ती चे गुंतणे

It is about she getting lost over quotes. At the same time she will over coming the thoughts. It's in simple and easy words. Some of the quotes lot of time makes a person to think over a lot. Most of them hit it like never before. It's a little try t

@पुजा आङेप
नमस्कार वाचकहो,

आज मी एक छोटासा प्रयत्न केला आहे, 'ती' च मनोगत मांडण्याचा. आशा आहे की आवडेल. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. हे फक्त एक मनोगत आहे.

सहजच आज 'ती' अशाच एका quote वर थांबली, ते असे ' Men are quicker to LEAVE, but usually always return.
Women take longer to think if they should leave, but if they leave, they never RETURN.' याचे भाषांतर असे, ' पुरुष सोडून जाण्याच्या निर्णयात जलद असतात, परंतु सामान्यत: नेहमीच परत येतात. परंतु, महिलांना सोडून जावे की नाही याचा विचार करण्यास जास्त वेळ लागतो, पण ते एकदा सोडून जातील परत कधीही न येण्यासाठी.' परत ती स्वतःला विचाराच्या अधीन करून गुंतून गेली...खरंच पुरुष सहजपणे निर्णय घेऊ शकतो. पण तेच एका महिलेच्या बाबतीत म्हणायचे झाले तर ती शंभरवेळा विचार करते. पण एकदा का 'ती' चा निर्णय पक्का झाला तर कोणीच बदलू शकत नाही हेही तितकेच खरेय. आता काळ बदलतो आहे आणि विचारसरणीही.

परत 'ती' इंटरनेट वर टाईमपास करत होती, पण अचानक ती चे लक्ष एका Quote ने वेधले. ते असे,
' I did not unlove you in overnight. No, I unlove you in bites of pieces over time.' त्याचे भाषांतर असे, ' माझे तुझ्यावरचे प्रेम एकाच रात्रीत नाही संपले, माझे प्रेम काळानुरूप हळू हळू तुकड्यांत संपले.' आणि ती विचारात गुंतली, खरंच, किती सहज आपण एखाद्यावर प्रेम व्यक्त करतो, तेच प्रेम कालानुरूप, परिस्थिती नुसार मरायला सुरुवात होते. कुठल्याही व्यक्तिचे कुणावरचे प्रेम संपण्यास परिस्थिती, व्यक्तिस्वभाव आणि बरेच काही कारणीभूत असते. म्हणुन एखाद्या व्यक्तीला, एका रात्रीत तुझे माझ्यावरचे प्रेम संपले का? असे विचारण्या आधी स्वतः मध्ये ढुंकून पाहायला हवे, नाही का? मग ती असो वा तो...दोघांना लागु होतो.

सगळी कामे उरकून परत 'ती' विचाराधीन झाली, आता ह्या वेळेस कशावर झाली? ते काहीसं असं, आपण बर्‍याच वेळा वाचतो ना की,' Lies is beautiful and Truth is painful.' खोटे सुंदर आहे आणि सत्य वेदनादायक आहे अस नक्कीच आहे का हो? एखादी व्यक्तीला सत्य समजल्यावर ह्या मुळे दुःखात नसते की सत्य समजलं...ह्या मुळे असते कारण नेहमीच खोटं बोलले गेलं. एक सत्य पेक्षा त्या शंभर खोटं सांगितले गेले चे दुःख जास्त असते. एकदा सत्य सांगितल्या वर लक्ष्यात ठेवायची गरज नाही म्हणतात तेही खरेच आहे कदाचित.

आज एवढेच लिहून 'ती ' चे विचारात गुंतणे थांबवते. जास्त लिहिले तर कंटाळवाणे वाटले नाही पाहिजे...हो ना वाचकहो?

धन्यवाद,
आपणास हा लेख सामायिक करणे आवडत असल्यास कृपया त्यासह लेखिकेचे नाव सामायिक करा.

@पुजा आङेप