Login

हिच गाडी घेणार अंतिम भाग

गाडीतल्या एसीची गोष्ट.
मागील भागात आपण पाहीले की स्वरांशचा गाडीवरचा खर्च तर आवडला नव्हता. पण गाडीतले म्युझिक प्लेअर बरोबर वापरला होता. त्यात त्यांचा पून्हा गाडीतून बाहार जायचा योग आला.

आता पूढे.

“ते आवाज वाढवा ना,” बायको तोऱ्यात बोलली. “गाण्याचा आवाज ऐकू येत नाहीये.”

“काचा उघड्या असल्या की इतकाच आवाज येतो.” स्वरांश चिडूनच बोलला.

तर त्याच हे लॉजिक एकून बाकी तिघी त्याला विचित्र नजरेने बघायला लागल्या.

थोडा वेळ चालवून झाला तोच स्वरांशने गाडी पेट्रोल पंपावर घेतली. ते बघून त्याच्या आईने त्याला विचारलं.

“कालच तर टाकल होत ना पेट्रोल.” आई प्रश्नार्थक बोलू लागली.

“हो, पण काचा उघड्या राहिल्या की गाडीला जोर लावायला जास्त पेट्रोल लागत.” स्वरांश आठ्या पाडून बोलला.

“अरे दादा, आपण आपल्या शहरापासून फक्त पाच किलोमीटर लांब आलोय रे.” त्याची बहिण विचार करत बोलली.

“असुदेत.” स्वरांश

“हा का नुसता फुगलेला आहे?” त्याची आई बाहेर उभ्या राहिलेल्या त्याच्याकडे बघून बोलू लागली.

“त्यांना एसी लावून दिला नाही ना म्हणून.” त्याची बायको दीर्घ श्वास घेत बोलली.

“म्हणून आता असे लॉजिक ऐकायला लागतील?” त्याची बहिण आठ्या पडून विचारू लागली. तसे त्याच्या बायकोने तिचे खांदे उडविले.

तोपर्यंत तो पेट्रोल टाकून गाडीत येऊन बसला. गाडी चालवून थोडा वेळ झाला नाही तोच सुटलेल्या वाऱ्याचा जोर वाढल्याने त्यांची गाडी रस्त्यावरून जरा हलली.

“अरे हळू चालव ना.” त्याची आई चिडून बोलली.

“काचा उघड्या राहिल्या की अशीच हवा येते आणि गाडी हलवते.” त्याने फुगलेल्या गालानेच उत्तर दिले.

“अरे पण काचा लावून एसी लावला की आम्हाला जीव गुदामरल्यासारख होत.” त्याची बहिण जरा वैतागून बोलली.

“जेवणासाठी हॉटेल बर एसी लागतो,” तो चिडून बोलला. “त्या लग्नाच्या हॉलमध्ये ते एसीच्या खाली उभी राहून सूप गरम नाही म्हणून बोंबलत फिरत होती.”

“ते मोठ असत रे,” आई त्याला समजावत बोलली. “इथे जागा लहान नाही का?”

“मग पुढच्या वेळेस आपण बसच घेऊ ना.” तो चिडून हसत बोलाला.

“हा.” त्याची आई पण चिडूनच बोलली.

पाठीमागे बसलेल्या त्याच्या बायकोला आणि बहिणीला आता त्याची फिरकी घेण्याची लहर आली.

“आई समोर ठेवलेली तुझी पर्स उचलून घे.” बहिण

“नाहीतर काचा उघड्या आहेत तर ती उडून बाहेर निघून जाईल.” बायको

तश्या बाकी तिघी हसायला लागल्या. तर त्याचे गाल अजूनच फुगले गेले.

“आता गाडीतून एसीच काढून टाकतो.” तो चिडून बोलायला लागला. “नाहीतर बिनाएसीची गाडी घेईल.”

“हा, घ्या बरं का.” त्याची बायको त्याला चिडवत बोलली.

“तुझ्यापुरती एसी असलेली गाडी घे.” त्याची बहिण ही त्याची मस्करी करत बोलली.

आता स्वरांश चांगलाच चिडीला आला होता. पुढच्याच महिन्यात त्याच प्रमोशन होणार होत. मग त्याचा पगार ही वाढणार होता. तो वाढल्यावर त्याने एक नवीन गाडी घायचे ठरवले होते. ह्या वेळेस त्याच्या डोक्यात वेगळेच प्लान शिजू लागले.

त्याने हे एक ते दोन महीने जाऊ दिले. त्याचा जसा पगार वाढला तस त्याने नवीन गाडी शोधायला सुरवात केली. जुनी गाडी विकून त्याने डाऊन पेयमेंट करणार होता. तर बाकी रकमेचे तो कर्ज घेणार होता.

पुढच्या काही दिवसातच त्याचा शोध संपला आणि घरात नवीन गाडी घेणार असल्याचे जाहीर केले. तस घरात परत आनंदाच उधाण आलं. पुढच्या रविवारी ते नवीन गाडी बघायला शोरूमला जात असल्याच त्याने घरात सांगितलं. तशी त्याची बायको आणि बहिण कोणती गाडी घेत असल्याचे त्याला सारखे विचारू लागले. पण त्याने ते सांगायचं टाळल होत. मग पुढच्या रविवारची ते उत्सुकतेने वाट बघू लागले.

बघता बघता रविवार उजाडला. त्याने जुनी गाडी आधीच त्या शोरूमला देऊन टाकली असल्याने आज ते टॅक्सी करून शोरूमला पोहोचले.

“आपण ही गाडी बघायला आलोय?” आई त्याच्याकडे आठ्या पाडून बघू लागली.

“दादा, सिरीयसली?” त्याची बहिण देखील त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत विचारू लागली.

“तुम्हीच बसायच त्या गाडीत.” त्याची बायको रागात त्याला धमकी देत बोलली.

“आता तुम्हालाच गाडीत एसी लागत नाही.” स्वरांश त्याचे खांदे उडवत बोलला. “मला लागतो. मग म्हटलं तूम्ही मागच्या डालेत बसायच आणि मलाही पूढे एसी मिळेल.”

तश्या त्या तिघी त्याच्याकडे रोखून बघायला लागल्या.

“तूम्हीच तर बोलले ना की तुझ्यापर्यंत एसी बघ.” तोही चिडून बोलला.

“म्हणून हा पिक अप?” त्याची बायको कपाळावर भल्या मोठ्या आठ्या पाडून विचारू लागली.

शोरूमला पोहोचल्यावर त्याने त्या तिघींना त्या कंपनीने नवीनच लाँच केलेला एसी पिकअप दाखवला होता, जो डिलीव्हरीसाठी तयार होता. स्वरांशने त्या तिघींना त्या समोरच नेऊन तिचं गाडी घेत असल्याच त्यांना सांगितलं होत.

“हा,” स्वरांश आज हसत बोलत होता. “म्हणजे तुम्हाला सीटची सफाई करावी लागणार नाही. पाहिजे तेवढी हवा. पाय आखडून येणार नाही. हव तेव्हा बसा, हव तेव्हा झोपा. जागाच जागा. वरून तुम्हाला हव तेवढं सामान पण आणता येईल.”

आता मात्र त्या तिघी त्याच्याकडे रागात बघायला लागल्या.

तसा स्वरांशचा तो मित्र ह्या तिघींजवळ आला. “अहो मावशी गम्मत करत आहेत ते, तुमची गाडी तर आतमध्ये आहे.”

तश्या त्या तिघी अजून गोंधळून बघू लागल्या. मग स्वरांश त्यांच्याजवळ गेला. “तुम्हाला खरचं वाटल की तुम्हाला मी ह्या पिकअपच्या मागच्या डाल्यात बसवेल?”

मग तो त्यांना त्यांच्या खऱ्या गाडीकडे घेऊन गेला. ती गाडी अजूनही लाल कपड्यात झाकलेली होती. आईच्या हाताने ते लाल कापड काढल गेल. तर तिथे सेवेन सीटर लक्झरी गाडी उभी असलेली दिसली.

‘एक दिवस आपल्याकडे पण एकदम महागडी गाडी असेल.’ ती गाडी बघून आपल्या नवऱ्याच वाक्य त्याच्या आईला आठवलं आणि तिचे डोळे लागलीच भरून आले.

गाडीची डिलीव्हरी घेतली आणि गाडी शोरूमच्या बाहेर आणली.

“ज्यांना एसी आवडत नाही त्यांनी गाडीच्या टपावर बसायचं.” स्वरांश तोऱ्यात बोलला. तश्या त्या तिघी बारीक डोळे करून त्याला बघायला लागल्या.

मग तिथल्या मॅनेजरने एसी वापरण्याचे फायदे आणि तोटे त्यांना समजावून सांगितले. “अश्या गाड्यामधले इलेक्ट्रोनिक्स धूळ गेल्याने खराब होतात. त्यामुळे जास्तीचा खर्च वाढला जाईल. म्हणून शक्यतो गाडीच्या काचा उघडून गाडी चालवू नका.”

स्वरांशने सांगायला लावलेली फिलोसोफी त्या मॅनेजरने त्यांना सांगितली. ते सोनारानेच कान टोचावे. ह्या म्हणीचा त्याने वापर केला. आता त्याचा किती उपयोग होणार होता? हे त्या देवालाच माहित होत.

मग त्याने ती गाडी घराकडे नेण्यासाठी काढली. ज्याच्या खिडक्यांच्या काचा थोड्याचवेळात त्याला शपथा घालून उघडायला लावल्या गेल्या होत्या. तसा त्याने आणि त्याच्या त्या मित्राने कपाळावर हात मारून घेतला. त्याचा नवीन गाडीचा उत्साह तिथेच जुना झाला होता.

समाप्त.

कशी वाटली ही कथा? कमेंट करून नक्की सांगा.