तुझी ती भेट भाग -19

Alina is shocked after seeing Kartik and sneha in hug position .

याआधी -

        अलिनाची डायरेक्टर सोबत ठरलेली मीटिंगला घेऊन चिंतेत होती . कारण डायरेक्टरच्या मनात फक्त ती एक भेट नव्हती . तो अलिनाला रात्री एका रिसॉर्टवर बोलावला होता . सकाळी ती लवकर उठून एक चिट्टी कार्तिकसाठी सोडून गेलेली होती . ती सकाळी लवकरच निघाली होती . कारण तीची परिस्तिथी ती कार्तिकला सांगू इच्छित नव्हती . कार्तिक आधीच स्नेहाबद्दल चिंतेत होता . कार्तिक युनिव्हर्सिटीमध्ये स्नेहा केलेल्या वागणुकीमुळे तो युनिव्हर्सिटीला न जाण्याचा निर्णय घेतला . स्नेहाला मात्र तिच्या वागणुकीमुळे  तिलाच वाईट वाटत होत . कार्तिकची माफी मागावी म्हणून ती त्याला फोन करून पाहली , पण तो उचलला नाही . इकडे अलिना मात्र तिच्या मीटिंग बद्दल चिंतेत होती . कॅफेमध्ये ती कॉफी पित विचार करत होती . शेवटी ती स्वतःच याचा निर्णय घेण्यासाठी एका म्यूजियममध्ये गेली . स्नेहा कार्तिकची माफी मागण्यासाठी युनिव्हर्सिटीला निघाली . पण तिकडे गेल्यावर तिथे कुठेच कार्तिक नव्हता . म्हणून शेवटी ती कार्तिकच्या घराच्या दिशेनी निघाली .

-----------------------------------------------------

यापुढे -

        स्नेहा तयार होऊन युनिव्हर्सिटीकडे निघाली . जाताना पुन्हा एकदा ती कार्तिकला फोन लावली . काही रिंग झाल्यावर फोनची रिंग आपोआप बंद झाल . तिला कळून चुकलं कि कालच्या प्रसंगावरून कार्तिक रागावला आहे  . काहीवेळात ती युनिव्हर्सिटीत पोहचली . ती सर्वात आधी कँटीनमध्ये गेली . तिथे कार्तिक कुठेच नव्हता . काळजीत ती त्याच्या वर्गात पोहचली . अजून तास सुरु झालेली नव्हती . पण कार्तिक तिथेही नव्हता . आता स्नेहा काळजीत पडली. काहीही विचार न करता ती कार्तिकच्या घराकडे निघाली .

        ती रागातही होती आणि चिंतेतही होती . कार्तिकला काही झालं तर नसेल ना ? यामुळे ती चिंतेत होती आणि कार्तिक फोन का उचलत नाहीये ? यामुळे तिला राग आल होत . तिचे पाऊल पटपट पडत होते . तिच्या डोक्यात अनेक विचार येत होत्या . भराभर पाऊले टाकत ती अखेर कार्तिकच्या घरासमोर उभी राहिली . तीच श्वास फुलून येत होत . अगदी थकलेल्या परिस्तिथीत ती गेट उघडून घराच्या दारात उभी राहिली .

       तिने दारावरील घंटी वाजवली . आतून घंटी वाजल्याचा आवाज आला . आतून दाराजवळ कोणीतरी आल्याचा सुद्धा आवाज आला . कार्तिक दार उघडला . कानात हेडफोन घालून तो गाणं गुणगुणत होता . समोर स्नेहाला पाहताच तो कानावरील हेडफोन काढला . एक क्षण दोघांची नजर एकमेकांना भिडली . तेवढ्यात स्नेहा म्हणाली .

स्नेहा -" मी आत येऊ शकते का ?"

कार्तिक अडखळत म्हणाला .

कार्तिक -" हा ये की ."

      सोफयावर बॅग ठेवून ती पण सोफयावर बसली . कार्तिक किचनमध्ये गेला . स्नेहाला कुठून बोलायची सुरुवात करायची याचच  विचार करत होती . कार्तिक किचेन मधून पाण्यानी भरलेला  पेला आणला . स्नेहा त्यातून एक घोट पीत म्हणाली .

स्नेहा -" आज युनिव्हर्सिटीला नाही आलास ?"

कार्तिक -" हो .. आज मूड नव्हता ."

स्नेहा -" का ?"

कार्तिक -" का म्हणजे ?"

स्नेहा -" काहीतरी कारण असेल ना न येण्याचं ?"

कार्तिक तिच्याकडं तिरकं कटाक्ष टाकत म्हणाला .

कार्तिक -" काल घटनाच अशी घडली होती ."

    स्नेहा जीभ चावली आणि तिच्या कालच्या वागण्याचा परत तिला आठवण आलं . 

----------------------------------------------

        इकडे अलिना म्युझिअममध्ये वेळ घालवत होती . कॅलिफोर्नियाच्या इतिहासासंबंधी खूप वस्तू तिथे ठेवलेले होते. त्या वस्तूंचे माहितीसुद्धा तिथे उपलब्ध होते . अलिना शरीराने तिथे होती खरं पण मनानी ती वेगळीकडेच होती . तिच्या डोक्यात आजच्या डायरेक्टर सोबतच मीटिंगच्या बाबतीत विचार चालू होते . मीटिंग नव्हे डायरेक्टर स्वतःची शारीरिक भूक भागवणार होता आणि त्या बदल्यात तो तिला शॉर्ट फिल्ममध्ये संधी देणार होता . हि गोष्ट अलिना ओळखून होती . ती याच विचारात हरवून गेली होती . 

      इतक्यात तिला हेअर्स्ट किल्ल्याची माहिती म्युजीएममध्ये दिसली . माहिती समोर त्या किल्ल्याच फोटोही लावलेली होती . कॅलिफोर्नियाच्या इतिहासामध्ये त्या किल्ल्याची वेगळीच जागा होती . पण अलिनाच्या आठवणीत या किल्ल्याबाबतीत वेगळी भावना होती . हि तीच जागा होती , जिथे कार्तिक , स्नेहा आणि हि स्वतः सहलीसाठी गेले होते . 

     त्या फोटोला बघून अलिनाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली  होती . ती त्या किल्ल्यातील आठवणी आठवत होती . कार्तिक कसा तिला त्या किल्ल्यावरची लव्हर पॉईंट दाखवण्यासाठी घेऊन गेला होता ? तो फक्त तिलाच घेऊन त्या लव्हर पॉईंटला गेला होता . त्यात सूर्यास्त होत होता . त्या सूर्याच्या किरणांमध्ये या दोघांचं जवळीक वाढत होती . ते क्षण आठवतच अलिनाच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशीची भावना दिसत होती . त्या क्षणीच अलिना कार्तिकच्या प्रेमात पडली होती . त्याच प्रेमापोटी ती कार्तिकला स्वतःच समस्या सांगत नव्हती . पण त्या किल्ल्याच्या अनभुवलेल्या क्षणाला आठवून तिला वाटू लागलं कि कार्तिकच असा होता , ज्याच्याकडे ती काहीही समस्या वाटू शकत होती . 

      तीच एक मन म्हणत होत कि कार्तिकला त्रास नको देऊस आणि दुसरं मन म्हणत होत कि कार्तिकला आपली समस्या सांग . त्याच विचारात ती गोंधळून गेली होती . अखेर ती एक निर्णय घेतली कि कार्तिकला आजच्या मीटिंग बद्दल सांगून टाकावं . हे निर्णय घेताच ती तिथून बाहेर पडली आणि घराच्या  दिशेनी निघाली .

------------------------------------------

     स्नेहा आणि कार्तिक या दोघांचे गप्पा सुरूच होणार होती . पण स्नेहाला कालच्या घडलेल्या प्रसंगाबाबतीत पश्चाताप वाटत होत . त्यामुळे माफी मागण्यासाठी तिला थोडं वेळ लागत होत . त्या शांततेच्या वातावरणात कार्तिक म्हणाला .

कार्तिक -" तू पण युनिव्हर्सिटीला गेली नाहीस ?"

स्नेहा - " सहजच ."

कार्तिक -" खरंच ?"

स्नेहा -" नाही . म्हणजे कालच्या प्रसंगाबाबतीत मला वाईट वाटत होत . म्हणून तुला फोन केले होते . तू उचलला नाहीस . म्हणून थेट घरीच आले ."

कार्तिक -" म्हणजे मॅडम माफी मागायला आलेत तर .."

स्नेहा -" तस म्हणू शकतोस ."

कार्तिक -" मग ?"

एक क्षण शांतता पसरली . अखेर स्नेहा म्हणाली .

स्नेहा -" मला माफ कर कार्तिक . काल मी जास्तच रिऍक्ट केले होते . मी असं करायला नको होत . सॉरी "

कार्तिक -" इट्स ओके ..."

कार्तिक अस म्हणताच स्नेहाला समाधान वाटलं . 

कार्तिक -" पण तू काल तशी रिऍक्ट का झालीस ?"

     स्नेहा आता गप्प होती . त्याच्या प्रश्नाच उत्तर ती द्यायला घाबरत होती . तिच्या हृदयाचे ठोके बाहेर पर्यंत ऐकू येत होते . 

स्नेहा -" सहजच ."

     ती वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू लागली . पण कार्तिक मात्र हुशार होता . तो विषय सोडून देणार्यांपैकी नव्हता . 

कार्तिक -" सहज ???"

स्नेहा मात्र अजून शांत होती . 

कार्तिक -" काहीतरी कारण असेल ना ?"

स्नेहा अजून शांत बसलेली होती . कार्तिककडे ती बघतही नव्हती .

कार्तिक -" अग सांग ना ."

कार्तिक जोर देऊन विचारात असल्याने ती अखेर बोलली .

स्नेहा -" मी तुझ्यावर रागावले होते ."

कार्तिक -" माझ्यावर ?"

स्नेहा -" हा ..."

कार्तिक -" का ? मी काय केलाय ?"

    स्नेहा एक वाक्य म्हणल्यावर शांत बसत होती . म्हणून कार्तिकचे प्रश्नही वाढत होते .

कार्तिक -" सांग ना ?"

स्नेहा -" कारण , हेअर्स्ट किल्ल्यामध्ये तुझ्यात आणि अलिनामध्ये जवळीक वाढली होती ."

कार्तिक -" काय ???"

कार्तिकला काही कळेनासं झाल होत . 

कार्तिक -" अग ती सहल अलिनासाठी गरजेचं होत . तिला डिप्रेशन मधून बाहेर काढायचं होत . त्यात जवळीक वाढणारच ना . पण मला समझेना त्यासाठी तू का रागावलीस ?"

     कार्तिकच्या एका नंतर एक प्रश्न येत होते म्हणून ती चिढत होती . शेवटी न राहवून ती जरा आवाजानेच म्हणाली .

स्नेहा -" Because , I love you damn it .”

हे वाक्य ऐकताच कार्तिकला एक प्रकारे धक्काच बसला . 

कार्तिक -" काय ???"

स्नेहा -" हा .... मी प्रेम करते तुझ्यावर .. एवढं कळत नाही का ?"

     तिच्या हृदयाचे ठोके बाहेर पर्यंत ऐकू येत होते . ती प्रेमाची कबुली देत असताना तिचे श्वास फुलू लागली होती . न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले . 

स्नेहा -" माझं हृदय कधीच तुझं झालं आहे कार्तिक  ."

कार्तिक निशब्द झाला होता . अचानक स्नेहा सोफ्यावरून उठली आणि  कार्तिकच्या मिठीत गेली .

स्नेहा  -" I love you Kartik ... I really do ...”

      कार्तिक मात्र तसाच स्तब्ध उभा होता .इतक्यात अलिना घरी आली . धावतच ती बेडरूममध्ये शिरली . ती पुढे पाहती  तर स्नेहा कार्तिकच्या मिठीत होती आणि  तिच्या तोंडून ' I love you  ' ऐकताच ती दारात जागीच थांबली . तिलाही धक्का बसलेला होता . कार्तिक स्नेहाच्या मिठीत होता . पण त्याच लक्ष अलिनाकडे गेलंच नाही . अलिना पुढचं दृश्य बघून समझून गेली कि स्नेहा आणि कार्तिक प्रेमजोडे आहेत . पण तिला हे माहिती नव्हतं कि कार्तिक काहीच बोलला नव्हता . तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले . ती अश्रू पुसत धावतच बाहेर गेली . स्नेहा अजून कार्तिकच्या मिठीत होती .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

हा भाग उशिरा आला . कारण मला डेंगू झालेला होता . आजकाल याची साथ आलेली आहे . त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या आणि गणेशउत्सवाचे खूप खूप शुभेच्छा .. हा भाग कसा वाटला नक्की सांगा . पुढील भाग लवकरच येईल . धन्यवाद ...

🎭 Series Post

View all