Oct 21, 2021
प्रेम

होंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 24

Read Later
होंगे जुदा ना हम पर्व 2 भाग 24

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

होंगे जुदा ना हम.. पर्व 2.. भाग 24

"नाही आदित्य..मी ठीक आहे.." राहुल

आदित्यराजने त्याचं काही ऐकून न घेता त्याला फ्रेश होण्यासाठी गेस्ट हाऊस वर पाठवलं..आणि तो आत एम सोफ्यावर बसला..आता त्याला थोडं बरं वाटत होतं..काव्या शुद्धीवर आली, त्याच्याशी नीट बोलली म्हटल्यावर त्याला खूप रिलॅक्स वाटलं..थँक गॉड

आता पुढे:

संध्याकाळी साधारण 6 वाजता काव्याला जाग आली..नर्सने तिला एकदा चेक केलं आणि सलाईन काढुन टाकलं..तिला थोडं फ्रेश केलं आणि बेडवर बसवलं..नर्स गेल्यावर राहुल आत आला..

"काऊ..कसं वाटतंय बच्चा..? त्रास होतोय का..?" राहुल तिला थोपटत म्हणाला

"हं..डोकं जड वाटतंय.." काव्या

"हं..ते लागलंय ना तिथं म्हणून तसं वाटतंय.." राहुल

"भाई..मॉम कुठाय..? मला मॉमकडे जायचंय.." काव्या

"मॉम घरी आहे बच्चा..तुला थोडं बरं वाटलं की आपण फोन करू त्यांना..ओके..? तू लवकर बरी ही मग आपण उद्या घरी जाऊ.." राहुल लहान मुलाची समजूत काढतात तशी समजूत काढत होता..

आदित्यराज काव्यासाठी ज्युस घेऊन आला..तिला प्यायला दिला..तिने आधी नखरे केले..तोंड वाकडं केलं..पण हे दोघे असतांना तिचं काही चाललं नाही.. आता बऱ्यापैकी झोप झाली होती तिची..ज्युस घेतल्यावर बरं वाटलं..राहुलने मॉमला फोन लावला..

"कशी आहेस बेटा..?" सीमाताईंनी काळजीने विचारलं

"आय एम फाईन मॉम.." काव्या थोडी स्माईल देत म्हणाली

"खोटं नको बोलू..मॉम आहे मी तुझी.." सीमाताई

"मॉम..मला आठवण येतेय तुमची.." काव्या एव्हढंस तोंड करत म्हणाली

"राहुलने तिला जवळ घेतलं..ती पण लगेच त्याच्या कुशीत शिरून बसली..

"हो बेटा..आम्ही आहोत ना..हे घे डॅड सोबत बोल.." सीमाताईंनी त्यांच्या डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी पटकन रणजीतरावांकडे फोन दिला

"डॅड.." काव्या

"काऊ..आजचा एक दिवस बेटा..उद्या मी तुमची इथे यायची व्यवस्था करतो..संध्याकाळी तू आपल्या घरी असशील..प्रॉमिस.." रणजीतराव

"थँक्स डॅड.." काव्या

"आणि इथे खूप सारे चॉकलेट्स पण तुझी वाट बघत आहेत.." मिताली

"Wow.. थँक्स मितू.." काव्या थोडं हसत म्हणाली

"काऊ बास आता बोलणं..तू आराम कर..रात्री परत बोलू म्हणे.." राहुल

"तुला तुझ्या बायको सोबत बोलायचंय ते सांग ना.." काव्या नाक उडवत म्हणाली

"कळलं ना आता..मग बोलू दे मला.." राहुल पण हसत म्हणाला

तिला नॉर्मल झालेलं बघून त्याला बरं वाटलं..तो मिताली सोबत बोलायला बाहेर गेला..आदित्यराज तिच्याजवळ येऊन बसला..
तिने त्याचा हात पकडला..

"आदी..मी खूप त्रास दिला ना तुला..?" काव्या

"हो..खूप..बस जीव जायचा बाकी होता माझा तुला रूममध्ये पडलेलं बघून..तुला शुद्ध येईपर्यंत कसा वेळ काढला माझं मला माहित.." आदित्यराज गहिवरून म्हणाला..त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं..तो किती असहाय्य झाला होता ते साफ दिसत होतं..

"आदी.." काव्याने त्याचा हात घट्ट पकडून आपल्या हृदयाशी धरला..तिच्या ही डोळ्यात पाणी आलं..

"सॉरी..ते चुकून..तू जास्त विचार करू नको..काही झालं नाहीये.." आदित्यराज नॉर्मल होत म्हणाला

"आदी..मला माहित आहे तुला खूप त्रास होतोय.. आय एम सॉरी.." काव्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन त्याला बिलगून बसली..

"असा चुकूनही विचार करायचा नाही..स्वतःला इतकं लागलंय तरी माझ्या त्रासाचा विचार करते..पागल कुठली.." आदित्यराज

"हं..तूच केलंस मला पागल..आणि इतकं रेडी होऊन का आलास..? ती नर्स किती वळून वळून बघत होती तुझ्याकडे..असं वाटलं की तिलाच एक इंजेक्शन टोचून द्यावं.." काव्या गाल फुगवत म्हणाली

आदित्यराज खळखळून हसला..तसं ती आणखी फुग्गा झाली

"तुझ्यासाठीच रेडी झालो स्वीटी..मग माझ्या प्रिन्सेसला फ्रेश वाटायला नको का.." आदित्यराज तिची मान हळुवार त्याच्याकडे वळवत म्हणाला

"हं..आदी.." काव्या

"शू..काही बोलू नको आता..खूप झाली बडबड..शांत बस.." आदित्यराज

"अम्मम्म्म.. नो..किती दिवसांनी भेटतोय तू.." काव्या

"काऊ..तू एक गोष्ट विसरतीयेस..आपण हॉस्पिटलमध्ये आहोत..तुला बरं नाही म्हणून इथे आलोय..ओके..कॅफेमध्ये बसलो नाहीये..गप्पा मारायला.." आदित्यराज

"हूं..जा तू..बोलू नको.." काव्या

"काऊ..अगं तुला त्रास होईल बेबी..तू ठीक हो मग हवं तितकं बोल..प्लिज.." आदित्यराज

"हो आदी..तू म्हणशील तसं.." काव्या त्याला आणखीनच बिलगून बसली..त्याने ही तिला आपल्या जवळ ओढलं..

"आह.. " काव्या डोक्याला हात लावत म्हणाली

"काय झालं..? खूप दुखतंय का..? तू झोप..मी डॉक्टरांना बोलावतो.." आदित्यराज

"नो आदी..मी ठीक आहे..तू इथेच थांब.. माझ्याजवळ.." काव्या डोळे मिटून शांत बसली

आदित्यराज तिला हलकं हलकं थोपटत होता..राहुल फोन संपवून आत आला..आदित्यराज त्याला बघून उठणार तोच त्याने इट्स ओके म्हणून सांगितलं..आणि स्माईल दिली..डॉक्टर सोबत बोलायला गेला..

थोड्यावेळाने ती उठली..

"आदी..घरी कधी जायचं..?" काव्या

"उद्या सकाळी.." आदित्यराज

"आत्ता जाऊया ना प्लिज..मला बोअर झालंय.." काव्या

"इथे आपण मज्जा म्हणून आलोय का.?" राहुल

"हूं..लहान आहे म्हणून असंच करा मला.." काव्या नाक उडवत म्हणाली

"काऊ..प्लिज.." आदित्यराज

"ओके..फाईन..विचारायचं पण नाही का.." काव्या

"किती बोलते गं तू..शांत बस आता.." आदित्यराज

काव्या चिडून डोळे मिटून बसली..आदित्यराज हसायला लागला..काव्या आणखीनच डोळे घट्ट बंद करून घेतले..

"काऊ..तुझ्यासाठी खिचडी आणायला सांगितली आहे..ती खाऊन मेडिसीन्स घ्यायच्या आहेत.." राहुल

"आणि तुम्ही दोघ काय जेवणार आहेत..?" काव्या

"तू आधी तुझं बघ..आमचं नंतर बघू.." राहुल

"तुम्ही लंच केलात..?" काव्या

"मी सांगितलंय ना जास्त बोलू नको.." आदित्यराज तिच्यावर रागवत म्हणाला

"भाई..मला तुझा फोन दे..2 मिन फोनवर बोलते..मग कुणासोबत बोलणार नाही.." काव्यापण चिडून म्हणाली

राहुलने तिला फोन दिला..तिने एक कॉल केला आणि कुणाला तरी सूचना देऊन फोन कट केला..

"हे घे तुझा फोन..काम झालं माझं..मला थोड्यावेळ आराम करायचा आहे..आणि आता मी बोलणार नाहीये.." काव्या डोळे बंद करत म्हणाली

दोघेही डोक्याला हात लावून हसायला लागेल..थोड्यावेळाने गेस्ट हाऊसमधून एक सर्व्हन्ट टिफिन घेऊन आला..राहुलने प्लेटमध्ये खिचडी घेतली..काव्याला भरवली..तिचं खाऊन झाल्यावर तिने त्या सर्व्हन्टला दुसऱ्या टिफिन मधलं जेवण 2 प्लेटमध्ये सर्व्ह करायला सांगितला..

"तुम्ही दोघे जेवलात तरच मी मेडिसीन्स घेईन.." काव्या त्यांच्याकडे न बघता म्हणाली

राहुल आणि आदित्यराजने एकमेकांकडे बघितलं..त्यांना कळलं तिला राग आलाय खूप म्हणून..त्यांनी काही न बोलता चुपचाप जेवण केलं..जेवण झाल्यानंतर राहुलने काव्याला मेडिसीन्स दिल्या

"हे घे.." राहुलने काव्या समोर मेडिसीन्स धरल्या

"अं..इतक्या..नको मला.." काव्या तोंड वाकडं करत म्हणाली

"तुला हवं आहे की नको विचारलं नाहीये..आता आम्ही जेवलो ना..चुपचाप गोळ्या घे..नाटक नकोय.." राहुल थोडा रुडली बोलला

काव्याने लगेच गोळ्या घेतल्या..आणि डोळे बंद करून बसली..राहुल हसला..तिच्या डोक्यावर हलकं किस करून एक चॉकलेट तिच्या समोर धरलं..काव्याने त्याच्याकडे न बघता दुसरीकडे बघितलं. त्याने चॉकलेटचा रॅपर काढून तिला भरवलं..

"आता हे पण मी जबरदस्तीने खायचं का..?" काव्या

"काऊ..सॉरी बच्चा..ये इकडे.." राहुल तिला जवळ घेत म्हणाला

"हूं..कसा रूड बोलतो माझ्यासोबत.." काव्या

"बच्चा..सॉरी..तू ऐकत नाहीस मग मला ओरडावं लागतं तुझ्यावर.." राहुल तिला जवळ घेत म्हणाला

"नकोय मला तुझं सॉरी..मला बरं नाहीये तरी ओरडतो माझ्यावर.." काव्या सॅड फेस करत म्हणाली

"ओके बच्चा.. परत नाही ओरडत..शांत हो..झोप आता..उद्या घरी जायचंय ना.." राहुल

"हं.." काव्या

राहुलने तिला नीट बेडवर झोपवलं..झोपेपर्यंत तिच्या हातावर थोपटत बसला..मेडिसीन्समूळे तिला लगेच झोप लागली..

"भाई..तू पण झोप..मी तिच्याजवळ बसतो..काही लागलं तर उठवेन तुला.." आदित्यराज

"आत्ता तू झोप थोड्यावेळ..माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे आरामाची..तुझी झोप झाली की मग मी झोपेन.." राहुलने त्याच काही न ऐकता त्याला झोपायला सांगितलं..

आदित्यराजने काव्याकडे एक नजर टाकली..ती शांत झोपली होती..तो ही तिथल्या दुसऱ्या बेडवर झोपायला गेला..रात्री कधीतरी त्याला जाग आली..राहुल चेअरला टेकून डोळे बंद करून बसला होता..त्याने त्याला उठवलं आणि बेडवर झोपायला सांगितलं..आदित्यराज काव्याजवळ बसला..तिच्या कपाळावर हलकं किस केलं..तिच्या हातावर हात ठेवून 'बस लवकर बरी हो काऊ..तुला मी असं नाही बघू शकत स्वीटी..' असं मनातच म्हणाला..आणि डोळे मिटून शांत बसला..

सकाळी राहुल आणि आदित्यराज दोघेही फ्रेश झाले..काव्या अजून उठली नव्हती..राहुलला डॅडचा फोन आला म्हणून तो बाहेर गेला..

"अं..भाई.." काव्या झोपतेच थोडं कळवळली

"काऊ..काय होतयं..? " आदित्यराज

"अं..डोकं.." काव्याने डोक्याला हात लावला..

"हं.. दुखतंय का.. ? काळजी नको करू..होईल कमी.." आदित्यराज

"हं..भाई कुठाय..?" काव्या

"इथेच बाहेर आहे..फोनवर बोलतोय..तू फ्रेश होते का..?" आदित्यराज

"हो.." काव्या

आदित्यराजने तिला बाथरूममध्ये सोडलं..

"एकदम आरामात आवर.. आणि डोअर लॉक करू नको..मी इथे बाहेरच आहे..काही हेल्प लागली तर आवाज दे..ओके..?" आदित्यराज

थोड्यावेळाने तिने आदित्यराजला हाक मारली..त्याने तिला बेडवर बसवलं..वाईप्सने चेहरा अलगद क्लीन करून दिला..पाठीमागे पिलो लावून तिला नीट बसवलं..

ड्रायव्हरने कॉफी आणि ज्युस आणून दिला..काव्याला ज्युस देऊन दोघांनी कॉफी घेतली..नर्सने ड्रेसिंग चेंज केलं..डॉक्टरांनी येऊन चेक केलं..आणि डिस्चार्ज प्रोसिजरसाठी बोलवलं..राहुल तिथे गेला..एक दोन तासांत सगळे गेस्ट हाऊसवर पोचले..

दुपारी लंच केला..काव्याला मेडिसीन्स देऊन झोपवलं.. तिचा थोडा आराम झाला की ते पुण्याला जाण्यासाठी निघणार होते..रणजीतरावांनी त्यांच्यासाठी प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन अरेंज केलं होतं.. 7 वाजेपर्यंत ते तिघे देशमुख व्हिलामध्ये पोचले..

राहुलने काव्याला उचलून आत आणलं आणि अलगद सोफ्यावर बसवलं..

"मॉम.." काव्या सीमाताईंच्या गळ्यात पडत म्हणाली

"काऊ..बेटा काय गं हे.." सीमाताई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या

"मॉम..मी ठीक आहे.." काव्या त्यांचे डोळे पुसत म्हणाली

"राहुल, आदी तुम्ही ही फ्रेश व्हा..मग सोबत डिनर करू.." मिताली

थोड्यावेळ गप्पा मारून सगळे जेवायला बसले..सीमाताई काव्याला खिचडी भरवत होत्या..

"मॉम..मी खाते..तू पण जेवायला बस.." काव्या

"तुझं होऊ दे आधी..मग मी जेवेन..मितू पण आहेच सोबत.." सीमाताई

काव्याचं खाऊन झालं..ती हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसली..डिनर झाला..सगळ्यांना बाय करून आदित्यराज त्याच्या घरी गेला..राहुल तिला घेऊन बेडरूममध्ये आला..तिला मेडिसीन्स दिल्या..बेडवर नीट झोपवलं..तिला मेडिसीन्स आणि ट्रॅव्हल करून दमल्यामुळे लगेच झोप लागली..

"मी काऊ जवळ झोपते..तू आराम कर बेटा..थकला आहेस खूप.." सीमाताई राहुलला म्हणाल्या

राहुलने काव्याकडे बघितलं आणि तो त्याच्या बेडरूममध्ये गेला..

"मॉम..तुम्ही पण आराम करा..मी थांबते इथे.." मिताली

"नको गं.. तू राहुल जवळ थांब..तो काऊची काळजी करत जागत बसेल..आणि तू पण आराम कर.." सीमाताई

"बरं..गुड नाईट मॉम.." मिताली

मिताली दार बंद करून तिच्या बेडरूममध्ये गेली..राहुल बाहेर बाल्कनीत होता..तिने त्याला मिठी मारली..त्यानेही तिला जवळ घेतलं..

"राहुल..काळजी करू नका..सगळं ठीक आहे..काही नाही झालं काऊला.." मिताली

"हं.." राहुल

"चला आता झोपा शांतपणे..तुम्ही खूप थकलाय.." मितालीने त्याला ओढतच आत आणलं..आणि झोपायला लावलं..

लाईट्स ऑफ करून त्याला जवळ घेऊन ती ही झोपली..

◆◆◆◆◆

दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि मिताली काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले..आदित्यराज ही सोबत होताच..त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी काव्याला चेक केलं..आणि नर्सला ड्रेसिंग चेंज करायला सांगितलं..राहुल आणि आदित्यराज त्यांच्या केबिनमध्ये आले..

त्या दोघांनी काय झालं होतं ते सांगितलं..काव्याची ममस्थिती कशी होती ते ही सांगितलं..

"राहुल..मला वाटतंय की आपण काव्याच्या काही टेस्ट करून घेऊ..आत्ता ज्या मेडिसीन्स दिल्या आहेत त्याच कन्टीन्यू करा..उद्याचा डोस संपला की 2 दिवसांनी तिच्या टेस्ट करू..दिवसभरासाठी ऍडमिट व्हावं लागेल.." डॉक्टर

"अंकल, काही सिरीयस आहे का..?" राहुलने काळजीने विचारलं

"नो माय बॉय..सिरिअस तर नाही..म्हणजे आत्ता तरी सांगता येत नाही..मला काही डाऊटस् आहेत..ते क्लिअर करण्यासाठी टेस्ट आहेत.." डॉक्टर

"ओके..आणि डोक्याच ड्रेसिंग..? " राहुल

"ड्रेसिंग साठी यावं लागेल 3-4 दिवस..एकदा जखम भरली की तुम्ही घरी ही करू शकता.." डॉक्टर

"ओके..ठीक आहे अंकल..थँक्स..येतो आम्ही.." राहुल

सगळे घरी आले..राहुलने डॉक्टर काय म्हणाले ते सगळ्यांना सांगितलं

"पण मी आता ठीक आहे..टेस्ट करायची काय गरज आहे..?" काव्या

"काऊ..परत काही त्रास होऊ नये म्हणून टेस्ट करायची आहे..आणी त्यासाठी तुला काही करायचं नाहीये..फक्त हॉस्पिटलमध्ये जायचं..बाकी सगळं ते बघतात..समजलं..?" राहुल

"पण भाई..?" काव्या

राहुलने फक्त एक लूक दिला तिला..ती लगेच खाली मान घालून शांत बसली..

"चला लंच तयार आहे..फ्रेश होऊन जेवायला चला..काऊ..तुझं फेव्हरेट सूप बनवलय..चल बेटा.." सीमाताई विषय बदलत म्हणल्या

सगळे जण फ्रेश होऊन डायनिंग टेबल वर आले..

"डॅड.. आज 31स्ट आहे..ऑफिसमध्ये न्यू इयर पार्टी आहे ना.." काव्या

"हो..आहे पार्टी..पण तुला बरं नाहीये तर आम्ही जाणार नाहीये..राहुल, मितू तुम्ही दोघे जा.." रणजीतराव

"नाही डॅड..तुम्ही, मितू आणि मॉम जा..मी घरी थांबतो.." राहुल

"एक मिनिट..तुम्ही सगळे जा..आपल्या ऑफिसची पार्टी आहे..ऑलरेडी सगळ्यांना इंव्हीटेशन्स दिले आहेत..आणि तुम्ही गेला नाहीत तर वाईट दिसेल..मी आता ठीक आहे..माझ्यासोबत संगीता काकू थांबतील..काही प्रॉब्लेम येणार नाही.." काव्या

"मॉम, डॅड, भाई..तुम्ही सगळे पार्टी अटेंड करा..मी थांबतो काव्यासोबत..तुम्ही घरी आलात की मी जाईन.. तसं ही मला या पार्टीज् आवडत नाहीत.." आदित्यराज

"हा..हे बेस्ट आहे.." काव्या खुश होत म्हणाली

तिला इतकं खुश झालेलं बघून सगळ्यांनी होकार दिला..कारण मग त्यांना ही त्यांचा क्वालिटी टाइम मिळेल..

लंच नंतर काव्या मेडिसीन्स घेऊन झोपली..आदित्यराज घरी गेला..तो संध्याकाळी परत येणार होता..बाकी सगळे ही आराम करायला गेले..परत त्यांना संध्याकाळच्या पार्टीसाठी तयारी करायची होती..

◆◆◆◆◆

सगळे जण पार्टीला गेल्यानंतर आदित्यराज आणि काव्या लॉनवर बसले होते..संध्याकाळची वेळ होती..थंडीचे दिवस असल्याने सूर्य नारायण लवकर घरी गेले होते..अंधार पडायला सुरुवात झाली होती..

"आदी..तू पण जायचं होतंस ना पार्टीमध्ये.. मी आता ठीक आहे.. बाकीचे सर्व्हनट्स पण आहेत घरी..काही लागलं असत तर मी कॉल केला असता.." काव्या

"मला पार्टीज् आवडत नाहीत..त्यात तू पण नाहीस..आणि तसही त्या बोअर पार्टीपेक्षा खूप इम्पॉरटंट काम आहे मला.. माझ्या बेबीला सांभाळण्याच.." आदित्यराज

"ओह..हाऊ स्वीट.." काव्या क्युट फेस करून म्हणाली

"आणि तू नाहीस तर मग किती तरी मिस. चिपकु माझ्या मागे लागतील..डान्स साठी विचारतील..यू नो ना..? ते चालेल का तुला..?" आदित्यराज तिला चिडवत म्हणाला

तिने त्याला एक रागीट लूक दिला आणि हाताची घडी घालून बसली..

"बघ..मी फक्त म्हटलं तर असं बघते माझ्याकडे.. खरोखर असं झालं तर मला तर फासावर लटकवशील.." आदित्यराज तिची आणखी मजा घेत म्हणाला

"हो..पण तुला नाही..त्यांना..कॉज यू आर माईन..ओन्ली माईन..नो वन कॅन टच यू ऍक्सेप्ट मी.." काव्या आदित्यराजची कॉलर पकडत म्हणाली

त्याने त्या संधीचा फायदा घेत तिला हलकंस किस केलं..

"व्हॉट वॉज दॅट..?" काव्याने डोळे मोठे करून विचारलं

"नथींग.." त्याने आपण काहीच केलं नाही असं बिहेव्ह करत खांदे उडवले..

"तू आत्ता मला किस केलंस..त्याचं विचारत आहे मी.." काव्या

"ओह..तुला नको असेल तर मला परत दे..आय नेव्हर माईंड.." आदित्यराज त्याची किलरवाली स्माईल देत म्हणाला

"आदी..तू ना.." काव्या त्याच्या दंडावर फटके मारत म्हणाली

"या आय नो..हँडसम..स्वीट..अँड.." आदित्यराज तिची नक्कल करत होता ते बघून काव्या खळखळून हसली..तिचं हसणं बघुन तो ही हसायला लागला..

"काऊ आत चल आता..थंडी वाढली आहे.." आदित्यराज

"अं..थोड्यावेळ बस.." काव्या

"तुझं हे थोड्यावेळ कधी संपतच नाही.." आदित्यराज हसत म्हणाला

"हूं.. असं काही नाहीये.." काव्या नाक उडवत म्हणाली

"हो का..? असं नाहीये तर मग कसं आहे.." तिच्या नाकावर हलकं बोटं मारत आदित्यराज म्हणाला..तिने तिचं क्युटवालं नाक असं उडवलं ना की तो तिच्या नाकावर टिचकी मारायचा..त्याला खूप आवडायचं तसं करायला..

"आदी..तुला किती वेळा सांगितलंय असं करू नको..आय डोन्ट लाईक इट.." तिला ते अजिबात आवडत नव्हतं..

"बट आय लाईक.." तो तिच्या नाकावर किस करत म्हणाला..हे तर ठरलेलं असतं पुढे नाकावर हलकं किस करणं.. मग काव्याच लाजणं..आणि तसंच झालं

"आगाऊ झाला आहेस तू..चल आता..आत जाऊ..नाहीतर परत मलाच बोलशील.." काव्या त्याच्या दंडावर फटका मारत म्हणाली

त्याने तिला उचललं आणि आत घेऊन आला..

"आदी..खाली सोड मला..मी चालू शकते..माझ्या डोक्याला लागलंय, पायाला नाही.." काव्या

"कुठे का असेना..लागलं तर आहे ना..मी इतका मोठा चान्स का सोडू.." आदित्यराज त्याची किलरवाली स्माईल देत म्हणाला

तिने ही त्याला विरोध करण्यात काही अर्थ नाही समजून गोड हसत त्याच्या गळ्यात आपले हात गुंफले..

बेडरूममध्ये येऊन त्याने तिला बेसवर नीट बसवलं..पाठीमागे पिलो लावल्या..मी डिनर रेडी आहे का बघून येतो..त्यांनतर मेडिसीन्स पण घ्यायच्या आहेत.." आदित्यराज

"हं..ओके..लवकर ये.." काव्या

आदित्यराज खाली आला..त्यांच्या मेडला डिनर बेडरूममध्ये पाठवायला सांगितला..ते झाल्यावर राहुलला कॉल केला..थोड्यावेळ काही महत्वाचं बोलून परत काव्याच्या रूममध्ये आला..काव्या डोळे मिटून शांत बसली होती..

"त्रास होतोय का..?" आदित्यराज तिच्या केसातुन हलकेच बोटं फिरवत म्हणाला

"हं..थोडं दुखतंय.." काव्या डोक्याला हात लावून म्हणाली

"मेसीसीन्स घेतल्या की कमी होईल..डिनर येईलच आता..तू फ्रेश होते का..मग तुला बरं वाटेल.." आदित्यराज

"हं..मी आलेच.." काव्या असं म्हणत बाथरूममध्ये गेली

"डोअर लॉक करू नको.." आदित्यराजने जोरात ओरडून सांगितलं..

ती बेशुद्ध पडल्यापासून त्याला तर आता भीतीच बसली होती..फक्त त्यालाच नाही तर सगळ्यांच्याच मनात भीती होती..

काव्या फ्रेश होऊन आली.. मेडने डिनर सर्व्ह केला.. आज काव्याने काहीही नखरे न करता छान हसत गप्पा मारत जेवण केलं..त्या नंतर मेडिसीन्स पण घेतल्या..आदित्यराजला थोडं नवलच वाटलं..डिनर नंतर दोघे बाल्कनीत सोफ्यावर बसले..थंडी होती म्हणून आदित्यराजने ब्लँकेट सोबत घेतलं होतं.. त्याने काव्याला त्यात पूर्ण कव्हर केलं..आणि तिला जवळ घेऊन बसला..

"काऊ..हे घे..आज एकदम गुड गर्ल सारखं डिनर केला..मेडिसीन्स घेतल्या म्हणून.." आदित्यराज तिला चॉकलेट्स देत म्हणाला

"गुड गर्ल तर मी आहेच..लहानपणापासून.." काव्या आपल्या ड्रेसला नसलेली कॉलर ताठ करायची ऍक्शन करत म्हणाली

"हो..फक्त अधेमधे वेड्यासारखी वागते..हट्टीपणा करते..रडू बाई होते..इतकंच..फुग्गा होणं तर नॉर्मलच आहे आपलं..बाकी तर एकदम गुड गर्ल.." आदित्यराज मस्करी करत म्हणाला

"हूं.." काव्या नाक उडवत म्हणाली

"हे सारखं सारखं असं नाक उडवते..एक दिवस खरंच हे नाक उडून जाईल.." आदित्यराज तिच्या नाकावर टिचकी मारत म्हणाला

"व्हेरी फनी.." काव्या फुग्गा होऊन म्हणाली

तो तिच्याजवळ यायला लागला तसं तिने नाकावर हात ठेऊन नाक लपवलं..ते बघून त्याने तिचे गाल ओढले..तिने नाकावरचा हात काढून गालावर ठेवला..त्याने त्याचा फायदा घेत नाकावर किस केलं..आणि खट्याळपणे हसला..काव्या ही त्याला फटके मारत त्याला बिलगली..अर्थात लाजून..

"आज मी खूप खुश आहे..खूप छान वाटतंय मला..फ्रेश वाटतंय.." काव्या

"हं..ते दिसतंय बेबी..नेहमी अशीच राहा.." आदित्यराज तिच्या कपाळावर किस करत म्हणाला

काव्याने त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले..त्याने ही तिची इच्छा ओळखून तिचा चेहरा ओंजळीत पकडला आणि डीप किस केला..

"आदी..तू म्हणाला होतास ना ते खरंच होतं..मी खूप वेड्यासारखं वागत होते..पण आता नाही..तू बघ आता..आय प्रॉमिस तुला तुझी आधीची काव्या परत मिळेल.." काव्या एकदम कॉन्फिडंटली म्हणाली

"नाही गं काऊ..तू जशी आहेस तशी राहा..फक्त समजून घे थोडं..बस माझं इतकंच म्हणणं आहे..तू जशी आहेस तशी मला आवडते..आय लव्ह यू मोअर दॅन एनीथिंग.." आदित्यराज

"आय लव्ह यू टू.." काव्याने परत त्याला किस केलं..

"काऊ..तू ठीक झाली ना मी आपलं लग्न प्रिपोन करण्याबद्दल घरी बोलणार आहे..मला आता तुला अजिबातच दूर करायचं नाहीये माझ्यापासून..आता तर नाहीच नाही..भले ही सध्या पद्धतीने झालं तरी चालेल पण तू जवळ हवी आहेस आता..बाकी काही नको.." आदित्यराज तिला घट्ट मिठी मारत म्हणाला

"हं..तू म्हणशील तसं.." काव्याही त्याच्या मिठीत शिरत म्हणाली

नंतर ते बराच वेळ गप्पा मारत होते..मेडिसीन्समूळे काव्याला आता पेंग येऊ लागली..ती बोलता बोलता त्याच्या कुशीत मस्त झोपली..आदित्यराजने तिला उचलून बेडवर झोपवलं..ब्लँकेट पांघरलं.. आणि लॅपटॉप घेऊन तिच्या बाजूला बसला..तिला अधून मधून थोपटत होता..ती आधी थोडी चुळबुळ करत होती..त्याने आपला हात तिच्या हातात दिला..तशी ती त्याचा हात पकडून शांत झोपली..

तो एका हाताने लॅपटॉपवर काम करत होता..काम करता करता मधेच एक नजर काव्याकडे गेली..ती मधेच गालातल्या गालात गोड हसत होती..झोपेत किती क्युट दिसते ही..तेव्हढ्यात काव्याने कूस बदलली आणि आदित्यराजकडे तोंड केलं..ती वळल्यामुळे त्याच्या खूप जवळ आली होती.. त्याला तिला किस करायचा मोह झाला..मोठया कष्टाने त्याने तो आवरला..तिच्याकडे बघता बघता त्याला कधी झोप लागली ते त्याला ही समजलं नाही..

क्रमशः

- श्रिया❣️
21-07-2020

And yes..adi did it..kavya is happy and things are back to normal now..काव्या आता बरीच नॉर्मल झाली आहे..तिला समजलं आपलं काय चुकत होतं ते..आणि तिने स्वतःला बदलायचं ठरवल..गुड..

पुढचा भाग 24-07-2020

कसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ©®श्रिया देशपांडे.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shriya Deshpande

Writer

I Love to Write..