तुझी ती भेट भाग -15

Sneha want to clear the emotions . But she cant

या आधी -

      अलिना , स्नेहा आणि कार्तिक हे अलिनाच्या मुडसाठी सहलीला जाण्याचा निर्णय घेतात . आधी ते डिस्नीलँडमध्ये खूप सारी मज्जा आणि मस्ती केले . त्यानंतर हे सगळे ताहोई तळेच्या ठिकाणी आले . जिथे अलिनाला , स्नेहा आणि कार्तिक यांच्यातील जवळीकमुळे तिच्या मनाला ठेच पोहचली . तिचा मूड खराब झाल्यामुळे स्वतःमध्येच राहू लागली . मूड चांगलं करण्यासाठी कार्तिक तिला आणि स्नेहाला हेअर्स्ट किल्ला बघण्यासाठी घेऊन जातो . तिथल्या लव्हर पॉइंटला अलिना आणि कार्तिक यांच्यामध्ये प्रेमाचं क्षण निर्माण झाल.

-------------------------------------------------------------

यापुढे -

      दोघांचे डोळे तांबूस किरण्यांनी चमकू लागली होती . अस बघताच तिने त्याच्या खांद्यावर हलकीशी मान ठेवली . अगदी क्षण थांबून गेल्यासारखं वाटू लागलं . दोघेही त्या नजार्यात हरवून गेलेले होते . 

       इतक्यात स्नेहा पाण्याची बाटली घेऊन आली आणि तिची नजर या दोघांवर पडली . बघताच तिच्या हातातील पाण्याची बाटली खाली पडली . त्या आवाजानेच हे दोघे मागे पाहिले , तर स्नेहा पडलेल्या बाटल्यांना गडबडीत उचलत होती . 

अलिना -" Hey wait ... Let me help you ."

       अस म्हणत अलिना स्नेहाच्या मदतीला आली . स्नेहा खोटी स्माईल दाखवत बाटल्यांना उचलू लागली . तिघांसाठी ती पाण्याची बाटली आणली होती . बाटली उचलताच प्रत्येक जण एकेक बाटली घेतले आणि पाणी पियू लागले . दिवसभर फिरल्याने त्यांना तहान लागलेली होती . 

      तांबूस किरणे आता अंधारात रूपांतर होत होती . अंधारात त्या किल्ला प्रकाशमय होऊ लागली होती . तिथले लायटिंग चालू झालेली होती .

स्नेहा -" Lets go guys ."

स्नेहा अगदी जड मनाने म्हणाली .

अलिना -" come on guys ... Lets spend some more time here ."

कार्तिक -" No alina ... she is right . we have to go . Otherwise we will be late for tomorrow.”

       असेच हा ना करता अलिना अखेर जाण्यास मान्य झाली . हॉटेलच्या दिशेनी जात असताना कार्तिक अलिना आणि स्नेहाच्या मध्ये होता . स्नेहा कार्तिकच्या चेहऱ्याकडे नैराश्याने पाहत होती , तर अलिना मनात खुश होऊन कार्तिककडे पाहत होती . दोघींचे कारण वेगळी असले तरी एकीने प्रेमाचे क्षण नुकतीच अनुभवले होती आणि एकीचे प्रेम भंग झाल होत कारण कार्तिकच प्रेम नसल्याच सांगितलेल होत . दोघींचे हात कार्तिकच्या स्पर्श घेऊ पाहत होते . दोघींचे हात हळूच त्याच्या हाताजवळ येत होते आणि थोडीशी स्पर्श जाणवताच कार्तिक एकदा अलिनाकडे पाहिलं आणि एकदा स्नेहाकडे पाहिलं . शेवटी एक मोठीशी स्माईल देत दोघींच्या गळ्यात हात घातला . दोघींना धक्का बसला खरा पण दुसऱ्या क्षणी त्या सावरल्या . अलिना जाम खुश होती . कार्तिकचा हात जरी तिच्या गळ्यात आला असला तरी स्नेहा फक्त बाहेरून खुश होती . आतून तिच्या मनातील वेदना चालूच होत्या .

        काहीवेळानंतर ते हॉटेलच्या रूममध्ये पोहचले . तिघेही थकले होते , त्यामुळे रात्रीच जेवण ते रूममध्येच मागवले . जेवत असताना अलिना आणि कार्तिकमध्ये गप्पा चालूच होत्या . पण स्नेहा फक्त होकार देत होती . तीच मन जेवणात हि लागत नव्हतं . तीचे भावना आतून दुखावल्या गेल्या होत्या .तिला रडायचं होत , पण यांच्यासमोर ती शांत होती . 

कार्तिक -" we should sleep now ..."

अलिना -" yeah ..."

       परवा अलिनाच्या ऍडची शूटिंग होती म्हणून तीही कार्तिकच्या वाक्याला होकार दिली . बेड मोठी असल्याने तिघेही झोपू शकत होते .आधी अलिना झोपली , तिच्याबाजूला कार्तिक झोपला आणि कार्तिकच्या बाजूला स्नेहा झोपली . कार्तिक बेडवर पडताच झोपी गेला . स्नेहा फक्त बेडवर पडली होती आणि विचार करत होती. इकडे अलीनाही जागी होती . स्नेहाच्या मनात भावनांचे स्पॉट होत होते . ती बेडवरच कार्तिककडे वळली . तो गाढ झोपला होता . त्याच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत होती . पण हे प्रेम एकतर्फे होत . न कळत स्नेहाच्या गालावरून अश्रू खाली येऊ लागली होती  . असं का होत आहे हे तिलाही समजत नव्हतं . 

    इकडे अलिनाही कार्तिकच्या चेहऱ्याकडे पाहत होती . आजच अनुभवलेलं क्षण ती विसरू शकत नव्हती . तिच्या मनात प्रेमाची स्पंदने उटत होती . अशीच भावना घेत ती त्याला पाहत होती . 

     मध्यरात्रीची वेळ होती . स्नेहाला अजूनही  झोप आल नव्हतं . ती अजूनही संध्याकाळच्या घटनेवर विचार करत होती . तळेच्या किनारी ती आणि कार्तिकच्या मध्ये घडलेली घटनेबाबत विचार करत ती अजून दुखावली जात होती . 

      ती बेडवरुन उठली . अलिना आणि कार्तिक झोपले होते . ती  वॉशरूममध्ये गेली आणि बेसिनचा नळ चालू करून तोंडावर पाणी मारू लागली . दोन तीनवेळा पाणी मारल्यावर ती पुढच्या आरश्यात पाहू लागली . काहीक्षण ती तशीच पाहत होती . अचानक तिला रडू सुटल. अश्रूला ती वाहू देत होती . तिच्या मनातील भावना अश्रूच्या रूपात बाहेर येत होती . अशीच रडत ती खाली बसली . दोन्ही गुढघ्याच्या मध्ये तोंड लपवून रडू लागली . काही वेळ ती अशीच रडत होती . नंतर उठून ती  परत तोंडावर पाणी मारून झोपायला गेली आणि बेडवर पडली . विचार करता करता  तीचा डोळा लागला . 

      सकाळच्या वेळी अलिना तिला उठवू पाहत होती . काहीवेळानंतर स्नेहा उठली . 

अलिना -" sneha ... Wake up ... We have to go back to california ..."

   स्नेहा काही न म्हणताच उठली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली . कार्तिकला कळून चुकलं कि हिला काहीतरी झालाय . ती फ्रेश होऊन बाहेर आली . सगळी पॅकिंग झाली आणि ते तिघे रूम सोडले . हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केले . तेंव्हाही स्नेहा गप्पच होती . बॅग कारमध्ये ठेवण्यात आल. स्नेहा काही न म्हणताच मागील सीटवर बसली . हि सुद्धा गोष्ट कार्तिकला खटकलं . अलिना समोरच्या सीटवर बसली आणि कार्तिक कार चालवू लागला . स्नेहा काही न बोलताच  बसली होती . अलिना आणि कार्तिक गप्पा मारत होते . स्नेहा मात्र गप्प होती . 

    कॅलिफोर्नियाला ते सगळे संद्याकाळच्या वेळी पोहचले . कार घराच्या समोर उभी होती . अलिना बॅग आत घेऊन जात होती . स्नेहा तिची बॅग घेऊन उभी झाली . 

स्नेहा -" कार्तिक मी जाते .."

कार्तिक -" अग थांब ना .. सोडतो तुला ..."

स्नेहा -" नाही नको ... मी जाते ... हॉस्टेल बंद होईल नाहीतर ..."

कार्तिक -" मग इथेच रहा .."

स्नेहा -" नाही नको ... जाते . अलिनाला हि सांग . बाय "

      असं म्हणत ती कार्तिकच पुढचं बोलणं न ऐकताच निघाली . कार्तिकच्या मनात कित्येक प्रश्न उत्पन्न झाली होती .

**********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच ... हा भाग कसा वाटला नक्की सांगा ... धन्यवाद 

🎭 Series Post

View all