Jan 19, 2022
प्रेम

होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18

Read Later
होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18

होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 18

"गुड नाईट..लव्ह यू.." राहुल तिला फोरहेड किस करत म्हणाला

"लव्ह यू टू.." असं म्हणत मिताली बेडवर झोपली..

तिच्या अंगावर ब्लँकेट पांघरून राहुल त्याच्या स्टडीरूममध्ये झोपायला गेला..

आता पुढे:

"गुड मॉर्निंग वहिनी साहेब.." काव्या

"गुड मॉर्निग काऊ.." मिताली हसत म्हणाली

काव्या नुकतंच आदित्यराज सोबत फोनवर बोलून बेडरूममध्ये आली होती..मिताली गाढ झोपली असल्याने तिने तिला उठवलं नव्हतं..ती बाल्कनीतून आत आली तेव्हा मितालीला जाग आली होती..

"काऊ सॉरी गं..काल माझ्यामुळे तुला बराचवेळ बाहेर बाल्कनीत बसावं लागलं..सॉरी.." मिताली उठून बसत म्हणाली

"अगं सॉरी काय मितू.. तुला भाईसोबत बोलायचं होतं..तू सांगितलं नव्हतं तरी समजलं मला.. इतक तर ओळखते ना मी तुला.. आणि तुला बरं वाटलं म्हणजे झालं.. त्यासाठी थोड्यावेळ बाहेर बसले तरी काही प्रॉब्लेम नाही.." काव्या

"थँक्स काऊ..मला समजून घेतल्याबद्दल.." मिताली

"हे सॉरी- थँक्स काय लावलंय तू सकाळी सकाळी..ते सोड आता.. तू पटकन फ्रेश हो..मॉमने सांगितलंय 10 वाजता गुरुजी येणार आहेत..पार्लरवाली पण येईलच इतक्यात.." काव्या

"अरे बापरे 8 वाजून गेले..तू उठवलं का नाहीस मला..? मॉम काय म्हणतील..? मी पण इतकी कशी मंद..अलार्म लावायचं विसरले..आज पहिलाच दिवस आणि मी.." मितालीने किती वाजले ते बघितलं आणि गडबडून उठत म्हणाली..तिला खूप टेन्शन आलं..

"रिलॅक्स मितू..काल सगळेच दमले असल्याने कोणी काही म्हणणार नाही..आणि मॉमनेच सांगितलं झोपू द्यायला..ओके..? टेन्शन नको घेऊ..तू फ्रेश हो..मी इथेच ब्रेकफास्ट आणते आपल्यासाठी.." काव्या

"हं..बाथ घेऊन आलेच मी..रेडी होते पटकन.." मिताली कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली..

"गुड मॉर्निग काऊ.." राहुल

काव्या खाली जाणार तितक्यात राहुल तिथे आला..

"गुड मॉर्निंग भाई.. " काव्या त्याला मिठी मारत म्हणाली

"मितू कुठाय..?" राहुल

"बायको शिवाय करमत नाही वाटतं..लगेच आल्याआल्या तिची चौकशी..ती बाथरूममध्ये आहे.." काव्या त्याला चिडवत म्हणाली

"असं काही नाही..सहज विचारलं..इथे दिसली नाही म्हणून.." राहुल

"ओह..आता मी दिसत आहे तर माझ्यासोबत बोलू शकतो.." काव्या

"काऊ..तू तर नेहमीच असणार आहेस बच्चा..मी हे सांगितलंय तुला आधी.." राहुल

"हो भाई..माहिती आहे मला.." काव्या

"काऊ..बच्चा सॉरी गं.. काल तुला आमच्यामुळे खुप वेळ बाल्कनीत बसावं लागलं..तू ही दमून तिथेच झोपी गेलीस..कशी अवघडून झोपली होतीस माहितीये..सॉरी.." राहुल काव्याला जवळ घेत म्हणाला

"इट्स ओके भाई..मला काही त्रास नाही झाला त्याचा..मितूला तुझी गरज होती..तुमचं बोलणं झालं नसत तर ती रात्रभर एकटी रडत बसली असती..आणि मी विचारलं तरी मला सांगितलं नसतं तिने.." काव्या पण त्याच्या कुशीत शिरून म्हणाली

"हं..तसं नाही काऊ..तिला एकटं वाटत होतं..म्हणून.." राहुल

"हं..तुम्ही दोघांनी सकाळी सकाळी आभार प्रदर्शन काय ठरवून मांडलं आहे का..? मितू ही उठल्या उठल्या हेच म्हणाली..काय झालं..? असं का बघतो आहेस माझ्याकडे..?" काव्या

"बघतोय..माझी काऊ इतकी समजूतदार कधीपासून झाली.." राहुल

"Awwwww.. ते तर मी आधीपासूनच आहे.." काव्या कॉलर ताठ करत म्हणाली

"हो..फक्त दिवसातून 4-5 वेळा नाही 10-12 वेळा फुग्गा होतो आपला..हो ना..?" राहुल चिडवत म्हणाला

"हूं..असं काही नाहीये.." काव्या नाक उडवत म्हणाली

"असंच आहे.." राहुल तिचे गाल ओढत म्हणाला

"आSSSSS... भाई..दुखतंय ना..बोलू नकोस माझ्यासोबत..जा.." काव्या गाल फुगवत म्हणाली

"हे बघ..मी म्हटलं होतं की नाही.." राहुल हसत म्हणाला

तितक्यात मिताली बाथरूममधून बाहेर आली..राहुल तर हसणं विसरून तिच्याकडे बघत राहिला..नुकताच शॉवर घेतल्यामुळे तिचा चेहरा टवटवीत दिसत होता..साधा पंजाबी ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र, हिरवा चुडा, कसलाही मेकअप नाही..

मिताली ओले केस टॉवेलने पुसत बाथरूममधून बाहेर आली होती..समोर राहुलला बघून ती तिथेच थांबली..त्याला असं एकटक बघताना बघून लाजली..दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले..

"मी ब्रेकफास्टच बघून येते..तुमचं चालू दे..एकमेकांकडे बघणं.." काव्या त्यांना चिडवत म्हणाली..

काव्याच्या बोलण्याने दोघेही भानावर आले..मितालीने लाजून मान दुसरीकडे वळवली आणि टॉवेलमध्ये चेहरा लपवला..राहुलने ही लाजून केसातून हात फिरवला..

काव्या हसत बाहेर गेली..ती गेल्यावर राहुलने पटकन मितालीला जवळ ओढलं..

"अहो..काय करताय..?" मिताली

"माझ्या बायकोला जवळ घेतोय..आणखी तर काहीच नाही केलं..करू का..?" राहुल खट्याळपणे म्हणाला

"राहुल..प्लिज..काही करायचं नाहीये..सोडा मला..अजुन पूजा व्हायची आहे.." मिताली त्याला दूर करत म्हणाली

"ओह..मग पूजा झाल्यावर मला हवं ते करायची परमिशन आहे..राईट..?" राहुल

"मी असं कुठे म्हटलं.." मिताली

"येस..तुझ्या बोलण्याचा अर्थ तर तसाच होतो.." राहुल डोळा मारत म्हणाला

"चावटपणा पुरे आता..काऊ येईल..सोडा मला.." मिताली त्याच्या हातावर फटका मारत म्हणाली

"हं..एकदा बघू तर दे तुला.." राहुल तिचा चेहेरा ओंजळीत धरत म्हणाला

त्याचा अशा बघण्याने ती पुरती लाजून लाल झाली..तिने त्याचा हात बाजूला केला आणि न राहवून त्याला घट्ट मिठी मारली..
ते बघून राहुल गालातल्या गालात हसला..आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली..

"काल झोप लागली का नीट..? आता कसं वाटतंय माझ्या राणीला..?" राहुल

"हो..झोप लागली..आज उशीर झाला उठायला..आता फ्रेश वाटतंय.. तुम्ही जवळ आहात तर.." मिताली त्याच्या कुशीत आपला चेहरा लपवत म्हणाली

"मगाशी जवळ घेतलं तर किती नाटकं केली..आणि आता बघा..कोण पकडून ठेवलंय मला.." राहुल तिला चिडवत म्हणाला

तेवढ्यात काव्या रूममध्ये आली.. तिच्यामागून मेड ब्रेकफास्ट घेऊन आली..

"तुमचा रोमॅन्स करून झाला असेल तर ब्रेकफास्ट करायला या..त्यांनतर रेडी पण व्हायचं आहे..पूजा आहे..लक्षात आहे ना..? " काव्या हसत म्हणाली

""काऊ.. " मिताली डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाली

मेडने टीपॉय वर ब्रेकफास्ट सर्व्ह केला..तिघेही सोफ्यावर बसले..

"मॉमने सांगितलंय पूजा आहे तर फराळ करायचा म्हणून..ओके..? आणी हे फ्रुट्स पण खायला सांगितले आहेत..जेवायला लेट होईल म्हणाली.." काव्या

"काऊ..तू फक्त ज्युस पिणार आहेस का..? तुझ्यासाठी काही नाही आणलंय.." मिताली

"मला भूक नाही जास्त..ज्युस बस होईल.." काव्या

"असं कसं..हे घे..मला इतकं नको आहे..मी फ्रुट्स खाईन.." राहुल तिला त्याची प्लेट देत म्हणाला

"नको भाई.." काव्या

त्याने फक्त एक लूक दिला तिच्याकडे..तसं तिने चुपचाप त्याच्या प्लेटमधली साबुदाणा खिचडी घेतली..आणि काही न बोलता खायला लागली..

"एकदा सांगितलं की ऐकायचं मग..कशाला इतके नखरे करते.." राहुल

"राहुल..प्लिज..सकाळी सकाळी नका ओरडू तिच्यावर..इट्स ओके काऊ..तुला हवं तेवढं खा.." मिताली

"हं.." काव्या खाली मान घालून म्हणाली

"ओके बाबा..एम सॉरी..आता बायकोनं सांगितलंय तर तिचं सगळं ऐकावं लागेल.." राहुल नौटंकी करत म्हणाला

"अहो..काहीही काय बोलताय.." मिताली लाजत म्हणाली

काव्या हसायला लागली..ते बघून राहुल आणि मिताली पण हसायला लागले..

ब्रेकफास्ट झाला..राहुल रेडी व्हायला गेला..मिताली आणि काव्या पण त्याचं आवरायला लागल्या..

थोड्या वेळाने दोघीही तयार झाल्या..बेडरूमच दार वाजलं..काव्याने दार उघडलं..

"तुम्ही..? या आत या..मितू बघ कोण आलंय.." काव्या आनंदाने म्हणाली

"मिताली.." मेधाताईनी दारातूनच आवाज दिला

"आई बाबा..तुम्ही.. तुम्ही कधी आलात..?" मिताली एकदम आनंदाने म्हणाली..जस काही खूप दिवसांनी बघत आहे..एक रात्र झाली होती फक्त तिला इथे येऊन..त्यांच्या पासून दूर होऊन..तिच्याकडे बघून तरी असं वाटत होतं की भेटून किती दिवस झाले असावेत..

"आत्ताच आलो.. कशी आहेत बेटा..?" महेशराव

"मी ठीक आहे बाबा.." मिताली हसत म्हणाली

"अहो ही आपलीच मितू आहे ना हो..किती वेगळी दिसते.." मेधाताई

"आई..काय गं तू पण.." मिताली त्यांच्या गळ्यात पडत म्हणाली

"काका काकु तुम्ही बसा..मी इथेच ब्रेकफास्ट पाठवायला सांगते..मितू तुला काही लागलं तर सांग..मी खाली आहे..भाई रेडी झाला का बघते..ओके.?" काव्या

"हो काऊ.." मिताली

गुरुजी आले..राहुल तयार होऊन बाहेर आला..त्याने मरून चिकनकारी कुर्ता आणि क्रिम कलरचा पायजमा घातला होता..
पाटावर बसला असला तर सगळं लक्ष जिन्याकडे होतं.. मितालीच्या येण्याकडे..गुरुजींना 2-2 वेळा सांगायला लागत होतं..सगळे जण त्याचा हा उतावळेपणा बघून गालातल्या गालात हसत होते..शेवटी एकदाची त्याला ती दिसली..तिला बघून आणखीनच वेडा झाला तो..

बॉटल ग्रीन कलरची पैठणी..मरून काठ पदर..सोन्याचे दागिने.. हलकासा मेकअप..त्यावर सूट होईल अशी हेअर स्टाईल..सकाळचं एक रूप आणि हे आत्ताच एक..तिने तिच्या सौन्दर्याने त्याला पुरतं घायाळ केलं होतं आज..

काव्याने त्याला कोपर मारून भानावर आणलं..सगळ्यांसमोर तो असं आपल्याकडे बघतोय म्हटल्यावर मिताली लज्जेने गोरोमोरी होत होती..ती त्याच्या शेजारी पाटावर येऊन बसली तरी त्याने नजर हटवली नव्हती..भानावर आल्यावर त्याने लाजून मान खाली घातली..सगळे हसायला लागले..मितालीला तर कुठे लपू असं झालं..

पूजा चालू असताना ही दोघे एकमेकांना अधूनमधून चोरून बघत होते..सगळे जण त्यांची मज्जा बघून हसत होते..
आदित्यराजला महत्वाची मीटिंग असल्याने तो आला नव्हता..आकाश आणि नेहाची डॉक्टरकडे व्हिजिट असल्याने मिस्टर मोहिते एकटेच आले होते..

पूजा झाली..हळद उतरवणीचा कार्यक्रम झाला..त्यानंतर सगळ्यांची जेवणं होईपर्यंत 3 वाजले..संध्याकाळी जवळच्या लॉनवर रिसेप्शन होतं.. सगळेजण थोडावेळ आराम करून रिसेप्शनच्या तयारीला लागले..

6 वाजता सगळे जण रिसेप्शनसाठी लॉनवर जमले..भव्य दिव्य पॅलेसचा सेट उभा करण्यात आला होता.. सगळीकडे आकर्षक रोषणाई..अधे मध्ये छोटे छोटे फाऊंटन्स..त्यावर कलरफुल लाईट्स सोडले होते..समोरच मोठा स्टेज होता..राहुल आणि मितालीला बसण्यासाठी मोठा सजवलेला काऊच..ब्राईट कलर्सचे कर्टन्स आणि फुलं यांची सजावट केली होती.. लॉनच्या तीन ही बाजूने फूड आणि ड्रिंक काऊंटर्स होते..लॉनच्या अधे मधे बसायला राऊंड टेबल्स आणि चेअर्स होत्या..

मितालीने ब्राऊन कलरचा लेहेंगा घातला होता..त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी..मॅचिंग ऍक्सेसरीज..नेहमीसारखी सुंदर दिसत होती..राहुलने ब्राऊन कलरचा 3 पीस सूट घातला होता..त्याचा ही नेहमीसारखा परफेक्ट लूक होता..

काव्याने ही पिच कलरचा लॉंग गाऊन घातला होता..केस कर्ली करून मोकळे सोडले होते..मॅचिंग ऍक्सेसरीज..हलकासा मेकअप..पिच कलरची लिपस्टिक..डोळे कुणाला तरी शोधत होते.. तितक्यात तिला चित परिचित आवाज आला..आणि चेहऱ्यावर गोड स्माईल आली..

"हाय ब्युटीफुल.. लुक्स लाईक यू आर मिसिंग समवन..?" आदित्यराज त्याची नेहमीची किलर स्माईल देत म्हणाला

नेव्ही ब्लू कलरच्या थ्री पीस सूटमध्ये आदित्यराज नेहमीसारखा हँडसम दिसत होता..तो आल्या आल्या बऱ्याच नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या..त्याने लक्ष न देता त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या काव्याजवळ तो आला होता..

"हेय..हाय आदी..येस..खूप मिस करत होते..पण आता नाही.." काव्या हसत त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली

"ओह..रिअली..इतकं मिस करत होतीस..?" आदित्यराजला तिने घट्ट मिठी मारल्यावर समजलं की काव्या किती आतुरतेने वाट बघत होती ते..

"खूप जास्त.." काव्या थोडं दूर होऊन त्याच्याकडे बघत म्हणाली

"दिस इज फॉर यू बेबी.." आदित्यराज एक रेड रोज तिच्यासमोर धरत म्हणाला

"थँक्स आदी..इतका का लेट..? कधीपासून वेट करत होते मी..सकाळी पण नव्हतास.." काव्या लटक्या रागाने म्हणाली

"मीटिंग लेट संपली.. मग घरी जाऊन रेडी होऊन आलो..त्यामुळे लेट झालं..आता आलोय ना..मग स्माईल कर आता.." आदित्यराज तिचा गाल ओढत म्हणाला

"हं..चल भाई आणि मितूला भेट.. ते ही वाट बघत होते तुझी.." काव्या त्याला घेऊन स्टेजवर गेली..

त्यांच्यासोबत फोटो शूट झालं..सगळ्यांना भेटून दोघेही एका कॉर्नरला येऊन बोलत बसले..काव्या तर एक मिनिट पण त्याला दूर जाऊ देत नव्हती..

रिसेप्शनला आश्रमातील सगळे आले होते..लग्नाचा व्हेन्यू दूर असल्यामुळे मुलांना तिथे आणलं नव्हतं..मितालीच्या हाताने आश्रमातील सगळ्यांना कपडे, आवश्यक वस्तू, खेळणी असं काही न काही वाटप करण्यात आलं..सगळ्यांना मिठाईचे बॉक्स दिले..

रिसेप्शन झाल्यावर बरेच पाहुणे तिथुनच परत आपापल्या घरी गेले.. मितालीचे आई बाबा ही त्यांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी गेले..आदित्यराज ही थकला होता..तो ही तिथूनच मिस्टर मोहितेंसोबत त्यांच्या घरी गेला..बाकी सगळे जण देशमुख व्हिलामध्ये परतले..

घरी आल्यावर सीमाताईंनी काव्याला काही सांगितलं..काव्याने ही हसत होकार दिला.. ती मितालीला घेऊन राहुलच्या बेडरूमसमोर आली..

जिन्यातून जातानाच मितलीला अंदाज आला होता..तिची पावले आपोआप हळू पडू लागली..हार्ट बिट्स वाढले होते..

"बेस्ट ऑफ लक.." काव्या मितालीच्या कानात हळूच म्हणाली

मितालीला एकदम पोटात गोळा आला..तिने काव्याचा हात पकडला..तिला थोडं घाबरायला झालं.. वेगळीच हुरहूर मनात दाटून आली.. आत्तापर्यंत ती खूपदा त्याच्या बेडरूममध्ये आली होती..तेव्हा तर अशी हुरहूर कधी वाटली नव्हती..पण आज ती राहुलची बायको म्हणून तिथे प्रवेश करणार होती..तिच्या हक्काच्या बेडरूममध्ये..त्यांच्या बेडरूममध्ये..

मितालीने काव्याच्या कानात काही सांगितलं..

"ओके मितू.. जशी तुझी इच्छा..मी आलेच." काव्या असं म्हणत हसत निघून गेली

थोड्यावेळाने आली तर राहुल सोबत होता..तिने त्याचा हात मितालीच्या हातात दिला..दोघांनाही गुड नाईट विश करून ती तिच्या बेडरूममध्ये गेली..

त्या दोघांनी ठरवल होत की लग्न झाल्यावर एकमेकांसोबत बेडररूममधे प्रवेश करायचा..राहुलही तिथे गेला नव्हता कालपासून.. तो स्टडीरूममध्ये झोपला होता रात्री..
दोघांनीही दार उघडलं..आणि हात पकडून रूममध्ये गेले..राहुलने लाईट ऑन केला..

"Wow.." मिताली तर बेडरूम बघून हरखली..

त्यांनी इंटेरिअर डेकोरेटरला जसं सांगितलं होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर रूम दिसत होती..

समोरच राहुल आणि मितालीचा एक फोटो फ्रेम लावली होती..वॉल कलर्स, कर्टन्स, सोफा, सगळं काही तिच्या मनासारखं होतं..ड्रेसिंग टेबल ही खूप सुंदर होतं.. नाजूक डिझाइनवालं..

ती ते बघत होती की राहुलने मागून येऊन तिला मिठी मारली..त्याबरोबर ती भानावर आली

"आवडलं..?" राहुल तिच्या कानात हळूच म्हणाला

"हो .खूप छान आहे सगळं.." मिताली

"आणि मी..?" राहुल तिच्या गालावर किस करत म्हणाला

"तुम्ही पण.." मिताली लाजत म्हणाली

"पण तू माझ्याकडे कुठे बघितलंस.. न बघता म्हणालीस.. आता रूम बघून झाली तर माझ्याकडे पण बघ.." राहुलने तिला आपल्याकडे वळवत म्हणाला

तिने नाही म्हणत लाजून खाली मान घातली..

"बरं..जशी तुझी इच्छा..तू फ्रेश हो..मी बाल्कनीत आहे.." राहुल तिच्या उत्तरची वाट न बघता बाल्कनीत गेला आणि स्लाईड डोअर पण ओढून घेतलं..उगीच तिला अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून..

मितलीला थोडं वाईट वाटलं..तिला वाटलं नव्हतं तो लगेच असं निघून जाईल..तिचे डोळे भरून आले..तिने नाईट ड्रेस घेतला आणि फ्रेश होण्यासाठी गेली..

बाहेर आली..बघितलं तर राहुल अजूनही रूममध्ये आला नव्हता..तिने दागिने काढले आणि ड्रेसिंग टेबल वर ठेवले..तेवढ्यात तिचं लक्ष एका इन्व्हलपकडे गेले..त्यावर तिचं नाव लिहिले होते..त्या सोबत एक रेड रोज पण होतं..

तिने उत्सुकतेने ते उघडलं..

पटकन बाल्कनीत जाऊन राहुलला मिठी मारली..

"राहुल..हे..हे कधी केलं..?" मिताली एक्ससाईट होऊन म्हणाली

"सरप्राईज.." राहुल हसत म्हणाला

"Switzerland..for 7 days..खरंच..? माझा विश्वासच बसत नाहीये.." मिताली आनंदाने म्हणाली..

तिची खूप इच्छा होती तिथे जायची..राहुलने तिला छान सरप्राईज दिलं होतं..त्याने Switzerland ला 7 दिवसाची हनिमून ट्रिप बुक केली होती..त्याने मितालीकडून आधीच सगळे डॉक्युमेंट्स मागून घेतले होते.ऑफिसच्या कामासाठी हवेत म्हणून..

"हॅपी..?" राहुल

"खूप..थँक्स..लव्ह यू.." मिताली त्याला मिठी मारत म्हणाली

"लव्ह यू टू.." राहुल

"राहुल..सॉरी..तुम्हाला राग आला ना.." मिताली

"नाही गं.. राग कशाचा..तुला कम्फर्टेबल नसेल म्हणून मी बाहेर आलो.." राहुल

"सॉरी.." मिताली

"अगं.. इट्स ओके मितू.. जास्त विचार करू नको.. लेट झालंय.. आणि थकली पण आहेस तू..झोप आता..चल.." राहुल

"हं.." मिताली परत त्याच्या मिठीत शिरली..

"मितू.. रिलॅक्स हो..आपल्याला काहीच घाई नाहीये कुठल्या गोष्टीची..ओके..? मी नाही रागावलो..उगीच काही तरी विचार नको करू.." राहुल तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला थोपटत म्हणाला

"एक विचारू.. तुम्हाला सगळं कसं कळतं मी न सांगता..?" मिताली

राहुल हसायला लागला.. ते बघून ती गोंधळली..

"न कळायला काय झालं मितू..आपण काय वेगळे आहोत का..? तू तर इथे आहेस माझ्या मनात..मग मला तर सगळं समजणारच.." राहुल तिचा हात आपल्या छातीवर ठेवत म्हणाला

मगाशी ते बेडरूममध्ये येत होते तेव्हा तिचा हात पकडल्यावर त्याला समजलं होत की ती घाबरली आहे, अस्वस्थ आहे..म्हणून त्याने तिला वेळ द्यायचा ठरवला..

राहुलने आज परत एकदा तिचं मन जिंकल होतं..त्याची हीच गोष्ट तिला परत परत त्याच्या प्रेमात पडायला मजबूर करत होती..

"काय झालं..?" राहुलने एक भुवई उंचावत विचारलं

मितालीने गोड हसली आणि हलकेच आपले ओठ त्याच्या ओठांवर ठेवले..आणि पळत बेडरूममधे आली..

राहुल आधी ब्लॅंक झाला..मग तो ही तिच्या मागून पळत आला..
तो आत आलेला बघुन तिने लगेच ब्लँकेट तोंडावर ओढलं..लाजुन आरक्त झालेला आपला चेहरा लपवला..

बराच वेळ झाला काही हालचाल नाही बघून तिने हळूच ब्लँकेट खाली केलं..समोर बघितलं तर राहुल नव्हता..तिने बाजूला वळून बघितलं तर तो बेडवर तिच्या बाजूला पडून तिच्याकडेच बघत होता..

त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव होते..तिला वाटलं होतं तो येईल आणि ब्लँकेट दूर करेल..त्याला ते माहीत होतं म्हणून बाजूला झोपून तो तिची मजा बघत होता..आपला पोपट झाला तिच्या लक्षात आलं..ती परत तोंडावर ब्लँकेट घेणार तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला..आणि ब्लॅंकेट बाजूला केलं..

"मी म्हटलं होतं..आता तुला एकटं सोडणार नाही..विसरलीस..?" राहुल तिच्या हातावर किस करत म्हणाला

"हं..नाही..विसरले.." मितालीचे हार्टबिट्स वाढत होते..

"आणि मगाशी बाहेर असताना केलं ते काय होतं..?" राहुल तिच्या ओठांवरून, गालावरून बोट फिरवत म्हणाला..

त्याच्या स्पर्शाने ती मोहरत होती..तिला ते हवं ही होतं पण भीती ही वाटत होती..तिच्या तोंडातून आवाज ही फुटेना..

"राहुSल..प्लिSSज..नको ना.." मिताली कसंबसं म्हणाली

तो हसत आणखी तिच्याजवळ आला..तिने घाबरून डोळे बंद केले..

"झोप आता..गुड नाईट.." राहुल शांतपणे तिच्या कपाळावर किस करत म्हणाला

आणि तिच्या अंगावरच ब्लँकेट नीट करून बाजूला सरकला..
तिने डोळे उघडले..तो थोडा दूर झोपला होता..ती त्याच्याजवळ सरकली..त्याने ही हसत तिला आपल्या जवळ ओढलं..ती ही लाजून त्याच्या कुशीत शिरली..

"वेडू कुठली.." राहुल गालातल्या गालात हसत म्हणाला

दोघेही गोड हसत एकमेकांना कुशीत घेऊन झोपले.. दिवसभराच्या फंक्शनमुळे दमले असल्याने ते लगेच झोपी गेले..

क्रमशः

- श्रिया❣️
08-07-2020

पुढचा भाग 10-07-2020

कसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रिया देशपांडे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now