तिचा खऱ्या प्रेमा पर्यंतचा प्रवास (भाग १०)

Madhuri visits advocate for devorce.

 माधुरी आणि गौरी  दुपारी 2 वाजता घरी पोहोचल्या. माधुरी ने बाबांना फोन करून कळवल की नीट पोहोचलो म्हणून. 

 इकडे मावशी सगळं स्वयंपाक करून यांची जेवणासाठी वाट बघत होती. दोघी घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन खाली आल्या. तोपर्यंत मावशीने जेवण गरम करून टेबलावर घेतले.

 या खाली आल्या तेव्हा तीन ताट बघून गौरीने विचारलं.

गौरी - " हे काय मावशी, तू अजुन जेवली नाहीस?"

मावशी -" ग म्हणाल एकत्रच जेवू. म्हणून थांबले"

गौरी -" पण तुला गोळ्या घ्यायच्या असतात ना. जेवायचं होत ना. असो आता तू बस.मी वाढते. "

माधुरी पण गौरी बरोबर वाढू लागली. तिघी जेवल्या.

मावशी आवरण्यासाठी उठू लागली.

माधुरी - " मावशी, तुम्ही बसा, मी अवरते. आधीच केवढ केलं तुम्ही "

मावशी - " असुदे ग, तुमचा खूप प्रवास झाला आहे. आणि मला अहो जावो करू नकोस. अे मावशी म्हण. गौरी जसं म्हणते तसं"

 माधुरी -  " हो मावशी"

   

अस म्हणत त्या दोघींनी सगळं आवरल. मावशीला काही करू दिलं नाही. मावशीला दोघिकडे बघून बर वाटले. तिला आधीपासूनच अस वाटायचं की तिला एक मुलगी असायला हवी होती. पण ती कमी गौरी आणि माधुरी पूर्ण करत होत्या. मुली लवकर समजून घेतात पुढच्याच कष्ट.

मावशी सोफ्यावर  बसली होती. या दोघी पण आवरून तिथे येऊन बसल्या. 

 मावशी -" कसे आहेत बाबा, काय म्हणाले ते "

माधुरी -"बाबांना मी सगळं सांगितलं. त्यांना खूप वाईट ही वाटल.पण माझ्या या निर्णयात ते माझ्याबरोबर आहेत. "

 माधुरीचा चेहरा उतरला होता.

 मावशी - " एक स्त्री म्हणून मी समजू शकते हे सर्व करताना तुला किती यातना, त्रास होत आहे. पण आता तू माग वळू नकोस. झालं ते झालं. ते नको व्यायला म्हणून तू करायचे तेवढे प्रयत्न ही केलेस. आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. झालेल्या गोष्टीचा तुझ्या भविष्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. नवीन आयुष्याची सुरवात कर. मी आणि गौरी आहोतच "

माधुरीच्या डोळ्यात पाणी आले. अशी कितीशी ओळख होती तिची मावशी बरोबर तरी पण किती जीव लावतात या आपल्याला.

डोळ्यातील पाणी पुसत माधुरी म्हणाली " हो मावशी, "

मावशी - " आणि हो, तुझा स्वाभिमान जपायचा म्हणून मी तुझ्या कडून पैसे घ्यायला तयार झाले. पण तू इथे भाडेकरू म्हणून राहू नकोस. आपलं घर मान. जशी मला गौरी तशी मला तू. "

 माधुरी - " हो मावशी "

मावशी जरा झोपायला तिच्या रूम मधे गेली. नंतर गौरी आणि माधुरी पण वरती आपल्या खोलीत गेल्या.

खोलीत माधुरी आणि गौरी आडव्या पडून बोलत बसल्या. 

माधुरी - " आता एक चांगले वकील शोधले पाहिजेत."

गौरी - " हो, तू सतीशशी बोलून घे हवं तर."

माधुरी - " मी फोन करून बघेन. पण मला नाही वाटत ते फोन उचलतील."

अस म्हणून माधुरी फोन करून बघते. सतीश फोन उचलत नाही.

इतक्यात बाबांचं फोन येतो.

बाबा -  " माधुरी, कशी आहेस, प्रवासाचा त्रास नाही ना झाला ?"

माधुरी - " नाही बाबा. एवढ काही नाही वाटल "

बाबा - " तू पुढील गोष्टींसाठी वकील बघितला का ?  "

माधुरी - " नाही अजुन. कोण माहीतत पण नाही "

बाबा - " माझ्या ओळखीचे एक वकील आहे. अडवोकेट कोठारी. मी त्याचा नंबर तुला देतो. भेटून घे."

माधुरी - "हो बाबा"

बाबा काळजी घे म्हणून फोन ठेवतात.

माधुरी गौरीला सांगते की "बाबांनी एक वकील सांगितलेत म्हणून. कोठारी नाव आहे त्यांचं."

गौरी -" ह्या वकिलांचा नावाचं ऑफिस  बहुतेक आपल्या  ऑफिसच्या वाटेत बघितल्या सारख वाटत आहे. आपण उद्याच ऑफिसला जाताना बघू."

 माधुरी - " हो "

असच दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी दोघी सकाळी लवकर अवरतात. मावशीला कल्पना देऊन लवकर घराबाहेर पडतात. गौरीला जे वाटतं असत तसच त्यांचं तिथं ऑफिस असत. 

 दोघी आता जातात. वकील अजुन आलेले नसतात. ऑफिस स्वच्छ करणार माणूस म्हणतो , " बसा थोडा वेळ, साहेब येतीलच इतक्यात "

 दोघी ऑफिस मधे फोन करून यायला १ तास तरी उशीर होईल अस कळवतात.

थोड्या वेळाने वकील येत्तात.

या दोघी केबिन मध्ये जातात.

 वकील - " बसा, बोला काय काम आहे तुमचं ?"

माधुरी - " नमस्कार, मी माधुरी आणि ही माझी मैत्रीण गौरी. मला डिव्होर्स हवा आहे म्हणून मी इथे आले आहे."

वकील - " का हवा आहे आपल्याला डिव्होर्स ?"

माधुरी - " खर तर हे लग्न माझ्या नवऱ्याच्या मर्जी विरूध्द झालं. ते नात स्वीकारत नाहीत. आणि आता माझेही प्रयत्न संपले आहेत. "

वकील - "म्हणजे? मला पहिल्यापासून सगळ सांगा."

माधुरी त्यांना आत्तापर्यंतचा सगळं घटनाक्रम सांगते.

वकील - " अस तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात त्यांनी फसवल. त्यांना हे नातच नको आहे. शिवाय तुमच्या सासूने तुमचा छळ ही केला आहे."

माधुरी - " हो"

वकील - " आपण या बाबतीत त्यांच्याकडून चांगली पोटगी घेऊ शकतो. शिवाय घरगुती हिंसा झाली हे ही दाखवू शकतो . तुम्ही तुमच्या पतीला ही कल्पना दिली आहे का डिव्होर्स ची."

माधुरी - " नाही"

वकील - " पण हे सगळ करण्याअगोदर माझ अस म्हणणं आहे की आपण तुम्हा दोघांना समोर समोर बसवून बोलून बघू. आणि त्यातून ही जर तुम्ही या मतावर ठाम असल तर मग आपण पुढे डिव्होर्स ची तयारी करू "

माधुरी - " ठीक आहे सर. पण मला वाटतं शेवटी हेच होणार आहे . "

वकील - " तुम्ही त्यांना इथं बोलवून घेऊ शकता का"

माधुरी -" मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचं प्रयत्न करत आहे पण ते उत्तर देत नाहीत."

वकील - " मला जरा नांबर देता. मी एकदा तुमचा वकील म्हणून बोलून बघतो."

माधुरीने त्यांना नंबर दिला.त्यांनी त्याला कॉल केलं आणि त्याने तो उचललं ही.

वकिलांनी त्याला फोन वरून सर्व माहिती दिली. आणि शिवाय उद्या संध्याकाळी ऑफिस वर भेटायला यायची वेळ दिली.

माधुरी आणि गौरी ही त्यांच्याशी बोलून ऑफिसला गेल्या.

दुपारी माधुरीला सतीश चा फोन आला.

उचलू का नको विचार करत तिने फोन उचलला.

क्रमशः

🎭 Series Post

View all