तुझी ती भेट ...भाग -१

Kartik gets an opportunity to study at Califorina . He travels there from India . Then the story begins.

      संध्याकाळचा वेळ होता . सगळे आपापल्या ऑफिस मधून घरी येत होते. सगळं काही शांत वाटत होत . इथ श्रध्दा मात्र थोड चिंतेत दिसत होती. कार्तिक  कॉलेज मधून अजुन आलेला नव्हता. त्याची यायची वेळ तर केंव्हाची येऊन गेली होती. तेवढ्यात राजीव ऑफिस मधून आला. येताच तो म्हणाला 

राजीव -" अग श्रध्दा ... जरा चहा टाक ग... खूप थकलोय आज.."

श्रध्दा मात्र अजुन चिंतेत होती. पण राजीवच थोड राग तिलाही आलेला होता . ती राजीव जवळ येऊन म्हणाली. 

श्रध्दा - " नाही मिळणार..."

राजीव -" का???"

श्रध्दा - " तुम्हाला ना.. कशाची काळजी नसते.."

राजीव वैतागून म्हणाला..

राजीव -" आता काय झालंय??"

श्रध्दा -" तुम्हाला ना कार्तिकची काही काळजीच नाहीय.. तो अजुन आलेला नाही ."

राजीव -" अग येत असेल तो??.. कॉल कर की.."

श्रध्दा -" केले होते ना... पिक करत नाहीये तो.."

         राजीव एका कंपनीमध्ये  इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. श्रध्दा एक हाऊस वाइफ होती. तरी श्रद्धाच बऱ्या पैकी शिक्षण झालेलं होत. ते दोघं अरेंज कम लव्ह मॅरेज केले होते. श्रध्दा थोडी धार्मिक विचाराची होती , तर राजीव मात्र थोड मॉडर्न विचाराचा होता. लग्नाच्या ३ वर्षांनी कार्तिक झाला होता. त्याच्या नंतर ४ वर्षांनी श्वेता झाली . ते दोघं जसे जसे मोठे होत गेले तसे तसे दोघ एकमेकांची भांडत होते. जसे इतर बहीण भाऊ भांडत असतात . पण तेवढंच ते एकमेकांना सपोर्ट सुद्धा करत असतात . दोघेही खूप हुशार होते. ते त्यांच्या फील्ड मध्ये उत्तम होते. कार्तिक मेडिकल आणि फिजिक्स मध्ये रिसर्च करणार होता. असे क्वचितच झाला होता की कोणी एक व्यक्ती मेडिकल आणि फिजिक्स मध्ये रिसर्च केले असतील. म्हणूनच तो खूप हुशार होता. तो जसा हुशार होता तसा श्रध्दा आणि राजीव या दोघांचा कॉम्बिनेशन होता. थोडा धार्मिक आणि थोड मॉडर्न...

श्वेता -" गेला असेल ग .. कुठल्यातरी पार्टी मध्ये..."

श्रध्दा -" तो मला न सांगितल्याशिवाय कुठ जात नाही..."

तेवढ्यात बाहेर गेट ओपन झाल्याचा आवाज आला. 

राजीव -" आला वाटत कार्तिक..." 

    कार्तिक घरात जणू पळतच आला. साइड बॅग त्याच्या खांद्यावर , कूल स्पेक्ट घातलेला , जीन्स पँट, शर्ट ची स्लिव कोपर्यापर्यंत  आणि पिळदार अशी शरीरयष्टी असलेला कार्तिक घरात प्रवेश करताच मोबाईल खेळत असलेली श्वेताला टपली मारला . श्वेता रागातच त्याला म्हणते.

श्वेता -" ये कार्त्या.. ????????"

कार्तिक आज खूप खूष होता. तो थेट श्रध्दा आणि राजीव यांचं पाय पडला. शेवटी आईवडिलांचा आशीर्वाद त्याला आता हवं होतं . 

श्रध्दा -" अरे काय झालं कार्तिक ??? ... आणि हा कुठ होतास इतकं उशीर , किती कॉल लागला तुला उचलत का नव्हतास???"

कार्तिक -" अग हो हो... एकाच वेळेस किती प्रश्न विचारतीस??  ????????"  

राजीव -" अरे हो... त्याला बसू तर देत..."

कार्तिक सोफ्यावर बसून त्याच्या बॅग मधील एक पाकीट  काढून राजीव कडे दिला. राजीव ती पाकीट काढला तर त्यात एक लेटर होता. तो लेटर वाचू लागला. 

राजीव -" अरे वा ... कार्तिक तुला Fulbright Nehru Fellowship  मिळाल... ते पण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ????????????"

श्रध्दा -" काय????..????????"

कार्तिक -" होय मम्मी... मास्टर्स डिग्री साठी मला फेलोशिप मिळालं आहे आणि मला रिसर्च सुद्धा करायला मिळणार आहे..."

श्वेता -" ते जाऊदेत ... स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी नेमके कोणत्या राज्यात आहे???"

श्वेता तिची शंका कार्तिकला विचारली... सगळे तिच्याकडे हसतच बघू लागले. 

कार्तिक -" अग श्वेते...  स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी हे कॅलिफोर्निया मध्ये आहे.... अमेरिका मध्ये.."

श्वेता -" काय???..????????????.. म्हणजे तू अमेरिकेला जाणार???"

कार्तिक -" होय..????.."

श्वेता -" पण एवढं खर्च कसं भागणार??"

कार्तिक -" त्यासाठी तर स्कॉलरशिप आहे ....????"

श्वेता -" म्हणजे तुझ रूम मला मिळणार ....किती मस्त ????????"

     तेवढ्यात श्रध्दा थोड चीतेंत दिसत होती. 

कार्तिक -" काय झालं मम्मी ??"

श्रध्दा -" म्हणजे तू अमेरिकेला जाणार.... एवढं लांब... कसं राहशील तू तिथे??"

राजीव -" अग श्रध्दा ... काळजी करू नकोस... सगळं काही ठीक होईल... माझे काही मित्र तिथे राहतात . त्यामुळे काही होणार नाही... आणि प्रश्न काही वर्षांचा आहे . जाईल लगेच..."

कार्तिक - " हो ... "

राजीव -" बर कार्तिक .. कधी जाणार आहेस अमेरिकेला??"

कार्तिक -" फायनल एक्साम नंतर.. आणि विसा वैगरे सगळे काही कॉलेजमधून होणार आहे.. सो टेन्शन नाही..."

श्वेता -" म्हणजे अजुन ३ महिने आहेत तर तुला??"

कार्तिक - " हो... माझी रूम तुला लवकर नाही मिळणार श्वेते ...????????."

कार्तिक तिला टपली मारत म्हणाला...

श्वेता -" कार्त्या...????????"

श्वेता त्याच्या मागे मारायला पळत गेली... त्यांचं हे खेळ बघून श्रध्दा आणि राजीवला हसू येत होत. दुसरीकडे श्रद्धाला कार्तिक जरा काळजी वाटत होती. हीच तर आईच प्रेम असते...
**

        बघता बघता ३ महिने कसे निघून गेले ते कळालच नाही... फायनल एक्झाम नुकताच संपलेला होता. विसा आणि पासपोर्टची इत्तर काम सुद्धा झालेले होते. फक्त आता बॅग भरून  एअरपोर्ट गाठणं एवढच बाकी होत. श्रध्दा बॅग मध्ये खूप काही भरत होती. खाण्याचे पदार्थ , कपडे वैगरे सर्व काही भरत होती. श्वेता तर फक्त त्यांना बघत होती. श्रध्दा , राजीव आणि कार्तिक अख्ख घरामध्ये इकड तिकड करत होते. सगळं काही भरल का ते परत एकदा चेक करूनच सुटकेचा श्वास ते तिघेही घेतले .  

श्वेता -" झालं का तुमचं?.. निघायचं का आता एअरपोर्ट ला.."

कार्तिक तिला टपली मारत म्हणाला...

कार्तिक -" होय .. "

श्वेता -" ये कार्त्या ..????????" 
***

       फ्लाईट ची टाईम १ तासा नंतर होती आणि ते ५ वाजताची होती. कार्तिक त्याची बॅग कार मध्ये ठेवली. सगळेजण एअरपोर्ट कडे जाऊ लागले. श्रध्दा त्याला खूप काही सूचना देत होती . ' काहीही असो तब्येत पहिली सांभाळ.. काहीही वाटलं तर डायरेक्ट हॉस्पिटल गाठायच .' .. कार्तिक फक्त हो म्हणत होता. काय करणार ? .. शेवटी ती एक आई होती.... बोलता बोलता कधी एअरपोर्ट आल त्यांना पण कळाल नाही... कार्तिक कार मधून बॅग काढली. एअरपोर्ट मध्ये जाताच कार्तिक बाकीचे फॉर्मलिटी करू लागला. तेवढं वेळ श्रध्दा आणि श्वेता एका बेंच वर वेट करत होते. राजीव कार्तिकला फॉर्मालिटी करण्यात मदत करत होते. कार्तिक चेक इन केला आणि श्रध्दा कडे आला . सगळे आता खूप शांत होते. 

     तेवढ्यात अनाउन्समेंट झाली . कार्तिक ची फ्लाईट निघण्यात आता केवळ १० मिनिटे राहिले होते. कार्तिक उठला .बॅग घेऊ लागला. श्रध्दा आणि राजीवची पाया पडून उठल्यावर म्हणाला. 

कार्तिक -" बाय मम्मी पप्पा... "

एवढं बोलताच श्रद्धाच्या डोळ्यात पाणी आल. 

कार्तिक -" ओ.. मम्मी .. बास की आता..."

तिला हग करत कार्तिक म्हणाला. काहीवेळ श्रध्दा त्याच्या मिठी मध्ये रडत होती. कार्तिक च्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले.

राजीव -" श्रध्दा ... त्याला जाऊ देत.. फ्लाईटची टाईम झाली
आहे. "

श्रध्दा त्याला बघत म्हणाली.

श्रध्दा -" काळजी घे कार्तिक..."

कार्तिक फक्त मान हलवली आणि श्वेता जवळ आला. टपली मारत म्हणाली. या वेळेस ती रागात आली नाही.

कार्तिक -" बाय श्वेते..."

श्वेता -" बाय कार्त्या...????... कॉल करत रहा... टेक केअर..."

     दोघेही हग करत म्हणाले. फ्लाइटची टाईम झालेली होती. कार्तिक सगळ्यांना बाय करत आणि बॅग घेऊन जाऊ लागला.  श्रध्दा आणि राजीव त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभारले होते. 
***

    कार्तिक आपली तिकीट वरचे सीट नंबर बघत स्वतः शोधत होता. तिकीट वर १३ सी नंबर होता. ते सापडताच कार्तिकला थोड दुःख झालं. कारण त्याला विंडो सीट हवी होती . पण त्याला त्याच्या बाजूची सीट मिळाली होती . तो काहीसा नाराजीतच बसला. कारण त्याची ही पहिली फ्लाईट होती आणि त्याला वरून जग कसं दिसतं ते बघायचं होत. 

    थोड वेळ तस बसताच तो विचार करू लागला की जर माझ्या बाजूच्या सीटवर जर एक सुंदर मुलगी बसली तर, अख्ख प्रवास छान जाईल नाही??... असच विचार करत बसलेला असताना त्याच्या जवळ एक जाड व्यक्ती आला . तो तर त्याच्याच विश्वात होता. तो तर त्या मुलीच्या विश्वमध्ये हरवून गेला होता. ती व्यक्ती त्याला हलवून विचारला 

जाड व्यक्ती -" एक्सक्युज मी... मला आत जाऊ द्याल का???"

कार्तिक जरा कुठे त्या मुलीच्या विश्वात हरवला होता. त्या माणसाच्या आवाजाने तो दचकून गेला आणि म्हणाला.

कार्तिक - " हा...तुम्ही काही म्हणालात का??"

व्यक्ती -" मला आत जाऊ द्याल का?” 

कार्तिक -" ओह .. नक्कीच ... बसा ना..."

   तो आत जसा जात होता तसा तेवढ त्रास कार्तिकला होत होता.तो बसताच कार्तिकला एक स्मित दिला तो पण एक स्मित हास्येनी स्वागत केला. पण तो त्याच्या मनात देवाला दोष देऊ लागला. ' काय रे देवा.. माझी ही पहिली फ्लाईट होती . ते पण तू या माणसासोबत घालवणार आहेस... शी...????????'  अजुन फ्लाईट टेक ऑफ झालेली नव्हती. 

     तेवढ्यात कर्तिकची नजर फ्लाईटचा मेन डोअर जवळ गेली . तिथून एक अप्सरा येऊ लागली होती. त्याची नजर तिच्या जवळच रोखली गेली. तिच्या एका खांदेवर बॅग होती. तिचे ते डोळे बघून कार्तिक तर त्यांच्यात बुडूनच गेला होता. ती पिंक सलवार कमीज मध्ये होती. तिचे ते सिल्की हेअर बघून कार्तिकला तिच्या त्या केसाच्या सावलीमध्ये राहू असे वाटत होती. तिचे ते गोरे गाल बघून तर कार्तिक स्वतः लाजला होता. ती तिकीट मधली सीट नंबर बघून सीट शोधत पुढे येऊ लागली. ती जशी पुढे पुढे येऊ लागली तशी तशी कार्तिक च हृदय धडधडत होत... ती मुलगी उर्फ अप्सरा त्याच्याजवळ येऊन कार्तिकच्या जवळच्या व्यक्तीकडे बघून म्हणाली. 

ती -" एक्सक्युज मी... ही सीट माझी आहे... "

व्यक्ती -" तुम्ही प्लीज माझ्या सीट वर बसा ना..."

. कार्तिकला तर त्या व्यक्तीला आता बाहेर काढून तिला बसवून घ्यावं अस वाटत होतं. कार्तिकला तो व्यक्ती काही न बोलता त्याच्या बाजूला येऊन बसला होता आणि कार्तिकला वाटू लागलं होत की तो त्याची सीट आहे . 
      ती जरा रागात येऊन म्हणाली
ती -" मी का तिथे बसू??.. तुम्ही तुमच्या सीटवर बसा. ही माझी सीट आहे.."

चांस बघताच कार्तिक सुद्धा बोलू लागला.

कार्तिक -" अहो... त्यांची सीट आहे ना... मग बसू द्या ना त्यांना..."

ती व्यक्ती नाईलाजाने उठून जाऊ लागला. तो बाहेर जाण्यापूर्वी कार्तिक त्याच्या सीटवरून उठला आणि बाजूला झाला . कारण त्याला अगोदरच त्रास नको होती. ती व्यक्ती गेल्यावर ती त्या सीट वर बसला. कार्तिक सीटवर न बसता तो थेट बाथरूमला गेला. तो जसा डोअर बंद करताच नाचू लागला. 

कार्तिक -" थांनक्स देवा... तू एकदम ग्रेट आहेस.. आता माझी जर्नी मस्त जाईल... "

एवढं बोलून तो नाचू लागला.. थोड्यावेळाने तो बाहेर एकदम नॉर्मल होऊन आला आणि सीट वर बसला. बसताच त्याला तिने लावलेल्या परफ्यूम च सुवास त्याच्या नाकात गेलं. त्याच मन तर अगदी धबधबा मध्ये नाचत होत. थोड ओळख व्हाव म्हणून तो म्हणाला. ती मोबाईल मेसेज करत होती.

कार्तिक -" हाय.."

ती -" हाय..????"

ती  स्माइल देत म्हणाली... हा तर घायाळच ... ' किती मस्त आवाज आहे हीचा..????'

कार्तिक -" मी कार्तिक प्रधान ... यू??"

तो हात पुढे करत म्हणाला.

ती -" मी स्नेहा पाठक..."

पण ती हात न पुढे करता म्हणाली... कार्तिकला ऑकवर्ड वाटलं. तो त्याचा हात मागे घेतला. परत तो बोलण्याचा ट्राय करू लागला. 

कार्तिक -" तर तुम्ही अमेरिकेला चाला का???"

स्नेहा -" नाही... जपानला... "

कार्तिक थोडा कन्फ्युज होऊन म्हणाला... 

कार्तिक -" कसं काय??.. हा फार अमेरिकेचा फ्लाईट आहे..."

स्नेहा -" माहिती आहे ना.. मग कशाला विचारता.. प्लेन मधी थांबत का??? ????????"

कार्तिक -" सहजच विचारलं... यू नॉ फॉर्मालिटी.. काय करता तुम्ही अमेरिकेत? ..."

स्नेहा -" का सांगू मी तुम्हाला??"

कार्तिक -" २५ तासच जर्नी आहे... तुम्ही सीट शेअर करत आहात... मग बोर होण्यापेक्षा गप्पा मारण बर .. न्हव का?"

स्नेहा -" ह्म... मी स्टडी करायला चाले.."

कार्तिक -" कुठे ??"

स्नेहा -" स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये??"

कार्तिक -" तुम्ही पण???"

स्नेहा -" तुम्ही पण म्हणजे ??"

कार्तिक -" म्हणजे मी सुद्धा??"

स्नेहा -" ओह्.. रिअली???"

कार्तिक -" होय..."

स्नेहा -" कोणता स्टडी करत आहात??"

कार्तिक -" बायोलॉजी अँड फिजिक्स... तुम्ही??"

स्नेहा -" ओहह... नाइस... मी केमिस्ट्री मध्ये.."

कार्तिक -" ओह.. नाइस टू मीट यू??"

तो हात पुढे करत म्हणाला..

स्नेहा -" मी टू... "

ती शेक हॅण्ड करत म्हणाली..

कार्तिक - " आता बर वाटलं.."

स्नेहा -" म्हणजे???"

कार्तिक -" मगाशी तुम्ही शेक हॅण्ड केला नाही ना .. आता केलात ना... मला ऑकवर्ड व्हायला आवडत नाही ना.."

ती हसू लागली.. ती हसताना तर खूप सुंदर दिसत होती... असेच गप्पा रंगात आले असताना एक अंनॉन्समेंट झाली..

"Ladies and gentlemen, welcome onboard Flight 4B7 with service from India to U.S.A . We are currently third in line for take-off and are expected to be in the air in approximately seven minutes time. We ask that you please fasten your seatbelts at this time and secure all baggage underneath your seat or in the overhead compartments. We also ask that your seats and table trays are in the upright position for take-off. Please turn off all personal electronic devices, including laptops and cell phones. Smoking is prohibited for the duration of the flight. Thank you for choosing Indian Airlines. Enjoy your flight."

सगळे इन्स्ट्रक्शन पाळल्यावर फ्लाईट टेक ऑफ करू लागली. स्नेहा डोळे बंद केली होती . फ्लाईट टेक ऑफ करत असताना ती कार्तिक च हात पकडली... कार्तिक तर हवेतच होता... फ्लाईट टेक ऑफ झाली.. जेंव्हा फ्लाईट स्टेबल झाली.तेंव्हा स्नेहा म्हणाली.

स्नेहा - " सॉरी... तुमचा हात पकडला बद्दल .. मला भीती वाटत होती..."

कार्तिक -" इट्स ओके... तुम्ही मला आओ जावो म्हणू नका बर... फक्त कार्तिक म्हणा..."

स्नेहा -" ओ... तू पण??"

असेच गप्पा सुरू झाले... रात्र झाली होती.. डिनर झाल्यावर विंडो तून बघितल्यावर खूप सारे दिवे खाली दिसत होते... शेवटी झोपण्याचा वेळ झाली.. 

कार्तिक -" गूड नाईट स्नेहा.."

स्नेहा -" गूड नाईट..????????"

ती झोपी गेली ... पण कार्तिक मात्र तसाच जागा होता.. सतत त्याच्या डोक्यात स्नेहाचा विचार येत होता... 
" हे फक्त योगायोग आहे का??.. हो योगायोगच म्हणावं लागेल.. ती पण सेम युनिव्हर्सिटी मध्ये शिकणार आहे जिथे मी शिकणार आहे.... का माहिती नाही , पण मी एक्सायटेड
फील करत आहे... कसं होईल जर आम्ही अमेरिकेमध्ये सुध्दा एकत्र वेळ घालवू... ओ..... वेटींग फॉर अमेरिका... "

तो सुद्धा झोपी गेला होता... उद्याच्या सकाळची त्याला वाट बघावं लागणार होती.. 

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

( पुढील भाग लवकरच... तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की कळवा ... कमेंट करा... ????????.. धन्यवाद...)




 

🎭 Series Post

View all