कलेमुळे ओळख मिळाली....२

छोट्या मुलाची प्रेरणादायी कथा

https://www.facebook.com/581606972323826/posts/976322512852268/

मागच्या भागात काय झाले तें वाचण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा...

बघूया कशी अनघा दिनूला भेटून त्याची बाजू ऐकते...
दिनू तिची मदत घेईल का??आणि तो कश्या प्रकारे या परिस्थितीवर मात करेल....

इथे येऊन आपण थांबलो होतो...आता बघूया पुढे...

मंदा आणि दिनू निघून गेल्यावर अनघा पण बाहेर जायला निघते,दिवाळी जवळ आलेली असते बरीच कामे असतात... सगळी कामे आवरून होईपर्यंत संध्याकाळ होते.. रिक्षा मिळत नसते,चालत चालत ती जवळच असलेल्या चौकात येते,बघते तर काय दिनू पणत्या,कंदील,स्वतः बनवलेले ग्रीटींगकार्ड,पाॅटपैंटिंग विकत होता.. तिने दिनूला हाक मारली.. तसा तो घाबरला.. रडू लागला..

अनघाने त्याला तिच्यासोबतच घरी आणले ... अन त्याला धीर दिला, हे बघ दिनू,घाबरू नकोस.. मला सांग बरं काय मनात आहे तुझ्या??...तिने त्याला पाणी दिले, थोडा खाऊ दिला... तो शांत झाला.. आणि बोलू लागला..ताई," तुमी मायला नका सांगू,घरी समजल तर,बापू मला शाळा सोडायला सांगल,आनं हेच काम करायला लावंल,मला शिकायचं हाय.."

हे ऐकल्यावर अनघा म्हणाली ठीक आहे,पण एकाअटीवर...तसा दिनू परत घाबरून गेला... ती म्हणाली अरे घाबरू नको...अट ही आहे की ह्यापुढे रस्त्यावर ह्या गोष्टी न विकता,तू माझ्याकडे आणून द्यायच्या,मी तूला त्याचे पैसे मिळवून देईन... तुझ्या आईला मी समजावून सांगेन.

हे ऐकून दिनूला आनंद झाला, तो म्हणाला चालेल, येतो मी आता... अनघाने त्याला पुस्तके देऊ केली अन म्हणाली तूला आवडत ना वाचायला मग् आता घे..सकाळी मंदा ओरडेल म्हणून घेतली नाहीस माहिती आहे मला... तो फक्त हसला... ताई मी नेईन नंतर...

चार दिवसांनी दिनू परत आला, तेव्हा खूप साऱ्या पणती,कंदील,स्वतः बनवलेले ग्रीटींगकार्ड,पाॅटपैंटिंग बरेच काही घेऊन आला होता... त्याची ती कला बघून अनघाला त्याचे कौतुक वाटले...

तिने तें सर्व सोसायटीमध्ये दाखवले, तीच्या ओळखीच्या समाज कार्य करणार्या एका संस्थेला ह्या सर्व वस्तू दाखवल्या... त्यांना ते खूपच आवडले..त्यांनी अजून ऑर्डर दिली.. दिनू मेहनती होता..त्याने ती पूर्ण केली.. अन मंदाला अनघाने आधीच सांगितलं मी दिनूला एका कामासाठी चार दिवस इथे ठेवून घेणार आहे.. त्यामुळे सणावाराला चार पैसे अजून मिळतील म्हणून ती खुश झाली आणि तयार झाली...

भरपूर पैसे मिळाले, दिनू खुश होता.. अनघाने मंदाला सर्व समजावून सांगितल आणि दिनूची बाजू पटवून दिली...एवढे दिवस तो हे काम करून शिकत होता....कारण त्याला तुमच्या परिस्थितीची जाणीव होती... मग् मंदाने त्याला जवळ घेतले अन म्हणाली भरपूर शिक, मोठा हो...अनघाचे आभार मानले... तुझे पैसे तू ताईंजवळ ठेव..

अनघाच्या सर्व प्रश्नांची उत्तर तिला मिळाली होती..आणि समाजकार्याला सुरवात झाल्याचे समाधान देखील...


दिनूला आता बऱ्याच ऑर्डर येऊ लागल्या, वॉल पैंटिंग, पिक्चर पैंटिंग असे करत त्याने पैसे साठवत शिक्षण पूर्ण केले.आज तो यशस्वी चित्रकार झाला होता..

तेवढ्यात बेल वाजली तशी अनघा भानावर आली, दिनू आला होता... दिनेश तू.. त्याला बघून अनघा म्हणाली..

ताई तुम्ही दिनूच म्हणा... तुमच्या मुळे ह्या दिनूला दिनेश म्हणून ओळखू लागले सर्व.... तुमच्यासाठी हि छोटी भेट.. याचा स्वीकार करा...

दिनू गेल्यावर तिने बघितल तर काय तिचे सुंदर पैंटिंग त्याने काढले होते... 

कशी वाटली कथा नक्की सांगा... तुमच्या कंमेंट ची वाट बघते...अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all