त्याचा तो एक निर्णय

His one decision Today Sanjana's mother goes to wake up sajana. She calling sanjana from outside of her room. But no reply is from sanjana so she called sanjana's brother he opened the door everyone inside the room and..... 2years ago Aur

त्याचा तो एक निर्णय ..... 

आजच्या दिवशी--.... 

संजना ची आई  सकाळी संजना ला उठवायला जाते.. आवाज देत असते परंतु काहीच उत्तर येत नाही, आई परत हाक देते, यावेळी ही उत्तर न मिळाल्याने ती घाबरून संजना च्या बाबा व भावाला बोलावते. 
 ते दोघे येतात भाऊ दार तोडून आत जातो आणि........ 


२ वर्षांपूर्वी... 

मराठवाड्यातील मुख्य शहरांमध्ये औरंगाबाद चा नेहमी उल्लेख केला जातो. कधी वेरूळ अजिंठा लेणी साठी तर कधी वैद्यकीयदृष्ट्या असलेल्या सुविधांसाठी तर कधी तिथे असलेल्या विद्यापीठासाठी नेहमी औरंगाबाद चा उल्लेख वर्तमानपत्रात केला जातो. मराठवाड्यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणासाठी दरवर्षी औरंगाबाद येथील विद्यालयात प्रवेश घेत असतात.


त्यातील एक विद्यार्थीनी संजना.  तीने दहावीनंतर चे महाविद्यालयीन शिक्षण तिच्या गावाजवळील एका कॉलेज मधून पूर्ण केले होते. व त्या नंतर ती पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेतील चांगल्या कॉलेजात प्रवेश घेते. 

थोडक्यात  संजना विषयी.. 

संजना  व संदीप हे एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली व खूप लाडात वाढलेली मुले. त्यांचे वडील संपतराव हे शेतकरी, त्यांच्याकडे वडिलोपार्जित ५५ एक्कर शेती असून त्यात काही एक्कर मध्ये फळे, भाज्या तर उर्वरित भागात पिके घेतली जात.. आता संपतरावा नंतर हे सगळे ह्या मुलांचे परंतु तिला  शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने  तिला हयात रस नव्हता तर संदीप ला शिक्षणाची आवड नव्हती म्हणून तो वडिलांना शेतातील कामात मदत करायचा आणि त्याला राजकारणाची आवड असल्याने गतवर्षी निवडून
 येऊन सरपंच झाला होता. 
संजना अभ्यासात हुशार असल्याने संपत रावांना तिचा अभिमान वाटत असे त्यामुळे घरात देखील हिचे खूप लाड व्हायचे. 

आता औरंगाबाद मध्ये..... 

 संजना ला कॉलेजात प्रवेश घेऊन तिथेच हॉस्टेल मध्ये ही तिच्या राहण्याची सोय करून तिच्या घरचे गावाकडे परततात. पहिल्यांदाच घरापासून दूर राहण्याचा विचार संजना ला भावुक करतो. पण तिला तिची रूममेट पूजा आवाज देते .. 

पूजा-- हॅलो, मी पूजा. ह्याच कॉलेजात BSC second year ला आहे. आणि तूझी रूममेट.. 

संजना-- हॅलो, मी संजना! आजच मी BSC ला अॅडमिशन घेतले. 

पूजा-- आरे वा म्हणजे मी तुझी सिनियर????????

संजना-- हो. माझे सामान लावायचे आहे तू करशील का मदत तूम्ही कूठे काय ठेवतात मला माहीत नाही म्हणून विचारले. 

आता संजना च्या डोक्यातून घराची आठवण गेली होती व तिला तिच्या सारखी बोलकी, सर्वसाधारण मुलगी रूममेट म्हणून भेटल्याने थोडे दडपण कमी झाले होते.. 

पूजा-- अग करेल ना मी मदत. असही आपण दोघीच ह्या रूममध्ये असणार त्यामुळे भरपूर प्रमाणात जागा मोकळी असते. 

पूजा च्या मदतीने संजना सगळे सामन लावते. आणि फ्रेश होते. 

संजना-- जेवणासाठी कीतीला खाली जायचे??? 

पूजा-- अग रोज रात्री ७ नंतर जेवण तयार असते मुली त्यांच्या वेळेनुसार जेवायला जातात. चल मी तूला काही मुलींची ओळख करून देते. तत्पूर्वी ही चावी तुझ्याकडे तूझ्या कपाटाची , बाहेर जातांना लावत जा, रूम साफ करण्यासाठी मावशी येतात. आणि किमती सामान कपाटात ठेवत जा. 

संजना साठी सगळे नवीन असल्याने ती ऐकून घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते. 

संजना-- चालेल. 

नंतर पूजा संजना ला संपूर्ण हॉस्टेल फिरून दाखवते व इतर मुलींची ओळख करून देते. त्यानंतर त्या दोघी जेवण करून रूममध्ये परत येतात. 

पूजा झोपते. संजना घरी फोन करून त्यांना पूजा बदल व इतर सगळे काही सांगते तिच्या घरच्यांची थोडी काळजी कमी होते. नंतर संजना झोपी जाते. 


आज संजना चा कॉलेज चा पहिला दिवस..  संजना सकाळी लवकर उठून तयार होते, पूजा ही तयार झालेली होती. 

संजना नवीन असल्याने पूजा तिला तिचा क्लास दाखवणार होती. दोघी नाष्टा करतात पूजा ची मैत्रीण कविता पण येते. 

त्या तिघी कॉलेज मध्ये येतात. पूजा संजना क्लास दाखवून पुढे तिच्या क्लास मध्ये जाते.. 

आता पहिला तास सुरू होणार होता, सर्व वर्ग मुलामुलींनी गच्च भरतो. संजना चा स्वभाव बोलका असल्याने पहिलेच दिवशी तीला मित्रमैत्रिणी ही होतात. 


कॉलेज नंतर

संजना तिच्या घरी फोन करून तर पूजा जेवताना तिचा पहिला दिवस कसा गेला त्या बद्दल सांगते. 

असेच दिवस जात होते संजना आता कॉलेज मध्ये रमली होती. 


२ वर्षानंतर..... 

 संजनाचे BSC चे दूसरे वर्ष संपून तिचे तिसरे वर्ष सुरू होणार होते. ह्या २ वर्षांत संजना कॉलेज ची टॉपर होती त्यामुळे सर्व प्राध्यापक तिला नावाने ओळखत. 

संजना चे मित्रमैत्रिणी ही हुशार तसेच नेहमी नवनवीन कार्यक्रमात सहभाग घेणारे होते. हे वर्ष शेवटचे वर्ष असल्याने सगळ्यांनी यंदाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होण्याचे ठरवले. 

प्रत्येक जण आपल्या आपल्या तयारी मध्ये मग्न होता. शेवटी स्नेहसंमेलनाचा तो दिवस आला आणि त्या रात्री संजना च्या ग्रुपमधील सुजयने तिला प्रपोज केले. चक्क स्टेजवरून प्रेमाची कबुली देत लग्नाची मागणी घातल्याने ती खालून पहातच होती????????. परंतु ती त्याला २ वर्षांपासून ओळखत होती आणि तिला तो आवडला असत त्यामुळे तिने प्रपोजल स्विकारले. सगळे जण आनंदी असतात. 


परंतू दूसरे दिवशी काय होणार होईल याची कल्पना देखील कोणीही केली नव्हती. 


स्नेहसंमेलनानंतरच्या दिवशी

संजना रात्री उशिरा झोपल्याने अजून उठली नव्हती. तिची रूममेट पूजा संजनाला  तिचा फोन येत असल्याने
उठवते. तिच्या भावाचा फोन होता. 

 संजना --हो मी येणार आहे आज दादा निघेल थोड्यावेळाने. 

भाऊ--- खाली ये. ( फोन कट होतो.... ) 

संजना थोड आवरून खाली जाते. भाऊ हॉस्टेल च्या मालकाशी बोलत असतो. 

भाऊ-- संजना तूझे सामन बांधून घे आपल्याला गावी जायचे आहे. 

संजना-- जाऊया पण सामान कशाला परत येणार आहे मी आणि दादा तु कशाला आलास न्यायला मी आले असते. 

भाऊ-- सामान घे माझ्या बोलणे झाले आहे ह्यांच्याशी.. बाकी घरी जाऊन बोलूया. 

संजनाला काही कळत नसते पण भावासोबत सर्वांसमोर बोलण्यापेक्षा घरी बाबांसमोर बोलूया म्हणते व वर येते. 

संजना सगळ्या सामानाची पॅकिंग करते, पूजा विचारत असते पण संजना काही न बोलताच निघून जाते.


घरी आल्यावर संजना ला दादा च्या अश्या  वागण्याचे कारण समजते. घरी पण संजना ला नीट कोणीही बोलत नव्हते.  

तिच्या घरी कालच्या स्नेहसंमेलनात घडलेल्या प्रकाराबदल कळलेले असते. तो मुलगा गरीब घरचा व ह्यांच्या जातीचा नसल्याने समाज नाव ठेवेल. समाजात आपली अब्रू जाईल या भीतीने त्यांनी तीला घरी बोलावून तिचे लग्न उच्चशिक्षित देखणा अश्या विवेक सोबत ठरवलेले संजना ला सांगण्यात येते. 

संजना ला धक्का बसतो... परंतु तिला काही च मार्ग नसतो ह्यातून बाहेर पडण्याचा, तिचा फोन देखील भावाने घेऊन ठेवला होता. 

घरी लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली होती, पुढल्या आठवड्यात लग्न असल्याने संजना ही तयारी पाहून वैतागली होती. 


आजचा दिवस--

भाऊ दार उघडतो आणि सगळे आत येऊन पहातात तर संजना तिच्या बेडवर पडलेली दिसते, तिने नस  कापून ह्या सगळ्या ला कंटाळून  स्वतः ची जीवनयात्रा संपवले ली असते. 
आई वडील तरूण मुलगी गेल्याने जीवाचा आकांत करून हुंदके देत रडत होते परंतु भाऊ मात्र बाजूला उभा राहून पहात होता. त्याच्या डोळ्यात अश्रू चा थेंब देखील नव्हता. 

खरं चा प्रतिष्ठा एवढी महत्वाची असते का ❓❓विचार करावा....... 

आज एकदा परत प्रेमात पडलेल्या संजना चा नाहक बळी गेला तो त्याच्या एका निर्णयामुळे..... 

आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद????????

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
©®Tanuja Ghodekar