिथे येत म्हणाली

"काही नाही..जरा टिप्स घेत होतो भाईकडून.." आदित्यराज काव्याला डोळा मारत म्हणाला

तिने आदित्यराजला एक लूक दिला नंतर बघते असा..

निघायची वेळ झाली..बॅग्स कारमध्ये लोड केल्या..राहुल आणि मितालीने मॉम डॅड, आई बाबा सगळ्यांना नमस्कार केला..

"हॅपी जर्नी.. काव्या दोघांना हग करत म्हणाली

"काऊ..काळजी घे..ओके..?" राहुल तिला जवळ घेत म्हणाला

"माझं जाऊदे..तूच काळजी घे तुझी आणि मितूची.. मस्त एन्जॉय करा.." काव्या

ते दोघे निघाले..मिताली तर खूप एक्ससाईटेड होती..एक तर तिची ड्रीम टूर..ते ही तिच्या मिस्टर परफेक्ट सोबत..त्यात ही स्पेशल हनिमून ट्रिप..आणखी काय हवं..OMG..7 days in Heaven..

क्रमशः

- श्रिया❣️
10-07-2020

पुढचा भाग 13-07-2020 संध्याकाळी

कसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रिया देशपांडे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now