देवा ,पुढच्या जन्मी मला पुरुष बनव रे बाबा
जेव्हापासून लॉक डाऊन सुरू झाले ,तेव्हापासून सायली वर खूपच कामाचा लोड पडला होता .वर्क फ्रॉम होम जरी असले ,तरी ऑफिस पेक्षा घरून काम जास्त करावे लागत होते, त्याच बरोबर लोक डाऊन मुळे, घरातल्या कामाला असणाऱ्या बायका येत नव्हत्या, त्यामुळे तर अजून जीव मेटाकुटीला आला होता. त्याउलट रोहितच होतं ,लॉक डाऊन सुरू झाल्यापासून ,त्याचेही काम घरातूनच होतं, कंटाळा आला की, तो सायलीला फर्मान सोडायचा, चहा ठेव .परत मुलांची आणि त्याची अपेक्षा असायची , की तिने वेगवेगळे पदार्थही करावे, तीही करायचा प्रयत्न करायची. घरात मुलांसोबत राहायला मिळत आहे ,यात तिलाही आनंद होता, पण घरातली काम आणि ऑफिसची कामं ,या दोन्हीमुळे तिचा वेळ कसा जाई, हेही तिला कळत नव्हते. तिला कधी कधी वाटे, की मुलांबरोबर गप्पा माराव्या, पण सगळी कामे करून, ती इतकी दमून जायची, इच्छा असुनही, तिला मुलांना वेळ देता येत नव्हता .रोहित तिला कोणत्या कामात मदत करत नव्हता, आधीपासून तो मदत करत नव्हता , त्यामुळे तिला त्याच्याकडून अपेक्षाही नव्हती. पण जेव्हा ऑफिस असायचे ,त्यावेळी कामवाल्या बायका पण यायच्या, त्यामुळे तिच्यावर इतका लोड येत नव्हता. तिला सगळी कामे उरकता उरकता ,रात्रीचे बारा वाजून जायचे , सकाळीही लवकर सहालाच उठावे लागायचे, या सगळ्या कामांमुळे ,ती स्वतःकडेही लक्ष देऊ शकत नव्हती. जेव्हापासून लॉक डाऊन सुरू झालं, तेव्हापासून तिचा वॉकही बंद झाला होता. पहिले दोन-तीन महिने तिला काही वाटले नाही ,पण नंतर नंतर या सगळ्या गोष्टींचा तिला त्रास व्हायला लागला, तिने रोहितला बोलून दाखवले, तर तो म्हणाला ,तू काही बाकीच्या बायकांपेक्षा, वेगळं काही करत नाही, सगळ्याच बायका घरातली कामे करतात, मग तुला का एवढा त्रास होत आहे .त्यावेळी तिच्या मनात विचार आला, मी बाई आहे, म्हणून ही कामे मलाच का करायची, मदत केली तर नाही चालणार का, संसार काय एकटीचा असतो का, किती छान आयुष्य असते ना पुरुषांचे, जेवण काय बनवायचं ,त्याचे टेन्शन नाही ,भाजी आणायचे टेन्शन नाही ,काही खावेसे वाटले , तर बायकोला ऑर्डर सोडायची , बायकोने ते करून दिलं पाहिजे, कारण ती तिचं कर्तव्य करत असते ,यात वेगळं काही करत नाही. तिच्या मनात विचार चमकून गेला ,देवाला प्रार्थना केली, हे देवा ,पुढच्या जन्मी तरी मला पुरुष बनव रे बाबा, म्हणजे मला सगळं जाग्यावर मिळेल, जास्त कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसेल, पुरुष असल्यामुळे कसंही वागता येईल, बाहेर जाण्यासाठी बंधने नसतील ,पण त्यावेळी मी मात्र ,माझ्या बायकोला थोडं तरी समजून घेईल, कारण आता या जन्मात मी त्यातून गेलेली आहे. मला तरी असे वाटते, प्रत्येक स्त्रीला असंच वाटत असेल, त्याला कारणेही तशीच आहेत, प्रत्येक स्त्रीला आपले चारित्र्य जपावं लागतं, पुरुषांनी कितीही काही केलं, तरी आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ,त्यांना सगळं माफ असतं ,पण ते जर बाईच वाकडे पाऊल पडलं, की ती लगेच चारित्र्यहीन होऊन जाते , तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला समाज पुढाकार घेतो ,कधी थांबणार हे सगळं, पुरुषांना असं कधी वाटणार, की देवा, पुढच्या जन्मी आम्हाला स्त्रीचा जन्म दे. प्रत्येक पुरुष म्हणत असतो, स्त्री एक माता-भगिनी, वेगवेगळी रूपे असलेली सहनशील व्यक्ती आहे, पण ती पण माणूस आहे ,तिचीही काही स्वप्ने असतात, त्या स्वप्नांचा आदर करता का, ती सहनशील आहे ,म्हणून तिच्यावर अत्याचार का करता,नवरा तर बायकोला ,आपली प्रॉपर्टी असल्यासारखे वागवतो ,ती जर त्याच्या मनाप्रमाणे नाही वागली ,तर याचा अर्थ ती प्रतिव्रता नाही, म्हणजे याचं मूल्यमापन करणारे कोण ,तर तोही पुरुष वर्ग आणि यात काही स्त्रियाही त्यांना साथ देतात, त्यांना असं करताना, आपणही एक स्त्रीच आहोत, या गोष्टीचाही विसर पडतो. या सगळ्यामुळे ,सायली सारख्या बायकांना, देवाला प्रार्थना करावीशी वाटते ,देवा, पुढच्या जन्मी मला पुरुष बनव रे बाबा, ही परिस्थिती आता ही आहे . जर या चांगले बदल घडवून आणायचे असतील , तर प्रत्येक स्त्रीने, आपल्या मुलाला बायकोशी कसे वागायचे, हे शिकवले पाहिजे ,तेव्हाच पुढच्या पिढीमध्ये, हा बदल घडून येईल. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल आणि तुम्हाला जर हा लेख आवडला असेल नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.
रूपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा