Jan 28, 2021
सामाजिक

मंतरलेली दुनिया

Read Later
मंतरलेली दुनिया

मंतरलेली दुनिया

माझ्या एका मैत्रिणीचा माझे फेसबुक वरील फोटो बघून फोन आला आणि ती म्हणाली, फोटोत कोण कोण आहे,तुझा भावाबरोबर फोटो आहे ,तुझ्या भावाला काही झालंय का? असा कसा फोटो काढून फेसबुक वर टाकला चांगलं नाही वाटत ते .

मी- चांगलं न वाटण्यासारखं त्याच्यात काय आहे?

ती- सगळे किती छान छान फोटो टाकतात आणि तू काय असा टाकते .

मी- मला नाही समजलं, तू काय बोलते ते

ती- इतक काही न समजण्यासारखा मी बोलली नाही आहे, कशाला तू तुमचं दुःख जगासमोर उघड करत आहे. मी- अग त्यात काय एवढं , फॅमिली फोटो टाकले ,तोही माझ्या फॅमिलीचा भाग आहे आणि मला त्याची लाज नाही वाटत.

ती- मला तसं म्हणायचं नव्हतं, प्रत्येक जण फेसबुक वर चांगल्या गोष्टी टाकतो, म्हणून मी म्हटलं.

मी- तू जे बोलते ते मला पटतय ,फेसबुक, इंस्टाग्राम ,ट्विटर, या सगळ्यात सगळेजण फक्त स्वतःबद्दल चांगल्या गोष्टीच लिहितात किंवा दाखवतात, प्रत्येक जण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, कि मी किती आनंदाने जीवन जगतो आणि किती सुखी आहे. ही जी दुनिया आहे ,ती मंतरलेली दुनिया आहे, काहीजण तर इतके स्वतःला यात अडकवून घेतात ,की लाईक आणि कमेंट किती मिळतात, यावरून आपण किती लोकप्रिय आहे ,हे समजतात.

ती- तू ही फोटो शेअर करतेस ना फेसबुक वर, मग तू असं कसं बोलू शकतेस?

मी- हो ,मी करते शेअर , पण त्यात कोणत्याही प्रकारचा दिखावा नसतो, जे आहे तेच शेअर करते ,मला सत्यात जगायला जास्त आवडते. प्रत्येकाचा एका गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो ,जसं मी फोटो टाकते ,त्यातून प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवावा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाअसेल, तर कुणाला वाटेल, किती प्रदर्शन करते ,कुणाला वाटेल, किती छान आयुष्य आहे , कुणाला द्वेषापोटी असं वाटेल ,ही आनंदात कशी राहू शकते ,  कुणाला असं वाटेल, कि मी आनंदात का राहू शकत नाही माझं कुठं चुकतंय ,निदान स्वतःला जाणून घेण्याचा तरी प्रयत्न करतील, असे एकाने जरी केलं, तरी माझा प्रयत्न सफल झाला असे मी समजते. आता हेच बघ ना, मी भावाबरोबर  शेअर केलेल्या फोटोवरून, तू मला फोन केला, पण मी काय विचार केला, की त्या फोटोच्या निमित्ताने तरी तू मला फोन केलास आणि आपल्या दोघींचे एकमेकांबरोबर बोलणं झालं. जर मी फोटो शेअर केला नसता तर कदाचित तू मला फोन केला नसता आणि आपल्या दोघींचं बोलणं झालं नसतं. माणूस स्वतःला या मंतरलेल्या जगात हरवत चालला आहे प्रत्येक जण फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम ,ट्विटर यावर कमेंट करून मोकळा होतो ,ते करायला वेळ असतो, पण एकमेकांशी फोनवर बोलायला सुद्धा वेळ नसतो. एकाच घरात माणसं बसून, एकमेकांशी बोलणे ऐवजी आपल्या फोनवर बिझी असतात. मला तर जेव्हा कुणाची आठवण येते, तेव्हा मी क्षणाचा विलंब न करता त्याला फोन लावते आणि बोलून घेते.

ती- तू जे म्हणते ,ते मला सगळं पटतय, मला असं वाटलं तुझ्याशी बोलून बघावं म्हणून मी फोन केलेला, काय झालय  भाऊला?

मी- अगं काही नाही त्याचा खुबा मोडला आहे, त्यामुळे तो जाग्यावरच वरच असतो , पण मला माझ्या आई-वडिलांचा खरंच खूप अभिमान वाटतो ,त्यांनी हे सत्य स्वीकारला आहे आणि प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची मदत करत असतो. या वयात त्याने आई-वडिलांचे करायचं, तर आई वडिलांना त्याचं कराव लागतं, यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असेल, पण आम्ही आता या गोष्टीचा स्वीकार करून आनंदाने एकत्र जगतो, प्रत्येक क्षण आनंदात घालवतो. तसं पाहायला गेलं तर ,प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही प्रॉब्लेम असतो, पण प्रत्येक जण आपली चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी किती काही म्हटलं ना, फेसबुक, ट्विटर , व्हाट्सअप ही सगळी मायावी दुनिया आहे ,मंतरलेली दुनिया ही म्हणू शकतो ,कारण यातल्या कमेंट आणि लाईक बघून लोक खुश होतात आणि प्रत्यक्षात जगणं विसरून जातात .त्यातून घेण्यासारखं ही बरच आहे , फक्त आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे .आपण प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहीजे,यावर खूप चांगल्या कथा पण असतात, त्यातून आपण बोध घेतला पाहिजे .खूप चांगल्या आयडिया पण मिळतात, की जे आपण जगताना आनंद मिळवण्यासाठी वापरल्या पाहिजेत , जसं की, लॉक डाऊन मध्ये घरात राहून राहून सगळे बोर झाले होते ,त्यात काही स्पर्धा ठेवल्यामुळे , लोकांना उत्साह मिळाला, निदान त्या स्पर्धांसाठी का होईना, लोक तयार झाली आणि जीवनाचा आनंद लुटला .आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सुद्धा, हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे . त्यामुळे आपण आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ,की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये . कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणे की, न जाणे, हे सर्वस्वी आपल्या हातात असते, त्यामुळे या मंतरलेल्या दुनियेत सुद्धा ,आता आपण किती वाहवत जायचे, ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे .धन्यवाद, तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर ,नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या 

रूपाली थोरात

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat