Login

नात्याचं पावित्र्य की Vasana-bhag1

It's About Sibling Relation
नात्याचं पावित्र्य की वासना- भाग 1


रुची खूप लहान असताना ,तिची आई देवा घरी निघून गेली होती. दोन मुलांना कसे सांभाळणार ,म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले.

सावत्र आई वडिलांसमोर त्यांच्याशी चांगली वागायची ,पण वडील एकदा का कामाला गेले, की मात्र त्यांच्यावर खूप अत्याचार करायची .वेळेवर जेवायला द्यायची नाही.वडिल विचारायचे, जेवलात का मुलांनो ? भीती पोटी पोरं म्हणायची, आम्ही जेवलो.

मुलांची ही अवस्था बघून मावश्यांना खूप वाईट वाटायचे ,पण त्या तरी किती दिवस पाहणार, जेव्हा शक्य होईल, तेव्हा त्या घेऊन जायच्या, तेवढाच या मुलांना काय तो आता आधार.

रुची तिच्या सावत्र आईच्या जाचाला कंटाळली होती,आता तिला जगणेही नकोसे झाले होते, वयात येताच तिच्या मावशीने गावाकडचे स्थळ आणले होते. मुलगा जास्त शिकेलेला नव्हता, पण होतकरू होता, रुचीने लगेच होकार दिला ,कारण आता तिला या घरातून कसेही बाहेर पडायचे होते.

लग्न झाल्यावर ती सासरी आली, पण ती मुंबईत वाढलेली तिला काही गावाला जमत नव्हत, म्हणून नवरा बायको दोघे कामाच्या शोधात मुंबईत आले. इथे आल्यावर तिच्या भावाने आणि वडिलांनी त्यांना काम शोधायला आणि नंतर दुसरीकडे भाड्याने घर बघून दिले. लग्नाला तेरा चौदा वर्षे झाली तरी अजून मूलबाळ नव्हते, भावाच्या मुलांना मात्र ती जीवापाड जपायची. सुट्टीत मुले तिच्या जवळच असायची.

नवरा समजूतदार असला तरी , ही मात्र सतत म्हणायची,का देवाने माझ्याबरोबर असं केलं, माझ्याच नशिबात असं का?
नंतर तिने स्वतःला सावरलं,एका मुलीला सांभाळायचं काम करू लागली, थोडीशी आपल्या दुःखातून सावरली.

एक दिवस भावाचा फोन आला , मी दुपारी घरी येतोय. भाऊ येणार म्हणून दुपारी सुट्टी घेऊन घरी गेली , पाहते तर भाऊ दारातच उभा होता. तिने दार उघडले ,दोघे घरात गेले .तिने त्याला पाणी दिले आणि म्हणाली ,तोंड हातपाय धुवून आपल्या दोघांना चहा ठेवते.

ती तोंड हातपाय धुवायला गेली आणि बरोबर गाऊन घेऊन गेली. हातपाय धुवत असताना ती वाकली होती ,तिचे उरोज सगळे दिसत होते,तेव्हा तिथे तिचा भाऊ येऊन उभा राहिला होता ,तिने साबण धुतल्यावर तिचं सहजच दरवाज्याकडे लक्ष गेले, ती म्हणाली,काय झालं? तो एकदम चपापला, कारण त्याचं लक्ष भलती कडेच होते,त्याच्या डोळ्यात तिला वासनेची भावना दिसत होती. पण तिने तो विचार मनातून झटकला आणि त्याला म्हणाली,तू जाऊन बस,मी आलेच गाऊन बदलून.

तो गेल्यावर तिने दार आतून बंद केले आणि गाऊन बदलून बाहेर आली. किचन मध्ये जाऊन चहा ठेवत होती, इतक्यात भाऊ मागून आला,त्याने मागून तिला मिठी मारली आणि म्हणाला ,तुझे ते खूपच मोठे आहे ,मी हातात पकडू का?
क्षणभर तिला काहीच सुचले नाही ,पण लक्षात येताच त्याला बाजूला लोटले.ती म्हणाली, तुला लाज वाटते का? असं बहिणीशी बोलायला. तो म्हणाला, अजून तुला मूल नाही, म्हणजे भाऊजी तुला सुख देत नसतील,तर मी देतो.
ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती. ती म्हणाली, माझा नवरा मला भरपूर सुख देतो , आम्ही खूप आनंदात आहोत, प्रॉब्लेम माझ्यात आहे ,त्यांच्यात नाही . पण तुला हे सांगून काही उपयोग नाही,मला तुला भाऊ म्हणायची ही लाज वाटते रे , आताच्या आता माझ्या घरातून जा ,नाही तर मी माझ्या जिवाचं बरं वाईट करून घेईन.हे ऐकल्यावर मात्र त्याची टरकली आणि तो पटकन निघून गेला.

तो गेला तरी ही मात्र सुन्न बसून होती, हे काय झालं,असा विचार करत होती , इतके दिवस जो माझा आधार होता ,तो असं कसा वागला,हे तिला कळतच नव्हतं. संध्याकाळी नवरा घरी आल्यावर,त्याने विचारलं, काय झालं,आज नेहमी सारखी बडबड चालू नाही. हे ऐकून तिला हुंदका अनावर झाला. त्याला बिचाऱ्याला कळेना, काय झालं. तो म्हणाला , अचानक तुला काय झालं? ती म्हणाली ,काही नाही,पण डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते. तो म्हणाला,तू शांत हो आधी,तुला जेव्हा सांगायचं तेव्हा सांग, पण रडू नको.
सांगू शकेल का ती नवऱ्याला सगळं, काय होईल पुढे, नक्की वाचा.