छंदातून आनंद...

Hobby Gives Satisfaction


छंद म्हणजे काय? जे केल्याने आपल्याला आनंद होतो,मन प्रसन्न होते ते म्हणजे छंद.

रोजची नियमित कामे पूर्ण केल्यानंतर जो वेळ मिळतो,तो आपण छंदासाठी देतो.रोज तीचं कामे पुन्हा पुन्हा करून कंटाळवाणे वाटते मगं काही तरी थोडेसे वेगळे करावेसे वाटते ते म्हणजे छंद !

प्रत्येकाचा छंद हा वेगळा असतो.आपल्याला काय करायला आवडते ,कशामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्यात काय गुण आहे? यावरून प्रत्येकाचे छंद ठरत असतात. आई वडिलांना जे छंद असतील तेचं छंद मुलांना असतील असे नाही .

अनेक प्रकारचे छंद असू शकतात. जसे वाचन,लेखन,संगीत ऐकणे,वाद्य वाजविणे,नृत्य करणे,बागकाम, खेळ ,वेगवेगळ्या वस्तू बनविणे(art,craft) ,स्वादिष्ट पदार्थ बनविणे,गृहसजावट, पर्यटन करणे,विविध प्रकारच्या वस्तू जमा करणे( पोस्टाची तिकीटे,प्रसिद्ध व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या, पुरातन वस्तू इ.)

वाचनाचा छंद असेल तर वाचनातून विविध विषयांची माहिती ,ज्ञान मिळते,विचार बदलतात ,जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.पुढे वाचनातून मगं लेखनाची आवड निर्माण होते.अनेक विचारवंत,तत्त्वज्ञानी,लेखक, कवी,असे महान लोकांनी आयुष्यात खुप वाचन केले.वाचनातून त्यांना आपल्या ध्येयाची दिशा मिळत गेली.

सध्या T.V., mobile यासारख्या साधनांमुळे वाचन कमी झाले आहे.सर्व माहिती Google वर मिळते म्हणून कोणी पुस्तके वाचत नाही आणि पुस्तकांचा संग्रह ही करीत नाही. अनेकांना वाचन करतांना झोप लागते तर काही वाचक तासनतास वाचत असतात अगदी तहानभूक विसरून! वाचकांचे प्रमाण कमी झाले असे म्हटले जाते तरी अनेक जण आपला वाचनाचा छंद जोपासून आहेत.कधी स्वतः पुस्तक विकत घेवून तर ग्रंथालय सभासद होऊन ,वर्तमानपत्र, मासिके, दिवाळी अंक आणि e - book च्या माध्यमातून, आपली वाचनाची भूक भागवित असतात.

बागकामाची आवड असणाऱ्यांना एखाद्या झाडाला आलेले पहिले फूल म्हणजे एक वेगळाचं आनंद देवून जातो !बागकामामुळे  फुले,फळे,भाजीपाला मिळतो,घर ही छान दिसते आणि हवा शुद्ध राहते आणि मनाला आनंद होतो तो निराळाचं !

संगीताचा छंद पण खुप उल्हासदायी असतो.कितीही tentions असले तरी संगीत ऐकले,गाणी ऐकली तर मन शांत होऊन जाते.

छंदामुळे आपल्याला जगण्याची एक वेगळीचं ऊर्जा मिळत असते.दिवसभराच्या कामकाजातून थकवा दूर करण्यासाठी,रोजचा दिवस नव्याने जगण्यासाठी छंद हे संजीवनीचे काम करतात. छंद नसते तर आयुष्य हे किती रटाळवाणे झाले असते ? सतत तेचं काम करून जीवनाचा उबग आला असता.मन उदास राहिले असते,मानसिक आजार वाढले असते,लोकांना जगण्याची ताकत चं राहिली नसती ,मनुष्य जीवन प्राण्यांप्रमाणे राहिले असते,खाणेपिणे, काम करीत राहणे बस एवढचं !

अनेक जण आपल्याला असलेल्या छंदातून चं पुढे करियर घडवितात .जीवन जगण्याचे साधन बनवितात .जसे लेखन करणारे कवी,लेखक होतात.संगीतात आवड असणारे संगीतकार, गायक,वादक होतात.खेळात आवड असणारे खेळाडु होतात.

काहींना काहीचं छंद नसतात असे म्हणतात पण काही नसले तरी नुसते गप्पा मारणे हा सुद्धा छंद होऊ शकतो .

काहींना अनेक छंद असतात आणि त्यांच्या तील छंदामुळे त्यांची ओळख बनत असते.छंद असल्याने आपल्याला स्वतः ला तर आनंद मिळतोच पण आपण इतरांना ही त्यातून आनंद देवू शकतो.उदा.बागकामातून  इतरांना आपल्या बागेतील छान छान फुले भेट देवू शकतात, चित्रकलेतून कोणाला छान चित्र भेट देवू शकतात, चविष्ट पदार्थ बनवून इतरांना खाण्याचा आनंद देवू शकतात.

छंद हे कोणावर जबरदस्तीने लादू शकत नाही. आई वडिलांना ज्या छंदात आनंद मिळतो ते मुलांना आवडतील चं असे नाही. म्हणून आईवडिलांनी  मुलांवर जबरदस्ती  करू नये.आपल्या मुलांना काय केल्याने आनंद मिळतो ते बघावे आणि त्यांच्या छंदाना प्रोत्साहन द्यावे.पण छंद हे चांगलेचं असावे.म्हणजे जे केल्याने आपल्याला आनंद होईल,इतरांना त्रास होणार नाही असे असावे.

कोणाल T.V.,mobile पाहण्याचा छंद असेल तर 

जास्त T.V., mobile पाहिल्याने आरोग्यास त्रास होऊ शकतो,त्यामुळे या गोष्टी प्रमाणात चं असाव्यात .

खुप वाचन केल्याने ही डोळ्यांना त्रास होतो .कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त करत गेले तर शरीराला ही त्रास होतो आणि मनाला ही कधीतरी नकोसे होते.म्हणून आपल्या छंदात नाविन्य राहण्यासाठी आपण त्यासाठी किती वेळ देत असतो हे ही महत्त्वाचे !


जीवनात असावा

एक तरी छंद

ज्यामुळे आपल्याला

मिळत असतो आनंद !