तुझी ती भेट ... भाग -५

The night where Alina drinks beer qt her room Kartik arrives there and giving some important lesson .

     कार्तिक बेडरूममध्ये शिरताच त्याच्या पायाजवळ दोन किंवा तीन बिअरचे  कॅन पडलेले होते. बेडवर अलिना विंडोकडे बघत बिअर पित होती. ते बघताच कार्तिक म्हणाला 

कार्तिक -" Alina.."

अलिना बियर पित तसेच मागे बघितली आणि बिअरची कॅन तोंडामधून काढत म्हणाली 

अलिना -" Ohh.. Kartik.. Hi.."

कार्तिक -" What's this???"

अलिना -" It's beer ????.."

ती थोड्या नशेत बोलत होती. 

कार्तिक -" I know that... But why are you drinking this?"

अलिना -" ---"

       ती तशीच बिअर तोंडाला लावून पित त्या खिडकीच्या बाहेर बघत होती. कार्तिक तिच्याकडे प्रश्र्नार्थी नजरेने बघू लागला. खिडकीच्या बाहेर बघत असताना अचानक तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले. ते बघताच कार्तिक तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

कार्तिक -" Alina... Are you ok??? ????????"

ती हसतहसत अश्रू पुसत म्हणाली. 

अलिना -" Yeah ... Absolutely "

तिच्या त्या खोटासा हास्यावर कार्तिकचा विश्वास बसत नव्हता. 

कार्तिक -" Alina... Please tell me... You can share with me .."

.... एवढं बोलून गप्प असणारी अलिना आता रडत होती. रडता रडता ती मधून बिअरचा घोटसुद्धा पित होती . कार्तिक शेवटी वैतागून तिच्या हातातून बिअरची कॅन काढून घेतला. 

कार्तिक -" Stop it Alina... what's wrong with you??"

अलिना  काही न म्हणता खिडकीच्या बाहेर बघत म्हणाली

अलिना -" You know ... when I was in eighth standard , my father leave us for money . Then from that day, my mother was everything for me. But destiny don't want to bring smile on my face . Three years ago, my mother also leaves me in this f***king stupid world  and then these f**king directors assumes that every girl are going to do whatever with them for the small roll in films..."????????????

तेवढी म्हणून परत ती बिअरचा कॅन कार्तिकच्या हातातून घेऊन तोंडाला लावली. कार्तिक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला.

कार्तिक - " Hmm... You know .. what I'm doing in such type of conditions ??"

अलिना  खिडकीच्या बाहेर बघतच म्हणाली . 

अलिना -" What ??"

कार्तिक -" I'm sharing with friends .."

अलिना -" Which I don't have ..."

तिची दिलेली पटकन अश्या रिप्लायला काय उत्तर द्यायचे हेच कार्तिकला कळत नव्हतं.

कार्तिक -" One minute ..."

तो त्याच्या बॅगमधून हेडफोन्स काढला आणि मोबाईलला कनेक्ट करून अलिनाला म्हणाला.

कार्तिक -" You know... My mom always says that if you trapped in such a situation , then you must be listening the songs."

अलिना -" Then Problems will be solved ??"

कार्तिक -" No... You will get the solutions to solve it..????????????"

कार्तिक साँग्ज शोधतच म्हणाला.

कार्तिक -" Are you hungry???"

अलिना -" Ahhh...????????"

अलिना कार्तिककडे बघत म्हणाली.

अलिना -" Yeah ....Little bit..."

कार्तिक -" Then... You listen the songs , I'll make something to eat...????????" 

कार्तिक तिच्या कानाला हेडफोन्स घालून किचनमध्ये जाऊ लागतो , परत मागे वळून म्हणतो. 

कार्तिक -" And stop drinking....????????"

अलिना -" Just one more shot.."

       कार्तिक मान हलवत किचनमध्ये गेला.  अलिना साँग्ज ऐकत आणि घोट घेत खिडकीच्या बाहेर बघत होती. बाहेरचं अत्यंत शांत वातावरण  बघत ती गाणे ऐकत होती. मधून तिच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा येत होते. 

      किचनमध्ये कार्तिक नूडल्स बनवत होता. कारण वेळसुद्धा खूप झाली होती आणि भूकसुद्धा खूप लागलेली होती. थोड्यावेळाने नूडल्स तयार झाल्यावर एका ट्रेमध्ये दोन नूडल्सनी भरलेल्या  बाउल घेऊन तो बाहेर आला . बघतो तर काय गाणे ऐकत अलिना झोपलेली होती. कानात हेडफोन्स आणि हातात बिअर ची कॅन तसेच होते. 

       बेडवर निपचित पडलेली बघून कार्तिक तिच्याजवळ गेला. हळूच तिच्या कानातले हेडफोन्स , कॅन काढला आणि तिला बेडवर  झोपवला.  तिचे नुकताच केलेले सिल्की केस तिच्या तोंडावर येत होते. कार्तिक तिच्या त्या केसाला हळूच कानामागे घेतला. खूप रडल्याने तिचे आय लायनर पुसट झालेली होती . रडण्याने तिचे डोळेसुद्धा जरासा सुजून गेलेला होता. त्याला मनापासून वाटत होत की अलिनाच हे स्ट्रगलींग पिरियड संपाव आणि ती फेमस अॅक्ट्रेस व्हावं. तिला शांतपणे झोपलेली बघून कार्तिकला मनात एक वेगळीच समाधान मिळत होती . तिला बघतच कार्तिक नूडल्स खाऊ लागला. तो तिच्याच विश्वात हरवून गेला होता. ती झोपताना एक क्यूट छोटीशी मुलगी वाटत होती . डिनर संपल्यावर तो तिला बघतच तिच्या बेडवर झोपी गेला. तिला झोपताना बघताबघता त्याचापण डोळा लागला. 

          सकाळची वेळ होती . सूर्याची ती कोवळी किरणे  रूममध्ये पसरलेली होती. तीच कोवळी किरणे अलिनाच्या तोंडावर पडू लागलेली होती . त्याच किरणांनी अलिनाला जोपेतून जागवल. अलिना त्याच खिडकीमधून बाहेर पाहू लागली , तर तिथे एका सुंदर दिवसाची सुरुवात दिसत होती. तिच्यात एक नवीनच ऊर्जा आलेली होती . तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज निर्माण झालेली होती. उठून सर्वात आधी ती कार्तिकला शोधू लागली. ती शोधता शोधता किचन मध्ये गेली , तर तिथे  तो नव्हता.  पण टेबलवर एक बाऊल ठेवलेली होती. अलिना ती बाऊल उघडून बघती तर त्यात ब्रेकफास्ट तयार करून ठेवलेला होता. त्या बाऊल च्या खाली एक चिठ्ठी होती. अलिना ती चिठ्ठी उघडून बघते तर ती चिट्टी कार्तिकची होती. 

" New day, new morning.. .Welcome this day with smile and do your best.. I'm with you ... Never give up and I know that you will be successful actress .. Eat this breakfast... I'll be back in time ...???????? "

ती चिठ्ठी वाचून अलिनाच्या चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माइल पसरलेली होती. हसऱ्या चेहऱ्याने ती म्हणाली ," Thank you , Kartik..????????"

--------------------

     आज कॅन्टीनमध्ये खूप गर्दी होती. स्नेहा आणि कार्तिक त्यांच्या नेहमीच्या टेबलवर कॉफी घेत बोलत होते. 

कार्तिक -" काल अलिनाचा ऑडिशन होता . त्यात तिच्यासोबत तेच झालं जे तिच्यासोबत पहिलापासून घडत आलेला आहे. त्यामुळे काल ती डिप्रेशनमध्ये होती. "

       

स्नेहा -" सगळ्यांच्या लाईफमध्ये अशी परिस्तिथी कधीनाकधी येतेच..."

कार्तिक -" तुला कधी आला होता का??"

स्नेहा -" नाही... पण पुढे येणार नाही असे पण सांगता येत नाही ना..."

कार्तिक -" पण त्यांच्या जवळचे त्यांना समझुन घ्यायला हवं की जेणेकरून त्याला पुढे काय करावं याची नवीन उमेद मिळेल."

स्नेहा -" हे सगळं सांगण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी चांगलं वाटतं पण जो कोणी डिप्रेशन मध्ये असतो त्यालाच ठावूक असत की त्याच्या मनात काय चालल आहे."

कार्तिक - " हे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे... पण त्या व्यक्तींना सुद्धा जवळचा कोणी पाहिजे असत ना. "

स्नेहा -" हो..."

कार्तिक -" तेच काम मी काल अलिनासोबत केलं. तिला सर्व काही सांगितल जे तिला नवीन उमेद देईल.."

स्नेहा -"  ती सावरेल??"

कार्तिक -" होप तर आहे... ती होईल बरी... तस सीरियस नव्हतच... "

स्नेहा -" ह्म म... मी पण तिला एकदा भेटू इच्छेते. तुझ्या तोंडून तिचे खूप वर्णन ऐकले मी...????????"

स्नेहा जेंव्हा जेंव्हा अलिनाच वर्णन कार्तिकच्या तोंडून ऐकत होती ती तेंव्हा खूप जेलस फील करत होती. का कुणास ठावूक ?? हा प्रश्न तिला सुद्धा पडलेला होता.

कार्तिक -" मग येणार आज घरी??"

स्नेहा -"हो... पण लेक्चर संपल्यावर.. "

दोघेही कॅन्टीनमधून क्लासला गेले. दोघांचे डिपार्टमेंट वेगळे होते त्या कारणाने त्यांना वेगळा मार्ग घ्यावा लागत होता. 

     संध्याकाळ होत आलेली होती. दोघांचे लेक्चर्स झालेले होते. दोघेही आता घरी निघाले. 

कार्तिक -" मग येतेस ना घरी??"

स्नेहा -" हो... पण थोड्यावेळ थांबेन.."

कार्तिक -" चालेल ना चल..."

       कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर कित्येक जण चालत जात होते.फूटपाथवरून कार्तिक आणि स्नेहा दोघेही गप्पा मारत निघाले होते. स्नेहाला अधूनमधून कार्तिकच्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला लागत होता. त्याच स्पर्शाने ती फुलून जायची . कार्तिक आपल्या बडबडमध्ये व्यस्त होता तर स्नेहा त्याला बघण्यात आणि त्याच्या वाक्याला मान हलवण्यात व्यस्त होती. 

     गप्पा मारता मारता दोघेही टॉयच्या स्टोअर जवळ आले. कार्तिक त्या स्टोअरमध्ये गेला तर तिथे अलिना तिथे नव्हती. तिथे विचारपूस केल्यावर समझल की ती तर आज स्टोरला आलीच नव्हती. कार्तिकला आता चिंता वाटू लागली होती . दोघेही जितक्या लवकर होईल तितक्या लवकर घरी पोहचले . तिथे दोघेही शोधले तर तिथे सुद्धा ती नव्हती. स्नेहाला थोडी ना होईना तिची चिंता वाटू लागली होती. कार्तिक जवळ तिचा मोबाईल नंबर सुद्धा नव्हता . कार्तिक आणि दोघेही चिंतेत असतानाच अचानक बेल वाजण्याचा आवाज आला...

********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच येईल... हा भाग आवडल्यास नक्की कमेंट करा ... शेअर करा.. मला माहिती आहे की हा भाग लहान आहे पण मी नक्की प्रयत्न करेन की अजुन मोठा भाग प्रकाशित व्हावा .... धन्यवाद ????????????????

🎭 Series Post

View all