हो.! मी बदलते नाव
सारंग आणि अनघा चे काल लग्न पार पडले. सगळे अगदी आनंदात होते. सारंग आणि अनघा चे अरेंज मॅरेज, पण म्हणतात ना अरेंज+लव मॅरेज, असच काहीतरी... तसच या दोघांचं... पहिल्याच भेटीत प्रेमात पडले.. आणि लगेच होकार ही सांगितला... भेटीगाठी होत गेल्या आणि दोघं ही एकमेकांच्या सहवासाने अगदी सुखावून गेले... शेवटी लग्नाचा दिवस आला.. आणि लग्न झाले...
सारंग च्या आई मला म्हणजेच सीमा ताईंना पाहिजे तशी सून मिळाली होती. लग्नाचे सगळे साग्रसंगीत सगळ्या विधी प्रमाणे पार पडले. अनघा चा छान गृहप्रवेश झाला.
आज सत्यनारायणाची पूजा. भटजींनी पूजा सुरू केली. आरतीच्या आधी भटजींनी सीमा ताईंना एक ताट मागितले आणि त्यावर तांदूळ ठेवून सारंग ला सांगितले की आता तुला तुझ्या बायको चे नाव या वर लिहायचे आहे.. (सारंग थोडा विचारात पडला.)
आपले आधीच ठरले होते ना की नाव नाही बदलायचे म्हणून हळूच अनघा सारंग च्या कानात पुटपुटली. सारंग वेळ सांभाळून भटजींना म्हणाला की मला नाही बदलायचे नाव अनघा चे, जे आहे तेच राहू देत..
मागून सारंग ची काकू आणि मावशी सारंग ला आवाज देत म्हणाली, "अस कस चालेल सारंग" नाव तर बदलावच लागेल. आपल्याकडे तशी पद्धत आहे. आम्ही नाही का नाव बदलली आमची, आणि काय फरक पडतो त्याने.., आम्हाला तर अजून काहीही फरक पडला नाही.... हो की नाही ग सीमा.... सीमा ताई थोड्या घाबरून सारंग ला म्हणाल्या, " सारंग नाव तर बदलाव लागतच रे" सगळेच बदलतात, तु ही लिही त्यावर नवीन नाव.
सारंग गोंधळलेल्या अवस्थेत आई ची बाजू समजून घेत अनघा कडे बघतो आणि तिला डोळ्यांनीच इशारा देत वेळेचं गांभीर्य ओळखून घे म्हणून सांगतो..
तरी पण एकदा प्रयत्न म्हणून काकूंना सांगतो की मला अनघा च नाव आवडतं, नको दुसरं नाव ठेवायला.. किती छान नाव आहे तीच अनघा.!
मग त्यात काय एवढं सारंग, काकू त्याला मध्येच अडवत बोलल्या.. तु म्हण की अनघा, तुला आवडतं तर... आम्हाला तर नवीन नावच सांग, आम्ही त्याच नावाने हाक मारू तिला.... काकू काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या.., आई वर दडपण आलेलं, बाबा पण म्हणाले काय गोंधळ सुरू आहे एका नावावरून.., करा लवकर, आरती पण करायची आहे .....
मागून सारंग ची काकू म्हणते, काय रे सारंग, मग ठेवतोय ना नवीन नाव, "सारंग ची सावी" कस आहे नाव ?? छान ना... घे मग लिही पटकन, तो अनघा ला बघतो, अनघा म्हणते ठिक आहे "मी बदलते माझं नाव" , आणि सारंग नाव लिहितो..
त्याला अनघाचा स्वभाव माहिती असतो., अनघा आता काही तरी नक्की करणार... सगळे आरती साठी उभे होतात, तेवढ्यात अनघा म्हणते थांबा सगळे, आणखी एक विधी बाकी आहे?,
सगळे स्तब्ध होऊन तिच्या कडे बघतात...
काय ना काकू, तुम्ही माझं नाव तर बदललं मग आता सारंग च नाव पण बदलुया का? काय फरक तर पडत नाहीच ना.. तो तर तुमच्या साठी सारंग च राहणार आहे, काय फरक पडतो एका नावाने.... मग काय म्हणता, ठेवूया ना नाव नवीन "अनघा चा अनय" कस आहे नाव?
मस्तच ना..., सगळे तिच्या कडे आश्चर्य चकित होऊन बघतात, आणि परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन भटजी सगळ्यांना आरती साठी या अस फर्मान सोडतात....सारंग त्यांना डोळ्याने च धन्यवाद म्हणतो.
त्या वेळेस भटजींनी तर सांभाळून घेतलं, समोरून तर कोणी काहीही बोललं नाही पण मागून मात्र अनघा ला सगळे उद्धट म्हणून गेले...
पण त्याने अनघा ला काहीही फरक पडला नाही. कारण ती स्वतः च्या निर्णयावर ठाम होती..
समाप्त
नाव फक्त मुलीनेच का बदलावे, मुलाने का नाही?? सगळ्या रुढी परंपरा स्त्री साठीच का?? आपल्या समाजात पण नको त्या गोष्टींना वाव मिळतो.. नाव तर नावच आहे ना.. तिच्या आई वडीलांनी एवढ्या प्रेमाने ठेवलेलं नाव काही सेकंदात बदलत तर का म्हणे? की सासरी तशी पद्धत असते..! की नवऱ्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून बायको च नाव ठेवतात.??...
असो.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा