तुझी ती भेट भाग -18

Alina is disrubed by the director but she didnt share with kartik . Because he already have one stressful topic of sneha

याआधी -

      कार्तिक स्नेहाच्या त्या वागणुकीमुळे रागात घरी जात असताना त्याला श्वेताचा फोन येतो .श्वेतासोबत बोलत असताना श्वेता त्याला सांगते कि तो स्नेहा आणि अलिना यांच्यात कन्फयुज आहे . हे कार्तीकलाही पटत म्हणून तो विचार करतच घरी पोहचतो . घरी अलिना आधीच पोहचली होती . तिच्या ऍडची शूटिंग चांगली पार पडली होती . पण त्याचा डायरेक्टर तिला शॉर्ट फिल्म मध्ये घेईन असं सांगून रात्री रिसॉर्टला बोलवला होता . त्या डायरेक्टरचे इशारे अलिना समझून घेतली होती . ती कार्तिकला सांगू पाहत होती , पण कार्तिक स्नेहाच्या वागणुकीमुळे आधीच वैतागला होता . त्याला त्रास न देता ती काही न सांगता झोपी गेली . सकाळी त्या डायरेक्टरचा मेसेज अलिनाच्या मोबाइल मध्ये आला . त्यात रात्रीची वेळ आणि रेसॉर्टच पत्ता लिहिलेला होता . तिच्या गालावरून फक्त अश्रू वाहू लागलं .

-----------------------------------------------------------

        अलिनाला रात्र एकदम भयानक वाटत होती . त्या रात्रीची शांतता तिला खाऊन जाणारी होती . त्यात उद्या डायरेक्टरला भेटायला जायचं होत . याच विचारात तिला झोपच लागत नव्हती . विचार करता करता ती झोपी गेली . 

       सकाळची कोवळी ऊन खिडकीतून आत येत होती . त्याच किरणाने कार्तिकला जाग आली . तो उठला खर पण त्याच्या डोक्यात स्नेहाच विचार चालू होत . ती का अशी वागते ? ती काल रागात का बोलली ? अश्या कित्येक प्रश्नांची उत्तर तो शोधू पाहत होता . काल घडून गेलेली घटना त्याच्या मनात गोंधळ निर्माण करत होती . जसा तो कालचा घटना आठवत होता , तसा त्याच स्वाभिमान दुखू लागलं . शेवटी रागात येऊन तो आज युनिव्हर्सिटी मध्ये न जाण्याचा निर्णय घेतला . अखेर तो बेडवरुन उठला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमजवळ जाऊ लागला . तेवढ्यात त्याला आठवलं कि अलिना अजून झोपी असणार . तो तिला उठवायला म्हणून तिच्या रूममध्ये गेला , तर ती तिच्या रूममध्ये नव्हती . एवढ्या सकाळी उठण्याची सवय अलिनाला नव्हती . म्हणून तो थोडा काळजीत होता . पूर्ण घर शोधला तरी तिचा पत्ता लागत नव्हता .

      अखेर तो स्वयंपाक घरात गेला . तिथल्या टेबलावर त्याला एक चिट्टी दिसली . तो चिट्टी घेऊन वाचू लागला . 

' Good morning KARTIK,

I have one important work . So I left the house early morning .I made the breakfast . Do your breakfast. Have a good day dear .’

      ती चिट्टी वाचून तो जरा गोंधळला . आजच्या काळात मोबाइल असून हि चिट्टी का सोडली ? आणि असलं कसलं काम आलं ? अशे प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले . यावर जास्त विचार न करता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळला . 

      इकडे हॉस्टेलमध्ये स्नेहा नुकतीच उठली होती . डोळे चोळत ती तशीच बेडवर बसली होती . डोळ्याच्या खाली काळे डाग पडले होते . त्यावरून कळत होत कि ती रात्री उशिरा झोपली होती . तीच मन तर अगदी उदास होऊन गेलेलं होत . जेंव्हा जेंव्हा ती ट्रीपमधील अलिना आणि कार्तिकच्या जवळीक निर्माण झालेली क्षण आठवते , तेंव्हा ती अगदी उदास होऊन जात असे . कालच्या क्लास बाहेरील घटने नंतर तर तिला अजून वाईट वाटत होत . कार्तिकची चुकी नसताना ती त्याला रागावली होती . 

       कालच्या त्या वागण्यामुळे कार्तिक कसा वागेल ? याची चिंता तिला लागून होती . काल झालेल्या प्रसंगाबाबतीत तिला आता वाईट वाटत होत . कार्तिकला माफी मागावी म्हणून ती त्याला फोन केली  . कित्येकदा रिंग गेल्यावरही फोन उचलला जात नव्हता . तिला वाटल कि कालच्या तिच्या वागणुकीमुळे कार्तिक रागावला . शेवटी ती विचार केली कि युनिव्हर्सिटी मध्ये जाताच कार्तिकला माफी मागावी . म्हणून ती उठली आणि तयार होऊ लागली .

       इकडे कार्तिक नाश्ताचा आस्वाद घेत होता . त्याचा फोन चार्जिंगला लागून होती . नाश्ताच आस्वाद घेऊन झाल्यावर तो  उठला आणि फोन घेतला . फोन सायलेंट वर होता म्हणून स्नेहाचा आलेला फोन त्याला ऐकू आलेला नव्हता . हे बघताच तो तिला फोन करणारच होता , पण कालच्या प्रसंग आठवला आणि फोन न करण्याचा निर्णय घेतला . 

-----------------------------------------------------

      एका कॉफी शॉपमध्ये अलिना एकटीच शून्यात बघत बसली होती . आज तिच्या मन विरुद्ध काम होणार होत . पण ते काम केलं नाहीतर तिचा करिअर पुढं वाढणार होत . कार्तिकला तर काम आहे म्हणून चिट्टी सोडली होती . कारण तिला आजचा डायरेक्टरचा विषय कार्तिकला सांगू वाटत नव्हतं . तो आधीच कालच्या प्रसंगावरून चिंतेत होता , ती अजून त्याला चिंतेत भर घालणार नव्हती . तिला आजच्या दिवसाचा निर्णय घ्यावं लागणार होत . तीच एक मन म्हणत होत कि कार्तिकला सगळं काही सांगून टाकावं . तर तीच दुसरं मन म्हणत होत कि हा आयुष्य तिचा आहे आणि निर्णय हि तिलाच घ्यावं लागणार आहे . याच विचारात ती हरवून गेली होती . याच विचारात ती कॉफी पित होती . एक कप झालं , दोन कप झालं , असं करता करता सहा कप कॉफी  पिली . तरीही तिच्या प्रश्नाच उत्तर तिला भेटत नव्हतं . एक दीर्घ श्वास घेऊन ती अखेर उठली आणि पैसे देऊन कॅफेच्या बाहेर पडली .  

      तिला बाहेर फिरूनच अख्खा दिवस काढणार होती . डायरेक्टर तिला रात्रीची वेळ दिला होता . त्याच संदर्भात विचार करण्यासाठी तिला वेळ हवा होता . अशीच मन व्यस्त ठेवण्यासाठी ती एका  ऐतिहासिक संग्रालयमध्ये गेली . 

-------------------------------------------------------

      स्नेहा तयार होऊन युनिव्हर्सिटी कडे निघाली . जाताना पुन्हा एकदा ती कार्तिकला फोन लावली . काही रिंग झाल्यावर फोनची रिंग जाण्याचं बंद झाल . तिला कळून चुकलं कि कालच्या प्रसंगावरून कार्तिक रागावला होता . काहीवेळात ती युनिव्हर्सिटीत पोहचली . ती सर्वात आधी कँटीन मध्ये गेली . तिथे कार्तिक कुठेच नव्हता . काळजीत ती त्याच्या वर्गात पोहचली . अजून तास सुरु झालेली नव्हती . पण कार्तिक तिथे नव्हता . आता स्नेहा काळजीत पडली. काहीही विचार न करता ती कार्तिकच्या घराकडे निघाली .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

मला माहिती आहे . हा भाग खूप उशिरा आलेला आहे . पुढील भाग नक्कीच लवकर येईल . मी खर तर लिखाण सोडून देणार होतो . मग वाटलं कथा तरी पूर्ण करावी . हा भाग छोटा आहे . पण कस वाटलं नक्की सांगा .

🎭 Series Post

View all