तीची कथा

तीची कथा
गोष्टी बदलतात
माणसं बदलतात
शाश्वती ती कसली इथे
काय बदलेलं,कोण बदलेलं,
कसं बदलेलं,किती बदलेलं....
कालपर्यंत आपली वाटणारी प्रत्येक व्यक्ती
 शेवटपर्यंत आपलीच असेन कशावरंन...??
आज व्देष करणारी व्यक्ती
शेवटपर्यंत तशीच वागेन कशावरंन...??
बदल हा अविरत असतो....
आणि तूही बदललीस की...!!?
पूर्वीची तू खुप वेगळी होती....
हल्ली तू अानंदी असते नेहमी
जग काय बोलेन याने तूला फार काही फरक पडत नाही आता...
कोणासाठी,कशासाठी किती तडजोड करायची ??
कि नाही करायची...
हे बरोबर समजतं आता तूला....
तूही काही बदलांची सुरूवात स्वतःपासनं कर
तू आहे तशी सर्वांना आवडतं असेन तर ठीक...
नाही तर नाही....
काहीच बिघडत नाही....
तूला तूझ्यातलीच नवी तू आवडतेना आता...!!!
ते महत्वाचं....
आरशासमोर उभी राहून काजळाची रेघ ओढतांना किती विचार करतेस तू....
पण आज तूझ्या डोळ्यांत वेगळंच तेज 
वेगळीच चमक दिसतीये....
बोलली ना मी....
तूही बदललीयेस.....!!!
     © एकज वर्णिक
         ( शिवानी )