नात्याचं पावित्र्य की वासना- भाग 2
रूचीने स्वतःला सावरलं,जेवण बनवलं,दोघे जेवले आणि झोपले. रूचीचा डोळा काही लागतं नव्हता, दुपारी जो प्रकार झाला होता,तो काही तिच्या डोक्यातून जात नव्हता, माझा स्वतःचा भाऊ असं वागू शकतो, यावर विश्वास बसत नव्हता.
तिला हे सगळं अनावर झाले आणि तोंडातून हुंदका फुटला,आता मात्र तिच्या नवऱ्याने तिला जवळ घेऊन विचारलं,काय झालं आहे,तू सांग मला. तिला ही आता जास्त लपवणं अवघड वाटत होतं ,नवरा कसा रियाक्ट करेल ,हे समजत नव्हतं, पण ही गोष्ट लपून ठेवण्यासारखीही नव्हती.
शेवटी तिने मन घट्ट केले व दुपारी झालेला सगळा प्रकार सांगितला. तिचा नवरा तिला म्हणाला, मी जर तुझ्या जागी असतो, तर मी त्याच्या पहिली कानाखाली वाजवली असती.रुची म्हणाली ,अहो, माझा पहिल्यांदा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता, मला काही सूचेना म्हणून मी त्याला म्हटलं, तू इथून निघून जा. तिचा नवरा म्हणाला, हे मात्र बरं केलं, आता परत तू माहेरी जाण्याची काही एक गरज नाही.

रुची म्हणाली ,मला स्वतःच आता त्याच थोबाडही बघण्याची इच्छा राहिलेली नाही, मला कर आता माझीच किळस वाटायला लागली आहे.माझं माहेर माझा भाऊच होता, आता तोच असा वागला म्हटल्यावर ,माझे माहेर सुटलं.
तिचा नवरा म्हणाला, तू का स्वतःला दोष देते, तू नाही वाईट विचार केला, त्याच्या मनात पाप आलं, मी त्याच्या बायकोशी बोलू का?
रुची म्हणाली, मला त्याचा संसार उध्वस्त करायचा नाही ,पण याचा अर्थ असाही नाही, की मी त्याला माफ केले, मी त्याला कधीच आयुष्यात माफ करू शकणार नाही.
तिचा नवरा तिला म्हणाला, आता बरं वाटत असेल तर झोप , माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.

दुसऱ्या दिवशी तिच्या भावाने तिला दोन तीन वेळा फोन केला, पण तिने उचलला नाही. त्याने परत फोन केला आणि म्हणाला, माझं चुकलं,मी ते इंटरनेट वर व्हिडिओ पाहिल्यामुळे, माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, प्लीज ही गोष्ट तू कुणाला सांगू नको, नाही तर मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझी बायको,ती काय म्हणेल.
ती म्हणाली,तू सगळ्यांचा विचार करत आहे ,माझं काय , तुझ्या अश्या वागण्याने,परत मी तुझ्याशी परत नॉर्मल वागू शकत नाही.मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाही आणि तुझे भावजी पण मला तिकडे पाठवणार नाही,तू सगळं बिघडवलं आहे. मला तुझा संसार मोडायचा नाही पण मी परत तुझ्या कडे येणार नाही,तुला काय सांगायचं,ते तू सांग,असं बोलून तिने फोन ठेऊन दिला.
नंतर काही दिवसांनी एका नातेवाईकाकडून तिला कळले,की त्याने सगळ्यांना सांगितले आहे ,की ती त्याच्या कडून हिस्सा म्हणून पैसे मागत होती,ते त्याने दिले नाही म्हणून तिने जाणे बंद केले आहे ,म्हणजे परत बदनामी पण तिचीच केली .
तिने ही गोष्ट नवऱ्याला सांगितल्यावर,तो म्हणाला आपल्याला ज्या गावाला जायचे नाही ,त्याचा विचार का करायचा.
पण किती ही झालं तरी तिचं माहेर तुटलं होतं,त्या ही पेक्षा जास्त मन आक्रंदत होत,ते दिसत जरी नसलं,तरी पोखरत मात्र नक्कीच होतं.
मैत्रिणी माहेराबद्दल बोलायला लागल्या की,ही मात्र तिथून निघून जात होती ,अलगद डोळ्यात आलेले अश्रू पुसत होती.
अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून देवाकडे मात्र प्रार्थना करत होती.

समाप्त.