होळी स्पेशल - काजूची खीर

Cashew Nut Porridge


होळी ला घराघरात तसा बघितला तर पुराणपोळीचाच बेत असतो. पण जर समजा नाहीच झाला तर गोड पदार्थ म्हणून काजूची खीर नक्की करून बघा .
साहित्य - ( 3 ते 4 जणांसाठी )
1- आर्धी वाटी काजू
2- 250 ml दूध
3- साखर पाव वाटी
4- पाव चमचा विलायची पूड
5- दोन चमचे साजूक तूप
6 - केशर
कृती -
1 - काजु मिक्सरमध्ये अर्धी ते एक वाटी पाणी घालून बारीक करून घ्यायचे .
2- पातेल्यात दूध उकळण्यासाठी ठेवायचे . त्यामध्ये साखर, विलायची पूड आणि चिमूटभर केसर घालायचे . ( साखर आपल्या आवडीनुसार जास्त घातली तरी चालेल)
3- दुसऱ्या गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे , तूप वितळले की लगेच तयार केलेली काजूची पेस्ट टाकायची . हे मिश्रण सतत हलवत राहायचे जेणेकरून खाली लागणार नाही. मिश्रण उकळायला लागले की ( साधारण 30/35 सेकंदात ) लगेचच उकळायला ठेवलेले दूध घालायचे.
4- मिश्रण व्यवस्थित हलवायचे , जेणेकरून काजूची पेस्ट दुधात मिक्स होईल . घट्ट होईपर्यंत खीर उकळू द्यायची.
काजू खीर तयार.