हिरव्या मिरचीचे प्रकार

हिरव्या मिरचीचे प्रकार

                 पंचामृत

साहित्य - 

१ वाटी वाळवलेली आम कैरी/आंब्याच्या खुला किंवा दुकानात मिळणारी आमचूर, एक वाटी गुळ, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक लहान वाटी शेंगदाण्याचा किंवा तिळाचा कुट, थोडी लसूण जिरे पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद.

कृती -

वाळवलेली आम कैरी किंवा आंब्याच्या खुला रात्री पाण्यात भिजत घाला. सकाळी मिक्सरमधून काढून घ्या. दुकानात मिळणारे आमचूर घेतल्यास त्यात एक वाटी पाणी घालून भिजवून घ्या. हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन पुसून त्याची देठे काढून घ्या व बारीक गोल तुकडे करा. गॅसवर कढई किंवा जाड बुडाचे पातेले ठेवून त्यात तेल व मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडल्यावर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून परतून घ्या. नंतर लसूण पेस्ट , थोडी हळद टाकून आम कैरीची पेस्ट किंवा भिजवलेले आमचूर टाका. थोडे पाणी टाकून गुळ घाला. दोन-तीन उकळ्या आल्यावर शेंगदाणा किंवा तिळाचा कूट घाला.  चवीनुसार मीठ घाला.झाले पंचामृत खाण्यास तयार.

चटणी म्हणून तर याचा उपयोग आहेच पण पोळी किंवा ब्रेड बरोबर ही आपण खाऊ शकतो.

              हिरव्या मिरचीचे लोणचे

साहित्य -

100 ग्रॅम हिरवी मिरची, दोन मोठ्या आकाराची लिंबे, गुळ मीठ व हळद.

कृती -

प्रथम हिरवी मिरची स्वच्छ धुऊन, पुसून देठे काढून घ्या. मिरचीचे दोन तुकडे करून त्या तुकड्यांना मध्ये काट द्या. लिंबाचा रस काढून त्यात गुळ, थोडी हळद व प्रमाणानुसार मीठ घाला. हे सर्व साहित्य एकत्र करून काचेच्या बरणीत भरून ठेवा. दोन-तीन दिवसाने चांगले मुरल्यावर खायला घ्या.

यात आवडीनुसार तुम्ही लोणच्याचा मसाला सुद्धा घालू शकता. आंबट गोड तिखट मिरचीचे लोणचे तयार.

चला तर मग करा रेसिपीला सुरुवात.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद.