Oct 18, 2021
कथामालिका

हिजडा... पण एक आई...

Read Later
हिजडा... पण एक आई...
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
आई' म्हणजे आपल्या आयुष्यातील , जीवनातील एक खुप महत्वाचा भाग , हिस्सा . आपल्या आयुष्याला परिपुर्ण करणारी अशी एक व्यक्ती . ति म्हणजे आई , आपल्याला ह्या जगात आणणारी हे जग दाखवणारी आपली जन्मदात्री आपली आई .

स्वतःच दुख , त्रास बाजूला ठेऊन आपल्या पाठी कायम उभी राहणारी .अशीच एक आई जी रस्त्यावर पडलेल्या नुकतच जन्माला आलेल्या बाळाला स्वतःच्या छायेत सामावून , पालन पोषण करणारी .एक स्त्री नसून , ति म्हणजे तृतिय पंथी विद्या आहे .

विद्या एक माणुसकिला जपणारी , लोकांच्या नजरेत टाळ्या पिटून स्वतःच पोट भरणारी. विद्या दिसायला सावळी , अंग काठी भरलेली , बांधा हा असा सरळ , जाड उंची , तिची उंची कमीत कमी साह फुट असेल . कपाळावर लाल रंगाच मोठ गोल सिंधुर लावलेले , केसात चापुन तेल घातलेले तेही अस्सल खोबरेल तेल , केस जर विद्या ने सोडले तर कोणत्याही स्त्री ला लाजवेल इतके मोठे कंबरेच्या खाली , हे जाड केस तिचे , म्हणुन ति कायम आंबाडा घालायची आणि त्यात एक चमेलीची वेणी माळयची .गोल साडी तेही साधी अशी कॉटन ची .

विद्या च्या हाथा मध्ये नेहमी एक परडी असते जशी जोगतीण कडे असते तशी .दिवसरात्र दारोदारी जाऊन ति जोगवा मागण्याचे काम करायची , आणि त्या जोगव्या मध्ये जे अन्न धान्य मिळेल ते ति दिवस भरात बनवुन खायची .घर तस तिचे लहानच, घर नाही म्हणता येणार पण एक लहान अशी झोपडी होती . झोपडीत जास्त काही नाही एक चूल आणि लहान सहान सामान बस ssss इतकच काय तोह तिचा संसार . विद्या एकटीच त्या झोपडीत रहायची , वय तिच साधरण पणे 40 एक असेल .

विद्या चा दिवस जोगवा मागण्या वर उजाडायचा आणि जोगवा मागण्या वर मावळायचा .अशाच एका दिवशी विद्या तिच्या काही ठरलेल्या लोकांन कडे जोगवा मागायला गेली .तिला तांदुळ , डाळ आणि काही पैसे तिला जोगवा मध्ये भेटतात . ति तिच काम आवरून येतच असते तर तिला एका ठिकाणी रस्त्यावर च्या कडेला एक गाठोडे भेटते , तस ते गाठोडे काही लहान ही नव्हते फार . विद्या ने थोडे आजूबाजूला पाहिले आणि त्या गाठोडे जवळ गेली . गाठोडे जरा मोठे च होते , तिने त्यात नक्की काय आहे हे पाहायला जाणार . तर त्या गाठोडं मधून विद्याला जरा हालचाल जाणवली , तिने परत नीट एकदा ते गाठोडं पाहिले आणि खात्री केली तिला जरा ते विचित्रच वाटले . तिने ते गाठोडे उघडले तर त्यातुन एक नुकतच जन्माला आलेले बाळ सापडले , दिसायला पांढरी , रडून रडून लाल लाल झालेली आणि चेहरा पूर्ण बावला होता त्या मुलीचा , हो त्या गाठोडं मध्ये मुलगी होती , बळाचा श्वास चालु होता पण ते काही हालचाल करत नव्हत . विद्या ने खुप आवाज दिला ' कोणी आहे का इथेsssss कोणी आहे ssssss का sssss ' पण कोणी कुत्र ही तिथे आजूबाजूला फिरकले नाही . फिरकणार तरी कस , ति वाट तोह रस्ता पूर्ण साम सुम होता . विद्या ने परडी बाजूला ठेवली आणि आधि त्या मुलीला जवळ घेतले . आणि स्वतःच्या छाति जवळ लावले ...छाति जवळ लावताच विद्या च्या डोळ्यांतून न कळत पाणी टपकले . तिने एकच उंच श्वास घेतला आणि बाळाला घेउन रस्त्यावर चालु लागली . संध्याकाळचे जेमतेम 8 वाजले होते . विद्या तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती , भडव्यांना जरा ही अक्कल नाही . नाही जमत तर पोर काढतात कशाला भाड खाऊ साले, आणि पोर काढतात. त्यात hi.मुलगी झाली की हे अस रस्त्याच्या कडेला टाकून द्यायच . फुण्क्णीचे साले . रस्त्यावरची कुत्री मांजरी तरी बरी स्वतःच्या मुलांना नीट संभाळतात . आणि हे रानटी साले .विद्या बडबड करत रस्त्याने चालत असते . ति आधि तिला एका दवाखान्यात घेउन जाते . डॉक्टर आधि विद्या कड़े बघतात खालून वर तर वरून खाल पर्यंत बघतात . काय झाले डॉक्टर? मला बघण्या पेक्षा तिला बघा जी बेशुद्ध आहे ति .. (विद्या डॉक्टर वर खेकसून बोलते )

कारण विद्या कडे आता पर्यंत प्रत्येक पुर्शाने असच पाहिलेलं असत .हो मी पाहतो , काय झालय हिला आणि कधि पासुन बेशुद्ध आहे ?(डॉक्टर विद्याला विचारतात )डॉक्टरांना थोड़ी शंका आलेली असते की काही तरी वेगळ आहे करून .

होय रस्त्याच्या कडेला सापडली एका गाठोडं मध्ये बांधलेली होती . आणि आजूबाजूला कोणी नव्हत रस्त्यात म्हणुन मग तिला घेउन निघाले, आणि आधि तुमच्या जवळ घेउन आले ..

बरं पोलीसात कळवल आहे की नाही ? की मी कळवू ... बरं झाले घेउन आलात तिला .( डॉक्टर विद्याला बोलतात )

नाही नको ! मी कळवेन पोलीस मध्ये (विद्या डॉक्टरांना बोलते ) तिची औषधे घेउन बरं मी निघते अस बोलुन विद्या दवाखान्यातून चालु लगते . तिने पोलीस स्टेशन मध्ये न जाण्याचा निर्णय घेते , कारण जर ति पोलीस स्टेशन मध्ये गेली तर तिथे जाऊन तक्रार करून काही फायदा नव्हता , कारण काहीच मदत होणार नाही याची खात्री विद्या ला होती , आणि उलट तिच्यावर च बाळ चोरीचा दावा टाकला असता . ति सरळ तिला घेउन स्वतःच्या घरी गेली . .पुढे काय नि कस ? हा विचार तिच्या डोक्यात घुमत होता . त्या तान्ह्या मुलीला माहीत ही नाही की तिचे आई वडील कोणा होते? , मोठ होऊन विचारल की माझे आई वडील नक्की कोण ? तर मी काय सांगणार आहे .आणि तु कोण ? मी कशी आली तुझ्या कडे ? असे खुप सारे प्रश्न विद्या च्या डोक्याच भुगा करत होते . भोंगा जस कानाजवळ भोंगवतो ना तसे प्रश्न भोंगावत होते तिच्या डोक्यात .विद्या ने छोटे से जमिनीवर अंथर अंथरूण त्यावर त्या चीमुकलीला ठेवले . तिच्या वर थोड़ी चादर घातली , आणि तिच्या गोड अशा चेहऱ्यावरून मायेने एक हाथ फिरवला. तिने उठून गटागट पाणी पियाली . घसा भीतीने आणि काळजीने सुखा झाला होता तोह तिने ओला केला . डॉक्टर ने दिलेली औषध हळू हळू करून त्या चीमुकलीला भरवत होती . चिमुकली थोड़ी शुध्दीवर म्हणजे तिची हालचाल थोड़ी थोड़ी सुरू झाली होती . तिने एका वाटीत कोमट दूध करून हळू हळू तिला पाजत होती . रात्री चे 12 वाजले होते . विद्या च्या पोठात एक ही अन्नाचा कण गेला नव्हता .जाणार तरी कसा विद्या तिची काळजी सख्या आई प्रमाणे करत होती . विद्या कधि तिला मांडीवर घेत तर कधि हाथांवर झोपवत होती . सकाळ उजाडली रात्री कधि झोप लागली हे , तिला समजलेच नाही .विद्या गडबडीत जागी झाली , झोपडीची खुंटी रात्रभर तशीच होती .सकाळचे 9 वाजले होते . पिल्लु ही उठले होते , विद्या तिच्या अंगाला हाथ लावुन बघते तर अंग थंड होत . ताप बऱ्यापैकी उतरला होता . अंथरुणात च पिल्लु जरा खेळायला लागल होत. ते पाहुन विद्याला बरं वाटल होत . तिने पिल्लु ला उचलून घेतल , तर काय पाठून पिल्लु चे कपडे भिजले होते , उग्र वास ही येत होता . पिल्लु ने रात्री कपड्यात सु केलेली दिसत होती . आणि ताप आल्यामुळे रात्री , तिला सकाळी भूक ही लागली होती . विद्या ने तिचे कपडे नि ओले झालेले अंथरूण बदलुन , दुसर सुख घालून तिला दूध भरवत होती . विद्या साठी सार काही नवीन होते , कारण तिने हे कधि अनुभवले नव्हते आणि तिला स्वतःलाच कुटुंब मधून दूर केले होते .आणि सगळ्यात मोठ म्हणजे , बाई च्या त्या लुगडं पोलकं च्या आड लपलेला एक पुरुष होता . पण त्या बळाच्या स्पर्शाने तिच्या काळजाला मातृत्वच पाझर फुटला होता . खऱ्या अर्थाने एक आई जन्माला आली होती .विद्या ने पिल्लूच नाव ही ठेवले होते , आशा .. कारण आशा हिच विद्या चा शेवट पर्यंत चा श्वास होती , आणि तिच्या जगण्याचे कारण ही आशा राहणार होती .विद्या त्या दिवशी पूर्ण दिवस जोगवा मागायला गेली नव्हती , तिने आशा साठी लहान सहान कपडे लंगोट , टोपी , अंगातली घेतली होती , तिला झोपण्यासाठी मखमली अशे लहान अंथरूण घेतले होते , तिच्या साठी दूध पावडर , दुधाची बाटली असे सर्व स्वतःच्या परीने करत होती . ति मोठी होई पर्यंत विद्या ने स्वतःचे जोगवा मागायचे काम थोडे कमी केले होते . जे काही पैसे भेटत होते त्यातुन ति आशा साठी लागणाऱ्या गरजा पुरवत होती . विद्या ने जोगवा व्यक्तरीक्त जे भेटेल लहान सहान काम ति करायला लागली होती . आशा मुळे विद्या च्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली होती .

आशा आता हळू हळू मोठी होऊ लागली होती , तस तस विद्या चे tension वाढत होते .

आशा विद्याला आई बोलायची , जस जस आशाला कळू लागले होते तस तस तिचे प्रश्न ही वाढत होते . आशा मध्येच शांत बसली की विद्याला ला tension यायच मग ति विचारायची , काय झाले बाळ ? ? ? काही होतय का ? की कसला विचार करतेयस ? कारण सत्य आज ना उद्या बाहेर येणार हे विद्या ला माहीत होते , आणि जग अस आहे की ते आशा च्या समोर हे प्रश्न नक्की मांडणार . की मी आशा ची नक्की कोण आहे ? तिचे आई वडील कोण होते ? 

आशा आता शाळेत जाऊ लागली होती , आणि जास्त करून आशा आता वयात येऊ लागली होती . आणि ति माझ्या सोबत असते म्हटल्यावर लोकांच्या नजरा तिच्या वर , नको नको तशा असणार ? विद्या दिवसेंदिवस tension मध्ये येत होती . आणि त्या मुळे ति अशक्त ही बनत जात होती . आशा कुठे खेळायला जरी गेली आणि तिला यायला जराही उशीर झाला तरी , विद्या चा जिव खुप कासावीस होत असे . मग नको नको ते प्रश्न तिला पडायचे .

एकदा आशा ने न राहून विद्याला विचारले. आई मी नक्की कोण आहे ? मग माझे पप्पा कुठे गेलेत ? बोल ना आई काही तरी ? ? 

हो बाळा मीच तुझी आई आहे . आणि थोड़ी मोठी झाली की मी तुला सगळ सांगेन ..आणि पप्पा कोण होते हे ही मी तुला तु मोठी झाली की सांगेन .( विद्या ने कस बस तिच्या प्रश्नांना उत्तर दिली ) आणि एक मोठा श्वास घेतला .

आई ssss आशा धावत नुकतीच शाळेतुन आली होती , आणि तिने विद्याला घट्ट मिठी मारली आणि तिच्या पायावर डोक ठेऊन नमस्कार केला ..अगं हे काय करतेस बाळ ? पाया का पड्तेस अशी ..काय झाल? ? 

विद्या च्या आता पर्यंत कोणी अस पाया पडल नव्हते , तिला खुप भरून आले होते. आणि तिच्या डोळ्यांत चटकन पाणी आले 

काय झाले आई ? तु रड्तेस का अशी ? (आशा विद्याला बोलते )

काही नाही ग बाळ , , , , 

आई अगं मी बोर्डात पहिली आली म्हणुन तुला हा नमस्कार , बाबा नसताना पण तु मला इतक संभाळले , इतकी लहानाची मोठी केली , बाबांची उणीव कधि भासू दिली नाहीस ..

अगं पण माझ्या पडण्याचा पेक्षा देवाच्या पड पाया , मी देवा पेक्षा मोठी नाही बाळ आशा ...(विद्या आशा ला बोलते )

पण माझ्या साठी तूच देव आहेस आई , देव आमच्या पर्यंत येऊ शकत नाही ना म्हणुन त्याने तुला पाठवलय . ( आशा विद्या ला बोलते ) तेव्हा विड्याच्या डोळ्यातून चटकन पाणी येत , विद्या शिकली नव्हती पण आशा शिकली म्हणुन तिला खुप भरून आले आणि अभिमान वाटला . जस एका आईला आपल्या पोटच्या मुला बद्दल वाटतो तसा . आशा ने तिचे कॉलेज पूर्ण करून एका चांगल्या ठिकाणी कामाला लागली होती , तिने विद्याला जोगवा मागू नकोस ह्या पुढे असे ही सांगीतले . आशा तिच्या आलेल्या पगारावर आई ला नि घर संभाळून होती .

एक दिवस विद्या ने आशाला खरे काय हे सांगायचे ठरवले , कारण तिला सांगणे विद्याला गरजेचे वाटले . आशा स्वतःच्या पायावर उभी राहिली होती , आणि तिच आता लग्नाचे वय झाले होते . बाळ आशा , , तु मला तुझ्या नि माझ्या नात्या बद्दल विचारलेले . की तुझे बाबा कुठे असतात ..( विद्या आशा ला बोलते )

हो अगं आई sssss पण तोह विषय मी परत तुझ्या पुढ्यात नाही काढला ? (आशा विद्या ला बोलते )

अगं बाळ मि तुझी आई नाहिये , , मि मि ...एक ... ( आशा ला विद्या बोलते )

हो अगं आई ssss मला माहीत आहे सगळं , तु कोण आहेस नि मि तुझी कोण आहे ! ( आशाला आता पर्यंत सगळं कळलं होत , कारण ते समजण्या पर्यंत ति मोठी झाली होती , त्या मुळे विद्याला काही आशा ला समजुन सांगण्याची वेळच आली नाही . 

विद्या ला आशा च बोलण ऐकुन खुप बरं वाटल , तिची काळजी मिठलि होती . आपण आशा मोठी झाल्यावर तिला काय सांगायचे हा असा विचार करून विद्या च्या डोक्यात भुंगा घोंघावत असायचा . खरच किती मोठी आणि समजदार झाली आहे आपली लेक . 

आशा च्या बालपणात विद्या ची खुप मेहनत होती , आशा शाळेत किंव्वा कोणत्या ही स्पर्धेत , परीक्षेत बसली की विद्या तिच्या वर्गाच्या बाहेर उभी रहायची . कारण तिला कोणी चिडवु नये , बोलू नये म्हणुन आणि तेच आशा पाहत आली आणि म्हणुन चा आज कदाचित विद्या ला काही समजावण्या ची वेळ आली नाही . आशाला विद्या बद्दल कोणी काही बोलले की , विद्या त्याला तिथेच उत्तर देउन निघुन यायची , पण तिने कधि हे येऊन विद्याला सांगितले नाही .

आशाला कित्येक मुलांचे स्थळ सांगुन यायचे लग्ना साठी , तस तर आशा दिसायला खुप सुंदर होती , गोरी , नाकी डोळी नीटस , अशी , अंग काठी बारीक , बोलायला गोड अशी . पण विद्या ची दत्तक घेतलेली मुलगी म्हणुन तिला नकार द्यायचे , पण आशा ने ते कधि मनावर नाही घेतले . पण बोलतात ना लग्नाच्या गाठी देव बांधुन पाठवतो , आशा साठी खुप चांगला स्थळ आल होत . मुलगा दिसायला जणु राजपिंड , गुणी , चांगला शिकलेला आणि आई बाबांचा एकुलता एक . आशाला त्याने मागणी घातली आणि आशा लग्नं करून आज खुप सुखी आहे , लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आशाला एक गोंडस बाळ आहे पण ! विद्या ह्या जगात नाही . जस आशाच लग्नं झाले , विद्या हे जग सोडून गेली . 
समाप्त 

काही चुकले असेल तर माफी असावी ....ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.