तिचा खऱ्या प्रेमा पर्यंतचा प्रवास (भाग २३. अंतिम भाग)

A baby comes in the life of Madhuri and Vinay

भाग - २२

https://www.irablogging.com/blog/her-story-towards-true-love--chapter-22_3633


 

भाग - २३


 

एक दिवस माधुरी आणि विनय समान खरेदी साठी बाहेर पडले होते 

सगळं सामान घेऊन ते परत घरी निघाले. दुपार झाली होती.

इकत्यात त्यांना रस्त्यावर गर्दी दिसली. दोघे गाडीतून उतरले आणि गर्दीच्या दिशेने गेले.

एक वयस्कर आजी पडली आहे अस लोक म्हणत होते.

दोघे बघायला गेले, त्यांनी त्या आजीकडे पाहिले.

विनय ला काही ओळखीचे न्हवते पण माधुरी , माधुरीने ओळखलं. या तर सतिशच्या आईं, वीणाताई.

कोणी त्यांना मदत करत नाही हे बघून विनय माधुरीला म्हणाला,

" आपण यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ. बिचाऱ्या बेशुद्ध आहेत"

माधुरी ने पण मानेने होकार दिला आणि विनयला मदत करू लागली.

दोघानी त्यांना गाडीत बसवलं.

जाताना माधुरीने विनयला त्यांची ओळख सांगितलं.

माधुरी - " अरे विनय, या तर सतिशच्या आईं "

विनय - " काय सांगतेस. अग मग फोन करून सांग त्याला."

माधुरी - " काही तरीच काय, माझ्याकडे त्यांचा नंबर नाही"

विनय -" अग मग आता कळवायच कसं?"

माधुरी - " शेजारी एक काकू होत्या त्यांचा नंबर आहे माझ्याकडे, त्यांना निरोप देते. त्या सतीश ना सांगतील."

विनय - " ठीक आहे"

तोपर्यंत ते हॉस्पिटल मध्ये पोहोचले. त्यांनी विणाताईना हॉस्पिटल मध्ये दाखल केलं

थोडे पैसे भरले भरले.

विनय ने घरी फोन करून सारा वृत्तान्त कळवला. थोडा वेळ लागेल यायला हे ही सांगितलं.

माधुरीने पण शेजरच्या काकूंना फोन केला.

काकू - " कोण?"

माधुरी - " मी माधुरी बोलत आहे,"

काकू - " अग माधुरी, बोल ग कसा फोन केलास."

माधुरी -" काकू, अहो वीणाताई आम्हाला रस्त्यात चक्कर येऊ पडलेल्या दिसल्या. आम्ही त्यांना मोहिते हॉस्पिटल मध्ये आणले आहे. तुम्ही जरा सतीश ना कळवता का? माझ्या कडे नंबर नाही"

काकू -" काय सांगतेस, हो मी लगेच फोन करते. घरात तर आला नाही आहे बहतेक."

अस म्हणून त्यांनी फोन ठेवला.

माधुरी आणि विनय हॉस्पिटल मध्ये थांबले होते.

इतक्यात काकू आल्या.

माधुरी -" काकू, तुम्ही? सतीशला कळवला का?"

काकू - " ग त्याचा फोन लागत नाही म्हणून मी आले."

माधुरी - " हा. पण या घराबाहेर कसं काय पडल्या. कधी बाहेर जात नाहीत ना त्या."

काकू - " अग काय सांगू तुला. तुम्ही वेगळे झाला आणि त्यांची वेळच फिरली.  तुम्ही वेगळे झाल्यावर सतीश ने त्या मुलीशी लग्न केलं.  घरात नुस्ते भांडण, सुख अजिबात न्हवत. त्यात सतिशच्या कंपनी तून अचानक काही लोकांना कमी केलं. त्यात त्याची नोकरी पण गेली. जसा पैसा येणं कमी झालं तस तर भांडण अजुन वाढली. सतीश नौकरी शोधत होता पण त्याला अजुन पण नोकरी नाही मिळाली. त्या मुलीचं फक्त त्याच्या पैसावर प्रेम. काही दिवसापूर्वी ती घरातील सोन, पैसा घेऊन पळून गेली. दोन चार दिवस सतीश शोधत आहे तिला. त्याला तर धक्का बसला या सगळ्याचा. घरी आलाच नाही तो अजुन. त्याला शोधायला म्हणून या बाहेर पडल्या असतील. तेव्हा चक्कर येऊन पडल्या असतील."

माधुरीला ऐकुन वाईट वाटलं. 

थोड्यावेळाने माधुरी आणि विनय गेले.

सतीशला फोन लागला. तो येत आहे म्हणून काकू पण गेल्या.

सतीशला स्वतची लाज वाटू लागली. आपल्यामुळे आईवर ही वेळ आली अस वाटू लागलं.

त्याने नर्स ना विचारल," कोणी आणले माझ्या आईला येते, मी भेटू शकतो का त्यांना?"

नर्स - " मिस्टर विनय आणि त्यांची बायको, ते दोघे घेऊन आले यांना. "

असे म्हणून ती निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी नर्स ने सतीशला काही औषधे लिहून दिली आणि आणायला सांगितली. तो गेला.

त्याचा दरम्यान विनय आणि माधुरी हॉस्पिटल मध्ये आले.

दोघे वीणाताई समोर उभे होते. वीणाताईना आता बर वाटत होत. सलाईन मुळे त्यांना शुध्द आली होती.

त्यांनी बघितल, समोर तर माधुरी आणि कोण तर मुलगा आहे.

इतक्यात नर्स म्हणली," मावशी, हेच दोघे तुम्हाला येथे वेळेत घेऊन आले"

वीणाताई च्या डोळ्यात पाणी आले.

विनय -" कशा आहात तुम्ही, बर वाटत आहे का आता?"

वीणाताई -" हो, धन्यवाद तुमचे. "

विनय -" अहो काही तरीच काय?"

इतक्यात विनयचा फोन वाजला म्हणून तो बाहेर आला.

आता तिथं फक्त वीणाताई आणि माधुरी.

वीणाताई नी माधुरी कडे बघीतल. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बघून त्यांना कळलं.

वीणाताई -" लग्न केलेस?"

माधुरी -" हो, ते माझे मिस्टर"

वीणाताई -" पोरी, माफ कर आम्हाला. मी तुला खूप दिला. आमच्यामुळे तुला त्रास झाला. तुझे आम्ही गुन्हेगार आहोत. कदाचित त्याचीच शिक्षा मिळत आहे आता आम्हाला."

माधुरी -" असा विचार करू नका, झाला ते झालं, मी सगळं विसरले आहे तुम्ही पण विसरा. काळजी घ्या स्वतः ची."

वीणाताई ना लाज वाटतं होती आपल्या वागणयाची. ज्या मुलीवर आपण इतके अत्याचार केले तीच आज आपल्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आली.

बाहेर विनयचा फोन चालू होता. इतक्यात सतीश औषध घेऊन आला. त्याने औषध नर्स कडे दिली.

नर्स -" तुम्हाला भेटायचं होत ना, हेच ते मिस्टर विनय"

सतीश नर्सने दाखवलेल्या व्यक्ती कडे बघत होता.

तो तिकडे गेला.

विनयचा फोन झाला.

सतीश -" थँक्यु, तुम्ही माझ्या आईला वेळेत इथं घेऊन आलात"

विनयच्या एकदम लक्षात आलं नाही.

सतीश -" मी सतीश, काल तुम्ही माझ्या आईला येथे आणले"

विनय -" अच्छा, अहो त्यात काय एवढे, जे योग्य वाटलं ते केलं"

सतीश -" नाही हो खरंच, मला तुमचे आणि तुमच्या मिसेस चे आभार मानायचे होते ".

इतक्यात माधुरी पण बाहेर आली. तीच लक्ष न्हवत.

माधुरी -" विनय ,चल निघू आपण "

सतीशने माधुरी कडे बघितल आणि माधुरीने सतीश कडे.

सतीशला धक्काच बसला.

म्हणजे विनय आणि माधुरी नवरा बायको आहेत.

त्या दोघांना असे बघून त्याला त्याची चूक कळली.

ज्या मुलीची संसाराची सगळी स्वप्ने आपण धुळीला मिळवली, जिला आपण कधीही किंमत, मान दिला नाही तिने तसा विचार ही न करता आपल्या आईला येथे आणले.

किती चांगल्या मनाची आहे माधुरी , कदाचित म्हणूनच तिला योग्य जोडीदार मिळाला आणि ती आता सुखी आहे. तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे तसं.

आणि आपण, आपण इतके वाईट वागलो त्याचीच शिक्षा आपल्याला मिळाली. जो संसार करायचा म्हणून हिला बाजूला सारलं तोच संसार आज राहिला नाही. 

तिला मात्र त्याच्याकडे बघून सगळं आठवलं. जो प्रेमाचं प्रवास तिथून चालू झाला होता तो विनय पर्यंत आला होता पण पूर्ण झाला न्हवता. 

सतीश -" मी तुमचे पैसे हळू हळू परत करेन "

विनय -" काही घाई नाही, हे माझ्या मित्राचे कार्ड, इथं जावा, कदाचित तुमचे नोकरीचे काम होईल"

असे म्हणून विनय आणि माधुरी निघाले.

सतीशला मात्र जाणवलं, खरंच माधुरीच्या पात्रतेचे आपण कधीच नव्हतो.

असेच दिवस जात होते. एक दिवस माधुरीला चक्कर आली. तरी बर घरीच होती.

मावशी - " काय ग काय झालं, काय होत आहे.?"

माधुरी - " मावशी, अग सकाळपासून काही पोटात राहत नाही आहे. "

मावशीला अंदाज आला. गौरीला काही तरी सांगितल.

गौरी पण पटकन जाऊन किट घेऊन आली.

विनयला मात्र काही कळत नव्हते.

मावशीने माधुरीला आपल्या खोलीत नेल आणि तिला किट दिलं. चेक कर म्हणाली.

माधुरी ने पण चेक केलं.

ती लाजत बाहेर आली.

तिचा लाजलेला चेहरा बघून मावशी आणि गौरी ला कळलं. तिघींनी मिठी मारली.

बाहेर विनय टेन्शन मध्ये होता.

तिघी बाहेर आल्या.

मावशी -' विनय, आता माधुरीची खूप काळजी घेतली पाहिजे आपल्याला."

विनयचा टेन्शन अजुन वाढलं.

विनय -" का ग आईं काय झालं?"

गौरी - " आता एक छोटा पाहुणा येणार आहे घरी मग काळजी नको घ्यायला."

असे म्हणत गौरीने हाताने अक्शन करून दाखवली.

विनयला आभाळ ठेंगणं झालं. काय करू कळेना.

त्यानं माधुरी कडे बघितले, माधुरीने लाजून खाली बघितल.

घरात आनंदी आनंद. 

असेच महिने गेले.

डिलिव्हरीचा दिवस जवळ आला.

माधुरीला रात्री पासून कळा चालू झाल्या. लगेच हॉस्पिटल मध्ये नेले. सकाळी तिला कन्यारत्न झाले 

माधुरी अजुन पडून होती. थकली होती. जरा डोळे उघल्यावर तीने आजूबाजूला बघितल.

इतक्यात मावशी ,गौरी आणि विनय छोट्याश्या गोंडस बाळाला घेऊन तिथं आले.

तिच्या हातात बाळाला दिलं.

इवले इवले हात, पाय बघुन तिला भरून आल. बाळ तिच्याकडे एकटक बघत होत, मधेच हसत होत.

बाळाकडे हसत बघता बघता तिच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाश्रु तरळले.

तिने बाळाचा मुका घेतला.

तिच्या हातात तिच्या खऱ्या प्रेमाच, तिच्या आणि विनयच्या प्रेमाचं प्रतीक होत. 

तिचा खऱ्या प्रेमाचा सुरू झालेला प्रवास त्या बाळापर्यंत येऊन संपूर्ण झाला होता.

समाप्त.

नमस्कार,

या कथामालिकेला आपण दिलेल्या प्रतीसादाबद्दल धन्यवाद. असाच पाठिंबा देत रहा. लवकरच भेटू नव्या कथामालिके बरोबर.




 

🎭 Series Post

View all