तुझी ती भेट भाग-11

They Reaching To The Tahoe For Fun


          पोलीस आल्यावर अलिना आणि स्नेहा सगळी परिस्तिथी सांगितल्या . पोलिसाना पटल्यावर ते सर्वाना घेऊन गेले . इकडे तिघे तसेच थांबले होते . थोडा वेळ ते एकमेकांना बघितले आणि अचानक तिघांना हसू फुटलं .


           डिस्नी लँड बघत असताना तिघेही मज्जा करत होते . कधी मोठ्या पाळणामध्ये बसले , तर कधी पाण्यातला घसरगुंडी खेळत . तिघे लहान मुलं असल्यासारखे वागत होते . त्यांच्यातला लहानपण जागा झालेली होती . एकमेकांवर पाणी उडवत मज्जा करत होते . कित्येक वेळ खेळल्यानंतर त्यांना भुकेची चाहूल लागू लागली .


अलिना -" Hey .... I’m hungry now.”


कार्तिक -" Me too "


स्नेहा -" Ok lets go then .."


         असं म्हणत तिघेही पुलमधून बाहेर आले . ओले केस पुसण्यासाठी आणि ओले कपडे बदलण्यासाठी ते चेंजिंग रूमकडे गेले . थोड्या वेळात तिघेही कपडे बदलून बाहेर आले . कार्तिक फुल टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातला होता . एवढं साधं कपडे घातला तरीही खूप साऱ्या मुली त्याच्याकडे पाहत होते . त्याची शरीरयष्टी पिळदार होती म्हणून असेल . स्नेहाचे कपडेसुद्धा साधेच होते , तरीही ती खूप सुंदर दिसत होती . अलिना याहून उलट अगदी छोटे कपडे घातली होती , ज्यातून तीच क्लीवेज दिसत होत . तिचे अर्धवट ओले पिवळे आणि लाल असणारे केस बघून कोणीही फ्लॅट झाला असता . त्यात तर ती अजूनही आकर्षक वाटत होती . पूलजवळ असणारे सगळ्या मुलांचं लक्ष तिच्यावरच होत . ज्यात कार्तिकसुद्धा समावेश होता . त्याच लक्ष तिच्याहून हटतच नव्हती . त्याला तस बघून स्नेहा जळत होती . कार्तिकच लक्ष ओढवून घेण्यासाठी जरा जोरातच म्हणाली .


स्नेहा -"कार्तिक ... निघायचं ?"


हे ऐकून तो अचानक शुद्धीवर आला . स्नेहाकडे बघत म्हणाला .


कार्तिक -" अहह .."


स्नेहा -" निघायचं का ?"


कार्तिक -" हो ..."


स्नेहा -" Alina ... Lets go ."


कार्तिक -" कुठे ?"


अलिना -" Where ?"


दोघे एकदमच , एका आवाजात म्हणाले .


स्नेहा -" To enjoy the food ."


स्नेहा पार्कच्या बाहेरच्या दिशेनी जात होती .


अलिना -"Hey Sneha ... But there is hotel in park ."


स्नेहा -" Just follow me ."


       स्नेहा पुढे आणि हे दोघे तिच्या मागे जात होते . त्यांच्या कारकडे पोहचताच स्नेहा कार्तिककडे वळून म्हणाली .


स्नेहा - " कारची चावी दे ."


कार्तिक -" का ?"


स्नेहा -" मी कार चालवणार आहे ."


कार्तिक -" तुला येतंय ?"


स्नेहा -" का ?... तुलाच येतंय का कार चालवणं ."


      कार्तिक तिच्याकडे कारची चावी देत साईडच्या सीटवर बसला . स्नेहा डोळ्यांवर चष्मा चढवत गाडी चालू केली.

        काही मिनिटे झाल्यावर त्या दोघांना कळालं कि आता जंगलात जाणार आहोत .


कार्तिक -" स्नेहा .. कुठे चालो आहोत आपण ?"


स्नेहा -" कळेलच लवकर ."


       थोड्यावेळाने त्यांना एक तलाव दिसत होता . हे बघताच अलिना एकदमच म्हणाली .


अलिना -" Tahoe Lake ..."


स्नेहा -" Yup ..."


अलिना -" Wow amazing ..."


        ताहोई तलाव हि कॅलिफोर्निया मध्ये खूपच प्रसिद्ध होती . तिथले निसर्ग अगदी मंत्रमुग्ध करणारे होते . तिथले हॉटेल्स मध्येही अगदी शांत आणि नैसर्गिक वातावरण होती . स्नेहाच्या मनात हे प्लॅन होत हे कळताच अलिना अगदी आनंदात उड्या मारत होती . कार्तिकतर फक्त नजाऱ्याचा आनंद घेत होता . अगदी निशब्द होऊन त्याच्या आजूबाजूच्या हिरवागार झाडांना पाहत होता . त्या झाडांच्या मधून त्या तलावाची चकाकणारी पाणी दिसत होती . स्नेहा त्या तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेलच्या पुढे थांबवली . ते हॉटेल बाकीच्या हॉटेल्सपेक्षा वेगळी होती .


स्नेहा -" Let s Go .."


अलिना -" Lets go babe ..."


     कार्तिकही कारमधून बाहेर आला . सर्वात आधी तो त्या तलावाच्या किनाऱ्यावर गेला . तिथल्या शांतीची त्याला गरज भासू लागली .

स्नेहा -" कार्तिक ..."


    त्याला मागून हाक मारत स्नेहा कारच्या पुढे थांबली होती .


अलिना -" What"s going on ?"


स्नेहा -" Don"t know ."


अलिना -" Lets check this out ."


दोघीही लगबगीने कार्तिकजवळ गेले .


अलिना -" Hey ... What happened ?"


त्याच्या खांद्यावर हात ठेवत अलिना विचारली .


कार्तिक -" Nothing ....I just need this silent ."


स्नेहा -" काय ?"


कार्तिक -" मला शांती पाहिजे ."


अलिना -" Are you ok ?"


त्याला असं बघून ती काळजीने विचारली .


कार्तिक -" Yeah ...."


स्नेहा -" Are you sure ?"


कार्तिक -" Yeah ."


स्नेहा -" कार्तिक ... मला भूक लागलीय . आपण नंतर इथे यायचं का ?"


कार्तिक स्नेहाच्या त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला .


कार्तिक -" बर .. चला ."


स्नेहा -" Alina ... Let’s go.”


          तिघेही हॉटेल मध्ये जाऊ लागले . हॉटेलच्या वर \" ताहोई \" अस लिहिलेलं होत . जेवढं साधं हॉटेल ती बाहेरून वाटत होती , तितकीच आलिशान ती आतून होती . स्नेहानी आधीच रूम बुक केलेली होती . तिघे एकाच रूममध्ये राहणार होते . रूम अगदी आलिशान होती . जास्त काही डेकोरेशन नव्हतं . पण जे काही व्यवस्था होती , ती अगदी महल सारखं होत . बेड तर इतकी मोठी होती कि त्यावर तिघेही झोपू शकत होते . स्नेहा खिडकी उघडली , तर बाहेरची ताहोई तलावाची निसर्गरम्य नजरे दिसत होते . ते बघून मनात एक वेगळीच समाधान मिळत होती .


           तिघांना खूपच भूक लागलेली होती , त्यामुळे वेळ न घालवता ते रूमच्या बाहेर आले आणि थेट एका टेबलावर जाऊन बसले . वेटर येताच लवकर त्यांची ऑर्डर दिली . ऑर्डर येताच त्याच्यावर तुटून पडले . खाताना सगळे विसरून गेले कि ते सहलीसाठी आले आहेत . खाताना ते एक शब्द बोलत नव्हते . इतके ते खाण्यात व्यस्त होते .


जेवण करताच त्यांच्या चेहऱ्यांवर वेगळीच समाधान पसरली होती .


स्नेहा -" Now that \"s the real trip ...."


अलिना -" Yeah ..."


कार्तिक -" Now let’s take the fun of lake ."


       स्नेहा आणि अलिना दोघिनी होकार दिल्या . बाहेर पडताच ते ताहोई तलावाच्या दिशेनी धावू लागले . किनाऱ्यावर पोहचताच तिघे थांबले . त्या नाजाऱ्यांचं आनंद घेऊ लागले . तलावाच्या मागे जंगलाची सुरुवात होत होती . घनदाट जंगलामधील पक्ष्यांचे आवाज मनाला आतून आनंद देत होती . तेवढ्यात कार्तिक अलिनाच्या खांद्यावर थोपटला . ती त्याच्याकडे पाहिली .


कार्तिक -" Look ... There is a whale ."


अलिना -" What ?"


       एवढं म्हणत ती तलावाकडे बघितली तर मागून धक्का मारत कार्तिक तिला तलावात ढकलला . पाण्यात पडताच स्नेहा आणि कार्तिक तिला पाहून हसू लागले . स्नेहा हसत कार्तिकजवळ आली आणि एकदमच त्यालाही धक्का मारली . तो पाण्यात पडताच अलिना त्याला अजून पाण्यात धक्का मारू लागली . अलिना हसतच बाहेर आली आणि अचानकच स्नेहला उचलली आणि पाण्यात फेकली . पाण्यात पडताच ती कार्तिकच्या खांद्यावर दोन्ही हातांच्या विळखा घालून उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली . एक क्षण ते दोघे एकमेकांना पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी हसूही लागले . त्या दोघांना पाहताच अलिनाच्या मनात थोडी चलबिचल होऊ लागली . एकदमच हसणारी अलिना शांत बसली . तिला शांत पाहताच दोघेही बाहेर येऊ लागले .


कार्तिक -" Alina ... That \"s not a fair ."


स्नेहा -" Yeah ..."


अलिना -" Why ? what happened ?"


     हे प्रश्न पूर्ण होताच दोघेही अलिनाला उचलले आणि पाण्यात फेकले . हसत न राहता हे दोघेही पाण्यात उडी मारले . तिघेही आता पाण्यात खेळत होते .


       संद्याकाळची वेळ होती . पाण्यात खेळून तिघेही थकले होते . तलावाच्या किनाऱ्यावर येऊन या तलावाच्या खाली मावळत असलेल्या सूर्याला पाहू लागले . तिघांच्या डोळ्यात त्या मावळत्या सूर्याची किरणे चमकत होते . मावळता सूर्य नंतर जंगलात नाहीसा होत होता .


अलिना -" Beautiful ... Isn’t it ?”


कार्तिक -" Yeah .."


     तिघेही त्या नजार्यात हरवून गेले होते . आता अंधार पसरत होती . आता गप्पा चालू झाल्या . पण कार्तिक एकटक तलावाकडे पाहत होता . स्नेहा हे पाहिल्यानंतर त्याला विचारावं वाटत होत .


स्नेहा -" Alina .... You want to drink ?"


अलिनाच्या मनात हीच इच्छा पूर्ण करायची राहवून गेली होती .


अलिना -" Yeah ..."


स्नेहा -" Bring some cold drink then ... And don \"t bring beer ... You understand ?"


      अलिना हिरमुसून हॉटेलच्या दिशेनी निघाली . आता स्नेहा कार्तिकला विचारू शकत होती . ती त्याच्या खांदयावर हात ठेवून विचारली .


स्नेहा -" काय झालं ?"


कार्तिक मान हलवून \" काही नाही \" अस इशारा दिला .


स्नेहा -" अच्छा ... म्हणून तर पाण्यात काय बघत आहेस ?."


कार्तिक -" तस नाही ... एक आठवलं मला ...."


स्नेहा -" काय ?"


कार्तिक -" लहानपणी आमच्या गावाकडे एक तळ होत . गावाकडे गेल्यावर मी तिथे फिरायचो , पोहायचो . तिथे माझी ओळख एका मुलीशी झाली . राधा नाव होत तीच ... टपोरे घारे डोळे , तिचे गाल अजूनही भरीव होते. मला तिचे गाल ओढण्यात खूप मज्जा यायची . आम्ही दोघेही तळ्यात खेळायचो , शिंपले शोधायचो , तिथल्या वाळूनी घर करायचो. पण अचानक माझ्या बाबाची बदली झाली . नाईलाजाने मलाही शहरात जावं लागणार होत . ती संद्याकाळ माझी शेवटची संद्याकाळ होती . सकाळी आम्ही निघणार होतो . त्या संद्याकाळी सूर्य मावळत होता . तीच मन कुठेच लागत नव्हतं . मी जाणार म्हणून तीही नाराज होती . तिला खूप समजवण्याचा मी प्रयत्न केलो . पण तिची नाराजी अश्रूमध्ये बदलली . खूप रडत होती . मीही खूप दुःखी होतो . शेवटी ती रडण्याच थांबवून बाजूच्या झाडेवरुन छोटीशी फुल काढून आली आणि मला देऊ लागली आणि म्हणाली \" तू मला विसणार नाही ना?\" मी म्हणालो \" नाही ... \" तिच्या ओलसर डोळे असूनही ती स्माईल करत मला फुल दिली . नंतर मी तिला कधीच पाहिलं नाही . नंतर गावी गेल्यावर कळलं कि तीही गाव सोडून गेली ."


      कार्तिकच्या डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागले . स्नेहा त्याच्याकडे पाहतच राहिली . कार्तिकचा हा चेहरा ती पहिल्यांदा पाहत होती . ती उठली आणि थोड्यावेळाने परत आली .


स्नेहा -" कार्तिक ..."


कार्तिक तिच्याकडे बघितला तर ती एक छोटीशी फुल आणली होती .


स्नेहा -" तू मला विसरणार नाही ना ?"


कार्तिक -" नाही ..."


        एवढं बोलून तो हसतच फुल घेतला . स्नेहाही हसू लागली . स्नेहा त्याच्याजवळ बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवली . त्या संद्याकाळची वेळ कार्तिकला अधिक समाधान वाटत होत .


         तेवढयात मागून अलिना कोल्डड्रिंकची बॉटल घेऊन आली होती . पण याना बघून ती तिथेच थांबली . तिच्या हृदयात हलकीशी कळ आली होती . अश्रू तिच्या गालावरून खाली वाहत होते . तशीच ती मागे फिरली आणि हॉटेलकडे धावू लागली .


*****************************

क्रमशः


ऋषिकेश मठपती


पुढील भाग लवकरच ... हा भाग कसा वाटलं नक्कीच सांगा कंमेंट करा आणि शेअर करा .... धन्यवाद ???