तुझी ती भेट ...भाग - ८

Alina didn't look well in the morning...

हे वाक्य म्हणत असताना ती बेडरूमकडे बघत होती. 

कार्तिक -" अग अस का करत आहेस??..."

स्नेहा -" खरच काही नाही रे... मी जाते ... बाय...."  

            एवढं बोलून ती नजर न मिळवताच निघून गेली. कार्तिक पुन्हा एकदा निशब्द थांबला होता. त्याला कळत नव्हतं की स्नेहा आणि त्याच्यात झालेली गैरसमज कसं दूर करायचं. झोपेतून उठल्यावर त्याला हा धक्का बसेल वाटलं नव्हतं. त्याच टेन्शनमध्ये तो सोफ्यावर बसला. त्याच्या दोन्ही हातामध्ये त्याच डोक होत . काय करावं की स्नेहाच्या मनातील गैरसमज दूर होतील ?? हेच विचार करत तो सोफ्यावर बसलेला असताना मोबाईलचा वाजल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. गडबडीत तो स्वतःचा मोबाईल शोधू लागला. नंतर त्याला कळाल की जे रिंगटोन वाजत आहे , तो त्याचा नाहीये... त्याला आलेल्या टेन्शनमध्ये तो वेगळ्यारितीने वागत होता. त्याच डोक जाम झालं होत.       मोबाईल काही वेळाने बंद झाला. तो मोबाईल दुसरा तिसरा कोणाचा नसून , तो मोबाईल अलीनाचा होता. 

       अलीना मोबाईल पिक का केली नाही ? हा प्रश्न एकदा कार्तिकच्या मनात येऊन गेली. तो बेडरूममध्ये एकदा जाऊन बघावं म्हणून तो सोफ्यावरून उठला आणि बेडरूममध्ये गेला. तर अलिना बेडवर झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर तिचे कालच सिल्क केलेले केस आलेले होते. तिच्या त्या मोहक रुपात कार्तिक काही क्षण हरवून गेला . बेडवर ती दोन्ही गुडघे पोटात घेऊन झोपलेली होती. कार्तिकला न राहता अलिनाच्या चेहऱ्यावरून केस बाजूला करण्यासाठी हात लावला , तर त्याला कळाल की तिला ताप आलेला होता. काळजी पोटी तो तिच्या कपाळाला हात लावून चेक करू लागला , तर तीच अंग तापेने खूपच गरम झालेली होती. त्याला काय करावं आणि काय नको असं झालं होत? तिला निरखून पाहत असताना त्याला कळालच नाही की ती थरथरत होती. कदाचित तिला थंड वाजत असावी. कार्तिक तिला पांघरूण ओढवतो आणि थेट तो मोबाईल शोधू लागला. थोड्यावेळाने त्याला कळाल की त्याचा मोबाईल तर बाहेरच्या सोफ्यावर राहिला होता. तो पळतच बाहेर जाऊ लागला. पळत जाताना त्याच्या पायाला दार लागलं आणि तो खाली पडला. पडल्याने त्याला काही वाटलं नाही , त्याला फक्त आता डॉक्टरला फोन लावायचा होता. क्षणाचीही वेळ न घालवता तो उठला आणि पळू लागला. सोफ्यापाशी पोहचताच तो मोबाईल उचलला आणि गुगलवरून जवळ असलेला डॉक्टरला फोन लावला. कोणी पिक करत नव्हत. अजुन कित्येक वेळा ट्राय केला तेंव्हा कुठ कोणी पिक केलं.

डॉक्टर -" Hello... Doctor James here... "

कार्तिक -" Hello... I'm Kartik ... calling from *****"

कार्तिक अडखळत डॉक्टरला घरचा अॅड्रेस सांगत होता. डॉक्टर अड्रेस ऐकुन , लिहून घेतला. नंतर शांतपणे कार्तिकला विचारले . 

डॉक्टर -" who's the patient??"

कार्तिक -" Her name is Alina... "

डॉक्टर -" Ok... what happened to her ??"

       कार्तिक डॉक्टरला अलीनाची कंडीशन सांगितला. तो ऐकताच डॉक्टर म्हणाला.

डॉक्टर -" Don't worry... I'll be there in some time... "     

     एवढं बोलून तो कॉल कट केला. डॉक्टर येतील याच फीलींगनी कार्तिकला समाधान वाटलं. मग तो अलिना जवळ जाऊन तिच्या कपाळाला हात लावून ताप चेक केला. अजूनही ताप तसाच होता. थोडा वेळ विचार करत तो उभा राहिला. त्याला काहीतर सुचल्यासारख आणि तो पळतच किचनमध्ये गेला. थोड्यावेळाने तो एका पातेल्यात पाणी आणला आणि त्यात कापड्याची पट्टी बुडवून अलीनाच्या कपाळावर ठेवू लागला. जेणेकरून तिचा ताप डोक्यापर्यंत ना जावो. थोडा वेळ तो तसच पट्टी पाण्यात बुडवून तिच्या कपाळावर ठेवून परत काढू लागला. इतक्यात बेल वाजली. कार्तिक लगेच उठून दार उघडण्यासाठी पळत सुटला. दार उघडताच डॉक्टर आले. अलीना अजुनसुद्धा थरथरत होती. डॉक्टर स्वतःसोबत आणलेला ब्रिफ केस उघडला आणि अलीनाला चेक करू लागला. कार्तिक त्याच्याजवळ उभा राहून सर्व काही बघत होता. अलिना अजूनसुद्धा डोळे उघडत नव्हती . डॉक्टर थोड्या चिंतेने चेक अप करत होते. नंतर तीच बी. पी सुद्धा चेक केले. 

डॉक्टर -" Mr Kartik.... We have to admit her... I think she have high blood pressure... with some cold ..."

कार्तिक -" But doctor... She has to attend one shoot of her ad in two days... "

डॉक्टर -" But understand Kartik... She has to take rest in hospital not here..."

कार्तिक थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला. 

कार्तिक -" Ok doctor... Let's take her at hospital."

...अस म्हणताच डॉक्टर फोन करून अंबुलान्स मागवला. थोड्यावेळाने अंबुलन्स चा आवाज येऊ लागला. आवाज येताच कार्तिक घराचं गेटजवळ पळतच गेला. अंबुलेन्स मधून दोघं आर्टिफिशियल बेड घेऊन घाईगडबडीत बाहेर आले. त्यांना गडबडीत बघताच कार्तिक गेट उघडला. दोघेही अलीनाच्या बेड जवळ आले. कार्तिक त्यांच्यासोबतच अलीनाच्या बेडजवळ आला. दोघेही अलीनाला उचलायला पुढे जातच होते की कार्तिक त्या दोघांना थांबवला. सगळ्यांना नवलच वाटल. कार्तिक बेडजवळ येऊन अलीनाला आपल्या हातातून उचलू लागला. जेव्हा तो तिला उचलू लागला तेंव्हा त्याच्या हाताला तीच गरम चटके अनुभवत होता. उचलताना तिचे काळे, ब्राऊनिश केस खाली येऊ लागले आणि तिचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. तिच्या चेहऱ्याकडे बघत असताना त्याला अस वाटत होत , जस तो क्षण हळू हळू जात आहे आणि बाकीचे सगळे स्तब्ध झाले आहेत. तो तिच्या चेहऱ्यावरून नजरच हटवत नव्हता. आर्टिफिशियल बेडवर ठेवताना सुद्धा त्याची नजर तिच्या चेहऱ्याला निहारत होती. तिला त्या बेडवर ठेवताच तिला आंबुलेन्सकडे नेऊ लागले. तिच्या मागे डॉक्टर आणि कार्तिकसुद्धा जाऊ लागला. घाईघाईमध्ये कार्तिक त्याचा मोबाईल , पाकीट आणि चावी घेऊन परत डॉक्टरच्या मागे जाऊ लागला. जाताना तो डोअर लॉक करायला विसरला नाही. 

       थोड्यावेळाने हॉस्पिटलच्या पुढे अंबुलन्स थांबली होती. थांबताच अंबुलन्सचा डोअर ओपन करण्यात आला आणि अलिनाला त्या आर्टिफिशियल बेडवरून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागले. जाताना कार्तिक सुद्धा त्यांच्याच मागे पळत होता. 

      अलीनाला चेक अप रूम मध्ये घेऊन गेले. तेंव्हा कार्तिकला बाहेर राहण्यास सांगितले. किमान एक तासानंतर डॉक्टर बाहेर आले. 

कार्तिक -" Doctor... what's happen to her?"

डॉक्टर - " She had some issues in mental health . Due to that she completely ignored her physical health. That's why this is happened..."

    कार्तिकला हे ऐकताच तिच्या डिप्रेशन मधली कंडीशन आठवली. 

कार्तिक -" So, Now doctor???.."

डॉक्टर -" Don't worry... She will be alright in some days..."

त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर कार्तिकला बर वाटल. 

कार्तिक -" Thank you , doctor..."

डॉक्टर -" metion not... But you to take care about her mental health..."

कार्तिक -" Absolutely doctor... I'm here for her..."

डॉक्टर -" ok then ????????.."

    डॉक्टर कार्तिकच्या खांद्यावर हात ठेवून स्माइल देत आपल्या पुढच्या पेशंटकडे गेले. कार्तिक मात्र वॉर्डच्या बाहेरूनच अलीनाला बघत होता. ती आता शांतपणे झोपली होती. तिला शांत बघून कार्तिक च्या मनात एक वेगळीच समाधान मिळत होती . 

      सकाळचे ९ वाजत होते. अलिनाच्या बेड जवळ बसला होता. काल रात्रभर जागा राहिल्याने त्याला आता झोप आलेली होती. बेड जवळ बसून तो डुलक्या मारत होता. तो त्याचे हात बेडवर ठेवून त्याच्यावर डोक ठेवून झोपू लागला. काही वेळ तो तसाच झोपला होता  ,  थोड्या वेळाने कार्तिकच्या मोबाईल मधून नोटिफिकेशनचा टोन वाजला. त्याचा डोळा लागल्याने त्याला ऐकू गेलं नव्हता. काही मिनिटांनी तो जागा झाला, टाईम बघावं म्हणून मोबाईल घेतला तेंव्हा ९:३० वाजून गेले होते. पण जेंव्हा तो अजुन डोळे फाडून मोबाईल बघितला , तेंव्हा त्याला धक्काच बसला. स्नेहाच ८ मिस्ड कॉल आणि १५ टेक्स्ट मेसेज आलेले होते. ते बघूनच त्याची झोप कुठले कुठे पळून गेलेली होती. अलिना अजुन झोपली होती. कार्तिक तिला बघून वार्डच्या बाहेर येऊन स्नेहाला कॉल लागला. रिंग तर वाजत होती , पण स्नेहा पिक अप करत नव्हती. एक झाले , दोन झाले .. असे पाच मिस्ड कॉल स्नेहाच्या मोबाईल मध्ये दिसत होते. तिकडे मात्र स्नेहा केमिस्ट्री लॅब मध्ये प्रयोग करत होती. तिचा मोबाईल सायलेंट असल्याने तिला कॉल आलेले कळत नव्हत. 

        लॅब मध्ये मोजकेच विद्यार्थी होते. कारण , पोस्ट ग्रॅज्युएशन ला खूप कमी लोक होते आणि ते कॅलिफोर्निया स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये तर सर्व काही स्वताला करावं लागतं. प्रोफेसर फक्त मार्गदर्शनासाठी होते. लॅब विद्यार्थी प्रयोग करत होते . पण स्नेहाच लक्ष त्यात नव्हतच. ती फक्त फिजिकली तिथे होती .पण मन मात्र कार्तिक कडे होत. तो आज कॉल का उचलला नाही?? तो नाराज झाला का माझ्यावर???...अशे कित्येक प्रश्न तिच्या मनाला छेद करून जात होते. तिच्या त्या विचाराने आजूबाजूच्या स्टुडंट्स ना कळाल की स्नेहा चुकीचं प्रयोग करत आहे. त्याच स्टुडंट्स पैकी एक होती ' जेनी ' . जेनी स्नेहाला हलवत म्हणाली. 

जेनी -" Are you alright , sneha??... "

शून्यात बघत असताना स्नेहाला तिच्या हलवल्याने धक्काच बसला होता.

स्नेहा -" ha.... Yeah .. I'm fine..."

जेनी -" your method of doing this experiment is wrong.."

    तिला जेंव्हा कळाल की ती चुकीच्या पद्धतीने करत आहे. तेंव्हा तिला कळून चुकलं की तीच मन फक्त कार्तिक कडेच होत. ती विचार करत असताना तिच्या मोबाईल मध्ये नोटिफिकेशन आल्याचं तिला कळाल. ती मोबाईल घेतल्यास तिला कळाल की कार्तिक कडून तिला ५ मिस्ड कॉल आलेले होते. ती बघत असतानाच तिला एक टेक्स्ट मेसेज कार्तिक कडून आलेलं होत. ती वेळ न घालवता मेसेज पहिली , तर तिला कळाल की कार्तिक अलिनाला घेऊन हॉस्पिटलला आहे. ती लगेच जेनीला म्हणाली.

स्नेहा -" Jenny... I have to go... "

जेनी -" where ???"

स्नेहा -" Hospital...."

जेनी -" Any problem??"

स्नेहा -" just an emergency... Can you inform to the professor ??.. Please..."

जेनी -" Ok..."

स्नेहा -" Thank you honey... Bye.."

जेनी -" Bye... Take care.. "

स्नेहा गडबडीत लॅब मधून जाण्यासाठी सॅक भरू लागली. 

********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती

🎭 Series Post

View all