हिरव्या मिरच्यांचे प्रकार

हिरव्या मिरच्यांचे प्रकार

हिरव्या मिरचीचा खर्डा........ साहित्य -

एक पाव हिरवी मिरची, एक वाटी तीळ , एक मोठ्या कांद्याचा कीस,

सात आठ लसून पाकळ्या, एक टीस्पून जिरे, चवीप्रमाणे मीठ 

व फोडणीसाठी थोडे तेल


कृती -

प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुऊन  कोरड्या कापडाने पुसून घ्या.

त्यांची देठं काढून घ्या. पातेल्यात किंवा कढईत तेलाची फोडणी 

करून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे, कांद्याचा कीस

घालून मंद आचेवर परतवून घ्यावे.  मिरच्यांचा रंग बदलल्यावर गॅस 

बंद करावा. तीळ भाजून घ्यावे. आता कढईतील सर्व वस्तू

व तीळ यात चवीपुरते मीठ घालून कुटून घ्या. किंवा मिक्सरमधून

जाडसर फिरवून घ्या.


 २)वाळलेली भरली मिरची 

साहित्य -

एक पाव हिरवी मिरची, एक पाव दही, थोडी हळद, 

 एक टीस्पून मेथी पूड, एक टीस्पून जिरेपूड, थोडे तीळ

व चवीपुरते मीठ.

कृती -

प्रथम हिरवी मिरची स्वच्छ धुऊन, पुसून देठे काढून घ्यावी.

त्या मिरच्यांना उभे काट द्यावे. घट्ट दही घेऊन त्यात हळद, मेथी पूड,

जिरेपूड, तीळ व चवीपुरते मीठ घालून हे सर्व मिश्रण उभे काट

दिलेल्या मिरचीत भरावे व कडक उन्हात मिरच्या वाळवाव्या. खिचडी सोबत तळून खाल्ल्यास छान लागतात.

                                किंवा

हीच हिरवी मिरची तव्यावर तेल टाकून किंचित परतवून घ्या.

 घट्ट दही घेऊन त्या दह्याला मोहरीचा तडका द्या.त्यात थोडी

हळद, जिरेपूड, चवीनुसार मीठ व थोडी साखर घालून त्यात

परतवलेल्या मिरच्या घाला. थोडे दह्यात मुरल्यावर खायला घ्या.

चला तर मग आजच ही रेसिपी करून पहा.

मस्त खा.

स्वस्थ रहा.

धन्यवाद.

सौ.रेखा देशमुख