तुझी ती भेट भाग-17

Alina Agree The Offer Of The Director But She Think About Sneha And Kartik
याआधी -

ट्रीपवरून आल्यापासून स्नेहा कार्तिकला टाळत होती . याच कारण मात्र कार्तिकला ठाऊक नव्हतं . म्हणून तो फोन करून विचारू पाहत होता . पण स्नेहा फोन उचलत नव्हती . ट्रीपमधील आठवणी आठवत स्नेहा रात्री रडता रडता झोपी गेली होती . सकाळी अलिना आणि कार्तिक लवकर निघाले . कार्तिकला स्नेहासोबत बोलायचं होत आणि अलिनाला ऍडच्या शूटिंगसाठी जाणार होती . अलिना सूटिंग उत्तम रित्या पार पाडली .शूटिंग संपल्यानंतर डायरेक्टर तिला शॉर्ट फिल्मचा ऑफर देतो , पण तिला उद्याच्या रात्री हॉटेलमध्ये भेटायला बोलवतो . अलिना त्याचा इशारा समजून घेतली होती . इकडे स्नेहा कार्तिकला टाळत होती . म्हणून वर्गाच्या बाहेर कार्तिक स्नेहाला रोखून धरतो . टाळण्याचा कारण विचारताना स्नेहा ओरडून त्याला रागवती . आजूबाजूचे सगळे त्यालाच पाहत होते . तो रागातच घराकडे निघाला .

-----------------------------------------------------------

यापुढे -

मोठ्यांनी ओरडल्याने कार्तिक तिला सोडून दिला . बाकी आजूबाजूचे त्यालाच पाहू लागले . तीही काही न म्हणताच निघून गेली . कार्तीकलाही आता राग आलेला होता . तो रागात परत घराकडे निघू लागला . तेवढ्यात त्याचा फोन वाजला . स्क्रीनवर श्वेता च नाव झळकत होत . तो रस्त्यावरून जात असताना फोन उचलला .


कार्तिक -" हॅलो ..."


श्वेता -" विसरला का काय आम्हाला ? किती दिवस झाले फोन नाही केलास ."


कार्तिक -" श्वेता ... माझं मूड चांगलं नाहीये ."


श्वेता -" का काय झाल?"


तो वाटेत थांबला आणि दीर्घश्वास घेतला आणि सांगू लागला .ट्रीपपासून ते स्नेहानी युनिव्हर्सिटीमध्ये काय केलं इथपर्यंत तो सांगितला .


श्वेता -" अच्छा ... मग तू कन्फयुज आहेस ."


कार्तिक -" काय ?? कश्यात कन्फयुज आहे ?"


श्वेता -" अलिना आणि स्नेहा मध्ये ?"


कार्तिक -" काही काय बोलतेस ?"


श्वेता -" खरच ..."


कार्तिक -" कशावरून वाटल तुला ?"


श्वेता -" मग का तू अलिना उदास असताना किल्ल्यामध्ये घेऊन गेलास ते हि ट्रीपमध्ये फिक्स नसताना ? आणि तू स्नेहाला का वारंवार कॉल करतोयस ?"


कार्तिक निशब्द झाला . नंतर तो म्हणाला .


कार्तिक -" कारण मला त्यांची काळजी वाटते ."


श्वेता -" तेच म्हणते मी कि का काळजी वाटते ?"


कार्तिक -" आता याच उत्तर काय सांगू मी ..."


श्वेता -" हे बघ म्हणले ना मी कि तू कॉन्फयुज झालास ते ..."


कार्तिक -" मग मी आता काय करू ?"


श्वेता -" मला वाटत तू यावर विचार करावं आणि निर्णय पटकन घ्याव."


कार्तिक -" कसला निर्णय ?"


श्वेता -" कि कुणावर तूच प्रेम आहे ."


कार्तिक -" प्रेम .... वेडी झालीस का ? प्रेम खूप मोठा विषय आहे ."


श्वेता -" मोठा विषय आहे म्हणून तर कॉन्फयुज आहेस तू ..."


कार्तिक थोडावेळ शांत झाला . कुठंतरी त्यालाही श्वेताच म्हणणं पटत होत .


कार्तिक -" तू कुठे आहेस ?"


श्वेता -" आता उठले ."


कार्तिक -" आता उठलीस ??"


श्वेता -" इथे सकाळ झालीये . तू कॅलिफोर्नियामध्ये आहेस . विसरलास का ?"


कार्तिक -" अरे हा ... मम्मी , पप्पा कसे आहेत?"


श्वेता -" मस्त आहेत ... "


कार्तिक -" तू काळजी घे ... नंतर कॉल करीन तुला ?"


श्वेता -" तू सुद्धा काळजी घे . बाय ."


कार्तिक -" बाय .."


श्वेताशी बोलून त्याला जरा बर वाटल . घराकडे निघताना तो श्वेताच बोलण्याचा विचार करत होता . बघता बघता घर कधी आल , त्यालाही कळल नाही . आतमध्ये जात असताना त्याला कळलं कि दार उघडाच होता . अलिना आहे असा अनुमान तो मानला आणि आतमध्ये गेला . रात्र झाली असताना सुद्धा लाईट चालू नव्हती . अलिना आली आहे का नाही अशी शंका त्याला येऊन गेली . म्हणून तो दारातूनच ओरडला .


कार्तिक -" अलिना ..."


आतूनच ती आवाज दिली .


अलिना -" I\"m here ..."


त्या आवाजाच्या दिशेनी तो जाऊ लागला आणि जात असताना तो लाईट चालू करत होता . अलिना वरच्या गॅलरीमध्ये बिअर पीत बसली होती . कार्तिक त्याचा बॅग सोफ्यावर ठेवत म्हणाला .


कार्तिक -" Hey .... Why are you here ? And like this ?"


अलिना -" What do you mean ?"


अलिना -" means lights are off and you are sitting here ."


अलिना बाहेर बघत म्हणाली .


अलिना -" I came here before 3 hours , thats why I forgot to light on ."


कार्तिक त्याच्याजवळ येऊन बसला .


कार्तिक -" You are drunked . Once again , sneha warns you to not drink the beer ."


अलिना त्याच्याकडे रागाने पाहत होती .


कार्तिक -" Ok calm down ...Actually I want to drink also ."


अलिनाला नवलच वाटल. ती तिच्या बॅगमधून एक बिअरची कॅन काढून कार्तिकला दिली . तो कॅन घेतला आणि ओपन करून एक घोट पिला . तोही बाहेर पाहत होता . संद्याकाळच्या शांत वातावरणामध्ये मन अगदी शांत झालेलं होत .


कार्तिक -" Hey ... How was your day and add shoot ?"


अलिना -" Its good experience for me .."


कार्तिक -" That\"s the reason you start drinking beer ."


अलिना तिच्या त्या अवस्थेची खर कारण सांगणार होती . पण कार्तिकही शांत वाटत होता .


अलिना -" What happened ? You are looking like upset doll ."


कार्तिक एक घोट घेतला आणि तिला झालेल सर्वकाही सांगितला . अलीनाही त्याला लक्षपूर्वक ऐकत होती .


अलिना -" Now ... What do you think ?"


कार्तिक -" I think she needs some time ."


अलिना -" You have to talk with her ."


कार्तिक -" I tried . She insults me infront of everyone ."


अलिनाला स्नेहाच्या त्या वागण्याचं कारण माहिती होत . पण ती त्याला सांगू शकत नव्हती . तिच्यासोबत डायरेक्टर कस वागला आणि काय म्हणाला हेही ती त्याला सांगू शकत नव्हती . कारण कार्तिकच अपसेट झालेला होता . अलिना हळूच कार्तिकचा हात हातात घेतली .


अलिना -" Don\"t worry . Everything will be fine ."


तिच्या त्या स्पर्शाने कार्तिक हडबडला . पहिल्यांदा त्याचा हृदय धडकू लागल होत . का कुणास ठाऊक ? तो स्पर्श त्याला पहिल्यांदा झाल्यासारखी वाटत होती .


अलिना -" Now come on . We have to eat our dinner ."


कार्तिक -" but where is the food ."


अलिना -" Dont worry . I already took this from hotel ."


ती हातात बॅग घेत म्हणाली . दोघेही शांतपणे जेवू लागले . अलिनाच्या मनात खुपसारे विचार चालू होते . स्नेहाशी बोलावे का ? कार्तिकला कस समजून सांगाव ? आणि त्या डायरेक्टर विषयी काय करायचं ? अश्या कित्येक प्रश्न तिला सतावत होती .

ते दोघे जेवून झोपायला गेले . पण दोघेही जागे होते . कार्तिक स्नेहाशी कस आणि काय बोलायचं याच विचार करत होता आणि अलिना कार्तिक आणि स्नेहा विषयी तर विचार करतच होती , पण त्या डायरेक्टरचा विचार हि तिला करायचं होत . खूप सारे चान्स ती गमावली होती . पण हि चान्स तिला गमवायचा नव्हता . जर ती त्याला नकार दिली तर ऍड शूटही कॅन्सल होण्याची शक्यता होती . नाईलाज म्हणून ती त्याला भेटण्यासाठी जाणार होती . इतक्यात तिच्या फोनवर मेसेज आल्याचा आवाज आला . त्या डायरेक्टर काढून मेसेज होता .

\" Meet tomorrow for fun baby ."


हॉटेलच्या ऍड्रेस आणि टाइम हि त्यात लिहिलेलं होत . हे बघून ती फक्त स्माईल असलेली ईमोजी पाठवली . नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते .


*******************************


क्रमशः


ऋषिकेश मठपती


पुढील भाग लवकरच .... हा भाग कस वाटल नक्की कळवा ... आणि मला फॉलो करा ... आवडल्यास नक्की शेअर करा .... धन्यवाद