या आधी-
ट्रीपमध्ये अलिना आणि कार्तिकच्या मध्ये जवळीक स्नेहाला खटकते . सकाळी उठल्यापासून ते परत कॅलिफोर्नियाला येई पर्यंत ती जास्त काही बोलत नव्हती . हे बघून कार्तिकला बोलावंसं वाटत होत . पण तो नंतर बोलण्यासाठी टाळत होता . कॅलिफोर्नियाला आल्यावर ती थेट त्याच्या होस्टेलला निघून गेली .
------------------------------------------------------------
यापुढे -
स्नेहा -" नाही नको ... जाते . अलिनाला हि सांग . बाय "
असं म्हणत ती कार्तिकच पुढचं बोलणं न ऐकताच निघाली . कार्तिकच्या मनात कित्येक प्रश्न उत्पन्न झालेले होते . बाकीचे सर्व सामान घेऊन तो आतमध्ये गेला . अलिना प्रवासाने थकलेली होती . त्यामुळे रूममध्ये जाताच ती बेडवर आडवी झाली . कार्तिक विचार करत आत आला .
अलिना -" Im little bit tired ..."
कार्तिक -" Me too ..."
थोडावेळ आराम म्हणून ते दोघे आडवे झाले होते . आता जेवण बनवण कुणालाही शक्य नव्हतं . त्यामुळे कार्तिक बाहेरून जेवण मागवला . दोघेही लवकर झोपण्यासाठी गेले . जाताना कार्तिक एकदा स्नेहाला कॉल लावला . कित्येक रिंग झाले ,तरीही ती फोन उचलली नव्हती . कार्तिकला थोडीशी काळजी वाटू लागली .
टॅक्सी होस्टेलच्या समोर उभी होती . स्नेहा मागच्या डिकीतून बॅग काढली आणि हॉस्टेलमध्ये आली . तिच्या मनात भावनांचे लाट उसळत होते . रूममध्ये पोहचल्यावर तिने बॅग ठेवली आणि बेडवर आडवी झाली . तिची नजर वर पाहत होत्या . तिच्या मनात कालचेच क्षण येत होत्या . अलिना व कार्तिक जवळ उभे असणं . नंतर तोच ती आणि तो फक्त मैत्रीण असल्याचं सांगणं . त्यानंतर तळेच्या किनारी अनुभवलेले क्षण तिच्या डोळ्यासमोर येत होते . हे सगळ आठवून तिच्या डोळ्यातून अश्रू खाली वाहू लागल . तेवढ्यात तिच्या जवळचा मोबाइल वाजला . अश्रू पुसत तिने फोन पाहिल तर कार्तिक फोन करत होता . काही विचार न करता ,ती फोन कट केली . कार्तिकला नवल वाटल . उद्या युनिव्हर्सिटी मध्येच भेटून बोलूयात म्हणून तो परत फोन केला नाही . इकडे मात्र स्नेहा परत त्याच कडू आठवणी आठवत होती . अचानक तिला रडू कोसळलं . जवळची लोडला मिठी मारत ती रडू लागली . रडत असतानाच तिला झोप लागली आणि काहीही न खाता ती झोपी गेली .
सकाळची वेळ होती . कार्तिक नुकताच उठला होता . अलिनाला उठण्यासाठी तो अलिनाच्या बेडजवळ गेला .
कार्तिक -" alina ... Wake up .. You have to go for ad shoot ."
हे ऐकताच अलिना एका झटक्यात उठली . उठून ती थेट फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली . इकडे कार्तिक नाश्ताची तयारी करत होता . त्यालाही युनिव्हर्सिटी मध्ये जायचं होत आणि महत्वाचं म्हणजे स्नेहासोबत त्याला बोलायचं होत .
अलिना फ्रेश होऊन बाहेर आली . तयार होण्यासाठी तिने तिच्या रूममध्ये गेली . कार्तिक हि फ्रेश होऊन आला . शूटिंगला जाण्यासाठी तिला लवकर जावं लागणार होत . कारण शुटिन्गच ठिकाण खूप दूर असल्याने तिला आधीच निघाव लागणार आणि तिला लेट पोहचण्याची इच्छा नव्हती .कार्तिक नाश्ता टेबलावर ठेवला होता .
कार्तिक -" Alina ... Get your breakfast ."
अलिना -" Yes ... Coming ."
अलिना आरश्यात बघून हलकीशी लिपस्टिक लावत होती . तयार होताच ती पर्से सहित नाश्ता करण्यासाठी टेबलाजवळ आली . कार्तिकही आलिनासोबत नाश्ता करण्यासाठी आला .त्याला स्नेहाविषयी तिला बोलायचं होत , पण आज तीच शूटिंग असल्याने तो काही विषय काढला नाही . नाश्ता संपवून अलिना जाण्यासाठी निघाली .
कार्तिक -" Alina ...All the best .."
अलिना -" Thank you .."
गुडबाय हग करून अलिना निघाली .
कार्तिक -" Alina ... Do your best ..."
अलिना -" Yeah ... Thank you ... I will be come soon ."
कार्तिक आता मोकळा होता . तो स्नेहाला शेवटचा फोन लावला . खूप वेळा रिंग होऊनही स्नेहा फोन उचलली नाही . वैतागून तो तिला मेसेज केला .
' स्नेहा .... आज कॅन्टीनजवळ भेट ... तुझ्याशी बोलायचं आहे . '
मेसेज पाठवून तो युनिव्हर्सिटीला जाण्यासाठी तयार होऊ लागला . भेटायचं असेल तर लवकर निघावं लागेल म्हणून तो घर लवकर सोडला .
युनिव्हर्सिटीतला वातावरण अगदी उत्साही वाटत होत . कार्तिक कॅन्टीनमध्ये स्नेहाची वाट पाहत बसला होता . खूप वेळ झाल तरीही हीच काही पत्ता लागत नव्हता . न राहवून तो कॉल केला . ती फोन उचलत नव्हती . कार्तिकला काय करावे समझत नव्हतं . लेक्चरला जायची वेळ झाली होती . लेक्चर संपल्यावर घरी जाताना स्नेहाच्या वर्गाबाहेरून जाऊयात हा विचार तो केला आणि वेळ न घालवता तो लेक्चरला गेला .
काही तासाच्या प्रवासानंतर अलिना शूटिंग स्पॉटवर पोहचली होती . डायरेक्टर तिला स्क्रिप्ट वाचण्यास सांगितला होता म्हणून ती मेकअप करत असतानाच स्क्रिप्ट वाचत होती . मेकअप आर्टिस्ट तिला मेकअप करत होता .
डायरेक्टर -" are you ready ?"
अलिना -" Yeah ..."
डायरेक्टर -" lights , roll camera , and action ..."
अलिना डायलॉग बोलू लागली .
डायरेक्टर -" Cut ..."
हे ऐकून अलिना एकदमच थांबली .
डायरेक्टर -" you have to take the product in your hand ."
अलिना -" Ok sir ... One more shot please ..."
डायरेक्टर -" ok ... Roll camera and action .."
अलिना पुन्हा डायलॉग बोलू लागली आणि बोलत असताना ती प्रॉडक्ट उचलून उरलेली डायलॉग म्हणू लागली .
डायरेक्टर -" and cut .... Amazing shot ... Very good alina .."
अलिना -" Thank you sir .."
डायरेक्टर -" Lets take 5 more shoot ..."
अलिना -" ok .."
त्याच प्रॉडक्टची अजून 5 ऍड ची शूटिंग करताना दुपार सरली . आता पॅकअप करण्याचं ठरलं . अलिना तिच्या रूममध्ये तयार होत होती . इतक्यात तिच्या रूममध्ये डायरेक्टर आला .
डायरेक्टर -" You are awesome alina ."
अलिना स्माईल करत म्हणाली
अलिना -" thank you sir .."
तो अजून तिच्या जवळ जाऊ लागला .
डायरेक्टर -" I have an offer to you ..."
असं म्हणत तो तिच्या पाठीवर हात फिरवू लागला . हा स्पर्श अलिनाला नकोस वाटत होत . तरीही ती काहीही भावना न दाखवता म्हणाली .
अलिना -" Whats that ?"
डायरेक्टर -" I have one short film for you ."
त्याचा पाठीवरचा हात अजून जरा खाली जात होता . अलिनाला हा चान्स घालवू वाटत नव्हता .
अलिना -" Yeah .."
डायरेक्टर -" But I want a favour ."
अलिना -" Whats that ?"
डायरेक्टर -" You have to come to the resort tomorrow night .."
अलिना त्याचा इशारा समजली होती . ती फक्त स्माईल करत पर्से उचलली आणि बाहेर पडली . डायरेक्टर हि खुशीत होता . पण अलिना मात्र आतून अगदी दुःखी होती . बाहेर येऊन ती थेट टॅक्सी पकडली . आत बसताच तिच्या गालावरून अश्रू वाहू लागली .
संद्याकाळ होत आलेली होती . कार्तिक स्नेहाच्या वर्गाबाहेर थांबला होता . इतक्यात तिच्या वर्गातले मुलंमुली बाहेर येऊ लागले . हे पाहताच तो स्नेहाला शोधू लागला . स्नेहा खाली मान घालून येत होती . बाहेर येताच तो तिचा हात पकडला . हात पकडल्याचे जाणवताच ती वर पाहिली .
कार्तिक -" स्नेहा .. काय झालाय तुला ?"
स्नेहा -" हात सोड कार्तिक ."
तो हात सोडला आणि म्हणाला .
कार्तिक -" काय झालाय ? आणि डोळे का सुजलेत तुझे ?"
स्नेहा -" काही नाही रे .."
कार्तिक -" किती कॉल केलो होतो . काय झालाय सांग प्लिज .."
स्नेहा -" कार्तिक ... प्लिज मला जाऊदेत ... मला बर वाटत नाहीये .. आपण नंतर बोलूयात ..."
कार्तिक तिच्या दोन्ही खांद्याला पकडून म्हणाला .
कार्तिक -" काय झालाय सांग ..."
ती मोठ्यांनी ओरडली .
स्नेहा -" जाऊदेत मला ... कळत नाहीये का ?"
मोठ्यांनी ओरडल्याने कार्तिक तिला सोडून दिला . बाकी आजूबाजूचे त्यालाच पाहू लागले . ती काही न म्हणताच निघून गेली . कार्तीकलाही आता राग आलेला होता . तो रागात परत घराकडे निघू लागला . तेवढ्यात त्याचा फोन वाजला ....
**********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच ... हा भाग कसा वाटला नक्की सांगा ... धन्यवाद