कलेमुळे मिळाली ओळख....१

कलेमुळे मिळाली ओळख......

सकाळी सकाळी अनघा मस्त चहा घेत पेपर वाचत होती...तिला खूप आधीपासून ही सवय होतीच.... आज अगदी पुढच्या पानावर मोठी बातमी छापून आली होती, सुप्रसिद्ध चित्रकार दिनेश कांबळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि विक्री... सोबतच त्यांचा मोठा फोटो... ते बघून अनघा मात्र भूतकाळात हरवली... एवढासा दिनू केवढा मोठा झाला...

हा दिनू म्हणजे तिच्याकडे घरकाम करायला येणार्या मंदाचा मुलगा.... घरची गरीबी असल्यामुळे मुलाने पण शिक्षण सोडून द्यावं असं तिला वाटायचं... त्यात खाणारी तोंड जास्त... मी आणि माझा धनी आम्ही दोघंच कामावर जातो बाकी सगळे बसून असतात ताई.. कस काय भागवणार? सांगा तुम्हीच...

अगं पण त्याला शिकायचे आहे तर शिकु दे की, अनघा म्हणायची... पण मंदा ऐकेल तर कसली...

ती आपली रोज येऊन तेच बोलायची अन अनघा शांतपणे ऐकायची....बोलुन काहीच उपयोग नव्हता हे तिला माहीती होते..
एकदा कामावर येताना त्याला घेऊन आली होती सोबत.. बिचारा तिने ओरडून,दटावुन ठेवले होते आधीच.. आल्यापासून एका जागी बसून होता...

अनघाने खाऊ दिला तो पण घेतला नाही... खूपच शांत आणि समंजस वाटला तिला तो... त्याचे डोळे खूप काही बोलत होते जणू..पण परिस्तिथीने हात बांधून ठेवले होते त्याचे...

हळूच तिने मंदाला विचारले, हा एवढा गप्प का आहे?

मंदा वाटच बघत होती, अनघा तिला कधी विचारते काय तें.. तिने लगेच अनघासमोर दिनूला चार बोल सुनावले...

आव ताई, ह्याला मी सातवी पतुर शिकवला.. त्या नगरपालिकच्या शालत होत मनुन जमलं आता पुढ मी कोठून आणू पैका..?? याच्या पाठीवर तिन पोरी हायत, सासू-सासरा.. ह्याला म्हनल आता काहीतरी काम कर अन हातभार लाव पर हा ऐकतच न्हाय..दिवसभर कुठंतरी फिरतो अन रातच्याला भी...

काय करतो? कुठं जातो? काय ती सांगत नाय बघा... तुम्ही जरा सांगा त्याले.. उगा आमच्या जीवाला घोर लागून राहतो...याला जरा बी जाणीव नाही बघा घरच्या परिस्थितीची...

अनघाने एक हळूच नजर टाकली... दिनूचे डोळे बरेच काही बोलत होते... त्याने चेहरा टाकला असला तरी मनात प्रचंड विचारांचे काहुर माजले होते,असे त्याच्याकडे बघून अनघाला जाणवले...पण मंदा समोर तो काही बोलणार नाही हे तिने ओळखले... तिने त्याला काही पुस्तक दिली,खूप आनंद झाला त्याला..पण मंदाला घाबरून तो घेत नव्हता ती पुस्तके... त्याचा चेहरा अनघाला बरेच काही सांगत होता... तीने ठरवलं शोध घ्यायचा....

मंदाची बाजू तिने ऐकून घेतली होती...दुसरी बाजू म्हणजेच दिनूची बाजू ऐकल्याशिवाय तिला चैन पडत नव्हते... अन आई समोर असली की तो बोलणार नाही हे सुद्धा तिला माहिती होते...

मुळात बघताक्षणीच तिला दिनू आवडला होता..काहीतरी वेगळेपणा होता त्या मुलाच्यात... अनघाने ठरवलं दिनूला मदत करायची... तशी अनघाला आधीपासून समाजसेवेची आवड होतीच... लग्न झाल्यावर संसार,मुले यात ती मागे पडली होती... त्याचा श्री गणेशा दिनूपासुन करायचा तिने ठरवले...

मंदाची बाजू तिला पटत होती, घरची गरीबी म्हणून दिनूने मदत करावी, पण त्याने शिक्षण सोडाव हे तिला काही पटत नव्हते... अन त्यासाठी महत्वाची होती ती दिनूची बाजू....

बघूया कशी अनघा दिनूला भेटून त्याची बाजू ऐकते...
दिनू तिची मदत घेईल का??आणि तो कश्या प्रकारे या परिस्थितीवर मात करेल....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all