तुझी ती भेट... भाग - ७

Once again misunderstanding between Alina , Kartik and Sneha is created by one call.

         दोघेही एकमेकांकडे बघू लागले. मन इतकं जोरात धडकत होत की जस ट्रेन आणि त्या ट्रेनचा आवाज मोठ्याने येऊ लागला होती. ते दोघेही जवळ येऊ लागले. जसजसे ते जवळ येत होते तसतसे त्या ट्रेनची गती वाढत होती. दोघांच्या ओठातील अंतर कमी होऊ लागले होती . शांत वातावरणात दोघे प्रेमाची सुरुवात करणार होते. दोघांचे डोळे बंद झाले होते. जगाची पर्वा न करता ते एक होणार होते .  पण तेवढ्यात मोबाईल वाजला . दोघांचे डोळे त्या वाजलेल्या मोबाईलमुळे उघडे झाले. कार्तिकला परिस्तिथी लक्ष येताच तो तिच्यापासून लांब झाला. 

कार्तिक -" Sorry... ????????????"

अलीना -" Your mobile is ringing ....????????"

     दोघेही त्या परिस्थितीत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालत नव्हते. दोघांचे चेहरे सकाळच्या उमलेल्या गुलाबासारखे गुलाबी झालेले होते. 

कार्तिक -" One second.."

     अस म्हणत कार्तिक त्याचा मोबाईल शोधत हॉलमध्ये आला. तर टेबलावर त्याचा मोबाईल वाजत होता. त्या स्क्रीनवर होम अस नाव झळकत होत. घरून त्याला कॉल येत होता. कार्तिक वेळ न घालवता कॉल रिसिव्ह केला. 

कार्तिक -" हॅलो... "

श्वेता हळू आवाजात बोलत होती.

श्वेता -" हॅलो.... कार्तिक.."

कार्तिक -" श्वेते... तू???... आणि हळू आवाजात का बोलत आहेस??"

श्वेता -" अरे कार्तिक... तुला मिस करत होते यार..."

कार्तिक -" खरच??"

श्वेता -" होय..."

कार्तिक -" मम्मी पप्पा कसे आहेत??"

श्वेता -" मजेत..... तू कसा आहेस??"

कार्तिक -" मी बरा आहे... तू कशी आहेस??"

श्वेता -" मी बरी आहे.."

कार्तिक -" ह्ममम..."

थोडावेळ तसेच शांतपणे गेल्यावर कार्तिक म्हणाला 

कार्तिक -" श्वेते... खरच काही नाही झालं ना ?"

श्वेता -" अॅक्च्युअली ... तुला काहीतरी शेअर करायचं होत .."

कार्तिक -" माहिती होत... काहीतरी गडबड केली असणार आणि मम्मी ओरडली असणार म्हणून शेअर करणार असशील." 

श्वेता -" नाही.... म्हणजे शेअर करायचं आहे . पण आईबाबतीत नाही.."

कार्तिक -" मग?"

श्वेता -" हे माझं सेकंड इअर आहे कॉलेजमध्ये..."

कार्तिक -" हेच शेअर करायचं आहे का???..."

श्वेता -" अरे ऐकुन तर घे..."

कार्तिक -" बर बोल..."

श्वेता -" फर्स्टइअरला असताना समीर नावाचा मुलगा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यानंतर आम्ही मित्र झालो. "

कार्तिक -" मग?"

श्वेता -" जेंव्हा सुट्टी संपून मी कॉलेजला जाऊ लागले . तेंव्हा तो मला सारखं बघत होता. तेवढंच नाहीतर क्लासमध्ये पण तो माझ्याकडेच बघत असतो आणि ग्रुपमध्ये आम्ही जेंव्हा चिल करत असतो तेंव्हा तो फक्त माझ्याकडेच बघत असतो. मी त्याला एकदा दोनदा विचारलेसुद्धा की अस का बघत असतोस म्हणून ... तो फक्त स्माईल देत म्हणतो ,' काही नाही ग , सहज..'...????????"

कार्तिक -" अच्छा..."

श्वेता -" होय.... आणि काल मी जेंव्हा कॉलेजला जात होते तेंव्हा तो मला भेटला . तेंव्हा मी एकटीच कॉलेजच्या गेटवरून जात होते. तो मला कँटीनला जाण्यासाठी रिक्वेस्ट केला . मी पण ठीक आहे म्हणाले...."

कार्तिक -" तू हो म्हणणारच ना ... तुला तर फक्त हादडायच असतं...????????"

श्वेता -" कार्त्या... बोलताना का अडवतोस रे... आणि तूच आहेस हावरा.... ????????"

कार्तिक हसत हसत म्हणतो.

कार्तिक -" बर बर... बोल पुढे... ????????????"

श्वेता -" आम्ही दोघे कॅन्टीनमध्ये गेलो . नंतर तो मला पिझ्झा ऑफर केला. मला नवल वाटत होत की तो एकदम चेंज कसा काय झाला?.."

कार्तिक -" त्याला तुझ्याकडून कुठलातरी काम काढायचं असेल...????????"

श्वेता -" मला पण असच वाटल होत . त्याला मी विचारलंसुद्धा की काय काम आहे . तो म्हणाला की कामाविना तुला काही खाऊ घालायच नाही का?.. मी शॉक झाले."

कार्तिक -" तुम्हा मुलींनाच असे ऑफर येतात... "

तो आज रात्रीचा इन्सिडेन्स आठवत म्हणत होता. त्याला विनाकारण आजच्या डिनरचे पैसे देऊ लागले होते.

श्वेता -" ते मला माहिती नाही... पण ते मोमेंट वेगळाच होता. स्पेशल होता एकदमच... मग अचानक ..."

कार्तिक -" मग अचानक काय???"

श्वेता एक मोठा दीर्घश्वास घेत म्हणाली.

श्वेता -" Then He proposed me .... ????????????????"

कार्तिक -" काय???...????????????????????????"

श्वेता -" होय.... तो मला प्रपोज केला."

कार्तिक -" अग पण ??"

श्वेता -" पण काय??... तू पण दुसऱ्या भावांसारखा आहेस. एवढं ओव्हर का रिअॅक्ट करत आहेस ??... तुला मी शेअर केल कारण तू मला बेस्ट फ्रेंडसारखा आहेस.. पण तू तर .."

कार्तिक -" अग ड्रामा क्वीन... मला बोलू तर दे... मी म्हणत होतो की तुझ्यासारख्या चुडेलवर प्रेम कसा काय होऊ शकतो ??...????????????.."

श्वेता -" तुझ तर काही वेगळंच ... कशाला तुझ्यासोबत शेअर करतेय मी..."

कार्तिक -" बर ... ते जाऊदेत ... तू उत्तर काय दिलीस त्याला??"

श्वेता -" अजुन तर उत्तर नाही दिले .. वेळ मागितला आहे .."

कार्तिक -" बर मला सांग... वेळ मागितल म्हणजे नेमकं काय ग??... नाही म्हणजे त्या वेळेत त्याच्याबद्दल प्रेम येत का??... "

श्वेता -" अरे तस नाही... पण एका रिलेशनमध्ये जात असताना सगळीकडचे विचार करावा लागतो ना... त्यासाठी.. "

कार्तिक -" मग तुला त्याच्याविषयी अगोदरच प्रेम होत म्हण की .."

श्वेता - " असू शकत ...????????????"

कार्तिक -" असू शकत म्हणजे ??"

श्वेता -" म्हणजे एवढच की पहिला मित्र म्हणून काळजी होती.  आता लवर म्हणून प्रेम असेल..."

कार्तिक -" म्हणजे तुझा निर्णय झालाय तर ??"

श्वेता -" होय... मी त्याला होकार देणार आहे.."

कार्तिक -" ओह्... छान.... ठीक आहे .... पण एक मात्र सांगतो. रिलेशन एका लिमिटमध्ये असावा... त्याच्या पुढं जाता कामा नये..."

श्वेता -" हो रे.... मला माहिती आहे माझे लिमिट..."

कार्तिक -" बर...  जपून जरा..."

श्वेता -" तुला तुझी अप्सरा मिळाली का नाही ??"

कार्तिक एकदा आतल्या बेडरूममध्ये बघून म्हणाला.

कार्तिक -" नाही..."

श्वेता -" मिळेल ..."

कार्तिक - " ते जाऊदेत.... तू काळजी घे... तू आता मॅचुअर आहेस... डिसिजन चांगला घे... मी सपोर्टमध्ये आहे तुझ्या.. पण सगळे लिमिटमध्ये .... ओके???"

कार्तिक काळजीपोटी म्हणतो.

श्वेता -" हो ब्रो .... "

कार्तिक -" काळजी घे..."

श्वेता -" तू पण .... लव यू... बाय.. गूड नाईट..."

कार्तिक -" लव यू..."

          कार्तिक एवढ बोलून कॉल कट करतो. कॉल कट करताच त्याच्या ओठावर स्मितहास्य पसरते. एक मोठा दीर्घ श्वास सोडून तो जेंव्हा मागे फिरतो , तेंव्हा त्याला दिसत की अलिना तिथे उभी राहून त्याच बोलणं ऐकत होती . 

अलिना -" Ohh... Sorry... "

   कार्तिकला कळून चुकलं की अलिना, त्याच आणि श्वेताच बोलणं ऐकत होती . तसेच त्याची ट्यूबलाईट पण पेटली की तो शेवटी ,' Love you.'. म्हणाला होता. 

कार्तिक -" Sorry for what??"

अलिना -" For listening your conversation ... Actually I'm passing from this way , then I hear your conversation...So sorry... and goodnight.. "

    एवढं बोलून ती कार्तिकच बोलणं न ऐकताच ती बेडरूममध्ये गेली. कार्तिक त्याला थांबू पाहत होता , पण आता ती तिथून नाहीशी झाली होती. तो तिच्या मागे जाण्याच्या प्रयत्न करू पाहत होता , का माहिती नाही ?? पण तो थांबला .

       अलिना आणि स्नेहा दोघीही बेडरूममध्ये झोपी गेले होत्या , अस कार्तिकला वाटत होत . पण आतली परिस्तिथी वेगळीच होती . आत दोघीही जागे होते . झोपण्याचा नाटक करत होते. स्नेहा जागी होती , कारण तिला अलिना आणि कार्तिक या दोघांमधली जवळीक आवडली नव्हती. अलिना जागी होती , कारण आधी ते दोघे प्रेमात एक होत असताना कॉल आला होता आणि कॉलवरच बोलणं ऐकून तिला वाटत होत की कार्तिकला अगोदरच कोणी प्रेम करणारी आहे. कार्तिक जागा होता , कारण स्नेहा आणि अलिना या दोघींना त्याच्याबद्दल गैरसमज झाला होता. त्या रात्री तिघेही जागे होते. 

         सकाळची सूर्यकिरणे खिडकीतून आत येऊ पाहत होती. अलीनाच्या बेड जवळील खिडकीतून अंधुक अस धुके बाहेर दिसत होते . बेडरूमच्या बाहेर असलेल्या सोफ्यावर कार्तिक झोपला होता. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी थोपटावल .  अचानक झालेल्या आघाताने तो जागा झाला. त्याला एक मिनिट तर कळलच नाही की काय झालंय ते...  तो सोफ्यावरून वर बघितला तर स्नेहा उभी होती. जरासा पण वेळ न घालवता तो उठून उभा राहिला. स्नेहा स्माइल देत म्हणाली.

स्नेहा -"  गूड मॉर्निंग ????????????..."

कार्तिक डोळे चोळत म्हणाला. 

कार्तिक -" गूड मॉर्निंग...  एवढं लवकर जागी झालीस?"

स्नेहा -" होय... रूमवर जायचं आहे ना... "

कार्तिक - " मग क्लासला नाही जाणार ??"

स्नेहा -" बघुयात... पहिला रूमवर जाणार.. मग बघते.."

कार्तिक -" त्यापेक्षा इथेच फ्रेश हो ना..."

स्नेहा -" नाही नको... खर तर मला बर वाटत नाहीये... सो... मी रूमवर जाते आणि... मला वाटतं की मी क्लासलासुद्धा नाही येणार..."

स्नेहा खर तर खोटं बोलत होती. तिला आता फक्त ऐकांत हवं होती. स्नेहा अडखळत म्हणत होती. कार्तिकला कसं तरच वाटत होत. 

कार्तिक -" अग खरच इथेच थांब... आपण डॉक्टर कडे जाऊयात..."

स्नेहा -" नाही नको... उगाच तुम्हा दोघांना त्रास..."

हे वाक्य म्हणत असताना ती बेडरूमकडे बघत होती. 

कार्तिक -" अग अस का करत आहेस ?.."

स्नेहा -" खरच काही नाही रे... मी जाते ... बाय...."

एवढं बोलून ती नजर न मिळवताच निघून गेली. कार्तिक पुन्हा एकदा निशब्द थांबला होता....

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती 

हा भाग तुम्हाला आवडला असेल , तर नक्की कमेंट करा... मला नेमकं कळत नाहीये की तुम्हाला ही कथा आवडत आहे का नाही .. मला माहिती आहे उशीर होते आहे खूप ही कथा अपलोड व्हायला, कारण मी आजारी होतो त्यामुळेही असेल..... त्यामुळे प्लीज कमेंट करा..... शेअर करा .... धन्यवाद ????????????????????

🎭 Series Post

View all