हे स्त्री,कधी ओळखणार स्त्रित्वाला.?

Hey Women,Be a Real Women .
हे स्त्री ,कधी ओळखणार स्त्रीत्वाला.?

रोज सकाळ पासून दुपार पर्यंत भाजीवाले येत जात असतातच.एखादा भाजी विक्रेता येतो तेव्हा त्याचा आवाज लांबूनच येत असतो.आता तर सगळे भाजीवाले स्पीकर ठेवत आहेत.तो घराजवळ येईपर्यंत माहित झालेले असते की भाजीवाला येत आहे.नंतर तो अगदी घराजवळ येऊन थांबतो.ब्रेक घेऊन घेऊन त्याचा स्पीकर चालूच असतो.अधून मधून बिल्डिंगच्या वर खिडक्यांमध्ये , गॅलरी मधे,आजूबाजूलाही बघत असतो.थोडा वेळ तसाच जातो.नंतर परत थोडा वेळ वाट बघतो.आणि जनु काही त्याला अंदाज असतोच ,त्याप्रमाणे कोणतरी एखादी स्त्री खाली येताना दिसते.ती त्या भाजी वाल्या जवळ येऊन थांबते.इतका वेळ घसा फोडून ऐकू आलेली माहिती परत प्रत्यक्ष समोर येऊन विचारली जाते.भाव -ताव, शिळी - ताजी, चांगली - वाईट ,कमी - जास्त. ई.बरेच काही.


त्या स्त्रीला कोणीतरी खिडकीतून ,गॅलरीतून बघत असते.मग तिची ही इच्छा जागृत होते.मग ती हातातले काहीसे काम बाजूला करून खाली उतरते.आणि मग पुढच्या अर्ध्या तासा मध्ये त्या भाजीच्या गाडीजवळ पूर्ण वेढले जाईल इतक्या स्त्रिया जमलेल्या असतात.काही जणी दोन चार भाज्या घेतात तर काही फक्त कोथांबिर कडीपत्ता घेऊन जातात.हा असा सीन सगळ्यांनीच बघितलं असेलच.


असाच सीन एखाद्या सणासुदीच्या दिवसात बघायला मिळतो.लागणारी काही स्टेशनरी,किंवा व्हरायटी च्या वस्तू किंवा रेडिमेड ड्रेसेस किंवा पडद्या पासून बेडशिटा पर्यंतची खरेदी अशाच प्रकारे झालेली बघायला मिळते.


म्हणजे बराच वेळ गेल्यानंतर जर एखादी स्त्री पुढे आलीच तर मग थोड्या वेळात तिकडे चांगलाच घोळका जमल्याचे दिसून येते.


हे तर काहीच नाही,आजकाल अनाथ आश्रमाच्या गाड्याही फिरताना दिसत आहेत.मला तर ह्या वेळी इतके आश्चर्य वाटले की यावर लेख लिहावासा वाटला.

एक अनाथ आश्रमची गाडी बराच वेळ चौकात येऊन थांबली होती.गाडीमध्ये त्याचा स्पीकर काही कागद पत्रे आणि ड्राइव्हर होते.त्याचा लंच टाईम झाला असेल म्हणून त्याने त्याचा डबाही खाऊन घेतला.नंतर थोड्या वेळाने परत स्पीकर चालू केला.तेवढ्यात एका स्त्रीने त्याला सर्व माहिती विचारली.आणि त्याला थांबायला सांगून ती घरी जाऊन कपड्यांच्या मोठ मोठ्या बॅगा घेऊन आली.सगळे जुने कपडे,नको असलेले ,लहान झालेले कपडे त्याला देऊन टाकले.

मग काय,नेहमीप्रमाणे त्या स्त्रीला बघून अजूनही इतरजनी खूपच एनकरेज झाल्या.काहींनी पटापट घरातील जुने कपडे वेगळे करून त्याला आणून दिले .मग ज्यांची काहीच तयारी नव्हती त्यांनी धान्य किंवा पैसे देऊ का विचारले.आणि असे करता करता अक्षरशः ती गाडी त्याच चौकात पूर्ण भरली गेली.

ही अशाच प्रकारची कितीतरी उदाहरणे देत स्त्रियांची मनोवृत्ती दाखवून देतात.

म्हणजे ,जर तिला एखादी गोष्ट घ्यायची किंवा द्यायची आहे तर ती स्त्री दुसऱ्या स्त्रीची का बरे वाट बघत असावी.पाहिल्याने सुरवात कोणीतरी करावी मग आपण तिच्या सारखेच करायचे मग ती खरेदी असो देणे घेणे असो किंवा बोलणे चालणे ,काहीही.


ह्या नंतरून येणाऱ्या स्त्रिया किवा जमा झालेला घोळका ,हा त्या पहिल्या स्त्री सोबत स्पर्धा करत असतात की,त्या स्त्रीच्या प्रतिस्पर्धी असतात की,तिचे आदराने अनुकरण करत असतात की,तिला पाहिले आल्याचे क्रेडिट घालवत असतात की, नुसता टाईम पास असतो की, कशाला काही अर्थच नसतो.ती अमुक एक गोष्ट करतेय ना मग आपण पण करायचीच.एवढंच.


घरा घरामधे एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीची प्रतिस्पर्धी असते.उदा. सासू - सून. नणंद - भावजय. तोंड बोल्या मैत्रिणी.कामातील सहकारी .या सगळ्याच.


जर स्त्रिया एकमेकींच्या प्रतिस्पर्धी असतात हेच जर सिद्ध झाले आहे तर मग एकमेकींचे अनुकरण तरी कसे काय करू शकतात.
हा प्रतिस्पर्धी शब्द संभ्रमात पाडणारा नाहीये का ?
तिने अमुक एक केले ना मग मी पण तेच करणार.?
ह्यात स्पर्धा कशी काय होते.?
आणि जर स्पर्धेतही अणुकरणच करायचे आहे तर एकमेकींच्या विरुद्ध स्पर्धक कशा काय होऊ शकतात.?


तिने अमुक एका कलरची साडी किंवा ड्रेस घेतला मग मलाही तसाच तोच पाहिजे .ही मनोवृत्ती स्पर्धकांची का मानावी.?

अग ,तू तिचे अनुकरण करत आहेस.म्हणजे खरतर तू तिची आदरणीय,जिवलग, आयडीयल ,प्रोत्साहित व्यक्ती म्हणून सिद्ध करत नाहीस का ?

उदाहरणच द्यायचे झाले तर ,सिनेमा मधील एखादी हिरोईन कीव ॲक्टरेस आपली अगदीच आवडती असते.मग आपण तिला फॉलोच करणार ना .तिच्या सारखी स्टाईल ,फॅशन ,तिचा आवडता रंग, सगळचं.मग तेव्हा ती आपली प्रतिस्पर्धी कधी कधीच नसतेच.उलट तिचे विरुद्ध बोललेला एखादा शब्दही आपल्याला मान्य होत नाही .


अगदी दोन सख्या मैत्रिणी तर सर्व काही एकमेकींना फॉलो करतात.म्हणजे काय त्या एकमेकीना प्रतिस्पर्धी असतात काय.?
माझ्या एका मैत्रिणीने मला आयुष्यभर कॉपी केले.मलाच फॉलो केले.सगळे काही माझ्या सारखेच पाहिजे असायचे तिला.म्हणजे मग ती माझी खरी मैत्रीण होती की प्रतिस्पर्धी.?
म्हणजे मैत्रीण आहे म्हणून प्रतिस्पर्धी नाही .पण तेच जर दुसऱ्या कोणी स्त्रीने केले तर तिचा मात्र द्वेष करायचा.

पण मुळातच स्त्री फक्त एकमेकींशी तुलना करणे या साठीच जन्मली आहे का .?

एकमेकींशी प्रतिस्पर्धी म्हणून आचरण करत असताना , कधी कधी स्त्रिया स्वतःचे अस्तित्व ही पूर्ण पने विसरून गेलेल्या असतात.

याचाच दुसरा अर्थ त्या प्रतिस्पर्ध्यांच्या अस्तित्वातच स्वतःचे अस्तित्व शोधत असतात....!!

खरचं मनापासून वाईट वाटते या स्त्रियांच्या अशा मानसिकते बद्दल...!!

आणि सर्व दोष मात्र दिला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीला...??

हे सगळचं बदलायला हवं नाही का.

Hey Women..Be a real Women. please...!!

गरज काळाची आहे.
गरज स्त्रीच्या अस्तित्वाची आहे.
गरज स्त्री स्वाभिमानाची आहे.
हे स्त्री ,'ओळख ना खऱ्या स्त्रीत्वाला.'
©® Sush.