भारती

Story About Herself..

0८ /0७/१९६२ पावसाळ्याच्या सरी रिमझिम बरसत होत्या. सकाळचे पाच वाजले होते, आणि बायोला पोटात दुखायला सुरवात झाली. ९महिने पुरे व्हायला अजून अवकाश होता.. पण

 कळा यायला सुरवात झाली होती. बयोचा नवरा लगबगीने उठला आणि शेजारी राहणाऱ्या ताईना  बोलावयास गेला. जेव्हा जेव्हा गरज लागायची तेव्हा तेव्हा ताई सगळ्याना मदत करायला हजर असायची म्हणून आता पन   ती आली.. 

  हॉस्पिटलमध्ये न्याव लागेल. ताई म्हणाली, हे ऐकून बयोचा नवरा गाडी  बगायला गेला, एथे  पोटात कळा येउन बयो  थकली होती, ताई बायोला धीर देत होती. एकदाची गाडी आली... आणि बयोला थोडे बर वाटल.. तिला गाडीत बसवल आणि तिच्या बरोबर ताई सुध्दा बसली.. होसपिटल थोड अंतरावर होत... तरीपण गाडी चालवताना सगळी खबरदारी घेवुन, एकदाची गाडी दवाखान्यात दाखल झाली.. तिकडे असणाऱ्या सि आणि लोकांच्या मदतीने बयोला आत नेण्यात आल.. अस म्हणतात बाळ जन्माला येण..म्हणजे बाईचा दुसरा जन्म असतो..अखेर अमरयाधीत कळा सोसून बाळाचा जन्म झाला.. आणि बाळाच्या किलकारीने सगळ्याना जागे केले... सिस्टरनी ही गोड भातमी बाहेर वाट बघत बसलेल्या ताईना व बयोचा नवरया ला सागितली.. मुलगी झाली हो  तुम्हाला मोठे पुण्यावान आहात.. 





🎭 Series Post

View all